अनुसुचित जाती कल्याण समितीच्या हस्ते विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे

Date:

महावितरणच्या तत्परतेचे समिती प्रमुख आ. नारायण कुचे यांनी केले कौतुक

पुणे : विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांना महावितरणने अनुसुचित जाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार नारायण कुचे व समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थित नियुक्तीपत्रे देण्यात आली. शुक्रवारी (दि.१९) पुणे मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ५६ मागासवर्गिय उमेदवारांना समितीच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले असून, महावितरणने निर्देशाचे तातडीने पालन केल्याबद्दल समितीने महावितरणचे कौतुक केले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना समितीप्रमुख आ. नारायण कुचे म्हणाले, गुरुवारी आम्ही महावितरणला सूचना केली की, नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्या आणि २४ तासांत महावितरणनेही तत्परतेने सर्व उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. पुणे परिमंडलात निवड झालेल्या २८१ उमेदवारांपैकी ५६ उमेदवार अनुसुचित जातीचे आहेत हे म्हत्वाचे. ही सर्व सामान्य कुटुंबातील मुले-मुली आहेत. या मुलांनी आता संधीचे सोने करावे असे आवाहन उमेदवारांना करताना महावितरणप्रमाणे इतर विभागांनीही अशीच तत्परता दाखवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर समिती सदस्य तथा विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनीही महावितरणच्या तत्परतेचे कौतुक केले. ते म्हणाले, ही समिती अनुसुचित जातींसह मागासवर्गीयांवर होणारे अन्याय दूर करण्याचे काम करत आहे.

महाराष्ट्र विधानसभा मंडळाने नियुक्त केलेली अनुसुचित जाती कल्याण समिती १८ ते २० सप्टेंबर अशी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शासनाच्या विविध विभागांकडून अनुसुचित जातींसाठी राबविलेल्या योजनांचा व नोकरभरतीचा आढावा ही समिती घेत आहे.

समितीमध्ये आ. भिमराव केराम, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. अशोक माने, आ. शाम खोडे, आ. मंगेश कुडाळकर, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. संजय बनसोडे, आ. सचिन पाटील, आ. गजानन लवटे, आ. संजय मेश्राम, आ. अमित गोरखे, आ. अमोल मिटकरी, आ. डॉ. प्रज्ञा सातव, आ. जगन्नाथ अभ्यंकर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व युवराज जरग, सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेशिर्के यांचेसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास मान्यता

पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन पुणे :...

पुणे विमानतळाचेजुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत : मुरलीधर मोहोळ

जुन्या टर्मिनलला एकच परवानगी बाकी पुणे (प्रतिनिधी) : पुणे विमानतळाच्या...

कात्रज कोंढवा रस्त्यावरील शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूने विरोधक संतप्त

पुणे- कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू...

कात्रज-कोंढवा रस्ता आणखी किती बळी घेणार ; मुख्यसभेत विरोधी पक्षनेते निलेश निकम आक्रमक

वारंवार होणाऱ्या अपघातांवरून प्रशासनाला जाब; रस्त्याचे रखडलेले काम आणि...