पुणे-डेक्कन जिमखाना क्लबतर्फेआयोजित 16 व्या 25 हजार डॉलर एनइसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या निधी चिलूमला व नताशा पलाह यांनी संषर्घपूर्ण विजय मिळवून दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या सामन्यांना सुरुवात झाली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या भारताच्या निधी चिलूमला हिने कोरीयाच्या जी-ही चोई हिचा 7-6(3), 5-7, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आजचा दिवस गाजवला. 2 तास 45 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हैद्राबादच्या निधीने आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या जी चोईचा सनसनाटी पराभव केला. पहिल्या सेटपासून दोन्ही खेळाडूंमध्ये एकेक गुणांसाठी चूरस होती. पहिला सेट निधीने टायबे्रकमध्ये जिंकल्यानंतर दुसर्या सेटमध्ये जी कोईने 7-5 असा विजय मिळवला. 1-1 अशा बरोबरीनंतर निर्णायक सेटमध्ये निधीने बेसलाईनवरून अचूक व शांत चित्ताने खेळ केला. कोरीयन खेळाडूने निर्णायक सेटमध्ये केलेल्या नाहक चुकांचा फायदाही निधीला झाला.
वाईल्ड कार्डव्दारे स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारताच्या नताशा पलाह हिने सिंगापूरच्या स्टेफनी टॅनचा 7-6(2), 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये नताशाने टायबे्रकमध्ये विजय मिळवला. पण दुसर्या सेटमध्ये नताशाने अधिक चांगला खेळ करून 6-3 असा सेटसह सामन्यात विजय मिळवला.
इजिप्तच्या सॅन्ड्रा समोर हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या व बर्लिनच्या स्वेतलाना पिझारकेना हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जपानच्या व तिसर्या मानांकित अकिको ओमे हिने बेल्जीयमच्या व पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या ब्रीटी गुन्केन्स् हिचा 7-6(3), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सेटमध्ये अकिकोला टायब्रेकपर्यंत झुंझावे लागले. दुसर्या सेटमध्ये अकीकोने आपल्या मानांकनाला साजेसा खेळ करून सहज विजय मिळवला.
दुहेरीमध्ये कायरा श्रॉफ व धरती वेणूगोपाळ हिने अमिना अन्शाबा व व्हॅलेन्टीना इव्हानकेन्को या जोडीचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला. व्हेरॉनिका कापशेव डायना मारचीनकेविचा या जोडीने चेइश युशू व चॅनेल व्हान न्युयेन यांचा 6-2, 6-2, असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः एकेरीः मुख्य ड्रॉः पहिली फेरीः
निधी चिलूमला (भारत) वि.वि. जी-ही चोई(कोरीया) 7-6(3), 5-7, 6-4;
नताशा पलाह (भारत) वि.वि. स्टेफनी टॅन (सिंगापूर) 7-6(2), 6-3;
सॅन्ड्रा समेर (इजिप्त) वि.वि. स्वेतलाना पिझारकेना (बर्लिन) 6-4, 6-2;
अकिकोओमे(जपान) वि.वि. ब्रीटी गुन्केन्स् (बेल्जीयम) 7-6(3), 6-3;
दुहेरीः पहिली फेरीः कायरा श्रॉफ/धरती वेणूगोपाळ वि.वि. अमिना अन्शाबा/व्हॅलेन्टीना इव्हानकेन्को 6-3, 6-3;
व्हेरॉनिका कापशे/डायना मारचीनकेविचा वि.वि. चेइश युशू/चॅनेल व्हान न्युयेन 6-2, 6-2;
बेट्रीस गुमूलिया/अॅना वेसेलिनोव्हीक वि.वि. ऋतुजा भोसले/स्नेहदेवी रेड्डी 6-1, 6-2;
तेसह ए./पोलिना मानोव्हा वि.वि. अॅना मोगिना/प्रार्थना ठोंबरे 6-4, 7-6(3);