पुणे- आपण काल अमित शहांना भेटलो चर्चा केली पण ‘द हिंदू ‘ या इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या आधारे दिलेली बातमी खोटी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला .
मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. पण द हिंदू वृत्तपत्रातील बातमी धादांत खोटी आहे. मैत्रिपूर्ण लढतीवर आणि मुख्यमंत्रीपदावर,बिहार पैटर्न वर कोणतीही चर्चा झाली नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीत 288 पैकी काही जागांबद्दल ठरले आहे, इतर जागावाटपाचे अजून काही ठरलेले नाही, पण जसे जागावाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईल. माझे असे मत आहे की असे मै़त्रीपूर्ण लढतीत काही अर्थ नाही, आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही, असे त्यांनी माध्यमांना म्हटले आहे.अजित पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत, असे काहीच होणार नाही. आम्ही सर्व जण बैठक घेऊन 288 जागापैंकी महायुतीमधील कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरले आहे, काही बाकी आहे. हे जेव्हा आमचे ठरेल तेव्हा मी यासंदर्भात माहिती देईल. महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे आमचे लक्ष आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातीवर तुमचा फोटो नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की,भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मीच माझा फोटो तुमच्या जाहिरातीमध्ये लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे झाले थोडे कमी करावे म्हणून असे सांगितल्याचे म्हणत त्यांनी विषय टाळला. लाडकी बहिण योजना ही महायुतीची सोजना आहे, त्यामुळे घटक पक्ष आपआपल्या परिने मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुतीम्हणून मांडणार.अजित पवार म्हणाले की, राज्यात कापूस, सोयाबिनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याला कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळत असतील तर मे मिळायला हवे अशा विषयावर माझी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली.