पुणे- असंख्य चित्रपटांतून , वास्तववादी घटनांतून गुन्हेगारीचा अंत कसा होतो हे पाहून समजून घेऊनही सोन्या मोन्या ,चंद्या,नंद्या अशा अनेक बिनकामी , बेकार आणि अल्पावधीत श्रीमंत बनू पाहणाऱ्या तरुणाईला भाईगीरीच्या क्रेझ ने पछाडले आहे. काही तर काम धंदा असूनही यात केवळ हौस म्हणूनही गुरफटत आहेत . अशा अनेक घटना रोज पुण्याच्या परिसरात घडत आहेत ज्यांना रोखण्याचे सामर्थ्य अद्यापही कोनात दिसून आलेले नाही पण यातून कित्येल कुटुंबे मात्र उध्वस्त होत आहेत .. ‘सोन्या म्हणायचे नाही, मी इथला भाई आहे, भाई म्हणून बोलायचे’ असे सांगूनही भाई म्हणण्यास नकार दिल्याने एका टोळक्याने पती पत्नीला मारहाण केली. ही घटना साडेसतरा नळी येथे १५ एप्रिलला रात्री १० वाजता घडली.तर बुलेटचा चाक पायावरुन गेल्याने एका तरुणासह त्याच्या कुटूंबास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना धनकवडी त घडली.सहकारनगर पोलिसांनी स्वप्निल दिपक कदम(28,रा.गुलाबनगर, धनकवडी) याला अटक केली असून त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.याशिवाय पुर्व वैमनस्यातून दोघांवर जीवघेणा हल्ला करत परिसरातील वाहनांची तोडफोड करण्याची घटना घोरपडे पेठेतील नेहरू मित्र मंडळ येथे घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पाच ते सात जणांवर खूनाचा प्रयत्न तसेच कोविड 19 उपाययोजना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
घोरपडे पेठेतील नेहरू मित्र मंडळ येथील घटने संदर्भात खडक पोलीस ठाण्यात अभिषेक उर्फ बाप्पा कसबे (31,रा.मनपा कॉलनी, घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली असून ,ते त्यांचा मेव्हणा गणेश मोरेसह मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरुन चालले होते. यावेळी आरोपींनी त्यांना चौकात अडवले. लोखंडी तलवार व कोयत्याने अभिषेक यांच्या हातावर, डोक्यावर व पाठीवर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तर गणेश यास लाथा-बुक्क्यांनी व बांबूने मारहाण करत आम्ही येथले भाई आहोत, जर आमच्या विरोधात कोणी गेला तर आम्ही मुडदे पाडू असा दम दिला. जाताना हातातील कोयते व तलवारी नाचवत वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बोबडे तपास करत आहेत.
सोन्या म्हणायचे नाही ,भाई म्हणायचे ..प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोन्या जगताप, जालिंदर खलसे, शुभम साखुरे, करण दहीवडे, शाहरुख, उंदर्या, सोन्या जगतापचे मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आनंदा मारुती काळे (वय २५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.काळे हे आपल्या मोटारसायकलवरुन जात असताना त्यांच्या बुलेटचा आवाज वाढवल्याने सोन्या जगताप याने त्यांना ‘ए आवाज कोणाला काढला रे’ असे विचारले. तेव्हा काळे यांनी ‘ए सोन्या तुला नाही केला’ असे म्हणाले. त्यावर टोळक्यांमधील एकाने ‘त्याला सोन्या म्हणायचे नाही भाई म्हणायचे,’ असे सांगितले. ‘मी त्याला सोन्याच बोलणार, भाई तुझ्या घरी’ असे उत्तर काळेंनी दिले. त्यावर राग येऊन सोन्या जगताप व इतरांनी आनंदा काळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बेल्टने मारले. त्याच्या सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी व मावस सासु यांनाही मारहाण केली.
धनकवडी येथील घटनेत बुलेटचा चाक पायावरुन गेल्याने एका तरुणासह त्याच्या कुटूंबास जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीसांनी स्वप्निल दिपक कदम(28,रा.गुलाबनगर, धनकवडी) याला अटक केली असून त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी संतोष हजारे (29,रा.तानाजीनगर, धनकवडी) हा बुलेट घेऊन रस्त्याने जात असताना त्यास स्वप्निल आडवा आला. यामुळे बुलेटचे चाक त्याच्या पायावरुन गेले. याचा राग मनात धरु स्वप्निल व त्याच्या साथीदारांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.यानंतर थोड्या वेळाने पुन्हा संतोषवर कोयत्याने वार केले. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र अरबाजलाही कोयत्याने मारहाण करण्यात आली. यानंतर स्वप्निलच्या भाऊ , पत्नी व आईसही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुजर करत आहेत.