अफगाणिस्तानमधील बदख्शान खान भागात रविवारी विमान कोसळले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मीडिया हाऊसने ते भारतीय विमान असल्याची माहिती दिली होती. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हे विमान भारताचे नसल्याचे सांगितले.
ही मोरोक्कन-नोंदणीकृत एअर अॅम्ब्युलन्स होती जी तांत्रिक बिघाडामुळे मार्गावरून भरकटली आणि क्रॅश झाली. विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ती थायलंडहून मॉस्कोला जात होती. त्यात बिहारमधील गया विमानतळावरून इंधन भरले होते.
याआधी पाकिस्तानी मीडिया हाऊस समाने बदख्शान प्रांताच्या पोलीस कमांडचा हवाला देत एअर अॅम्ब्युलन्सचे वर्णन भारतीय प्रवासी विमान असे केले होते. जे काल रात्री रडारवरून गायब झाल्यानंतर जेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले.
तथापि, 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून कोणतेही भारतीय विमान त्यांच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत नाही. दरम्यान, टोलो न्यूजने बदख्शान माहिती विभागाचे प्रवक्ते जबिहुल्ला अमीरी यांच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आले आहे.