पुणे- शरद पवारांची कर्मभूमी असलेल्या पुण्याच्या आठवणी खुद्द पवारच जागवणार आहेत .यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा मुख्यमंत्री असताना पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना कॉंग्रेस मध्ये साधारणतः १९६४ मध्ये आमंत्रित केलं,वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले .त्यानंतर ३ वर्षात म्हणजे १९६७ च्या निवडणुकीत ते आमदार झाले आणि वयाच्या 29 व्या वर्षी वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला .१९७२ च्या निवडणुकीतही ते आमदार झाले .त्यानंतर १९७८ साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसचे १२ आमदार फोडून त्यांनी वसंतदादांचे सरकार पाडले …अशा प्रचंडवादळी अशा आपल्या राजकीय वाटचालीत त्यांनी पुण्याचं बदलतं रूप वारंवार अनुभवलं .पुण्याचं बदलतं रूप आणि पवारांचं राजकारण याचे जणू घट्ट ऋणानुबंध भासावेत ,ऐकायला मिळावेत … अशा एका कार्यक्रमाची चांगली संधी पुणेकरांना प्राप्त होऊ पाहते आहे .
पुण्यातील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तूंचे दर्शन घडवणारे वैशिष्ट्यपूर्ण कॉफीटेबल बुक पुण्याचा इतिहास मुखोद्गत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकाशित करणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता बालशिक्षण मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने निवेदक सुधीर गाडगीळ, शरद पवार यांच्यासह ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर संवाद साधणार आहेत.पुण्याचे जिल्हाधिकारी ,पिंपरी महापालिकेचे आयुक्त अशा पदांवर काम केलेले ; सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ‘स्मरणरम्य पुणे’ या विषयावरील दिनदर्शिकाही प्रकाशित केली जाणार आहे. ‘पुणे एकेकाळी’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत एकाच वेळी प्रकाशित होणार आहे. त्याचे लेखन मंदार लवाटे यांनी केले आहे. ‘पेपरलिफ’चे जतन भाटवडेकर यांनी ही माहिती दिली.
खरं सोनं,’ते’जुनं पुणं… शरद पवार जागवणार आठवणी …?
Date: