Home Blog Page 712

​​​​​​​बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीची 5 वाहनांना धडक:अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच; चालकावर गुन्हा अन् सुटका

0

नागपूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान भरधाव कारने 5 वाहनांना धडक दिल्याची घटना ऑरेंज सिटी नागपुरात घडली आहे. ज्या कारने हा अपघात झाला ती कार आपला मुलगा संकेत याच्या नावाने असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिली. पण सोबतच संकेत हाच कार चालवत होता हे वृत्त त्यांनी फेटाळले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच होते असा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सोमवारी सांगितले की, अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे व रोनित चिंतमवार हे 3 जण होते. या तिघांनाही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांची चौकशी जाली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती. पण गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे रात्रीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

पत्रकारांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्याला संकेत बावनकुळे कुठे बसला होता? असा थेट प्रश्न केला असता त्यांनी ते चालकाच्या बाजूला बसल्याचे सांगितले. संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारच्या समोरील सीटवर बसला होता. तर रोनित चिंतमवार मागच्या सीटवर बसला होता. या तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तेथून घरी परत जाताना हा अपघात झाला. डॉक्टरांनी 2 जणांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, त्यांच्या रक्ताचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.
या प्रकरणी केवळ ड्रायव्हरवर गुन्हा दाखल आहे. संकेत किंवा रोनितवर गुन्हा दाखल नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.
नागपूरच्या रामदासपेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे यांना बोलावून चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. रामदासपेठेते रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे यांच्या मालकीच्या ऑडी कारने काही वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर ऑडी कार चालकाने तेथून पोबारा केला होता. पोलिसांच्या पुढील तपासानुसार संकेत बावनकुळे त्या वेळी कारमध्ये नव्हते. घटनेच्या वेळेला कार अर्जुन हावरे नामक चालक चालवत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र रोनीत चितंमवार हा होता.
चुकीच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे – बावनकुळे

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही वक्तव्य या घटनेवर आले आहे. तो म्हणाला, ‘ती गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी. न्याय हा कोणासाठी वेगळा नाही. दोषींवर कारवाई करावी. कोणाचाही राजकीय संबंध असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.

अमित शहांना भेटलो,पण,’ती’ बातमी खोटी ..अजितदादांचा दावा

पुणे- आपण काल अमित शहांना भेटलो चर्चा केली पण ‘द हिंदू ‘ या इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या आधारे दिलेली बातमी खोटी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला .

मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. पण द हिंदू वृत्तपत्रातील बातमी धादांत खोटी आहे. मैत्रिपूर्ण लढतीवर आणि मुख्यमंत्रीपदावर,बिहार पैटर्न वर कोणतीही चर्चा झाली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीत 288 पैकी काही जागांबद्दल ठरले आहे, इतर जागावाटपाचे अजून काही ठरलेले नाही, पण जसे जागावाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईल. माझे असे मत आहे की असे मै़त्रीपूर्ण लढतीत काही अर्थ नाही, आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही, असे त्यांनी माध्यमांना म्हटले आहे.अजित पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत, असे काहीच होणार नाही. आम्ही सर्व जण बैठक घेऊन 288 जागापैंकी महायुतीमधील कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरले आहे, काही बाकी आहे. हे जेव्हा आमचे ठरेल तेव्हा मी यासंदर्भात माहिती देईल. महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे आमचे लक्ष आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातीवर तुमचा फोटो नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की,भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मीच माझा फोटो तुमच्या जाहिरातीमध्ये लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे झाले थोडे कमी करावे म्हणून असे सांगितल्याचे म्हणत त्यांनी विषय टाळला. लाडकी बहिण योजना ही महायुतीची सोजना आहे, त्यामुळे घटक पक्ष आपआपल्या परिने मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुतीम्हणून मांडणार.अजित पवार म्हणाले की, राज्यात कापूस, सोयाबिनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याला कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळत असतील तर मे मिळायला हवे अशा विषयावर माझी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली.

मुख्यमंत्री पद द्या, महाराष्ट्रात राबवितो बिहार पॅटर्न-अजित पवारांची थेट अमित शहांना ऑफर

मुंबई -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह विविध गणपती मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. यात अमित शहा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील घेतली. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची देखील बैठक झाली. त्यातच अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यात कुठेही दिसले नसल्याने याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार आणि अमित शहा यांची विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा सोडणार नाहीभारतीय जनता पक्षाच्या वतीने 288 मतदारसंघांपैकी 150 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातील कमीत कमी 125 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. तर अजित पवार आणि अमित शहा यांची मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत 40 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या सर्व 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. याशिवाय काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या महाविकास आघाडीतील दहा ते बारा जागा देखील अजित पवार गटाने मागितल्या आहेत.

 साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरच्या देखाव्यात  १८ संतांच्या पादुकांचे दर्शन

पुनीत बालन यांच्या हस्ते उदघाटन

पुणे :

 साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरच्या  सार्वजनिक गणेशोत्सवात  १८ संतांच्या पादुका दर्शन सोहळा हा देखावा करण्यात आला आहे. तसेच श्री सद्गुरू शंकर महाराज मठाची प्रतिकृति उभारण्यात आली आहे.या  प्रतिकृतीचे उद्घाटन  प्रसिद्ध उद्योजक पुनित बालन यांच्या हस्ते सोमवार,दि.९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात झाले. रवींद्र  माळवदकर (अध्यक्ष, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर),भाई कात्रे (कार्याध्यक्ष,साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर),शिवानी माळवदकर,विजय गोरे,नितीन काळे,योगेश निंबाळकर,आनंद साळुंखे,धनंजय काळे हे मान्यवर उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर,मुक्ताबाई,नामदेव,जनाबाई,नरहरी सोनार,सेनामहाराज,निळोबाराय,रामदास,वेणाबाई,महावतार,स्वामी समर्थ,टेम्बे स्वामी,शंकर महाराज,गुळवणी महाराज यांच्या पादुकांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. दि.९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत दररोज एक संत याप्रमाणे  श्री साईबाबा,जंगली महाराज,अक्कलकोट स्वामी समर्थ,माळी महाराज,गजानन महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ पादुका देखील दर्शनासाठी मांडण्यात येत आहेत.१९१९ साली स्थापन झालेल्या  साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरला १०५ वर्षांची परंपरा आहे.राष्ट्रीय एकात्मता प्रसारासाठी ही संस्था प्रयत्न करते.

पुनीत बालन म्हणाले,’चांगले सामाजिक कार्य गणेश मंडळाच्या मार्फत होऊ शकते याचे प्रत्यंतर  साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर गणेशोत्सव मंडळाने दाखवून दिले आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्तेच समाजाच्या अडचणीत धावून येतात,हे आपण नेहमी पाहत असतो. आजच्या भेटीच्या निमित्ताने या मंडळाचा सामाजिक पुढाकाराची माहिती मिळाली . आम्ही नेहमी त्यात योगदान देऊ.रवींद्र माळवदकर हे गणेशोत्सवात नेहमी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात.ते  प्रत्येक बैठकीत कार्यकर्ते,मंडळे आणि प्रशासनाला उपयुक्त सूचना करतात.त्यांचा अनुभव उत्सव पुढे नेण्यास उपयुक्त ठरेल.’

रवींद्र माळवदकर म्हणाले यांनी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर आणि गणेशोत्सवाची माहिती दिली.तसेच वंचितांची दिवाळी,सर्वधर्मीय पुढाकाराची आषाढी वारी अशा अनेक सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.’समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून आम्ही उपक्रमांची रचना करतो आणि संघर्ष देखील करतो ‘,असे त्यांनी सांगितले.

मंडळाचे कार्यकर्ते आणि देखावा साकारणाऱ्या कलाकारांचा सत्कार पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आला .शिवानी माळवदकर यांनी प्रास्ताविक केले ,भाई कात्रे यांनी आभार मानले.

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या 54 व्या बैठकीदरम्यान करण्यात आलेल्या शिफारशी

0

जीएसटी परिषदेने दर तर्कसंगत करण्याबाबत सध्याच्या मंत्रिगटाबरोबर आरोग्य विमा आणि आयुर्विम्याशी संबंधित जीएसटीवर मंत्रिगटाची शिफारस केली आहे;ऑक्टोबर 2024 अखेर अहवाल सादर करायचा आहे

जीएसटी परिषदेने ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमब या कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी दर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्याची केली शिफारस
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेची 54 वी बैठक केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली.

या बैठकीला केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरीही उपस्थित होते.

जीएसटी परिषदेने जीएसटी कर दरांमधील बदल, नागरिकांना दिलासा, व्यापार सुलभ करण्यासाठी उपाय आणि जीएसटीमधील अनुपालन सुव्यवस्थित करण्याच्या उपायांशी संबंधित खालील शिफारसी केल्या आहेत.

जीएसटी कर दरांमध्ये बदल/स्पष्टीकरण:
वस्तू

कर्करोगावरील औषधे

ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमब या कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी दर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात येईल
सेवा जीवन आणि आरोग्य विमा

जीएसटी परिषदेने जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीशी संबंधित मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे विचार करण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्याची शिफारस केली. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, राजस्थान, आंध्र प्रदेश, मेघालय, गोवा, तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब आणि गुजरात हे मंत्रिगट सदस्य आहेत. मंत्रिगटाने ऑक्टोबर 2024 अखेर अहवाल सादर करायचा आहे.

उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रम

परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या मान्यताप्राप्त उड्डाण प्रशिक्षण संघटनेद्वारे (FTOs) आयोजित मान्यताप्राप्त उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रमांना जीएसटी दरातून सूट देण्यात आली आहे.
4.संशोधन आणि विकास सेवा पुरवणे

जीएसटी परिषदेने सरकारी संस्थेद्वारे किंवा सरकारी किंवा खाजगी अनुदान वापरून प्राप्तीकर कायदा, 1961 च्या कलम 35 च्या उप-कलम (1) च्या कलम (ii) किंवा (iii) अंतर्गत अधिसूचित संशोधन संघटना, विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्थाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या संशोधन आणि विकास सेवा करमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
‘जसे आहे तसे ’ तत्त्वावर मागील मागण्या नियमित केल्या जाणार
ब.व्यापार सुलभ करण्यासाठी उपाययोजना :

1.सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 128A नुसार आर्थिक वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 साठी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 73 अंतर्गत कर मागण्यांच्या संदर्भात, व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची प्रक्रिया आणि अटी:

2.सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 16 मध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या उप-कलम (5) आणि उप-कलम (6) च्या अंमलबजावणीसाठी एक यंत्रणा प्रदान करणे:

3.सीजीएसटी नियम, 2017 च्या नियम 89 आणि नियम 96 मध्ये सुधारणा करणे आणि निर्यातीवरील आयजीएसटी परताव्याच्या संदर्भात स्पष्टीकरण प्रदान करणे ज्यामध्ये सीजीएसटी नियम, 2017 च्या नियम 96(10) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या सवलती/सूट संबंधी अधिसूचनांचा लाभ इनपुटवर घेतला गेला आहे. :

  1. काही मुद्द्यांमधील संदिग्धता आणि कायदेशीर विवाद दूर करण्यासाठी परिपत्रकांद्वारे स्पष्टीकरण जारी करणे:

विम्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी जैसे थे च..पण हेलीकॉप्टर प्रवासाच्या GST त 13 टक्के कपात सत्वर..

0

दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर १८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयावरसुद्धा निव्वळ तीव्र नापसंती

पर्यटनासाठी होणाऱ्या हेलिकॉप्टरच्या हवाई यात्रेवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत या यात्रेवर १८ टक्के जीएसटी लावला जात होता. आता पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

दिल्लीः विमा हप्त्यावरील १८ टक्के जीएसटी कमी करण्यावर जीएसटी परिषदेमध्ये सोमवारी व्यापक सहमती झाली. परंतु यासंदर्भात निर्णय मात्र पुढील बैठकीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय दोन हजारांपेक्षा कमी रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा निर्णयही तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे.जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुषमा स्वराज भवनात पार पडली. या परिषदेतला काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री उपस्थित होते. आयुर्विमा तसेच आरोग्य विम्यावर लावण्यात येणाऱ्या १८ टक्के जीएसटीवरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुलै महिन्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून विम्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती. यानंतर गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही विरोधकांनी हीच मागणी लावून धरली होती. यामुळे आजच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार या मुद्यावर चर्चाही झाली. बहुतांश मंत्र्यांनी ही मागणी लावून धरल्याने यावर व्यापक सहमती झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. परंतु याबद्दल नेमकी कार्यपद्धती कशी असेल, याबद्दल मात्र पुढील जीएसटी बैठकीत निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले.

दोन हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहार होणाऱ्या डिजिटल व्यवहारांवर कर लावण्याचा निर्णय तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे. दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर १८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयावरसुद्धा तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. अखेर हा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी होणाऱ्या हेलिकॉप्टरच्या हवाई यात्रेवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत या यात्रेवर १८ टक्के जीएसटी लावला जात होता. आता पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

बैठकीतील चर्चेचे मुद्दे

  • ऑनलाईन गेमिंगवर कर लावण्यावर अद्याप निर्णय नाही
  • तेल व वायू उत्सर्जनावर कर लावण्याचा प्रस्तावावरही निर्णय नाही
  • शैक्षणिक संस्थांमधील संशोधन कार्य व विकासासाठी मिळणाऱ्या निधीवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी समिती

धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत;तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दिनांक ९ सप्टेंबर ः महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन पू.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजी राजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.

‘जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राचीनिर्मिती झाली आहे’, असा विश्वास डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, “सत्ययुगापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहीली आहे. स्वतःला कॉंग्रेसमधील डावे म्हणणारे सुभाषचंद्र बोस तर याला स्पष्टपणे हिंदू प्रेरणा म्हणत. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही तर स्वभावाचे वर्णन आहे. सर्व विविधतांना स्विकारणारे हे उदात्त विशेषण आहे.”

भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भाने तंजावरचा अधिक अभ्यास व्हायला हवा, असे मत लेखक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी व्यक्त केले.साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे यावेळी उद्घाटन झाले.

तंजावर हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास :
तंजावर मधील मराठ्यांचा इतिहास हा एका घराण्याचा इतिहास नाही, असे प्रतिपादन बाबाजीराजे भोसले यांनी केले. ते म्हणाले, “तंजावरमध्ये केवळ भोसलेच नाही तर डोंगरे, केसरकर, कुलकर्णी, महाडिक, गाडे आदि आडनावाची घराणी आहेत, ज्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे. हा केवळ एका घराण्याचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि तंजावरचा संबंध वाढायला हवा.”

शिवाजी महाराज आत्मप्रेरणा

इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक दैदिप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन भारत भरात दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांच्या विरूद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.

सरसंघचालक म्हणाले..

  • धर्म हा एकतेचा धागा
  • धर्म ही राष्ट्राची जीवनशक्ती
  • धर्म लयाला गेल्यावर राष्ट्राचे अधःपतन
  • धर्माची मूल्य सत्यातून येतात
  • सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच धर्माचा उदय
    ▪️-हिंदू धर्म हाच आपल्या कतेचा आधार
    ▪️धर्म जगाला देणे हेच भारताचे प्रयोजन
    इस्लामी आक्रमणाचे स्वरुप ओळखणारे छ.शिवाजी महाराज

वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ:DCM फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; मार्च 2024 पासून लागू होणार वेतनवाढ

0

ऊर्जामंत्री यांनी घेतली वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना मिळणार 19% वेतन वाढ जाहीर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने स्वागत

मुंबई- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली या वेळी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ फरकासह देण्याचा निर्णय घेण्यात आला या शिवाय पुढील निर्णय घेण्यात आले.

जाॅब सिक्युरिटी म्हणून केवळ कंत्राटदार बदलला म्हणून एकतर्फीपणे कामावरून कमी करता येणार नाही.
महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रू पाच लाख पर्यंत आरोग्य विमा लाभ देण्यात येईल. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढुन त्या माध्यमातून अपघात विमा देणार, कोर्ट केस लिस्ट संपर्क पोर्टल ला जोडणार, नोकरीत कंत्राटी कामगारांना वयात सवलत देनार, सर्वांना कंपनीच्या लोगो चे आयकार्ड देणार, 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वीज उद्योगाला स्वतंत्र श्रेणी लागू करणार बेकायदेशीर कृती करणारे कंत्राटदारावर कायद्यातील तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल.

सदरील वेतन वाढ ही दि मार्च 2024 पासून लागू होणार आहे. कोर्ट केस ।व अन्यायग्रस्त कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात येईल.

हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची मागणी केली आहे त्या बाबतीत सरकार पातळीवर अभ्यास करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेला दिले आहे.

कंत्राटदार कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक व सामाजिक शोषण करतात त्यामुळे या साठी महाराष्ट्र शासनाने ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊन या शोषित पीडित कामगारांना न्याय दिला पाहिजे व या वेळी सरकारचे स्वागत केले आहे, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले आहे.या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या लढा यशस्वीपणे भाग घेतलेल्या व भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवलेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

पुढीले काळात कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून चर्चा मार्फत कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असेच आश्वासन देवेंद्र फडणवीस शिष्टमंडळला दिले.

या मीटिंग साठी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश सरचिटणीस गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री राहुल बोडके, महावितरण सचिव अभिजीत माहुलकर, योगेश सायवनकर, विदर्भ प्रतिनिधी अंकुश डोंगरवार, कोकण प्रतिनिधी कमाल खान, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी, राहुल भालभर, मराठवाडा प्रतिनिधी मारुती गुंड, महानिर्मिती उपाध्यक्ष मोहन देशमुख,विनोद बनसोड, विलास गुजरमाळे, विकास अडबाले व अन्य अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते

दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन

पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले

पुणे, : दैनिक भारत डायरीचे प्रतिष्ठित संपादक श्री अशोक अग्रवाल यांचे सोमवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय सुमारे 60 वर्षे होते. त्यांच्या निधनाने हिंदी पत्रकारितेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. अशोक अग्रवाल निःपक्षपाती, निर्भय आणि सचोटीवर आधारित पत्रकारितेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

श्री अग्रवाल यांनी आयुष्यभर श्रमिक पत्रकार म्हणून आपला ठसा उमटवला आणि संपूर्ण प्रामाणिक आणि समर्पणाने लढाऊ पत्रकारिता केली. त्यांचे योगदान केवळ पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदी पत्रकारिता जगतासाठी प्रेरणादायी होते. अशोक अग्रवाल यांनी निःपक्षपाती आणि निर्भय पत्रकारितेचा आदर्श घालून दिला, जो सचोटीने आणि समाजाच्या खऱ्या सेवेने प्रेरित झाला.

हिंदी पत्रकारितेचे मोठे नुकसान

त्यांच्या निधनाबद्दल पुणे आणि देशभरातील पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अशोक अग्रवाल यांची पोकळी भरून काढणे फार कठीण आहे हे सर्वांनी मान्य केले. आपल्या आयुष्यात त्यांनी पत्रकारिता ही समाजाचा खरा आवाज म्हणून मांडली आणि सत्य समोर आणण्यासाठी नेहमीच निर्भयपणे काम केले.

दैनिक भारत डायरीची स्थापना आणि वारसा

अशोक अग्रवाल यांनी ८ ऑगस्ट १९९७ रोजी दैनिक भारत डायरीची स्थापना केली, जी आज पुण्यातील हिंदी पत्रकारितेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या वृत्तपत्राचा पहिला अंक दिवंगत चित्रपट अभिनेते कादर खान यांनी सुरू केला होता. तेव्हापासून आजतागायत दैनिक भारत डायरीने जनहिताची पत्रकारिता सर्वोच्च ठेवली आहे आणि समाजातील दुर्बल घटकांचा आवाज राहिला आहे.
दैनिक भारत डायरी दरवर्षी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे ज्यामध्ये बॉलीवूड स्टार्सचा मेळावा होता. या वर्षापासून श्री अग्रवाल यांनी चित्रपट अभिनेते कादर खान यांच्या नावाने “सर कादर खान जीवन गौरव पुरस्कार” देण्याची घोषणा केली होती. 14 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक स्मृती मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये चित्रपट अभिनेते जितेंद्र कपूर यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सर कादर खान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता, मात्र दरम्यान, या कार्यक्रमात बाजी मारली गेली. अकाली श्री अग्रवाल यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे हा कार्यक्रम आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

अशोक अग्रवाल यांनी 2 दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अग्रवाल यांच्या निधनाने संपूर्ण अग्रवाल समाजासह पुण्यातील पत्रकार, राजकीय नेते, हितचिंतक आणि भारत डायरीच्या वाचकांना मोठा धक्का बसला आहे.

विशाल अग्रवाल हे संपादकीय जबाबदारी सांभाळतील

अशोक अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि उपसंपादक विशाल अशोक अग्रवाल हे संपादकाची तात्काळ जबाबदारी स्वीकारणार आहेत. विशाल अग्रवाल हे देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पत्रकारितेच्या सेवेत गुंतले असून या कठीण प्रसंगी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते तत्पर आहेत.

अशोक अग्रवाल यांचे निधन हे हिंदी पत्रकारिता जगताचे मोठे नुकसान आहे, हे फार काळ विसरता येणार नाही. त्यांनी प्रस्थापित केलेली मूल्ये आणि मूल्यांवर आधारित पत्रकारिता पुढे नेण्याचे आव्हान आता त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि सहकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊनराज्यातील अरीष्ट टाळण्यासाठी उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना.

पुणे-गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घराघरात तसेच गणेश मंडळाच्या सभामंडपात वाजत गाजत थाटामाटात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील गणेशोत्सवाची धुम काही औरच असते. राज्यभरातील लाखो गणेश भक्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनाला येतात. भाद्रपद चतुर्थीला गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावे पूजाअर्चना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळात तर अनोखी उत्साहऊर्जा संचारते. सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा, राष्ट्रिय एकात्मता, सर्वधर्म समभाव राखून हिंदू संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते. मोठ्या हर्षोल्लाहासाने विविध प्रकारच्या आकर्षक सजावट व नयन मनोहर देखावे सादर करून लाडक्या बाप्पाची आणि स्थापना केली जाते व पुढील दहा दिवस संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉं नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कसबा गणपती, दगडुशेठ गणपती, तांबडे जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग मंडई गणपती, केसरी वाडा. येथील गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पुजा केली. राज्यातील दृष्काळाची छाया नष्ट होऊन सुखसमृद्धी लाभावी, बळीराजा संतुष्ट होऊन राज्यातील सर्व प्रकारचे अरिष्ट टळावे. महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकाभिमुख व जनसामान्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे अशी प्रार्थना उपसभापती, शिवसेना नेत्या डाँक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी गणरायाकडे केली. यावेळी दर्शना त्रिगुणाईत सहसंपर्क प्रमुख , सारिका पवार , मनिषा पारंडे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख संजिवनी विजापूरकर विभाग प्रमुख, श्रृती राजरकर, जयश्री मोरे उपशहर प्रमुख तसेच शिवसेना भवन कार्यालय प्रमुख श्री सुधीर जोशी उपस्थीत होते.

‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने, चांदीचे दागिने अर्पण करतात. यंदाच्या गणेशोत्सवात सॉलिटेरियो डायमंडस तर्फे गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसविण्यात आला असून यामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंडसचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रीं चे दर्शन घेत हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

विवेक ओबेरॉय म्हणाले, मी जेव्हा इथे येतो, तेव्हा तेव्हा गणपतीचे दर्शन घेऊन मन भरून येते. एवढ्या मोठया प्रमाणात गर्दी असून देखील अत्यंत शांतपणे येथे दर्शन घेता येते. वर्षानुवर्षे येथे गर्दी वाढत असली, तरी देखील सगळ्यांना नीट दर्शन मिळते, हे मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

सॉलिटेरियो डायमंडस तर्फे १२ दिवस हा ६६ कॅरेट हि-याचा तिलक साकारण्याचे काम सुरु होते. गणरायांच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल १५० तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा हिऱ्याचा तिलक साकारला आहे.. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर,देशात कमी झाली -जयंत पाटील

मोठ्या पवारांच्या मनात काय आहे? हे ओळखणे अवघड आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे यांच्या मनात काय आहे, ते मला ओळखता येते व माहितीही आहे, आणि काय होणार आहे हेही ठाऊक आहे ; पण ते मी सांगणार नाही.

अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावा राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.त्यामुळे ते त्यांना आता तुम्ही थोडसं दुर ऊभं राहा म्हणू शकतील. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. आता तुम्ही वेगळी निवडणुक लढवा असंही सांगतील अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळं व्हावं वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं. अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे. निवडणुक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ, असे सांगितले जाऊ शकते.

पुणे -आज मागणी नसलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खर्च अनावश्यक सुरू आहे. पाण्याचे प्रश्न महत्वाचे असून राज्यात काही भागात पाणी कमी तर काही जागी जास्त आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे आवश्यक आहे. नाशिक, धुळे मधून काही पाणी गुजरातला जात आहे ते आपल्या हक्काचे आहे ते वळवले पाहिजे. सरकारने लक्ष्य देऊन विदर्भातील पाण्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘ महाराष्ट्र व्हिजन २०५० ‘ विषयावर वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.

प्रश्न- पवारसाहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्याने अजितदादांनी बंडाची भूमिका घेतली काय ? उत्तर – नाही , तुम्ही बसून प्रश्न विचार .. तुम्ही उभे राहून प्रश्न विचारल्याने प्रश्न वाढलेला आहे .. असे म्हणत हसत जयंत पाटलांनी दिली बगल


जयंत पाटील म्हणाले, अलीकडे राजकारणी केवळ पुढील निवडणुकी पुरते पाहत आहे हे दिसून येत आहे. राज्यासमोर अनेक आव्हाने सध्या आहे. देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र अग्रेसर होते. रोजगारासाठी प्राधान्य काँग्रेस काळापासुन प्रोत्साहन दिले गेले. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र पूर्वी महत्वाचे स्थान होते पण आज अनेक ठिकाणी बंदरे, विमानतळे अशी दळणवळण सुविधा निर्माण झाली. त्यामुळे परिस्थिती बदलली असून गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय गुंतवणूकदारस निर्माण झाले.देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे महत्वाचे आहे. गुंतवणूक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी सर्व समाज गुण्या गोविंदाने राहिली पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिला पाहिजे तर गुंतवणूक येते पण सध्या तसे वातावरण नाही.
काहीजण धार्मिक गोष्टी बोलून भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन गुंतवणूक होणारी ठिकाणे निवडून तेथे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले तर मोठ्या शहरावरील पायाभूत सुविधा ताण निर्माण होणार नाही. स्वतंत्र जागी ग्रोथ सेंटर, कॉरिडॉर निर्माण केले तर मराठवाडा, विदर्भ परिसरात नवे रोजगार निर्माण होऊन सदर भागाचा विकास होईल. धर्म निरपेक्ष संस्कार नवीन पिढीला दिले तर जागतिक पातळीवर आपण आगामी काळात पुढे जाऊ.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बाबत असंख्य शाळा निर्माण झाल्या आहे. आता त्याच्या शिक्षण आणि पायाभूत सुविधा बाबत गुणात्मक दर्जा संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. शाळांच्या शिक्षकाचे प्रशिक्षण आणि दर्जा यातून चांगली पिढी निर्माण होईल. उद्याच्या निवडणुकीकडे केवळ न पाहता जनतेने दीर्घकालीन महाराष्ट्र हिताचा विचार निवडणुकीत करावा. तात्पुरते स्वप्न दाखवणारा योजना पेक्षा दीर्घकालीन परिणामकारक काम महत्वाचे आहे. सरसकट पैसे वाटप हे केवळ दोन महिने आहे. ज्या महिलेस पैशाची खरचं गरज आहे त्यांना मदत दिली पाहिजे. तात्कालिक स्वप्न दाखवणाऱ्या लोकांना जनतेने घरी पाठवले पाहिजे.

पीसीसीसोईआर मध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेला प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. ०९ सप्टेंबर २०२४) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल तर्फे आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते.
या स्पर्धेमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी तीस संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सामाजिक समस्यांचे तांत्रिक दृष्टिकोनातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
विविध नामांकित कंपन्यातील तज्ज्ञ, अनुभवी परीक्षक डॉ. बी. सत्यनारायण, श्रीकांत सावलकर, राहुल शेलार, ललित पाटील, दीपक रसाळ व जयवंत देवरे यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बी. सत्यनारायण यांनी तरुणांना संशोधनाचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, विजयलक्ष्मी कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवगंगा गव्हाणे आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गंगा नेबुला सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात

पुणे-विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला असून हा वार्षिक उत्सव रहिवाशांना अनोख्या आणि प्रेमळ पद्धतीने एकत्र आणून त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात रहिवाशांमध्ये प्रचलित असलेल्या उत्सवाच्या मूडसह आणि गणेशोत्सव उत्सवादरम्यान सामुदायिक बंधनाच्या जबरदस्त भावनेसह होतो.

या उत्सवाची सुरुवात एका भव्य मिरवणुकीने झाली जिथे सुंदर रचलेल्या गणेशाची मूर्ती सोसायटीच्या रस्त्यावरून आनंदी रहिवासी आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  रहिवासी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि सभासदांनी प्रार्थना करून आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद घेत दररोज आरत्या केल्या जातात.

सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादरीकरण आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि संपूर्ण रहिवासी, विशेषतः लहान मुले मोठ्या उत्साहाने या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. गणपतीला धुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व सांगणाऱ्या सोसायटीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या स्किटने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  याव्यतिरिक्त, सोसायटी पर्यावरणास अनुकूल उत्सवांना प्रोत्साहन देते, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाश्वत पद्धतींचा प्रचार करते.

गणेशोत्सव उत्सव केवळ तेथील रहिवाशांमधील बंध दृढ करत नाही तर समाजाने एकत्र येण्यासाठी त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि चांगल्या समाजासाठी बांधिलकी जपण्याचे एक सुंदर उदाहरण देखील आहे.

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी’नगररोड मध्ये चिकुनगुनियाच्या गंभीरसंसर्गातून ५ वर्षांचा मुलगा झाला बरा

जीवघेणा मेंदू संसर्ग आणि अवयवांची कार्यक्षमता कमी झाली पण या लहान मुलानेमिळवला अद्भूत विजय

पुणे सप्टेंबर२०२४  चिकनगुनियाच्या गंभीर मेंदू संसर्गामुळे (एन्सेफलायटीस )झालेल्या आणि त्यातून अनेक अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागलेल्या एका पाच वर्षांच्यामुलावर पुण्यातील ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी’ नगररोड येथे यशस्वीपणे उपचार करण्यातआले. अगदी जिवावर बेतलेल्या दुखण्यातून हा मुलगा आता बरा झाला असून त्यालारुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अवघड आजारातुन त्याच्या प्रकृती ची उत्तम सुधारणा झाली.

सुरुवातीला १८ ऑगस्ट २०२४ रोजी चंदननगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद शेलारयांनी मुलाला तपासले होते. त्यावेळी मुलाला खूप ताप येत होता; परंतु या मुलाला नंतरफिट्स येऊ लागल्या, त्यामुळे त्याला तातडीने नगररोड सह्याद्रि हॉस्पिटल्समॉमस्टोरी येथील पीआयसीयूमध्ये विशेष उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यावर या मुलाला फिट्स येऊ लागल्या आणि डोळ्यांतील बाहुलीचे असमान प्रमाण झालेमेंदुचे प्रेशर वाढणे अशी मेंदूमध्ये गंभीर संसर्ग झाल्याची चिन्हेत्याच्यात दिसू लागली. आमच्या लक्षात आलेकी अस्थिर श्वासोच्छवास आणि सततफिट्स येणे यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर तातडीने व्हेंटिलेटरद्वारेउपचार करणे आवश्यक होते. ईईजी मॉनिटरिंगमध्ये दिसून आले की मुलालासतत येत असलेल्या फिट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यकआहे. मात्र मेंदूमध्ये त्या सतत फिट दिसून आल्या. त्यामुळेया फिट्सवर आणि मेंदूच्या वाढलेल्या दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलाला सततऔषधे देण्यास सुरुवात करण्यात आली. हळूहळू ईईजी नॉर्मल होऊ लागला. हे असेत्वरीत उपचार केले नसतेतर मेंदू ची कार्यक्षमता कमी होण्याचा गंभीर धोका होता,” असे ‘सह्याद्रिहॉस्पिटल्स मॉमस्टोरी’नगररोड चे ज्येष्ठ बालरोग अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. सागर लाड म्हणाले.

सुरुवातीला मुलाच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेआढळून आले होते. त्याचे यकृत निकामी होऊ लागले होते. चिकनगुनियाचा संसर्गअसलेल्या ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये ही स्थिती उद्भवते. अशा वेळी यकृताच्यापुनरुज्जीवनासाठी तातडीच्या औषधांची आवश्यकता असते. त्याचबरोबर मुलाच्यारक्तातील प्लेटलेट्सची व पांढऱ्या रक्तपेशींची संख्या खूपच कमी झाली होती. त्यामुळेत्याच्यावरील उपचार जटिल झाले होते. त्याला रक्त आणि प्लेटलेट्स चढविण्यातआले. त्याचा रक्तदाब खूपच कमी झाला होता. तो सामान्य पातळीवर आणण्यासाठीऔषधे आवश्यक होती. ‘रिअल-टाइम पीसीआर’ चाचणी केल्यावर मुलालाचिकनगुनियाचा गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. चाचण्या व उपचार चालूअसतानाच त्याची परिस्थिती आणखी बिघडली. त्याला ‘हिमोफॅगोसाइटिकलिम्फोहिस्टियोसाइटोसिस’ झाला. ही एक अशी दुर्मिळ आणि धोकादायक स्थितीअसतेज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच अवयवांना इजा करू लागते. या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी‘इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन’ आणि स्टिरॉइड्स द्यावे लागतात,” असे स्पष्टीकरण डॉ. सागर लाड यांनी दिले.

सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरी नगररोड येथील निओनॅटोलॉजी व पेडियाट्रिक्स या विभागाचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणालेया मुलाच्या प्रकृतीवर सतत बारकाईने देखरेख ठेवत आणि विविध प्रकारचे उपचार करीत डॉक्टरांनी संसर्गाची गुंतागुंतहाताळली. मुलाचा मेंदू आणि इतर अवयवांवर त्यांनी विपरीत परिणाम होऊ दिले नाहीत. या मुलाच्या मेंदूच्या ‘एमआरआय’च्या स्कॅनमध्ये एन्सेफलायटीसची लक्षणे ठळकपणे आढळून आली. चिकुनगुनियामुळे उद्भवू शकणारी ही एक गंभीर व असामान्य स्थिती असते.

रुग्णालयात १४ दिवस उपचार घेतल्यावर मुलाच्या प्रकृतीत उल्लेखनीय प्रगती झाली .१० दिवसा नंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता नाहीअसे ठरविण्यात आले.”त्याची प्रकृती चिंताजनक झाली होतीआता मात्र त्याच्या हालचाली व त्याचे विचार हे सुरळीत झाले आहेत. तो आता त्याच्या सभोवतालच्या जगाशी चांगला संवाद साधत आहे,” डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

दि. १ सप्टेंबर रोजी मुलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर झाली असून त्याच्या न्यूरोलॉजिकल समस्या कमी झाल्या आहेत.

रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ प्रतीक कटारिया म्हणाले, “सह्याद्रितील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या अतीव काळजीबद्दल रुग्ण मुलाच्या कुटुंबियांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.”

‘सह्याद्रि’तील अनेक विभागांतील तज्ज्ञांनी एकत्रित प्रयत्न करून या मुलाला जीवनमिळवून दिले. या पथकामध्ये डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. प्रीती लाड, डॉ. सुष्मितानिमगड्डा, डॉ. निकिता मानकर, डॉ. ऐश्वर्या दलाल, डॉ. प्रांजली फुलारी, डॉ. नेहाकुंटूरकर आणि डॉ. दिनेश ठाकरे, तसेच बाल यकृत तज्ज्ञ डॉ. स्नेहवर्धन पांडे आणिबालरक्तरोग तज्ञ डॉ. कन्नन यांचा समावेश होता.

चिकुनगुनिया हा लहान मुलांमध्ये फारसा गंभीर आजार मानला जात नाहीपरंतुपुण्यातील सध्याच्या परिस्थितीत आम्ही चिकुनगुनियाचा अत्यंत गुंतागुंतीचा संसर्गपाहत आहोत. विशेषत: लहान मुलांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन फिट्स येणेशुद्ध हरपूलागणे आणि अगदी कोमामध्ये जाणे हेही आढळून येत आहे. लवकर निदान नझाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. बहुधा विषाणूंच्या विषाणूजन्य घटकातीलबदलामुळे हे झाले असावे,” असे डॉ. सागर लाड म्हणाले.