महेश मांजरेकरांचा ‘ध्यानीमनी ‘..

Date:

महेश मांजरेकर निर्मित नटसम्राट चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ध्यानीमनी या १० फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं विशेष लक्ष आणि हिंदी सिनेसृष्टीची उत्सुकता या चित्रपटाकडे लागून राहिली
आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी, मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक देखील करत आहेत. बिग बी आणि सलमान खाननं ध्यानीमनी या चित्रपटाच्या ट्रेलरला मनापासून दाद दिली असून, ट्विटर आणि फेसबुकवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या
आहेत. तसंच ‘ध्यानीमनीचा’ अत्यंत कुतूहलपूर्ण ट्रेलरही त्यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रचंड प्रतिसामिळत आहे.
प्रेक्षकांना कायमच नाविन्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या महेश मांजरेकरांची ही निर्मिती असून महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ;ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट; या प्रॉडक्शन हाऊसची ही कलाकृती आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या अत्यंत ताकदीच्या अभिनयानं चित्रपटातील आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी भावे ह्या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसार पद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. हा सिनेमा “बघू नका” अशी विनंती सध्या अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. ठाम, गंभीर आणि रहस्यमय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर व्हिडिओत व्यक्त होताना आढळून येत आहेत. या सिनेमा बद्दल ख्यातनाम हिंदी सिनेतारे, अमिताभ बच्चन व सलमान खान यांनी सुद्धा ‘हा चित्रपट बघू नका’ असे ट्विट केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सचिन खेडेकर, सुनील बर्वे, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील चित्रपट बघू नका असे आग्रहाने सांगत आहेत. चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम करावीशीच वाटते. इथे निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती विषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. या धाडसामुळे सोशल मीडियात या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू असून १० फेब्रुवारीला, एक अत्यंत वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...

तीन अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई

पुणे -पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन...

६० लाखाचा विमल गुटखा खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडला

पुणे- पुणे पोलिसांनी माग काढून खेड शिवापुर टोल नाक्यावर...

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही. बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल. आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.” ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात. iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात: ·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा ·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा ·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा ·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा ·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा ·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा