पुणे- अनेक नगरसेविका निवडून तर आल्या पण त्या नामधारी बनून राहत आहेत , त्यांचे पती ,मुले आणि कार्यकर्तेच महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत . या नगरसेविकांच्या नावाने कारभार करू पाहत आहेत . हे प्रकार तातडीने थांबावावे अशी मागणी अॅड.रूपाली पाटील ठोंबरे आणि संगीता तिवारी उयांनी महापालिका आयुकांना भेटून केली आहे. आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेय . पण आमच्या कुटुंबाने कधी महापालिकेच्या आणि आमच्या कामात ढवळाढवळ केली नाही असे सांगत या दोन्ही महिला नेत्यांनी यावेळी निदर्शने देखील केली.
आज दिनांक 20/4/26 रोजी , Pune Municipal Corporation (पुणे महानगरपालिका) येथेहे आंदोलन करण्यात आले
पुणे महानगरपालिकेच्या कारभारामध्ये निवडून आलेल्या नगरसेविकांच्या पती, मुले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शासकीय कामकाजात सुरू असलेली बेकायदेशीर हस्तक्षेप आणि लुडबुड हा गंभीर मुद्दा बनला आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या नावावर घराणेशाही आणि अनधिकृत सत्ता चालवण्याचा प्रकार उघडपणे सुरू असून, हा प्रकार कायद्याचा आणि प्रशासनाचा सरळ अपमान आहे.
असे सांगत रूपाली पाटील ठोंबरे,संगीता तिवारी, Bitiya Foundation (बिटिया फाउंडेशन) आणि Jhansi Ki Rani Pratishthan (झाशीची राणी प्रतिष्ठान) यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले .
यावेळी त्या म्हणाल्या ,’ हे आंदोलन केवळ निषेध नसून, प्रशासनातील या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात थेट लढा आहे. आंदोलनानंतर संबंधित प्रतिनिधी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत निवेदन दिले आहेत आणि या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पायल तिवारी बिटीया फौंडेशनच्या संगिता तिवारी आणि झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अँड.रूपाली पाटीलठोंबरे यांनी केलेल्या या नादोलानाच्या बाबत प्रशासनाने कौतुक केले आहे.

