क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

Date:

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 8 हजार 114 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली आहे.

शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग 30 5.2023 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार अनाथ निराश्रीत निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्यांची गरज असलेल्या ० ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी कौंटुबिंक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सदर योजना ही वैयक्तीक लाभाची योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणासाठी दरमहा 2250 रुपये थेट लाभ देण्यात येतो. अनाथ, निराधार, निराश्रीत बालके, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्याची मुले या योजनेचा लाभ घेतात. क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या अंगणवाडी सेविका, पंचायत समिती , तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती ढवळे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिका...

‘त्या’महिलेचा VDO चित्रित करणाऱ्या पत्रकारांना भाजपाकडून धमक्या, म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२६.. भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...