हृदयांतरच्या सेटवर शामक दावरकडून विक्रम फडणीसला मिळाली नटराजाची मूर्ती!

Date:

गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. फॅशन डिझाइनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर ह्या पहिल्या मराठी चित्रपटातल्या एका गाण्यासाठी शामकने नृत्यदिग्दर्शन केलंय.

 

विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) ह्यांच्या ‘हृदयांतर’ ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. ‘हृदयांतर’ हा एक भावनिक चित्रपट आहे.

 

विक्रम फडणीस सांगतात, “शामक दावर माझ्या चित्रपटासाठी एक कॉन्सर्ट गाणं करतायत, ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच एक सन्मानाची बाब आहे. मी शामकला गेली 25 वर्ष ओळखतोय. आणि आता हा ऋणानुबंध एक पाऊल पूढे जाऊन एका चित्रपटात आम्ही एकत्र काम करतोय. शामक स्वत:च्याच भुमिकेत दिसेल. आम्ही नुकतंच ह्य़ा गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. आणि ते गाणं सुंदररित्या साकारलं गेलंय. जेव्हा शामकने मला सेटवर आल्यावर नटराजाची मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा तर मला सुखद आश्चर्यांचा धक्काच बसला. नटराज पावित्र्याचं प्रतिक आहे. ही भेट चिरंतनकाळ माझ्या आठवणीत राहिल.”

 

शामक दावर आणि विक्रम फडणीस ह्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणे, शामकसाठी चांगला अनुभव आहे. शामक दावर ह्याविषयी म्हणतात, “जेव्हा विक्रमने फिल्मसाठी माझ्याकडे विचारणा केल्यावर मी लगेच त्याला होकार कळवला. माझ्या 30 वर्षांच्या करीयरमध्ये मी कधीही मराठी चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केलं नव्हतं. मी नेहमीच बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये काम केलेले आहे. विक्रम माझा जवळचा मित्र आहे. आणि हा सिनेमा मी एक आव्हान म्हणून करायचा ठरवला. काहीतरी वेगळं करून पाहण्याची इच्छा यामागे होती. विक्रम नृत्यदिग्दर्शकाला पूर्ण मुभा देतो. त्यामुळे आपली कला मनमोकळेपणाने दाखवण्याचा अवसर कलाकाराला मिळतो.”

 

हृदयांतर सिनेमाचे दुसरे शेड्युल नुकतेच मुंबईत पूर्ण झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...

तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन...

६० लाखाचा विमल गुटखा खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडला

पुणे- पुणे पोलिसांनी माग काढून खेड शिवापुर टोल नाक्यावर...

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही. बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल. आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.” ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात. iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात: ·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा ·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा ·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा ·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा ·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा ·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा