हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

Date:

  • पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा स्पष्ट इशारा
  • आयटी पार्कमधील नालेसफाईसाठी ३१ मेची ‘डेडलाईन’
  • नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे पीएमआरडीएसह एमआयडीसी व ग्रामपंचायतींना निर्देश

पुणे: पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आता थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी (२९ एप्रिल) आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ३१ मे २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बैठका नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असे स्पष्ट करत महानगर आयुक्तांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. विशेषतः प्रमुख नाले आणि आयटी पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी न ढकलण्याबाबत त्यांनी बजावले.

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना महानगर आयुक्तांनी महत्त्वाचे निर्देश दिले. त्यात हिंजवडी-माण परिसरातील मुख्य नाले तातडीने मोकळे करून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करावे, नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे ३१ मेपूर्वी हटवावीत, तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पीएमआरडीएसह एमआयडीसी व संबंधित ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस शाखेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याचे बैठकीत ठरले. यावेळी हिंजवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आयटी पार्क परिसरातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती सादर केली.

“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.”— डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

या बैठकीला पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त पूनम मेहता, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल यांच्यासह जिल्हा परिषद, वन विभाग आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंजवडी व माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या...

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना,...

शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,बच्चू कडू निश्चित,झिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल

मुंबई -विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकींचे पुनर्वसन:विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेचा...