कोंढव्यात नागरिक -प्रशासन सुसंवादाने कोरोनाशी लढाई (व्हिडीओ)
कोंढव्यात नागरिक -प्रशासन सुसंवादाने कोरोनाशी लढाई (व्हिडीओ)
पुणे- महापालिका ,पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद साधत संवेदनशील कोंढवा येथे कोरोनाशी लढाई सुरु असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका नंदा नारायण लोणकर यांनी मायमराठी ला दिली .
कोंढवा ,एन आय बी एम हा परिसर तसा विदेशात ये जा करणाऱ्या बहुतांशी नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो . महापालिकेचे आरोग्य खाते ,स्थानील लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांना येथे कोरोनाशी सामना करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करणे क्रमप्राप्त आहे. अनेकांना येथे विलागीकरन पत्करावे लागलेय . तर सर्वत्र आहेत तसे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे प्रश्न देखील येथे आहेत . त्यात काल झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने येथे तारांबळ उड्विली अशात पोलीस, लोकप्रतिनिधी ,कार्यकर्ते आणि पालिका प्रशासन आपसात सुसंवाद साधित कोरोनाशी लढा देत आहेत . या पार्श्वभूमीवर हा येथील छोटासा वृत्तांत …