जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

Date:

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर झालं आहे.

अनेक दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरु आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्यांची जागा विधान परिषदेत रिक्त झाली आहे.
भाजपकडून प्रज्ञा सातव यांना त्याच रिक्त झालेल्या जागेवर जी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 9 जागांपैकी 5 जागांवर विजय मिळवण्याचं संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे 5 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते. अनेकांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. अनेकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले जात होते. या विषयावर महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काही नावे निश्चित करण्यात आली होती. ही सर्व नावे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली होती. त्यापैकी सहा नावे भाजपच्या हायकमांडने मान्य केली आहेत. या सर्व उमेदवारांची नावे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...