पुणे-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी व मोहन भागवत यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण, महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकारने त्वरीत कारवाई करावी.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, यशराज पारखी, नगरसेविका दिपाली डोख, अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, संगीता पवार, प्राची दुधाणे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, मोहसीन शेख, ॲन्थोनी जेकब, मिलिंद पोकळे, रविंद्र माझिरे, संदिप मोकाटे, मारुती माने, रवि आरडे, चेतन आगरवाल, फिरोज शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड, संतोष सुपेकर, चेतन पडवळ, अनिल धिमधिमे, वैभव डांगमाळी, ऋषीकेश बालगुडे, वीरेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

