दुपारी मंत्री दम मारतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं ;संकटातही सरकारला ”राजकारण’ सुचतंय-प्रविण दरेकरांचा आरोप

Date:

मुंबई दि.१८ एप्रिल – दुपारी मंत्री दम मारतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं, असले प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहेत. संकट काळात महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या माध्यमातून मदतीची तयारी दर्शवणाऱ्या कंपनीच्या मालकाला दहशतवाद्याप्रमाणे ताब्यात घेणं हा सरकारचा निव्वळ कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
प्रविण दरेकर यांनी रविवारी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम भरला जातो, त्यानंतर संध्याकाळी १० ते १५ पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकतात त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलून नेतात, हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

दरेकर म्हणाले की, १२ एप्रिल रोजी मी आणि आमदार प्रसाद लाड आम्ही दमणच्या कंपनीत महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता. शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. “तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत”, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस डोकनिया यांच्या घरी धडकले, त्यांनी डोकनिया यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांना उचलून पोलीस स्टेशनला नेले. महाराष्ट्राला मदत करणाऱ्या ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकांची अशाप्रकारे चौकशी करणं, महाविकास आघाडी सरकारला शोभत नाही. संकटाच्या काळात देखील महाविकास आघाडी सरकारला राजकारण सुचतंय हे दु्दैवी आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...