पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

Date:

पुणे-पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्याचा ‘सबसे बडा खिलाडी.. सुरेश कलमाडी’ अशी टॅगलाईन त्यांनी आयुष्यभर मिरवली.सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत1 मे 1944 रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सहा वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांनी पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री होते, ही एक विशेष बाब आहे.कलमाडी यांचे नाव पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांशी जोडले जाते. त्यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या स्पर्धा सुरू करून शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली.1996 ते 2011 या काळात त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 2010 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजक समितीचे ते अध्यक्ष होते. या स्पर्धांदरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि 2011 मध्ये त्यांना अटकही झाली होती. मात्र, तपासाअंती पुरावे अपुरे ठरल्याने 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला, जो न्यायालयाने स्वीकारला.पण तोपर्यंत ,आरोग्य आणि राजकारण अशा पातळीवर कलमाडी यांच्या तळपत्या सूर्याचा अस्त झाला होता.

१९७८ मध्ये सुरेश कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९८२ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी सुरेश कलमाडी यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यानंतर सलग ३० वर्षे सुरेश कलमाडी खासदार होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत होते. २०१० पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरू झाली. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यावेळी विरोधकांनी सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढंच काय तेव्हा पुण्यात निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्रच होतं. कार्यकर्ते तिथं जमायचे. कलमाडी विमानतळावर यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताला जणू जत्रा भरायची.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....