तुम्ही रुग्णालय देऊ शकत नसाल तर ‘त्यांना’ घरीच उपचारसुविधा द्या – आबा बागुल

Date:

पुणे-कोरोनाच्या रुग्णांना तुम्ही बेड पुरवू शकत नसाल , सुविधा पुरवू शकत नसाल तर प्राथमिक अवस्थेतील, आणि फारसा त्रास नसलेल्या मोठा प्रादुर्भाव न झालेल्या, आणि घरीच बरे होऊ शकतील अशा रुग्णांना आपापल्या घरीच उपचार घेता येतील अशी व्यवस्था तरी निर्माण करा अशी मागणी आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,”कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता, रूग्णालयात जागा न मिळाल्याने घरातच फॅमिली डॉक्टरकडून रेमडिसिवर इंजेक्शन व इतर उपचार करण्याचे धाडसी पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे.कोरोनाचे रूग्ण वाढण्याचे प्रमाण वेगात असून भविष्यात अजून रूग्ण वाढून रूग्ण रस्त्यावर अथवा घरातच मृत्युमुखी पडतील अशी परिस्थिती झाली असून  घरातच फॅमिली डॉक्टरकडून रेमडिसिवर इंजेक्शन व इतर उपचार करण्याबाबत राज्य शासन व केंद्र शासनाशी तातडीने पत्रव्यवहार करावा.जगभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणे शहरात दैनंदिन ६ हजार कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांपैकी सर्वच रूग्ण हे अत्यंत गंंभीर अवस्थेत नसल्याने अनेक रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशनमध्ये आहेत. महापालिकेने कोरोना बाधितांवर उपचार करणेसाठी जंबो रूग्णालय, दळवी रूग्णालय, नायडू रूग्णालय व इतर अनेक रूग्णालये सुसज्ज केलेली आहेत. या रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर सुविधा उपलब्ध असून रूग्ण उपचारासाठी दाखल होवून बरे होवून डिस्चार्ज देखील होत आहेत. परंतू मनपाच्या रूग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत असल्याने महापालिकेकडून शहरातील खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेणेची कार्यवाही करण्यात येत आहे. असे असनूही रूग्ण वाढीचे प्रमाण जास्त असल्याने पुणे शहरात उपचारासाठी दाखल होणेस जागा उपलब्ध नाही अशी स्थिती तयार झाली असून रूग्णांवर उपचार करणेसाठी रूग्णांचे नातेवाईक रात्रंदिवस शहरात रूग्णालयांमध्ये चकरा मारत आहेत, परंतू त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोना बाधितांवर रेमडिसिवर इंजेक्शन व औषधे देणे असे उपचार केले जातात. जे रूग्ण सिरियस होतात त्यांना आयसीयु व डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर उपचार दिले जातात. परंतू ज्या रूग्णांना  रेमडिसिवर इंजेक्शन व औषधे यावर जे रूग्ण बरे होणार आहेत अशा रूग्णांवर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने घरीच रूग्णांवर उपचार केले तरी ते बरे होतील असे अनेक तज्ञांचे मत आहे. याबाबत धाडसी पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. जर घरीच फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच डॉक्टरांनी घरी जावून इंजेक्शन व इतर उपचार दिल्यास रूग्णालयात येणारा लाखो रूपयांचा खर्च देखील वाचणार असून रूग्णालयातील जागा अडून राहणार नाहीत, या जागांवर अत्यवस्थ असलेले रूग्णांना जागा उपलब्ध होवून मृत्युचे प्रमाण कमी होईल. अन्यथा येत्या काळात कोरोनाचे रूग्ण रस्त्यावर मृत्युमुखी पडतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. तरी पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणणेसाठी व निष्पाप नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी विविध उपाय योजना व धाडसी पावले उचलण्यात यावी, विशेषतः फॅमिली डॉक्टरांनी रूग्णांना घरीच रेमडिसिवर इंजेक्शन व इतर औषधे देणेकामी निर्णय करणेसाठी राज्य शासन आवश्यकता असल्यास केंद्र शासनाकडे तातडीने पत्रव्यवहार करण्यात यावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...