“शौर्य – गाथा अभिमानाची” या मालिकेची पुढची गोष्ट आहे महिला पोलीस अधिकारी श्रीमती हिरेमठ मॅडम आणि निडर मृदुला लाड यांची . या शूर महिला पोलीस अधिकारी , स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता , अत्यंत निडरतेने आणि कल्पकतेने अट्टल कुविख्यात खंडणीबहाद्दरांना एकट्यानेच भिडल्या आणि जेरबंदही केले. अश्या प्रकारची केस सोडवताना त्यांची प्लॅनिंग आणि कामाच्या कक्षेच्या चाकोरीबाहेर जाऊन केलेलं शौर्य गौरवणीय आहे . ज्या प्रमाणे महाराष्ट्र पोलिसांमध्ये पुरुष पोलीस पूर्ण मेहनतीने काम करतात, तेवढ्याच मेहनतीने महिला पोलीस सुद्धा त्यांचे कर्तव्य बजावत असतात. अनेक महिला पोलीस , अत्यंत कर्तबगारीने , त्यांचं कुटुंब सांभाळून , जनतेच्या सुरक्षेसाठी झटत असतात . पोलीस दलात महिला पोलिसांची नितांत गरज या साठीही आहे कारण अनेक महिला तक्रारदार पुरुष अधिकाऱ्यांसमोर स्वतःची व्यथा नीट मांडू शकत नाहीत . तेव्हा अश्या महिला अधिकाऱ्यांचे केवळ असणेही बरंच काही करून जाते . महिला पोलीस निडरतेने गुन्हेगारांशी एक एक हात ही करतात आणि काही नाजूक केसेसचे सामंजस्याने निराकरणही ही करतात . अश्या महिला अधिकाऱ्यांमध्ये दोन महत्वपूर्ण नाव आहेत हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांची . हिरेमठ मॅडम यांना क्राईम ब्रांच मध्ये पहिल्या महिला डिटेक्शन अधिकारी असण्याचा मान आहे . तर मृदुला लाड याना स्वातंत्र्यानंतर पहिले पोलीस राष्ट्रपती शौर्य पदक मिळण्याचा मान आहे . तसेच पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या बॅच मधील त्या पोलीस अधिकारी आहेत . त्यांनी अनेक केसेस पुरुष अधिकारांच्या खांद्याला खांदा लावून सोडवल्या आहेत. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांनी सोडवलेल्या अनेक केस मधील महत्वाच्या दोन केसेस या शुक्रवारी १६ डिसेंबर हिरेमठ मॅडम आणि शनिवारी १७ डिसेंबर मृदुला लाड , रात्री ९ वाजता, झी युवावर या “शौर्य – गाथा अभिमानाची” या कार्यक्रमाद्वारे पाहायला मिळतील.
१९९६ मध्ये हिरेमठ मॅडम यांची, क्राईम ब्रांच मध्ये पहिली महिला डिटेक्शन अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती . त्या वेळी रॉनी मेंडोसा हे पोलीस आयुक्त होते. एक “तंजोर आर्ट पेंटिंग”या व्यवसायातील एक गर्भ श्रीमंत बाईने तिला खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांची तक्रार नोंदवली आणि हि केस हिरेमठ मॅडम यांच्याकडे आली. हिरेमठ मॅडम यांनी हि केस सोडवण्यासाठी अनेक बाबींचा विचार केला. या कार्यक्रमात आपल्याला हिरेमठ मॅडम या चाकोरीबाहेर जाऊन कल्पकतेने त्या खंडणीखोरपर्यंत कश्या पोहोचल्या आणि कश्या प्रकारे त्यांनी त्याला भर रस्त्यात खंडणी खोराबरोबर हातापायी करून, चालत्या वाहनातून अक्षरशः खेचून बाहेर काढले आणि जेरबंद केले, याची हि अतिशय रंजक अशी गोष्ट आहे. तर मृदुला लाड यांनी, नकळत भाग होत गेलेल्या गुन्हेगाराच्या पाठलागामध्ये; अतिशय नीडरतेने लढताना; तेव्हाचा कुविख्यात खंडणीखोर “डी के राव” सारख्या गुन्हेगाराला बंदुकीच्या गोळीबारात जायबंदी केले . डी . के राव ज्याला अनेक मोठमोठाले बिल्डर्स सुद्धा घाबरायचे अश्या मोठ्या गुंडाला आपल्या जीवाची पर्वा न करता , एका शूर महिलेने आमने सामने गोळीबार करत निडरपणे सामना केला आणि अतुलनीय शौर्य दाखवले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात ही स्त्रियांना समाजात आपले असे वेगळे स्थान करण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागत आहे आणि ह्या परिश्रमात ती कूठेही कमी पडलेली नाही जिद्दीने पुढे जात आहे महिला हल्ली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. अगदी महिला जगतापासून ते पुरुष जगापर्यंत म्हणजे असे कि जिथे आधी पुरुष पारंगत असायचा तिथे त्यांच्या जागेवर महिला काम करू लागल्या आहेत महिलांनी आपले क्षेत्र (स्त्रि धर्म) न सोडता अतिशय नेटाने त्या त्यांचं काम करीत असतात. प्रत्येक काम करत असताना महिलांची दृष्टी हि व्यापक असते. पोलीस क्षेत्रात वावरताना, पुरुषांची मक्तेदारी तोडत; कुठेही कमी ना पडता, हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांनी अश्या केसेस अत्यंत यशस्वी प्रकारे सोडवल्या. महिला पोलिसांचे अतुलनीय शौर्य आपल्याला झी युवावर तसेच्या तसे, हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांच्या स्वतःच्या अनुभवांसकट पहायला मिळणार आहे.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.