सह्याद्रि हॉस्पिटल्स आणि इम्युनोअॅक्ट यांच्या भागीदारीतून पुण्यात प्रगत ‘CAR-T Cell Therapy’ सादर

Date:

प्रगत CAR-T Therapyच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खर्चापेक्षाही कितीतरी कमी खर्च

पुणे१६ जानेवारी २०२४ : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रुग्णालय शृंखलांपैकी एक असलेल्या ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने पुण्यात ‘CAR-T सेल थेरपी’ सादर करण्यासाठी इम्युनोअॅक्ट या कंपनीशी व्यावसायिक भागीदारी केली आहे. ‘सह्याद्रि’तर्फे आज ही घोषणा करण्यात आली. ‘हेमॅटोलॉजी’वरील सर्वसमावेशक उपचार केंद्रांसह इतर अनेक महत्त्वाच्या आरोग्य सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’मध्ये आता ‘NexCAR19™’ (Actalycabtagene autoleucel) पुरविण्यात येणार आहे. ‘बी-सेल लिम्फोमा’ आणि ‘बी-अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’च्या उपचारांना दाद न देणाऱ्या किंवा हे आजार बळावलेल्या पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ही ‘CAR-T सेल थेरपी’ डिझाइन करण्यात आलेली आहे. 

“कर्करोगाच्या रूग्णांना अत्याधुनिक उपचार प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेमध्ये ‘CAR-T सेल थेरपी’मुळे अधिकच भर पडणार आहे. ‘CAR-T सेल थेरपी’ सादर करून आम्ही कर्करोगावरील उपचारांच्या मर्यादा कमी करण्याचे आमचे सततचे प्रयत्न निदर्शनास आणू इच्छितो. या थेरपीतून आम्ही रुग्णांना सध्या उपलब्ध असणारे सर्वात प्रगत उपचारांचे पर्याय देऊ करीत आहोत,” असे प्रतिपादन सह्याद्रि हॉस्पिटल्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अब्राराली दलाल यांनी केले. ते पुढे म्हणाले, ” CAR-T सेल थेरपीच्या एकत्रिकरणामुळे जटिल स्वरुपाच्या रक्त कर्करोगाच्या उपचारात एक नवीन मापदंड प्रस्थापित होणार आहे. अचूक औषधांचे सर्वोच्च दर्जाचे उपाय योजण्याच्या आमच्या ध्येयाशी हे अनुरुप आहे. या अत्याधुनिक उपचारांमुळे रक्ताच्या विकारांवरील नाविन्यपूर्ण उपचारांच्या क्षेत्रात ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे स्थान अग्रभागी राहणार आहे. पुण्यातील व महाराष्ट्रातील रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे उपचार उपयुक्त ठरणार आहेत.”

सामान्यतः ‘लिव्हिंग ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या वैयक्तिक उपचारपद्धती विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करून, विषाणूजन्य व्हेक्टर वापरून, रुग्णाच्या स्वतःच्या टी-सेल्समध्ये अनुवांशिकरित्या बदल करून तयार केल्या जातात. ‘NexCAR19’ ही भारतात पूर्णपणे विकसित आणि उत्पादित केलेली पहिली ‘CAR-T थेरपी’ असून जगभरात व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या अशा अंदाजे दहा उपचारांमध्ये तिची गणना होते. अमेरिकेमध्ये तत्सम थेरपीसाठी लाखो डॉलर्स खर्च येऊ शकतो; तथापि या खर्चाच्या सुमारे एक दशांश खर्चामध्ये ही थेरपी आपल्याकडे मिळू शकेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

‘बी-सेल कॅन्सर’वर एक किंवा त्याहून जास्त पद्धतींनी उपचार करूनही अपयश मिळाले, तर अशा रुग्णांबाबत आशा संपुष्टात येत असते. सध्या अशा उपचारांमध्ये केमोथेरपी, मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांचा समावेश आहे. सह्याद्रिमधील वैद्यकीय आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट अशा वेळी या उपचारांचा दर्जा वाढवण्यासाठी ‘NexCAR19’ वापरू शकतील. प्रारंभीच्या काळात ‘NexCAR19’ची उपलब्धता पुण्यातील सह्याद्रिच्या डेक्कन जिमखाना येथील केंद्रात असणार आहे. या केंद्रातून देशाच्या पश्चिमेकडील व त्यापलीकडील भागामधील रुग्णांना सेवा देण्यात येते.

सह्याद्रि हॉस्पिटल्समधील हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट विभागाचे प्रमुख डॉशशिकांत आपटे (M.D., FRCPA) म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये आम्ही विविध पार्श्वभूमी असलेल्या रूग्णांवर उपचार करतो. आम्ही दरवर्षी अंदाजे ४५ ते ५० जणांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) करतो. ‘NexCAR19’ची उपलब्धता झाल्याने आता आम्हाला ‘बी-सेल’चा घातक रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याची मोठी संधी मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की अशाच प्रकारच्या ‘सेल थेरपी’ रक्ताच्या कर्करोगाच्या इतर प्रकारांसाठीदेखील उपलब्ध होतील आणि त्यामुळे त्यांतील गंभीर व गरजू रुग्णांचीही गरज पूर्ण होईल.”

इम्युनोअॅक्टचे सहसंस्थापक  बिझनेस डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक शिरीष आर्य म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्सकडील अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि त्यांचे वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेले ऑन्कोलॉजिस्ट यांच्या माध्यमातून रुग्णांना ‘NexCAR19’ची उपलब्धता तात्काळ आणि परवडणाऱ्या दरांत होण्यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आम्ही देऊ. संशोधनात नावीन्यता आणण्यावर ‘इम्युनोअॅक्ट’मध्ये आमचा भर असतो. या जीवरक्षक थेरपीचे फायदे शक्य तितक्या जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या मजबूत ‘CAR-T प्लॅटफॉर्म’ची मापनक्षमता वाढवण्यासाठी आमचे हे प्रयत्न केंद्रित आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....