मुंबई–
जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!, असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ पोस्ट करत लगावला आहे.
सुषमा अंधारे यांच्या पोस्टमध्ये एका गाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागच्या सीटवर बसलेले दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या सीटवर बसताना दिसून येत आहे. मागच्या सीटवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन बसल्याने त्यांना दाटीवाटीमध्ये बसावे लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांना आपल्यामध्ये खरंच गुणवत्ता आहे असे वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, महाराष्ट्र तुमची लायकी काय आहे हे तुम्हाला दाखवेल, असे म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे.