‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी रस्त्यांची पाहणी

Date:

पुणे-महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे व अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ पुणे महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी आज केली.
पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे पुणे शहरात अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत ती जगाच्या नकाशावर यावीत व त्या माध्यमातून तेथील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी आणि स्थानिक तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराचे तसेच भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार आहे.
याप्रसंगी महापालिका आयुक्त यांनी पुणे शहरातील ज्या भागातून स्पर्धा जाणार आहे, त्या सर्व भागांमधील रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असावेत याबाबतचे काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या रस्त्यांवर सायकल स्पर्धेबाबतचे रंगकाम ताबडतोब सुरु करण्याबाबतचे आदेश दिले आणि या सर्व रस्त्यांवर स्वच्छता करण्यात यावी असे आदेश दिले तसेच रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत याबाबतचे आदेश दिले.

या वेळी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर,उप आयुक्त (परि.क्र.१) माधव जगताप, उप आयुक्त (घनकचरा)अविनाश सपकाळ, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिराचा राहुल गांधींच्या उपस्थितीत समारोप.

राहुल गांधींनी घेतली जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबियांशी भेट, आदिवासी विद्यार्थ्यांशीही साधला...

दीप्ती चवधरी यांच्या कार्यअहवालाचे राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते ...

हडपसरमध्ये महापालिकेच्या कचरा डंपरची धडक; तरुणाचा मृत्यू

मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची मदत द्या; प्रमोद नाना...