Home Blog Page 88

बिर्लास्टुडिओज आणि वी ची भागीदारी:भारतातील पहिले ‘मोबाईल-फर्स्ट’ टॅलेंटहंट’रील सेरिअल स्टार’ आयोजित करणार

मुंबई, १४ एप्रिल, २०२६: बिर्ला स्टुडिओजने वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या सहयोगाने ‘रील से रिअल स्टार’ (Reel Se Real Star) हा उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली. ‘मोबाईल फर्स्ट’ अभिनय टॅलेंट शोधणारे हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे. भारतीय मनोरंजन सृष्टीतील संधींची दारे सर्वांसाठी खुली करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

‘ओळख आणि संधी’ हे मुख्य ध्येय उराशी बाळगून, ‘रील से रिअल स्टार’ हे व्यासपीठ भौगोलिक मर्यादा, चित्रपटसृष्टीत प्रवेशाच्या आड येणारे अडथळे दूर करत आहे – स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सिनेमाचे दरवाजे खुले होणार आहेत.  

हा उपक्रम एका साध्या पण अत्यंत प्रभावी विचारावर आधारलेला आहे: “कला ही कोणा एकाची मक्तेदारी नसते, ती कोणातही असू  शकते आणि प्रत्येक प्रतिभेला व्यासपीठ मिळायलाच हवे.”

या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना बिर्ला स्टुडिओजच्या संस्थापिका आणि अध्यक्षा अनन्या बिर्ला म्हणाल्या: अनेकदा योग्य प्रतिभेला हवी तशी संधी मिळत नाहीआणि याच कमतरतेमुळे अनेक होतकरू कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून वंचित राहतातआजच्या काळात उपलब्ध असलेल्या प्रगत डिजिटल पायाभूत सुविधाबिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी आणि वोडाफोन आयडियाचे (वीदेशव्यापी जाळे यांच्या मदतीनेआम्ही पारंपारिक मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहोतचित्रपटसृष्टीची दारे सर्वांसाठी कशी खुली करता येतीलयाचा नव्याने विचार करण्याची ही एक उत्तम संधी आहेरील से रिअल स्टार‘ हा आमचा एक असा प्रयत्न आहेजिथे देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीमधील कलागुणांचा शोध घेतला जाऊ शकतो आणि संधी मिळवण्यासाठी परिस्थितीचा अडथळा येणार नाहीकारण आम्ही असे मानतो कीप्रत्येक प्रतिभेला स्वतःला सिद्ध करण्याची एक खरी संधी मिळायलाच हवी.”

वोडाफोन आयडियाची (वी) अफाट डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील तसेच सांस्कृतिक दृष्टी यांचा मेळ घालत, भारतातील सर्वात अस्सल आणि वैविध्यपूर्ण ‘ॲक्टिंग टॅलेंट पाईपलाईन’ निर्माण करण्याचे या व्यासपीठाचे ध्येय आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान असूनही वंचित राहिलेले कलाकार मनोरंजन सृष्टीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील.

वोडाफोन आयडियाचे (वीमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअभिजित किशोर म्हणाले, कनेक्टिविटी तेव्हाच सर्वात अर्थपूर्ण ठरते जेव्हा ती संधी निर्माण करतेरील से रिअल स्टार‘ हे व्यासपीठ देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना ऑडिशन रूम‘ थेट त्यांच्या हातात आणून देईलचित्रपटसृष्टीतील प्रवेशाच्या आड येणारे पारंपारिक अडथळे मोडीत काढणार आहेआमचे भक्कम नेटवर्क२० कोटींहून अधिक युजर्सपर्यंत असलेली आमची डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी यांच्या जोरावरआम्ही संपूर्ण भारतात प्रतिभा शोधण्याच्या प्रक्रियेचे लोकशाहीकरण‘ करत आहोतआमचे ध्येय साधे आहेप्रतिभेला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसाव्यात आणि तिचा शोध कुठूनही घेतला जावा— मग ते गजबजलेले महानगर असो किंवा दुर्गम गावआम्ही केवळ एक व्यासपीठ तयार करत नाही आहोततर लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची एक खरी संधी देत आहोत.”

ही मोहीम संपूर्ण देशभरात चालवली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण भारतभरातील उदयोन्मुख कलाकारांना संपूर्णपणे डिजिटल, ॲप आणि वेब-आधारित प्रक्रियेद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. यात सहभागी होणारे कलाकार आपल्या ऑडिशन्स थेट अपलोड करू शकतील, ज्यामुळे सिनेसृष्टीतील कोणाच्याही ओळखीची गरज आता उरलेली नाही.

‘रील से रिअल स्टार’ मध्ये जनसहभाग आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा एक अनोखा संगम घडून येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची पारख नामवंत दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज करतील, तसेच त्यांना बहुमोल मार्गदर्शन देखील करतील. यामुळे या उपक्रमाची विश्वासार्हता आणि कलात्मक दर्जा जपला जाईल.

भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे एक सुवर्णसंधी — एका नामांकित दिग्दर्शकासोबत चित्रपटात काम करण्याची! हा उपक्रम येत्या काही महिन्यांत ‘वी’ (वोडाफोन आयडिया) ॲपवर सहभागासाठी उपलब्ध होईल. सध्या, इच्छुक कलाकार बिर्ला स्टुडिओज किंवा वी च्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात.

गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये मार्च 2022 पासून 3.8 पट वाढ, बनले आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन

· गोल्ड लोन शिल्लक आता भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओपैकी 11.1%; मार्च 2022 मध्ये हे प्रमाण 5.9% होते

· ओरिजिनेशन मूल्य 2022 च्या पहिल्या तिमाही पासून 5.1 पट वाढले असून सरासरी तिकीट आकार 90,000 रु. वरून दुप्पटीने वाढून 1.96 लाख रु.

·         प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम कर्जदार आता सुमारे 52% ओरिजिनेशनमध्ये आहेत आणि महिलांचा वाटा 39% आहे. त्यायोगे गोल्ड लोन बाजारात अधिक व्यापक आणि मजबूत कर्जदार आधार दिसून येत आहे

मुंबई, 14 एप्रिल 2026: गोल्ड लोन वेगाने वाढत शिल्लक वाट्याच्या आधारावर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन बनले आहे1. ट्रान्सयुनियन सिबिलच्या गोल्ड लोन लँडस्केप अहवालानुसार मार्च 2022 पासून गोल्ड लोन शिल्लक 3.8 पट वाढली असून डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओमधील त्यांचा वाटा 5.9% वरून 11.1% पर्यंत वाढला आहे. या वाढीतून कर्जदारांकडून वाढता स्वीकार, मोठे तिकीट आकार, वित्तपुरवठादारांचा व्यापक सहभाग आणि अधिक विस्तृत क्रेडिट इतिहास असलेल्या ग्राहक व महिला कर्जदारांचा समावेश असलेला कर्जदार प्रोफाइल दिसून येतो.

अहवालात असे दर्शविले आहे की या विभागातील वाढ विशेषतः एनबीएफसीमध्ये मजबूत राहिली आहे. त्यांनी मार्च 2022 मधील 7% वरून डिसेंबर 2025 मध्ये 11% पर्यंत गोल्ड लोन शिल्लक वाटा वाढवला आहे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी याच कालावधीत 57% वरून 62% पर्यंत वाढ केली आहे. प्रत्येक खात्यावरील सरासरी गोल्ड लोन शिल्लक मार्च 2022 मधील 1.1 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 1.9 लाख रु. झाली आहे. त्यातून या विभागातील कर्जाचे वाढते प्रमाण अधोरेखित होते.

चार्ट 1: गोल्ड लोन इंडस्ट्री सप्लाय (इंडेक्स्ड) *

टीप: मार्च ’22 ला संपलेल्या तिमाहीसाठी निर्देशांक 100 धरला आहे

पुरवठा प्रवाह बाजारातील घडामोडींमध्ये तीव्र विस्तार दर्शवतात. 2022 मधील पहिल्या तिमाहीपासून गोल्ड लोन ओरिजिनेशनचे प्रमाण 2.3 पट वाढले आहे, तर त्याच कालावधीत ओरिजिनेशन मूल्य 5.1 पट वाढले आहे. 2022 मधील पहिल्या तिमाहीत 90,000 रु. असलेला सरासरी तिकीट आकार 2025 च्या चौथ्या तिमाहीत 1.96 लाख रु. पर्यंत वाढला आहे. यावरून बाजाराचा विस्तार फक्त पोहोच वाढविण्यातच नाही तर उच्च मूल्याच्या कर्जाकडेही होत असल्याचे दिसते.

कर्जदारांचे प्रोफाइल देखील बदलत आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम2 कर्जदारांचा वाटा 2022 मधील 43% वरून 2025 मध्ये सुमारे 52% झाला आहे, तर न्यू-टू-क्रेडिट सहभाग 12% वरून 6% पर्यंत घटला आहे. यावरून कर्जदारांच्या प्रोफाइलमध्ये गोल्ड लोन अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत असल्याचे सूचित होते.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भावेश जैन म्हणाले, “भारतामध्ये सोने नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे.  परंतु आता सोने-आधारित कर्जाचा वापर कसा केला जातो यात एक संरचनात्मक बदल होत असताना आपण पाहत आहोत. सुलभ सुरक्षित कर्ज म्हणून गोल्ड लोन हे वाढत्या प्रमाणात मुख्य प्रवाहातील, सुसूत्र आणि सहज उपलब्ध या स्वरूपाचे बनत आहे. त्यांची जलद वाढ कर्जदात्यांचा म्हणजेच वित्तपुरवठादारांचा विश्वास आणि ग्राहकांचा वाढता स्वीकार या दोन्हींचे प्रतिबिंब आहे.

“विशेष लक्षवेधी बाब म्हणजे या विभागात अधिक मजबूत क्रेडिट प्रोफाइल असलेले कर्जदार, मोठे तिकीट आकार आणि परत परत वापर होत आहे. यावरून असे दिसते की गोल्ड लोन आता केवळ अल्पकालीन तरलतेच्या गरजांसाठी वापरले जात नाहीत, तर ते घरगुती कर्ज घेण्याच्या व्यापक वर्तनाचा भाग बनत आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

व्यापक कर्जदार आधार विस्ताराला देत आहे चालना

महिला कर्जदार गोल्ड लोन विस्तारामध्ये एक महत्त्वाचा वाढीचा घटक म्हणून उदयास आले आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये महिलांचे प्रमाण 2022 मधील 36% वरून वाढून 2025 मध्ये 39% झाले. दक्षिणेकडील बाजारपेठांबरोबरच पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्येही मजबूत वाढ दिसून येत आहे. अहवालात तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला कर्जदारांमध्ये उल्लेखनीय गती दिसून येत असल्याचे ठळकपणे नमूद केले आहे. त्यातून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात मागणीचा विस्तार स्पष्ट होतो.

अहवालात कर्जदारांच्या कर्ज घेण्याच्या पद्धतींमध्येही बदल होत असल्याचे नमूद केले आहे. प्रति कर्जदार सरासरी प्रलंबित रक्कम डिसेंबर 2022 मधील 1.9 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 3.1 लाख रु. झाली आहे, तर 2.5 लाख रु. पेक्षा जास्त गोल्ड लोन एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांची संख्या 2025 अखेरीस एकूण कर्जदारांच्या 14% झाली आहे. 2022 मध्ये हेच प्रमाण 10% होते. जास्त प्रमाणात सध्या असलेली शिल्लक आणि अधिक असुरक्षित एक्स्पोजर असलेले कर्जदारही ओरिजिनेशनमध्ये अधिक ठळक झाले आहेत. यावरून गोल्ड लोन आता कर्जदारांच्या वॉलेटमध्ये इतर कर्ज स्वरूपांसोबत अधिक प्रमाणात दिसत आहेत.

वाढ ही मजबूत जोखीम शिस्तीसह संतुलितच असावी

अहवालात या विभागाच्या वाढीसोबत अधिक तीव्र कर्जदार-स्तरीय जोखीम मूल्यमापनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. अभ्यासानुसार, जून 2025 ला संपलेल्या सहा महिन्यांत ओरिजिनेट केलेल्या गोल्ड लोनसाठी एकूण थकबाकी दर 1.1% होता (थकबाकी म्हणजे ओरिजिनेशनच्या सहा महिन्यांत 60 दिवसांपेक्षा जास्त विलंबाने नोंदवलेले कोणतेही खाते).  ज्यांची पोस्ट-ओरिजिनेशन गोल्ड लोन प्रलंबित रक्कम 2.5 लाख रु. पेक्षा जास्त होती अशा कर्जदारांमध्ये थकबाकी दर 1.5% होता. तो कमी एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांच्या 0.7% च्या तुलनेत सुमारे 2.2 पट जास्त आहे. याशिवाय, गोल्ड लोनमधील वॉलेट केंद्रीकरण, अलीकडील थकबाकी आणि एकूण कर्ज पोर्टफोलिओमध्ये गोल्ड लोनवर अधिक अवलंबित्व हे महत्त्वाचे पुढील जोखीम निर्देशक आहेत.

अहवालात पुढे असेही नमूद केले आहे की गंभीर थकबाकीचा इतिहास असलेले आणि नंतर गोल्ड लोनवर अवलंबून राहणारे कर्जदार औपचारिक क्रेडिट प्रणालीपासून दूर जाण्याचा लक्षणीय उच्च धोका दर्शवतात. त्यांचा क्रेडिट उपलब्धता बंद होण्याचा दर नॉन-डिफॉल्टिंग कर्जदारांच्या तुलनेत सुमारे 1.6 पट जास्त होता. यावरून असे सूचित होते की ज्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड नियमित आणि वेळेवर करण्यात अडचणी येत आहेत अशा कर्जदारांसाठी गोल्ड लोन हे शेवटचा पर्याय म्हणून वापरले जात असावेत.

श्री. जैन पुढे म्हणाले, “गोल्ड लोन विभागाचा विस्तार होत असताना वित्तपुरवठादारांचे प्राधान्य  प्राथमिकता वाढ आणि सावधगिरी यामध्ये संतुलन राखणे हेच असले पाहिजे. तारण ठेवण्याची ताकद महत्त्वाची राहते परंतु कर्जदारांचे मूल्यमापन करण्यासाठी ती एकमेव निकष ठरू शकत नाही. वित्तपुरवठादारांनी कर्जदारांचा एकूण कर्जबाजारीपणा, परतफेड क्षमता, अलीकडील क्रेडिट वर्तन आणि विविध कर्जदात्यांमधील एक्स्पोजर यांचे अधिक सर्वसमावेशक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कर्जदार-स्तरीय लोन-टू-वॅल्यू तपासणी अधिक मजबूत करणे, जोखीम-आधारित किंमत निर्धारण आणि गोल्ड लोनच्या परत परत वापरावर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे हे या महत्त्वाच्या विभागाची शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने वाढ सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ठरेल.”

1 डिसेंबर 2025 पर्यंत शिल्लक वाट्याच्या 27.8% सह गृहनिर्माण कर्ज हे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन आहे

2 क्रेडिटव्हिजन® (CV) स्कोअर श्रेणी: सबप्राइम 300–680; नियर प्राइम 681–730; प्राइम 731–770; प्राइम प्लस 771–790; सुपर प्राइम 791-900

जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे यातून बाहेर आल्यास खरी आदरांजली

आज राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आंबेडकर जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करताना तरुण पिढीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करताना केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांच्या वारशाचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !

बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।

महापौर मंजुषा नागपुरे भीमगीतांच्या तालावर रंगल्या; बोपोडीत जयंती महोत्सवात उत्साहाचा जल्लोष

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी येथे भव्य जयंती महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या या सोहळ्यात आकर्षक विद्युत रोषणाई, दमदार स्पीकर शो आणि भीमगीतांनी परिसर भारावून गेला. या उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भीमगीतांच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली आणि नागरिकांमध्ये आनंदाची लहर पसरली.

या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, अविनाश कदम, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी क्रेनच्या सहाय्याने तब्बल ३० फूट उंचीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी बोलताना वाडेकर म्हणाले, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे दरवर्षी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या दिमाखात विविध सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो. यंदा  बाबसाहेबांनी केलेलल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी तर महात्मा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे, महात्मा फुले पुणे महापालिकेचे सदस्य होते यामुळे याला विशेष महत्व आहे. या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन वाडेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण सहभाग यामुळे बोपोडीतील जयंती महोत्सवाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अल्पोपहार वितरण तसेच रोप वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे झालेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार बापूसाहेब पठारे, सभागृह नेते गणेश बिडकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस श्याम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक नीलेश अल्हाट, जयदेव रधवे, निलेश रोकडे, चिंतामण जगताप, सनाबी शेख, हर्षदा गायकवाड, मंगल रासगे, शोभा झेंढे, हनुमंत गायकवाड, मिलिंद चलवादी, अजय थोरात, सुनिल जाधव, बुद्धिशा रंधवे, शशिकांत मोरे, शांतीनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून रोपांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने अवलंब करावा, असे आवाहन यावेळी केले.

लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो; इतिहास रचला जातो : पद्मश्री शेखर सेन

0

पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : सृष्टीचे चलन आवर्तनातूनच होत असते. कलाकार हा संस्कृतीचा प्रतिनिधी असतो; निधीपती नव्हे. त्या निधीला सुंदर रूपात प्रस्तुत करण्याचे कार्य तो करतो. भूतकाळातून ज्ञानकलश, ज्ञानमोती शोधले जातात तेव्हा कलेची उन्नती साधली जाते. लेखणी कागदावर अंकित होत नाही तोपर्यंत ती कल्पना असते. जेव्हा ती कागदावर उतरते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो, इतिहास रचला जातो, असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक, ज्येष्ठ कलावंत पद्मश्री शेखर सेन यांनी केले.

तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल आणि अभिजात अकादमीतर्फे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. १२) शेखर सेन यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावर, डॉ. सदानंद बोरसे, पुस्तकाच्या अनुवादक विद्याहरि देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूर कॉलनीतील एमइएस ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्ञान ग्रहण करण्यासाठी ग्रंथाची आवश्यकता असते हा मुद्दा अधोरेखित करून पद्मश्री शेखर सेन पुढे म्हणाले, संगीत क्षेत्रातील भ्रामक संकल्पनांना पंडित सुरेश तळवलकर यांच्या लेखणीतून दूर सारले जाईल. ते पुढे म्हणाले, कला प्रवाहित ठेवण्याचे कार्य कलाकार निरंतरपणे करत असतो. संगीत कलेच्या माध्यमातूनच निराशा, आत्म्यातील मलिनता दूर केली जाऊ शकते. निरंतर कला साधनेतून परंपरेत योग निर्माण करणाऱ्याला तालयोगी म्हटले जाते. मृत चर्मात प्राणप्रतिष्ठा करण्याचे कार्य तालयोगी पंडित सुरेश तळवलकर करीत आहेत, असे त्यांनी गौरवाने नमूद केले.

गुरूंचे विचार देशात प्रसृत होतील : पंडित सुरेश तळवलकर…

पुस्तक लेखानाविषयी बोलताना पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक माझ्या हातून लिहिले गेले असले तरी यातील संकल्पना, विचार हे बुजुर्गांचेच आहेत. हे विचार, संकल्पना मला पहायला, ऐकायला, अनुभवायला मिळाल्या हे माझे भाग्य आहे. ‘आवर्तन’ म्हणजे पुनरावृत्ती नव्हे तर पूर्णत्व झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात होय. गुरू शिष्याला शिकवतात परंतु त्यावर अनेक वर्षांची साधना झाल्यानंतरच त्यातील अर्थ गवसतो. या पुस्तकाच्या माध्यमातून गुरूंचे विचार संपूर्ण भारतात प्रसृत होतील.

पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर म्हणाले, भारतीय अभिजात संगीताचा प्रसार संपूर्ण जगभरात झालेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत क्षेत्राकडे कसे पहावे, पुढे जाण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन मिळेल.

डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वाट्याला आलेला अनमोल जडावाचा दागिना आहे. पंडित सुरेश तळवलकर यांचे तबला-डग्ग्याइतकेच त्यांच्या वाणी व लेखणीवर प्रभुत्व आहे. या पुस्तकाची मांडणी सुबोध शैलीत केलेली असून यातील आठवणी-किस्स्यांमधून सांगीतिक विचारच पोहोचविले जात आहेत. मराठीतील विचारधन सीमित राहू नये, त्याचा परिघ मोठा व्हावा या हेतूने हिंदी आवृत्तीची निर्मिती झाली आहे.

अनुवादक विद्याहरि देशपांडे म्हणाल्या, अनुवाद करताना लेखकाचे विचार दुसऱ्या भाषेत आणावे लागतात. तेव्हा त्यांचे रूप बदलता येते परंतु विचार बदलले जात नाहीत. ‘आवर्तन’ पुस्तकाचा अनुवाद करताना पंडितजींचे शब्द गुरुवाणीप्रमाणे माझ्या कानात गुंजत होते. गुरू समिप असल्याची भावना सातत्याने जाणवत होती. ‘आवर्तन’ या पुस्तकातील विचारधन त्यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून ऐकविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीनिवास राव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिरीष कौलगुड, सुरेंद्र मोहिते, सुनील देशपांडे यांनी केले.

पुस्तक प्रकाशन समारंभानिमित्त तालवाद्य प्रस्तुतीचा अनोखा कार्यक्रम सावनी तळवलकर (तबला), ईशान परांजपे (काहोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश), अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी सादर केला.

खारघर, कळंबोली व पनवेल येथे अभिनय शिबिरांचे आयोजन

पनवेल महानगरपालिका व अ.भा. नाट्य परिषद शाखा- पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम सांस्कृतिक चळवळ

पनवेल, :- पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 मे ते 19 मे असे नऊ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नाट्य संस्कृती चळवळीस अधिक चालना मिळावी या करिता नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे त्याकरिता महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार याचे आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या विद्यमाने पनवेल, कळंबोली व खारघर येथे सर्व कलावंतांसाठी हे शिबिर मोफत आहे.

परेश ठाकूर
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नाट्य कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळावे व त्यांमधून पनवेलचे नाव राज्यात सर्वत्र पोहचावे याकरिता नाट्य परिषद विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने युवा नाट्यकर्मींना अभिनय प्रशिक्षणास वेळ मिळु शकतो. या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा मोठा फायदा पनवेल मधील कलावंतांना होईल.असे परिषदेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी म्हटले आहे
.


दोन गटात शिबीर
अभिनय प्रशिक्षण शिबीरासाठी दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यात पहिला गट विभाग म्हणजे वय वर्षे 8 ते 16 हा युवा गट व प्रौढ गट म्हणजे 17 ते 60 वयांपर्यंत यात सहभाग घेता येईल प्रत्येक गटासाठी हे शिबीर पूर्णपणे मोफत आहे . संख्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या 30-30 नाट्यकर्मींना या शिबिरासाठी प्रवेश दिला जाईल.


*उच्चस्तरीय प्रशिक्षण *
युवा गटासाठी सकाळी 9 ते 12 व प्रौढ गटासाठी दुपारी 2 ते 5 अशी वेळा असतील. त्याचप्रमाणे पनवेल आणि खारघर येथे एक बॅच ही उच्चस्तरीय अभिनय प्रशिक्षणासाठी असेल. गतवर्षीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक वरिष्ठस्तरीय प्रशिक्षण मिळावे यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेवटी सर्वांचे सादरी करण होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी दिनांक 5 मे 2026 पर्यंत करावी.असे आवाहन पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्यावतीने करण्यात येत आहे.

संपर्क
शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी पुढील क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा.
1.शामनाथ पुंडे- प्रमुख कार्यवाह- अ.भा.नाट्य परिषद, पनवेल शाखा.
मो.नं : 9821758147

  1. श्रीमती स्मिता गांधी,सह कार्यवाह- अ.भा.नाट्य परिषद, पनवेल शाखा.
    मो.नं. 9323489693
  2. सौ. वर्षा कुलकर्णी – जनसंपर्क अधिकारी
    मो.नं. 7715815127

PMC क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याच्या राजकीय खेळी संदर्भात DCM सुनेत्रा पवारांची तक्रार, तातडीने खुलासा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश


आक्षेप घेण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये-विश्रांतवाडी व धानोरी (प्रभाग क्रमांक १ व २): हा भाग नैसर्गिकरीत्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ असताना, त्यांना दूर अंतरावरील नगर रस्ता कार्यालयाला जोडण्यात आले आहे.
-खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४) येथील नागरिकांना नगर रस्ता कार्यालय जवळ असताना, त्यांना ते ओलांडून तीन किलोमीटर दूर असलेल्या येरवडा कार्यालयात जावे लागणार आहे.पुणे महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा प्रशासनाच्या नावाखाली करण्यात आलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. महापालिका प्रशासनाने घाईघाईत तयार केलेल्या या क्षेत्रीय रचनेमुळे अनेक प्रभागांतील नागरिकांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये दूर गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याचा थेट परिणाम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांवर होत असून, दैनंदिन कामांसाठी त्यांना अधिक अंतरावरील कार्यालयांमध्ये जावे लागणार आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.


पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ विभागांच्या केलेल्या पुनर्रचनेवर थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्षेपांवर तातडीने खुलासा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिला आहे. या संदर्भातचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांच्या रचनेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रक्रियेत भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक अंतराचा विचार न केल्यामुळे पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घरापासून लांब असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर या रचनेला स्थगिती देऊन नवीन प्रभागरचना करावी, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.


विश्रांतवाडी व धानोरी या क्षेत्रीय कार्यालयाला पूर्वीप्रमाणे कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि येरवडा हे प्रभाग जोडणे अपेक्षित होते. यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये याच प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाची रचना होती. या वेळी या क्षेत्रीय कार्यालयांत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि लोहगाव विमाननगर हे प्रभाग जोडण्याची खेळी खेळली गेली. या राजकारणामुळे वाघोली येथील नागरिकांना रामवाडी जवळ असतानाही येरवड्यात यावे लागणार आहे. तर, कळस येथील नागरिकांना नगर रस्ता येथे जावा लागणार असल्याचा ‘राष्ट्रवादी’चा आक्षेप आहे.


प्रशासकीय सुसंगततेसाठी प्रभाग क्रमांक १, २ व ६ हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयास आणि प्रभाग ३, ४ व ५ हे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयास जोडणे अधिक सयुक्तिक ठरेल. अशा प्रकारच्या विसंगत रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नाहक प्रवास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ही रचना अत्यंत एकांगी असून, त्यामध्ये भौगोलिक सुसंगतता व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतलेले दिसत नाही. तरी, जनहिताच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाच्या सदर प्रभागरचनेस तत्काळ स्थगिती देऊन नवीन सुधारित प्रभागरचना करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

महामानवाच्या विचारांची कास धरू या!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र , न्यायशास्त्र, मानववंशशास्त्र अभ्यासक, द्रष्टे विचारवंत , थोर समाज सुधारक,पुरोगामी कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ , संपादक, कठोर तत्वप्रिय नेते असे बाबासाहेबांचे प्रखर बहु आयामी व्यक्तीमत्व होते.

बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे सैन्यात मेजर- सुबेदार म्हणून सेवा करीत. त्यामुळे त्यांच्या भारतात विविध ठिकाणी बदल्या होत.सेवेबरोबरच ते समाज कार्यही करीत.त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना संपादक मित्र राजेंद्र घरत,मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे तथासामाजिक कार्यकर्ते मित्र ऍड योगेश मोरे यांच्या समवेत आंबावडे येथील स्मारक पाहण्याची संधी मिळाली होती.

मध्यप्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या वडिलांची नेमणूक असताना १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला.आता महूचे नामकरण “डॉ. आंबेडकर नगर” असे करण्यात आले आहे. सातारा येथील शासकीय विद्यालयात त्यांनी १९०० साली नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतला.१९०८ सालच्या जानेवारी महिन्यात ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले. पर्शियन आणि इंग्रजी घेऊन १९१३ मध्ये ते बी.ए. झाले. सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन १९१३ च्या जुलै महिन्यात बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन ते १९१५ मध्ये एम.ए. झाले. डि लीट, डीएससी, बॅरिस्टर ऍट ला असे ते उच्च विद्याविभूषित होते.

बाळासाहेबांचा ”दि कास्ट इन इंडिया” हा पहिला शोधनिबंध १९१६ मध्ये प्रकाशित झाला. इंग्लंड मधील लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स या संस्थेत ते जून १९१६ मध्ये दाखल झाले. आता ही संस्था लंडन स्कुल ऑफ इकॉनामिक्स या नावाने जगभर प्रख्यात आहे.
बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात १९१७ साली पीएचडीपर संशोधन पूर्ण केले.” स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज ” हा त्यांचा ग्रंथ १९१७ मध्ये प्रकाशित झाला.

बाबासाहेब मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात रुजू झाले.
त्यांनी १९२० च्या जानेवारीत ”मूकनायक” वृत्तपत्र सुरु केले.पुढे लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील एमएससी पदवी मिळवली.”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या त्यांच्या शोधप्रबंधाला १९२३च्या मार्चमध्ये अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी मिळाली.तत्कालीन मुंबई शासनात विधान परिषद सदस्य (एम.एल.सी ) म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

सामाजिक समतेच्या चळवळीतील अत्यन्त महत्वाचे पाऊल ठरलेला महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२६च्या मार्च महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणला.१९२७ च्या एप्रिलमध्ये त्यांनी “बहिष्कृत भारत” वृत्तपत्र सुरु केले.
मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयात १९२८ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९३० साली त्यांनी ” जनता” पत्र सुरु केले.मानव मुक्तीच्या शांततामय संघर्षात गाजलेला काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी १९३० ते ३५ या कालावधीत केला.

ब्रिटिश सरकारने १९३० -३२ या दरम्यान आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.१९३२ च्या सप्टेंबर मध्ये त्यांनीं पुणे करार केला.प्राध्यापक असलेल्या सरकारी विधी महाविद्यालयाचे ते १९३५ मध्ये प्राचार्य झाले.

अथक प्रयत्न करूनही जात व्यवस्था जात नाही हे पाहून त्यांनी १९३५च्या ऑक्टोबर महिन्यात येवला येथे झालेल्या जाहीर सभेत
बाबासाहेबांनी हिंदु धर्मत्यागाची घोषणा केली.पुढे जवळपास २० वर्षांनी त्यांनी प्रत्यक्ष धर्म परिवर्तन केले.
१९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शिक्षण ही मूठभर माणसांची मक्तेदारी राहू नये म्हणून त्यांनी १९४५ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.या संस्थेतर्फे विविध ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या संस्थेने शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आम्ही घडलो,असे ऋण लाखो विद्यार्थी व्यक्त करतात.”हू वेअर शुद्राज” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित झाला.

१९४७च्या ऑगस्ट महिन्यात ते घटना समितीचे अध्यक्ष झाले.

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले.बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सादर केले.हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले. तेंव्हा पासून आपण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो.

बाबासाहेबांनी १९५० साली जून महिन्यात औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.त्यांच्या जीवन कार्याचा सन्मान म्हणून
कोलंबिया विद्यापीठाने आपल्या या विद्यार्थ्यांस १९५२ मध्यें एलएलडी पदवीने गौरविले.

बाबासाहेबांनी १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली.त्याच वर्षी “प्रबुद्ध भारत” वृत्तपत्र सुरु केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्धधर्म स्विकारला. नेपाळ मधील काठमांडू येथे नोव्हेंबर १९५६ मध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

या महा मानवाचे महापरिनिर्वाण ६ डिसेंम्बर १९५६ रोजी दिल्ली येथे या झाले. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत हा महामानव चिरनिद्रा घेत आहे.येथे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्मारक होत आहे
बाबासाहेबांना भारत सरकारच्या “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने १९९० मध्ये गौरविण्यात आले. त्यांच्यावर आतापर्यंत १२ चित्रपट, अनेक माहिती पट, ६ दूरचित्रवाणी मालिका, नाटकं निर्माण झाली आहेत
.

भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहायक म्हणून काम करत असताना निर्माते सुधीर पाटणकर यांच्या समवेत मला “ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” हा टीव्हीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी हिंदीतून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी मराठीतून निर्माण करण्याची संधी मिळाली होती. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने ६ डिसेंम्बर १९८९ रोजी राष्ट्रीय स्तरावर रात्री नऊ वाजता प्रसारित झालेल्या या माहिती पटास देश भरातून प्रचंड प्रतिसाद लाभला होता. राष्ट्रीय प्रसारणात “प्राईम टाईम” मिळणं ते त्याकाळी अत्यन्त दुर्मीळ होतं.तो एक मोठा बहुमान समजला जात असे. या अभिमानास्पद आठवणींवर आधारित लेखही मी लिहिला होता.

बाबासाहेब आपल्यातुन शरीर रूपाने गेले असले तरी काळ जसा पुढे जात आहे, तसतसे त्यांचे “स्वातंत्र्य , समता , बंधुत्व,” शिका, संघटित व्हा,संघर्ष करा ” असे एक ना अनेक तेजस्वी विचार ,तत्वे जगाला अधिकाधिक प्रकाशमान करत आहेत.

दरवर्षी मुंबईत १४ एप्रिल या जयंतिदिनी,६ डिसेंबर या महा परिनिर्वाणदिनी आणि नागपूर येथे धम्म परिवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर या लोकोत्तर महापुरुषाची महती गात असतो. त्यांच्या विचारांचे अनुकरणच आपल्याला व या विश्वाला पुढे नेणारे आहे.
या महामानवास मनःपूर्वक मानवंदना .


लेखन:देवेंद्र भुजबळ
निवृत्त माहिती संचालक

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर

पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बीएसआय) या केंद्र सरकारच्या संस्थेत पीएचडी संशोधन करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (५०) यांना पिंपरी-चिंचवड (भोसरी एमआयडीसी) पोलिसांनी अटक केली असून, त्याने लैंगिक छळ केल्याची कबुलीही दिली आहे.

दरम्यान, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी फोनवरून सविस्तर संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी स्वतः अतिशय व्यथित झाले आहे. मुलीला संशोधक बनवण्यासाठी पालक आयुष्य समर्पित करतात आणि अशा वेळेला मुलींच्या वाट्याला या गोष्टी येत असतील तर खरोखर असे नराधम कुठल्याच प्रकारच्या नोकरीत राहण्याच्या लायकीचे नाहीत.”

या विद्यार्थिनीला, डॉ. बिन्नियमिनकडून अनैतिक वर्तन, लैंगिक छळ, अंगावर हात टाकणे आणि मानसिक त्रास दिल्याने तीला मानसिक धक्का बसला व त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. तसेच तिचा संशोधनाचा डेटा वारंवार डिलीट करण्यात येत होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबीयांना पूर्ण सहकार्य दिल्याचे त्यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी यावरून शैक्षणिक संस्थांमधील लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या समित्या कितपत कार्यान्वित आहेत, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. “केंद्र सरकारची जरी ही संस्था असली तरी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी, उच्च शिक्षण विभागाने, महिला-बालविकास विभागाने वारंवार जीआर काढून स्पष्ट केले आहे की प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्थानिक तक्रार समित्या (लोकल कंप्लेंट कमिटी) असल्या पाहिजेत. परंतु त्या समित्यांकडे माहिती पोहोचते की नाही, याची तपासणी होत नाही. विद्यार्थिनींपर्यंत जागृती आणि माहिती पोहोचवण्यातही कमतरता दिसते,” असे त्यांनी सांगितले. ही विद्यार्थिनी केंद्र सरकारच्या संस्था सुरक्षित आहेत म्हणूनच इथे पीएचडीसाठी आली होती. पण घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

वनस्पती शास्त्र संशोधन संस्था , केंद्र सरकार यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला बडतर्फ करावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबाला सक्षम सरकारी वकील मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी आश्वासन दिले.

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लादलेली सागरी नाकेबंदी सुरू झाली आहे. हा निर्णय आज संध्याकाळी ७:३० वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता) अंमलात आला.या निर्णयानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवून त्याची तपासणी केली जाईल. इराणला टोल भरलेल्या जहाजांवर विशेष लक्ष दिले जाईल.ट्रम्प यांनी काल सांगितले होते की, इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. यामुळे इराणच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का बसेल.दरम्यान, इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताहली यांनी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारण्यात आलेला नाही. इराण भारतीय जहाजांना त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करेल.

वॉशिंग्टन डीसी-इराणने म्हटले आहे की, तो होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाण्यासाठी मदत करेल. इराणचे भारतातील राजदूत, मोहम्मद फताहली यांनी सांगितले की, या विषयावर इराण आणि भारत यांच्यात चांगली चर्चा सुरू आहे.ते म्हणाले की, सध्याचा तणाव असूनही भारतीय जहाजांना या मार्गावरून कोणत्याही अडचणींशिवाय प्रवास करता यावा, अशी इराणची इच्छा आहे. त्यामुळे, इराण नवी दिल्लीला मदत करण्यास तयार आहे.यापूर्वी, इराणने अमेरिकेला इशारा दिला होता की, जर होर्मुझची सामुद्रधुनी आणि तेथील बंदरांना लक्ष्य केले गेले, तर पर्शियन आखात आणि ओमानच्या समुद्रातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही.

इराणचे सैन्य आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) यांनी म्हटले आहे की, या प्रदेशातील सागरी सुरक्षा ही सर्व देशांची सामायिक जबाबदारी आहे. जर सुरक्षा सर्वांची नसेल, तर ती कोणाचीच नसेल.
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले आहे की, अमेरिका सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांवर नाकेबंदी लादण्याची तयारी करत आहे. याअंतर्गत, इराणी बंदरांमधून ये-जा करणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर निगराणी ठेवली जाईल आणि त्यांना थांबवले जाऊ शकते.


होर्मुझच्या नाकेबंदीला इस्रायलचा पाठिंबा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश इराणवरील अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीला पाठिंबा देतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय योग्य असून इस्रायल या मुद्द्यावर अमेरिकेसोबत मिळून काम करत आहे.

एका बैठकीत नेतन्याहू म्हणाले की, पाकिस्तानमध्ये झालेल्या शांतता चर्चेच्या नियमांचे इराणने उल्लंघन केल्यामुळे ट्रम्प यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
रशियाचा ‘हॉर्मुझ सामुद्राधुनी’तील नाकेबंदीला विरोध
रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या ‘क्रेमलिन’ने, अमेरिकेच्या अशा एका निर्णयावर टीका केली आहे; ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘हॉर्मुझ सामुद्राधुनी’ची नाकेबंदी करण्याची घोषणा केली होती. क्रेमलिनचे म्हणणे आहे की, या कृतीचा जागतिक बाजारपेठांवर विपरीत परिणाम होईल.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नमूद केले की, ट्रम्प यांच्या या आदेशातील अनेक पैलू अद्याप अस्पष्ट आहेत.

अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, ही नाकेबंदी वॉशिंग्टनच्या वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता) अंमलात येईल. या उपाययोजनेअंतर्गत, इराणच्या बंदरांकडे जाणारी आणि तिथून परतणारी जहाजे रोखली जातील.

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

नाशिक येथे कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ एप्रिल २०२६ : नाशिक शहरात उघडकीस आलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांना सविस्तर निवेदन देत सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची सूचना दिली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणामुळे समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा, महिलांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतर व लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर बाबी समोर येत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करून त्यामागील संभाव्य सूत्रधार व संघटित जाळ्याचा शोध घेण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल चॅट्स, आर्थिक व्यवहार यांसारख्या तांत्रिक पुराव्यांची तपासणी करून दोषींची साखळी उघड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले. यासोबतच पीडितांना तत्काळ पोलीस संरक्षण, मोफत कायदेशीर मदत, समुपदेशन व मानसिक आधार सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी सर्व खासगी व कॉर्पोरेट संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील आयटी कंपन्या व इतर संस्थांमध्ये नियमित सुरक्षा ऑडिट व अचानक तपासण्या करून अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

धर्मांतराच्या नावाखाली कोणतेही बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास त्यावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय महिला सुरक्षा व कायदेशीर हक्कांविषयी पोलीस विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबवून समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

या संपूर्ण प्रकरणात तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याची सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

पुण्याच्या अगोदर ‘पीएमआरडीए’ची कारवाई सुरु; अनधिकृत होर्डिंगवर हातोड्यावर हातोडे !

  • पीएमआरडीए हद्दीत आजपासून अनधिकृत होर्डिंगविरोधात जोरदार कारवाई सत्र सुरू!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम उघडली आहे. सोमवारी (दि.१३) हिंजवडी येथील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करत प्रशासनाने ते जमीनदोस्त केले.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम तीव्र केली आहे. हिंजवडी (ता. मुळशी) येथील गट क्रमांक २०६ मधील अंदाजे १२५० चौरस फूट क्षेत्रावर उभारण्यात आलेले होर्डिंगचे लोखंडी सांगाडे (फ्रेम) नियमबाह्य असल्याचे पाहणीत आढळले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

‘पीएमआरडीए’ने बजावलेल्या नोटिशीनुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ ते ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. संबंधित होर्डिंगसाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर अशा अनधिकृत होर्डिंगमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (जीवितास धोका निर्माण करणे) आणि कलम ४२० अन्वये गुन्हे दाखल होऊ शकतात.

“अनधिकृत होर्डिंगप्रकरणी एक महिना ते तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. संबंधित धारकांनी स्वतःहून आपली अनधिकृत होर्डिंग काढून घ्यावीत, अन्यथा प्राधिकरणाकडून होणाऱ्या कारवाईचा खर्च आणि दंड वसूल केला जाईल,” असा इशारा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिला आहे.

ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे, तहसीलदार आशा होळकर आणि तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या पथकाने पार पाडली. ज्या होर्डिंगधारकांकडे रितसर परवानगी नाही, त्यांनी तातडीने अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा येत्या काळात संपूर्ण पीएमआर हद्दीत अशीच धडक कारवाई सुरू राहील, असेही ‘पीएमआरडीए’ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

“शहर परिवर्तन समिती” आणि “MISSION ३२” समस्यामुक्त शहर करण्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे-वाहतूक, रस्ते, ड्रेनेज ,पाणी ,पार्किंग, डोक्यावरच्या केबल्स ,पाण्याच्या टाक्या ,मोबाईल अॅप्स, आवश्यक तेवढे समन्वयक अशा विविध प्रश्नांवर चर्चा करून सह्ह्र समस्यामुक्त करण्यासाठी पुणे शहर परिसरातील आय ए एस , आय पी एस , अधिकारी, वर्ग १ चे अधिकारी , असे सर्व प्रशासन हातमिळवणी करून साज होत असून याचाच भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत “शहर परिवर्तन समिती” स्थापन करण्यात आली आणि तातडीने “MISSION ३२” हाती घेण्यात आले व इतरही अनेक निर्णय घेतले गेले.

पुणे शहरा समोरील वाढती विविध स्वरूपाची शहरी आव्हाने प्रभावीपणे हाताळण्या साठी तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी “शहर परिवर्तन समिती” स्थापन करण्यात आली आहे. पुणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करणेच् असे प्रश्न, शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढविणे, रस्ते चांगले करणे, शहर स्वच्छ आणि सुंदर करणे यावर उपाय योजने बाबत शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची दुसरी बैठक आज दिनांक १३/०४/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली.


सदर बैठकीमध्ये यापूर्वी दि.०५/०२/२०२६ रोजी झालेल्या शहर परिवर्तन कक्षाचे बैठकीचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला . पुणे शहरातील १२मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसन बाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली असून यामध्ये बाणेर – पाषाण लिंक रोड, वाकड ते कस्पटे वस्ती रोड, आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज रस्ता व वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर येथील मिसिंग लिंक वर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली यामधील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबी जसे कि, मोजणी ,अतिक्रमण काढण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली असून जि-ल्हाधिकारी यांनी संबंधित शासकीय विभागाला वेळेत काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत.


सदर ३२ रस्त्यांच्या फुटपाथवर अडथला ठरणारे फीडर पिलरचे सादरीकरण करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी MSEDCL च्या मुख्य अभियंता यांनी सदर फीडर पीलर चे डिझाईन Approve करून तातडीने शिफ्ट करण्याचे आदेशित करण्यात आले आहेत. तसेच पुणे शहरांमधील प्रमुख ३२रस्त्यांचे “MISSION ३२”चे अंतर्गत सदरील कामे युद्ध पातळीवर करणे बाबत महापालिका आयुक्त यांनी पुणे मनपाच्या पथ, प्रकल्प, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागास आदेश दिले. पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आर.पी. रस्त्यानुसार प्रत्येक गावनिहाय एक रस्ता याप्रमाणे ३२ गावांमधील पोलीस विभागांच्या समन्वयाने निश्चितीनुसार ३२ प्रमुख रस्त्याच्या विकसनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी आजच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत.
सदर रस्त्यांमधील जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचे मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांचे सोयीसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यांचे रस्त्या संबंधित तक्रारी साठी सदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून तक्रार निवारण करणे बाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत तयार करण्यात आलेले PTP (Pune city Traffic Police) हेॲप्लिकेशन्स पुणे महानगरपालिकेच्या ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स ला लिंक झाल्यास एकत्रितपणे रस्ते व वाहतुक सुरळीत होणार याबाबत चर्चा झाली.
पोलीस उपायुक्त वाहतूक यांनी रस्ते खोदाईबाबत NOC तात्काळ देण्यात येईल असे सूचित करून परिपूर्ण माहिती असणारे अधिकारी यांनी त्यासाठी संपर्क केल्यास निर्णय घेणे सोयीचे होईल. असे सूचित केले.
पुणे मनपामार्फत विविध रस्त्यांवर पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंग चे ठिकाणे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक परिमंडळ निहाय वॉटर लॉगिंग एरिया करिता टेंडर प्रकिया पूर्ण करून काम करून सुरू करणे येत आहे.
भूसंपादन करतेवेळी वनविभागामुळे अडथळा ठरणाऱ्या ठिकाणाबाबत चर्चा करण्यात आली असून वन विभागाच्या संबंधित अधिकारी यांचेकडे पुणे महानगरपालिके मार्फत सादर करण्यात आलेल्या वन विभागाचे ताब्यातील जागांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले.
जिल्हाधिकारी यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक पोलीस यांना MISSION ३२ अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यावरील रिक्षा थांबा ठिकाणे प्रत्यक्ष जागेवर मार्किंग करून निश्चित करणे व बेवारस वाहने उचलणे याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पुणे शहरातील महत्त्वाचे ५ रस्त्यांवर पे & पार्क बाबत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
पाणीपुरवठा विभागाकडील पाण्याच्या टाक्या उभारण्या साठी आवश्यक असलेल्या सरकारी जागांचे मोजणी व भूसंपादनाचे अनुषंगाने सदरचे प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे बाबत आदेश दिले असून यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीमध्ये स्पष्ट केले.
वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करून त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर सर्व संबधित विभागांशी समन्वय ठेवून कामाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी देवून पुढील बैठकीपूर्वी सर्व मुद्द्यांवर अनुपालन सादर करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी त्यांची नावे –

• नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
• जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी,पुणे
• पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका
• प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पुणे महानगरपालिका
• ओमप्रकाश दिवटे , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका
• अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका
• मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे
• अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)-
• भूमी अभिलेख विभाग
• दूरसंचार सेवा प्रदाते• महामेट्रो
• पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML)
• पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)
• वन विभाग अधिकारी
• प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (RTO)
• पुणे महानगरपालिका विभाग – पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, प्रकल्प, विद्युत, पथ, बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण निर्मुलन विभाग, उपआयुक्त परिमंडळ क्र.१ ते ५