गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये मार्च 2022 पासून 3.8 पट वाढ, बनले आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन

Date:

· गोल्ड लोन शिल्लक आता भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओपैकी 11.1%; मार्च 2022 मध्ये हे प्रमाण 5.9% होते

· ओरिजिनेशन मूल्य 2022 च्या पहिल्या तिमाही पासून 5.1 पट वाढले असून सरासरी तिकीट आकार 90,000 रु. वरून दुप्पटीने वाढून 1.96 लाख रु.

·         प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम कर्जदार आता सुमारे 52% ओरिजिनेशनमध्ये आहेत आणि महिलांचा वाटा 39% आहे. त्यायोगे गोल्ड लोन बाजारात अधिक व्यापक आणि मजबूत कर्जदार आधार दिसून येत आहे

मुंबई, 14 एप्रिल 2026: गोल्ड लोन वेगाने वाढत शिल्लक वाट्याच्या आधारावर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन बनले आहे1. ट्रान्सयुनियन सिबिलच्या गोल्ड लोन लँडस्केप अहवालानुसार मार्च 2022 पासून गोल्ड लोन शिल्लक 3.8 पट वाढली असून डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओमधील त्यांचा वाटा 5.9% वरून 11.1% पर्यंत वाढला आहे. या वाढीतून कर्जदारांकडून वाढता स्वीकार, मोठे तिकीट आकार, वित्तपुरवठादारांचा व्यापक सहभाग आणि अधिक विस्तृत क्रेडिट इतिहास असलेल्या ग्राहक व महिला कर्जदारांचा समावेश असलेला कर्जदार प्रोफाइल दिसून येतो.

अहवालात असे दर्शविले आहे की या विभागातील वाढ विशेषतः एनबीएफसीमध्ये मजबूत राहिली आहे. त्यांनी मार्च 2022 मधील 7% वरून डिसेंबर 2025 मध्ये 11% पर्यंत गोल्ड लोन शिल्लक वाटा वाढवला आहे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी याच कालावधीत 57% वरून 62% पर्यंत वाढ केली आहे. प्रत्येक खात्यावरील सरासरी गोल्ड लोन शिल्लक मार्च 2022 मधील 1.1 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 1.9 लाख रु. झाली आहे. त्यातून या विभागातील कर्जाचे वाढते प्रमाण अधोरेखित होते.

चार्ट 1: गोल्ड लोन इंडस्ट्री सप्लाय (इंडेक्स्ड) *

टीप: मार्च ’22 ला संपलेल्या तिमाहीसाठी निर्देशांक 100 धरला आहे

पुरवठा प्रवाह बाजारातील घडामोडींमध्ये तीव्र विस्तार दर्शवतात. 2022 मधील पहिल्या तिमाहीपासून गोल्ड लोन ओरिजिनेशनचे प्रमाण 2.3 पट वाढले आहे, तर त्याच कालावधीत ओरिजिनेशन मूल्य 5.1 पट वाढले आहे. 2022 मधील पहिल्या तिमाहीत 90,000 रु. असलेला सरासरी तिकीट आकार 2025 च्या चौथ्या तिमाहीत 1.96 लाख रु. पर्यंत वाढला आहे. यावरून बाजाराचा विस्तार फक्त पोहोच वाढविण्यातच नाही तर उच्च मूल्याच्या कर्जाकडेही होत असल्याचे दिसते.

कर्जदारांचे प्रोफाइल देखील बदलत आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये प्राइम आणि त्याहून उच्च प्राइम2 कर्जदारांचा वाटा 2022 मधील 43% वरून 2025 मध्ये सुमारे 52% झाला आहे, तर न्यू-टू-क्रेडिट सहभाग 12% वरून 6% पर्यंत घटला आहे. यावरून कर्जदारांच्या प्रोफाइलमध्ये गोल्ड लोन अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत असल्याचे सूचित होते.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भावेश जैन म्हणाले, “भारतामध्ये सोने नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे.  परंतु आता सोने-आधारित कर्जाचा वापर कसा केला जातो यात एक संरचनात्मक बदल होत असताना आपण पाहत आहोत. सुलभ सुरक्षित कर्ज म्हणून गोल्ड लोन हे वाढत्या प्रमाणात मुख्य प्रवाहातील, सुसूत्र आणि सहज उपलब्ध या स्वरूपाचे बनत आहे. त्यांची जलद वाढ कर्जदात्यांचा म्हणजेच वित्तपुरवठादारांचा विश्वास आणि ग्राहकांचा वाढता स्वीकार या दोन्हींचे प्रतिबिंब आहे.

“विशेष लक्षवेधी बाब म्हणजे या विभागात अधिक मजबूत क्रेडिट प्रोफाइल असलेले कर्जदार, मोठे तिकीट आकार आणि परत परत वापर होत आहे. यावरून असे दिसते की गोल्ड लोन आता केवळ अल्पकालीन तरलतेच्या गरजांसाठी वापरले जात नाहीत, तर ते घरगुती कर्ज घेण्याच्या व्यापक वर्तनाचा भाग बनत आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

व्यापक कर्जदार आधार विस्ताराला देत आहे चालना

महिला कर्जदार गोल्ड लोन विस्तारामध्ये एक महत्त्वाचा वाढीचा घटक म्हणून उदयास आले आहेत. गोल्ड लोन ओरिजिनेशनमध्ये महिलांचे प्रमाण 2022 मधील 36% वरून वाढून 2025 मध्ये 39% झाले. दक्षिणेकडील बाजारपेठांबरोबरच पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्येही मजबूत वाढ दिसून येत आहे. अहवालात तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला कर्जदारांमध्ये उल्लेखनीय गती दिसून येत असल्याचे ठळकपणे नमूद केले आहे. त्यातून वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात मागणीचा विस्तार स्पष्ट होतो.

अहवालात कर्जदारांच्या कर्ज घेण्याच्या पद्धतींमध्येही बदल होत असल्याचे नमूद केले आहे. प्रति कर्जदार सरासरी प्रलंबित रक्कम डिसेंबर 2022 मधील 1.9 लाख रु. वरून डिसेंबर 2025 मध्ये 3.1 लाख रु. झाली आहे, तर 2.5 लाख रु. पेक्षा जास्त गोल्ड लोन एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांची संख्या 2025 अखेरीस एकूण कर्जदारांच्या 14% झाली आहे. 2022 मध्ये हेच प्रमाण 10% होते. जास्त प्रमाणात सध्या असलेली शिल्लक आणि अधिक असुरक्षित एक्स्पोजर असलेले कर्जदारही ओरिजिनेशनमध्ये अधिक ठळक झाले आहेत. यावरून गोल्ड लोन आता कर्जदारांच्या वॉलेटमध्ये इतर कर्ज स्वरूपांसोबत अधिक प्रमाणात दिसत आहेत.

वाढ ही मजबूत जोखीम शिस्तीसह संतुलितच असावी

अहवालात या विभागाच्या वाढीसोबत अधिक तीव्र कर्जदार-स्तरीय जोखीम मूल्यमापनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. अभ्यासानुसार, जून 2025 ला संपलेल्या सहा महिन्यांत ओरिजिनेट केलेल्या गोल्ड लोनसाठी एकूण थकबाकी दर 1.1% होता (थकबाकी म्हणजे ओरिजिनेशनच्या सहा महिन्यांत 60 दिवसांपेक्षा जास्त विलंबाने नोंदवलेले कोणतेही खाते).  ज्यांची पोस्ट-ओरिजिनेशन गोल्ड लोन प्रलंबित रक्कम 2.5 लाख रु. पेक्षा जास्त होती अशा कर्जदारांमध्ये थकबाकी दर 1.5% होता. तो कमी एक्स्पोजर असलेल्या कर्जदारांच्या 0.7% च्या तुलनेत सुमारे 2.2 पट जास्त आहे. याशिवाय, गोल्ड लोनमधील वॉलेट केंद्रीकरण, अलीकडील थकबाकी आणि एकूण कर्ज पोर्टफोलिओमध्ये गोल्ड लोनवर अधिक अवलंबित्व हे महत्त्वाचे पुढील जोखीम निर्देशक आहेत.

अहवालात पुढे असेही नमूद केले आहे की गंभीर थकबाकीचा इतिहास असलेले आणि नंतर गोल्ड लोनवर अवलंबून राहणारे कर्जदार औपचारिक क्रेडिट प्रणालीपासून दूर जाण्याचा लक्षणीय उच्च धोका दर्शवतात. त्यांचा क्रेडिट उपलब्धता बंद होण्याचा दर नॉन-डिफॉल्टिंग कर्जदारांच्या तुलनेत सुमारे 1.6 पट जास्त होता. यावरून असे सूचित होते की ज्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड नियमित आणि वेळेवर करण्यात अडचणी येत आहेत अशा कर्जदारांसाठी गोल्ड लोन हे शेवटचा पर्याय म्हणून वापरले जात असावेत.

श्री. जैन पुढे म्हणाले, “गोल्ड लोन विभागाचा विस्तार होत असताना वित्तपुरवठादारांचे प्राधान्य  प्राथमिकता वाढ आणि सावधगिरी यामध्ये संतुलन राखणे हेच असले पाहिजे. तारण ठेवण्याची ताकद महत्त्वाची राहते परंतु कर्जदारांचे मूल्यमापन करण्यासाठी ती एकमेव निकष ठरू शकत नाही. वित्तपुरवठादारांनी कर्जदारांचा एकूण कर्जबाजारीपणा, परतफेड क्षमता, अलीकडील क्रेडिट वर्तन आणि विविध कर्जदात्यांमधील एक्स्पोजर यांचे अधिक सर्वसमावेशक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कर्जदार-स्तरीय लोन-टू-वॅल्यू तपासणी अधिक मजबूत करणे, जोखीम-आधारित किंमत निर्धारण आणि गोल्ड लोनच्या परत परत वापरावर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे हे या महत्त्वाच्या विभागाची शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने वाढ सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ठरेल.”

1 डिसेंबर 2025 पर्यंत शिल्लक वाट्याच्या 27.8% सह गृहनिर्माण कर्ज हे सर्वात मोठे रिटेल क्रेडिट उत्पादन आहे

2 क्रेडिटव्हिजन® (CV) स्कोअर श्रेणी: सबप्राइम 300–680; नियर प्राइम 681–730; प्राइम 731–770; प्राइम प्लस 771–790; सुपर प्राइम 791-900

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिर्लास्टुडिओज आणि वी ची भागीदारी:भारतातील पहिले ‘मोबाईल-फर्स्ट’ टॅलेंटहंट’रील सेरिअल स्टार’ आयोजित करणार

मुंबई, १४ एप्रिल, २०२६: बिर्ला स्टुडिओजने वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या सहयोगाने 'रील से रिअल स्टार' (Reel Se Real Star) हा उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली. 'मोबाईल फर्स्ट' अभिनय टॅलेंट शोधणारे हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ आहे. भारतीय मनोरंजन सृष्टीतील संधींची दारे सर्वांसाठी खुली करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 'ओळख आणि संधी' हे मुख्य ध्येय उराशी बाळगून, 'रील से रिअल स्टार' हे व्यासपीठ भौगोलिक मर्यादा, चित्रपटसृष्टीत प्रवेशाच्या आड येणारे अडथळे दूर करत आहे – स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सिनेमाचे दरवाजे खुले होणार आहेत.   हा उपक्रम एका साध्या पण अत्यंत प्रभावी विचारावर आधारलेला आहे: "कला ही कोणा एकाची मक्तेदारी नसते, ती कोणातही असू  शकते आणि प्रत्येक प्रतिभेला व्यासपीठ मिळायलाच हवे." या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना बिर्ला स्टुडिओजच्या संस्थापिका आणि अध्यक्षा अनन्या बिर्ला म्हणाल्या: "अनेकदा योग्य प्रतिभेला हवी तशी संधी मिळत नाही—आणि याच कमतरतेमुळे अनेक होतकरू कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून वंचित राहतात. आजच्या काळात उपलब्ध असलेल्या प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी आणि वोडाफोन आयडियाचे (वी) देशव्यापी जाळे यांच्या मदतीने, आम्ही पारंपारिक मर्यादा ओलांडून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहोत. चित्रपटसृष्टीची दारे सर्वांसाठी कशी खुली करता येतील, याचा नव्याने विचार करण्याची ही एक उत्तम संधी आहे. 'रील से रिअल स्टार' हा आमचा एक असा प्रयत्न आहे, जिथे देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीमधील कलागुणांचा शोध घेतला जाऊ शकतो आणि संधी मिळवण्यासाठी परिस्थितीचा अडथळा येणार नाही. कारण आम्ही असे मानतो की, प्रत्येक प्रतिभेला स्वतःला सिद्ध करण्याची एक खरी संधी मिळायलाच हवी." वोडाफोन आयडियाची (वी) अफाट डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील तसेच सांस्कृतिक दृष्टी यांचा मेळ घालत, भारतातील सर्वात अस्सल आणि वैविध्यपूर्ण 'ॲक्टिंग टॅलेंट पाईपलाईन' निर्माण करण्याचे या व्यासपीठाचे ध्येय आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान असूनही वंचित राहिलेले कलाकार मनोरंजन सृष्टीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील. वोडाफोन आयडियाचे (वी) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजित किशोर म्हणाले, "कनेक्टिविटी तेव्हाच सर्वात अर्थपूर्ण ठरते जेव्हा ती संधी निर्माण करते. 'रील से रिअल स्टार' हे व्यासपीठ देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना 'ऑडिशन रूम' थेट त्यांच्या हातात आणून देईल. चित्रपटसृष्टीतील प्रवेशाच्या आड येणारे पारंपारिक अडथळे मोडीत काढणार आहे. आमचे भक्कम नेटवर्क, २० कोटींहून अधिक युजर्सपर्यंत असलेली आमची डिजिटल पोहोच आणि बिर्ला स्टुडिओजची सर्जनशील दृष्टी यांच्या जोरावर, आम्ही संपूर्ण भारतात प्रतिभा शोधण्याच्या प्रक्रियेचे 'लोकशाहीकरण' करत आहोत. आमचे ध्येय साधे आहे: प्रतिभेला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसाव्यात आणि तिचा शोध कुठूनही घेतला जावा— मग ते गजबजलेले महानगर असो किंवा दुर्गम गाव. आम्ही केवळ एक व्यासपीठ तयार करत नाही आहोत, तर लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची एक खरी संधी देत आहोत." ही मोहीम संपूर्ण देशभरात चालवली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण भारतभरातील उदयोन्मुख कलाकारांना संपूर्णपणे डिजिटल, ॲप आणि वेब-आधारित प्रक्रियेद्वारे आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. यात सहभागी होणारे कलाकार आपल्या ऑडिशन्स थेट अपलोड करू शकतील, ज्यामुळे सिनेसृष्टीतील कोणाच्याही ओळखीची गरज आता उरलेली नाही. 'रील से रिअल स्टार' मध्ये जनसहभाग आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा एक अनोखा संगम घडून येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची पारख नामवंत दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज करतील, तसेच त्यांना बहुमोल मार्गदर्शन देखील करतील. यामुळे या उपक्रमाची विश्वासार्हता आणि कलात्मक दर्जा जपला जाईल. भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे एक सुवर्णसंधी — एका नामांकित दिग्दर्शकासोबत चित्रपटात काम करण्याची! हा उपक्रम येत्या काही महिन्यांत 'वी' (वोडाफोन आयडिया) ॲपवर सहभागासाठी उपलब्ध होईल. सध्या, इच्छुक कलाकार बिर्ला स्टुडिओज किंवा वी च्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात.

संपूर्ण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद…

पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून...

लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो; इतिहास रचला जातो : पद्मश्री शेखर सेन

पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे...