पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे येथे म्हणाल्या की,राज्यातले प्रश्न आम्ही संसदेत मांडतो. आज लोकशाही नाही तर संसदेत दडपशाही सुरू आहे. त्यांचे 38 खासदार भीतीपोटी काहीच बोलत नाहीत. नितीन गडकरी साहेबांचे आभार मानते. कारण त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात खूप कामे केली आहेत. आज 6 वंदे भारत रेल्वे जातात त्याचा उपयोग माझ्या मतदार संघाला शून्य फायदा आहे.माझे वडील फार कमी बोलतात. ते कुणाला सल्ला तर देतच नाहीत. आता माझ्या वडिलांच्या मागे त्यांची बदनामी करायला अदृश्य शक्ती लागली आहे. राजकारण जरूर करा पण असे करू नको. रोहित पवारांनाना ईडीची नोटीस आली. आता त्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?,
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला तुम्ही 3 वेळा मतदान करून दिल्लीला जायची संधी दिली. मी तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीत जाते. राज्यातून 48 खासदार दिल्लीत जातात. 38 सत्तेत आहेत तर 10 विरोधात आहेत. 18 वर्षात पहिल्यादा माझे निलंबन झाले. कारण मी शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळावा ही मागणी केली. मी काही नियम मोडले नाहीत. कुठलीही घोषणाबाजी केली नाही. तरी मला निलंबित केले.कामासाठी, लोकांसाठी आवाज उठवला आणि निलंबन केले तर मी 100 वेळा निलंबित व्हायला तयार आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात 5 वर्ष भाजपची सत्ता होती. 2 वर्ष झाली आपल्याला नगरसेवक नाहीये हे दुर्दैव आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार आहे. मग आमचा काय विकास झाला आहे? स्मार्ट सिटी फक्त सांगितली गेली. पत्यामुळे तुमच्या-आमच्या आयुष्यात काय बदल झाला? का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.