पुणे-गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घराघरात तसेच गणेश मंडळाच्या सभामंडपात वाजत गाजत थाटामाटात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील गणेशोत्सवाची धुम काही औरच असते. राज्यभरातील लाखो गणेश भक्त पुण्यात बाप्पाच्या दर्शनाला येतात. भाद्रपद चतुर्थीला गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावे पूजाअर्चना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळात तर अनोखी उत्साहऊर्जा संचारते. सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा, राष्ट्रिय एकात्मता, सर्वधर्म समभाव राखून हिंदू संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते. मोठ्या हर्षोल्लाहासाने विविध प्रकारच्या आकर्षक सजावट व नयन मनोहर देखावे सादर करून लाडक्या बाप्पाची आणि स्थापना केली जाते व पुढील दहा दिवस संस्कृती व परंपरेचे रक्षण केले जाते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉं नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कसबा गणपती, दगडुशेठ गणपती, तांबडे जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग मंडई गणपती, केसरी वाडा. येथील गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पुजा केली. राज्यातील दृष्काळाची छाया नष्ट होऊन सुखसमृद्धी लाभावी, बळीराजा संतुष्ट होऊन राज्यातील सर्व प्रकारचे अरिष्ट टळावे. महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकाभिमुख व जनसामान्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे अशी प्रार्थना उपसभापती, शिवसेना नेत्या डाँक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी गणरायाकडे केली. यावेळी दर्शना त्रिगुणाईत सहसंपर्क प्रमुख , सारिका पवार , मनिषा पारंडे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख संजिवनी विजापूरकर विभाग प्रमुख, श्रृती राजरकर, जयश्री मोरे उपशहर प्रमुख तसेच शिवसेना भवन कार्यालय प्रमुख श्री सुधीर जोशी उपस्थीत होते.