संपूर्ण देशात लाॅकडाऊन लागणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलं उत्तर

Date:

नवी दिल्ली – एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा यांना देशात लाॅकडाऊन लागेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सध्या लाॅकडाऊन लागू करणे म्हणजे घाई करण्यासारखे आहे. गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनचा हेतू वेगळा होता, त्यावेळी देशाकडे औषध किंवा लस नव्हती. मात्र आताची स्थिती वेगळी आहे. आम्ही राज्यांसोबत सतत संपर्कात आहोत, सध्यातरी संपूर्ण देश लाॅकडाऊनबाबत कोणताही विचार नाही, असे अमित शहा म्हणाले.भारतात करोना संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. करोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. काल (ता.17 एप्रिल) देशात 2 लाख 60 हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर दिड हजाराहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 12 राज्यांत करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ही परिस्थिती पाहता देश लाॅकडाऊनच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात लाॅकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या ताज्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात देशात 2 लाख 61 हजार 500 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1501 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 1 लाख 38 हजार 423 जणांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...