Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘पुलं’ म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल-शि. द. फडणीस

Date:

पुणे : “छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करीत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिश्कीलपणा आणि सदोदित हसरे व्यक्तिमत्व असणारे ‘पुल’ म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,” अशा शब्दात ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी ‘पुलं’बद्दल गौरवोद्गार काढले.
साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंतुन त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंग्यचित्र आणि त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात झालेल्या या सोहळ्यावेळी सौ. शकुंतला फडणीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पु. ल. देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर, व्यंग्यचित्रकार अलोक निरंतर, साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी उपस्थित होते. शुक्रवारपर्यंत (९ नोव्हेंबर २०१८) हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पुणेकरांना विनामूल्य पाहता येणार आहे.
या प्रदर्शनात देशपांडे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना, दुर्मिळ क्षण याची माहिती देणारी छायाचित्रे, सहकलाकार, मित्रपरिवार, साहित्यिक यांच्याशी असलेले स्नेहबंध छायाचित्रांमधून उलगडण्यात आले आहेत. गदिमा, बाबूजी, शांताबाई शेळके, राम गबाले, लतादीदी यांच्यासमवेतची छायाचित्रे, अनेक चित्रपट, नाटकातील त्यांच्या भूमिका आणि सुनीताबाईंबरोबरचा सहवास अशी दुर्मिळ छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या लेखनावर आणि विनोदांवर आधारित व्यंग्यचित्रे येथे पाहायला मिळणार आहेत.
शि. द. फडणीस म्हणाले, “सगळ्याच क्षेत्रातील लोकांशी स्नेहबंध असल्याने ‘पुलं’चे आयुष्य समृद्ध झाले आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली हे आपले भाग्य आहे. त्यांच्याबरोबर मला काम करता आले. तो अनुभव अतिशय विलक्षण होता. त्यांच्यातील चित्रकार, साहित्यिक, अभिनेता, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि सढळ हाताने दान केलेला देणगीदार जवळून पहिला आहे.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या व्यंग्यचित्रांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले याचा आनंद आहे. देशपांडे दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर सहजीवन कसे असावे, हे शिकायला मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी आहे. वक्ता, लेखक, नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गायक अशा विविधांगी भूमिका जगलेल्या ‘पुलं’च्या जीवनावर संशोधन व्हावे.”
कृष्णकुमार गोयल, दिनेश ठाकूर, आलोक निरंतर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कैलास भिंगारे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...