पुणे बाल पुस्तक जत्रा ठरणार ज्ञान, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा उत्सव; पालक-शिक्षकांसाठीही खास पर्वणी

Date:

३० ते ४ मे दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य आयोजन

पुणे : लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारी, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लावणारी, कला संस्कृतीची माहिती करून देतानाच ज्ञानासोबतच मनोरंजनाची मेजवानी देणारी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ येत्या ३० एप्रिलपासून सुरू होत आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे ४ मेपर्यंत भरणाऱ्या जत्रेत मुलांसाठी विविध रंगतदार कार्यक्रम, कथा-कवितांचे सत्र, विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक मार्गदर्शन आणि खेळकर उपक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे ही जत्रा लहान मुले, पालक आणि शिक्षकांसाठी एकाच वेळी ज्ञान, मनोरंजन आणि प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन उपस्थित होते.

जत्रेचे उद्घाटन झाल्यानंतर १ मेपासून मुलांसाठी खास हास्य-मनोरंजन आणि संवादात्मक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. सकाळी ‘हसण्याची बायारकी’ या कार्यक्रमातून मुलांना खळखळून हसवणारा अनुभव मिळणार आहे, तर दुपारी ‘हा खेळ बाहुल्यांचा’ या उपक्रमातून कथानक आणि अभिनयाचा सुंदर संगम पाहायला मिळेल. सायंकाळी ‘चिंटू तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमातून मुलांचा लाडका पात्र प्रत्यक्ष भेटणार असल्याने बालप्रेक्षकांसाठी हा दिवस विशेष आकर्षण ठरणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे मुलांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे.

त्यानंतर २ मे रोजी जत्रेत शिक्षण आणि विज्ञानाचा संगम अनुभवायला मिळणार आहे. सकाळी ‘स-संविधानाचा!’ या बालनाट्यातून मुलांना संविधानाची ओळख मनोरंजक पद्धतीने करून दिली जाणार आहे. दुपारी ‘विज्ञान गप्पागप्पी’ या सत्रात प्रयोग, प्रश्नोत्तरे आणि संवादातून विज्ञानाची गोडी वाढवली जाईल. तर सायंकाळी ‘एआय तुमचा नवा स्टडी बडी’ या सत्रातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासात कसा उपयोग करायचा, याचे मार्गदर्शन मिळणार आहे.

त्याचप्रमाणे ३ मे रोजी कथा आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळणार आहे. सकाळी ‘कथा कवितांच्या राज्यात’ या सत्रातून मुलांना साहित्यविश्वाची रंगतदार सफर घडवली जाईल. दुपारी ‘सलाम भारतीय वायुसेनेला!’ या कार्यक्रमातून विमानांचे प्रात्यक्षिक, एरो मॉडेलिंग आणि देशसेवेची प्रेरणा देणारे सादरीकरण होणार असून, मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली जाणार आहे.शेवटच्या दिवशी ४ मे रोजी जत्रेचा समारोपही तितकाच आकर्षक ठरणार आहे. सकाळी ‘मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा कराल?’ या चर्चासत्रातून पालकांना उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. तर दुपारी समारोपाच्या कार्यक्रमात संबळ वादन, गोंधळ गाणे आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणांमुळे वातावरण रंगणार आहे. पुस्तकांच्या विश्वात रमवणारी, नवीन गोष्टी शिकवणारी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ही जत्रा पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे, असे नागपुरे आणि पांडे यांनी सांगितले.
…..
पुणे बाल पुस्तक जत्रा ही केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा उत्सव आहे. वाचनाची आवड, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या जत्रेत कथा, विज्ञान, नाट्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडत असून, मुलांना आनंदातून शिकण्याची संधी मिळणार आहे. पालक आणि शिक्षकांसाठीही मार्गदर्शक सत्रे उपयुक्त ठरणार आहेत. डिजिटल युगात मुलांना योग्य दिशा देण्याचे काम ही जत्रा करेल. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

  • मंजुषा नागपुरे, महापौर
    …….
    यंदाच्या जत्रेत पुस्तकांच्या दालनांची संख्या साधारण १०० राहणार असून, त्यामध्ये बालसाहित्यावर भर देण्यात आला आहे. साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल असणार आहे. जत्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत ग्रामीण व साहसी खेळ रंगणार आहेत. खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येणार आहे. मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ असे भरगच्च उपक्रम अनुभवता येईल. त्याचप्रमाणे मुलांना कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, लेखक यांना भेटता येईल. त्यामुळे सहकुटुंब पुणे बाल पुस्तक जत्रेचा आनंद घ्यावा.
  • राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

📦 कार्यक्रमांचे वेळापत्रक (१ ते ४ मे)

शुक्रवार, १ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – हसण्याची बायारकी
सादरकर्ते : मकरंद टिल्लू
🕓 दुपारी ४.०० वा. – हा खेळ बाहुल्यांचा
सादरकर्ते : चैताली माजगावकर-भंडारी
🕔 सायं. ५.०० वा. – चिंटू तुमच्या भेटीला
सादरकर्ते : चारुहास पंडित


शनिवार, २ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – शिक्षण विवेक निर्मित बालनाट्य – स-संविधानाचा!
सूत्रधार : डॉ. अर्चना कुंटेकर
🕓 दुपारी ४.०० वा. – विज्ञान गप्पागप्पी
सादरकर्ते : राजीव तांबे
🕔 सायं. ५.०० वा. – एआय तुमचा नवा स्टडी बडी
सादरकर्ते : डॉ. अमेय पांगारकर


रविवार, ३ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – कथा कवितांच्या राज्यात
बालसाहित्यिक : एकनाथ आव्हाड
🕓 दुपारी ४ ते सायं. ६ – सलाम भारतीय वायुसेनेला!
सादरकर्ते : सदानंद काले


सोमवार, ४ मे

🕚 सकाळी ११.३० वा. – मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा कराल?
सादरकर्ते : श्रुती पानसे, स्मिता वळसंगकर
🕓 दुपारी ४.०० वा. – समारोप – संबळ वादन, गोंधळ गाणे आणि अन्य कार्यक्रम*
सादरकर्ते : मोहिनी भुसे व एसएसडीटी संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“मोफत पाणी” टँकर चा महाघोटाळा… खर्डेकर यांचे आयुक्तांना साकडे

पुणे:पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथील बंद मीटर चा घोळ...

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...