मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबरला अरबी समुद्रातील उभारण्यात येणार्या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली होती.
केंद्र सरकारनेही शिवस्मारकाला मंजुरी दिल्यानंतर या कामाला वेग आला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील अरबी समुद्रात 16 एकर जमीनची निवड करण्यात आली आहे. स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळणे आवश्यक होते. आता 24 डिसेंबरला शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे.