केअर टेकर्स संस्थेची पूरग्रस्तांना मदत…….
पुणे-कोकणातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक वस्तूंची मदतीचा हात घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी लष्कर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडीत उपस्थित होते..केअर टेकर्स या संस्थेच्या वतीने महाड येथील पूरग्रस्त बांधवांसाठी आवश्यक वस्तूंचा ट्रक रासने यांच्या उपस्थितीत रवाना झाला.रासने यांनी आपल्याकडील छत्र्यांची मदत पाठविली .
यावेळी रासने म्हणाले ,’देशात कोठेही आपत्ती येते त्यावेळेस पुणेकर सर्वप्रथम मदतीचा हात देत असतो….पुणेकर संवेदनशील असून सढळ हाताने मदत करीत असतात.कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांनी आर्थिक परिस्थिती खालावली असतानाही मदत केली,असेही रासने म्हणाले..
1993 साली अनंत चतुदर्शीच्या रात्री लातूर जिल्ह्यात भूकंप झाला,त्यावेळेस आम्ही पहाटे दगडूशेठ गणपती विसर्जन करुन लगेचच लातूर ला मदत घेऊन निघालो होतो ,अशी आठवण त्यांनी सांगितली.हा कार्यक्रम केअर टेकर्स या संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी आयोजित केला होता.