पुणे- निवडणुका घेण्याची छाती नाही, धाडस नाही म्हणून २/ ३ वर्षे भाजपने महापालिकेच्या निवडणुका सुद्धा घेतल्या नाही,मग कालचा इव्हेंट केला,मुळात यांच्यात निवडणुकीला सामोरे जायचे धाडस नसताना हा इकडे जाणार,तो तिकडे जाणार असे काही म्हणायचे,निवडणुका घेण्याचे त्यांचे धाडस नाही,आणि राजकीय भुकंपाची चर्चा करतात,मुळात त्यांच्या छातीत धडकी भरलीय,अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.राम मंदिर बांधलंय आता पुन्हा आजपासून बेरोजगारी,गरिबी,महागाई,भ्रष्टाचार,शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुढे उभ्या राहणारच आहेत.असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी संबोधित केलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, अतिशय चांगली आढावा बैठक आज झाली. यानंतर 6 विभागीय बैठका होणार आहेत आणि नंतर लोणावळा येथे शिबिर होईल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष निवडणूक लढणार की संघटनात्मक निवडणुका लढायच्या हे ठरवणं महत्वाचं आहे. बुथ कमिट्या निर्माण करणं गांभीर्याने घ्या, असे आदेश पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुका व्यक्तीकेंद्रित करू पहात आहेत, आणि त्याला काही प्रमाणात यशही येतंय. लोकसभा मतदारसंघ पाहिले तर निवडणुकीत भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. उगाच हा इकडे जाणार, तो तिकडे जाणार अशा बातम्या पेरायचं काम सुरू आहे. त्यांच्यात निवडणुका घ्यायचं धाडस नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.नरेंद्र मोदी यांनी 2014ला निवडणूक आर्थिक विषयावर लढवली, अच्छे दिन आएंगे. 2019 ची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षितेवरून लढवली. बालाकोट घटना. आता नवीन मुद्दा पाहिजे होता म्हणून कालचा राम मंदिरचा इव्हेंट. राम मंदिर हे मुळ जागेपासून 4 किमी लांब आहे. जुन्या मूर्ती कुठं आहेत? नवीन मुर्त्या कशा आल्या? मंदिर अर्धवट होतं म्हणून शंकराचार्य यांनी विरोध केला. मग ज्योतिषाला विचारून उपवास केला, आज बहुतेक जेवले असतील, जमिनीवर झोपले, काही चुकीचं होऊ नये म्हणून. पण चुकीचं होणारच आहे, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.