Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फर्ग्युसन कॉलेजात धक्काबुक्की … पोलीस आणि रक्षकांनी बंदुका काढून च आव्हाडांना काढले बाहेर

Date:

पुणे- फर्ग्युसन कॉलेजमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आज बुधवारी (दि २३ )आले असताना  दोन गट समोरासमोर आले त्यांच्यात आरडाओरड -घोषणाबाजी -धक्काबुक्की व मारामारी झाली. पोलिसांना यावेळी  सौम्य लाठीमारही करावा . यावेळी आव्हाड यांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.  यावेळी  आव्हाड यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या नजीक असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने आणि आव्हाड यांच्या खाजगी अंगरक्षकाने बंदूक हातात घेवूनच मधून ती उंचावून दाखवीतच आव्हाड यांना बाहेर सुरक्षित काढले. भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांना येथून हुसकावून लावले अशीच प्रतिक्रिया येथे यावेळी मिळत होती .

या संदर्भातील माहिती अशी कि , जितेंद्र आव्हाड महाविद्यालयातील किमया या खुल्या सभागृहात आव्हाड हे कन्हैया कुमार समर्थक विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्याचवेळी किमया पासून काही अंतरावरच अभाविपचे समर्थक आव्हाडांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या जवळ आले. यावेळी पोलीस येथे होतेच त्यानंतर आव्हाड यांनी आपली चर्चा आटोपून काढता पाय घेतला. ते परत निघाले असता अगदी जवळ असणा-या अभाविपच्या कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थकांचे घोषणायुद्ध सुरु झाले. पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांना देखील कारवाई करताना मर्यादा येत होत्या. त्यातच काही कार्यकर्ते आव्हाडांच्या अंगावर धावून गेल्याने गोंधळाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत हाणामारीला सुरुवात केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांचा सर्व रोख हा आव्हाडांच्या दिशेने होता. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना बंदुका बाहेर काढाव्या लागल्या. त्यानंतरही कार्यकर्ते जुमानत नसल्याचे लक्षात येताच सौम्य लाठीमार करत जमलेल्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.हे जे कार्यकर्ते होते तेत्या सर्वांना पोलीस ओळखत होते हे विशेष.पोलिसांच्या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात आव्हाडांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक करत, गाडीवर लाथाबुक्क्या मारत राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी देखील आव्हाड यांच्या गाडीवर लाथाबुक्क्यांचा प्रहार करीत आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.

fc

 

fc prachary
प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी

दरम्यान  पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी फर्ग्यूसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे सादर करा, अशी मागणी पोलिसांनी करताच फर्ग्यूसन कॉलेजचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी माघार घेत आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करा असे आमचे म्हणणे होते अशी सारवासारव केली . दरम्यान, वाढता वाद पाहता परदेशी यांनी माफी मागितली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परदेशी यांना तातडीने मुंबईला  बोलावले आहे.

alok
काल मंगळवारी पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये ‘अभिविप’चा विद्यार्थी नेता आलोक सिंह दिल्लीतील ‘जेएनयू’मध्ये 9 फेब्रुवारीला काय घडले होते याची माहिती वजा व्याख्यान देण्यासाठी आला होता. यावेळी  दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने  पोलिसांत तक्रार केली. सकाळी 11.30 च्या सुमारास काही विद्यार्थी जमा झाले व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कोणतेही परवानगी न घेता एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या. कॉलेज आवारात अशा प्रकारे एकत्र जमून देशविरोधी घोषणा देणा-या व्यक्तींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांत तक्रार दिली होती .

patr
मात्र, यानंतर पोलिसांनी याबाबत पुरावे अथवा सीसीटीव्ही फुटेज सादर करा अशी मागणी केली. मात्र, त्यानंतर कॉलेजने नरमाई -माघारीचे धोरण स्वीकारले तसेच देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास कारवाई करा असे आपणाला म्हणयाचे होते ,मात्र टायपिंग मिस्टेक झाली अशी सारवासारव देखील प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र -ना. चंद्रकांतदादा पाटील

पाषाण-सुतारवाडीतील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे:नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय...

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास...

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर...

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...