पिंपरी, पुणे (दि. २३ जानेवारी २०२४)– पुणे जिल्हा व तालुका परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २३-२४ मध्ये पिंपरी मधील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूलच्या ‘एक्सीडेंट अलर्ट इंडिकेटर’ या प्रकल्पाने नववी ते बारावी या गटातून १५० प्रकल्पातून दुसरा क्रमांक पटकावला. एच. ए. स्कूलचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अभिज्ञ कुलकर्णी याने प्रकल्प सादर केला.
विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहावी ते आठवी या गटात ७५ संघाची निवड झाली होती. या मध्ये हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलच्या इयत्ता सातवी मधील संस्कृती पाटील व झयान शेख यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही गटांना श्वेता नाईक व हविनाळ शिवयोगेश्वर, प्रिती मस्दूत यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.