जिथे कोरोनाची लस बनली, तिथेच तिचा तुटवडा होऊ देऊ नका – आबा बागुल(व्हिडीओ)

Date:

पुणे- ज्या शहरात कोरोना प्रतिबंधक लस बनली तिथेच तिचा तुटवडा भासणे या सारखे दुर्दैव नाही, जगाला देऊ द्यात पण पुण्याला कमी पडू देऊ नका असे आज येथे कॉंग्रेसचे महापालिकेतील ग ट नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले . आज त्यांनी त्यांच्या प्रभागात लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते .

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना पुणेकरांना कोरोनाचे लसीकरण करणे सोयीचे व्हावे यासाठी शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून प्रभागातील नागरिकांसाठी राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून हे केंद्र सुरू करण्यात आले. सदर केंद्रात लसीकरण करणाऱ्या नागरिकांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येते तसेच निरीक्षण कक्षेत चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले. आज राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग येथील लसीकरण केंद्राचा शुभारंभ झाला असून यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार,आरोग्य अधिकारी डॉ विद्या नागमोडे, डॉ पाखले,डीएसआय भालेराव,जयश्रीताई बागुल,अमित बागूल आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...