Home Blog Page 696

 मिलान फॅशन वीक मध्ये तमन्ना भाटिया च्या अनोख्या अदा  

भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलुत्व आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली जागतिक खळबळ आणि पॅन-इंडियन स्टार तमन्ना भाटिया हिने मिलान फॅशन वीक दरम्यान अत्यंत अपेक्षित असलेल्या रॉबर्टो कॅव्हली स्प्रिंग/समर 2025 शोमध्ये आपल्या फॅशन ची अनोखी झलक दाखवली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या शानदार पदार्पणानंतर तमन्ना भाटिया आता 18 सप्टेंबर 2024 रोजी रॉबर्टो कॅव्हली SS25 शोमध्ये सहभागी झाली ! 
 या प्रतिष्ठित कार्यक्रमात पहिल्यांदाच हजेरी लावणारी तमन्ना जागतिक फॅशन मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एका निवेदनात अभिनेत्रीने तिचा उत्साह व्यक्त करताना म्हटले आहे की, “माझ्या सिंधी वारशामुळे कवल्लीचे घर घरासारखे वाटते. प्राण्यांच्या प्रिंट्स, सोनेरी आणि बोल्ड ग्लॅमरचे सिंधी प्रेम ब्रँडच्या बोल्ड ड्रेसमध्ये मला हा फॅशन विक करताना मज्जा येते ” हा कार्यक्रम देखील एक व्यासपीठ आहे जिथे फॅशन आणि वारसा एकत्र येतो. रॉबर्टो कॅव्हॅली शोमध्ये तमन्नाच्या उपस्थितीमुळे तिच्या स्वतःच्या सिंधी संस्कृतीचा वारसा जपणार आहे. कामाच्या आघाडीवर तमन्ना चमकत आहे. ती सध्या स्त्री 2 गाण्याच्या आज की रातच्या यशाचा आनंद घेत आहे आणि तिने तमिळ ब्लॉकबस्टर अरनमानाई 4 सह 2024 चा हिट गाणे आधीच दिले आहे. तिच्या आगामी तेलगू चित्रपट ओडेला 2 आणि ओटीटी प्रोजेक्ट डेअरिंग पार्टनर आहे.

कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मिरवणुकीनंतर लगेचच साफसफाईला सुरुवात

पुणे -महानगरपालिकेच्या कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक संपन्न झाल्या नंतर लगेचच साफसफाई करिता सुरुवात करण्यात आली

कसबा विश्रामबावडा क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत महात्मा फुले मंडई येथे लोकमान्य टिळक व लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्री गणेश विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी यांची प्रमुख उपस्थिती होती. टिळक रोड येथून १६४, लक्ष्मी रोड येथून १८९ केळकर रोड येथून १०१ असे एकूण ४५४ गणेश मंडळांनी विसर्जन सोहळ्यात भाग घेऊन गणेशोत्सवाची सांगता झाली. श्री गणेश विसर्जन पूर्ण झाल्यानंतर त्वरित क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता सेवक यांनी प्रमुख रस्ते लक्ष्मी रोड , केळकर रोड, शास्त्री रोड ,टिळक रोड, कुमटेकर रोड, हे स्वच्छ करण्यात आले. गणेशोत्सवाच्या दरम्यान 12860 किलो निर्माल्य जमा करण्यात आले. गणेश उत्सव दरम्यान क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने संपूर्ण परिसरात ४७ ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली तसेच मूर्ती संकलित केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले. क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत एकूण १४२१५ गणेश मूर्तीचे संकलन करून पुनर्विसर्जनासाठी वाघोली येथे खाणी मध्ये पाठवण्यात आल्या . तसेच गणेशोत्सव दरम्यान तिन्ही शिफ्ट मध्ये स्वच्छता करण्यात येत होती . यादरम्यान सुलभ शौचालयाची सोय करण्यात आली होती . गणेश भक्तांच्या सोयीसाठी तात्पुरते १५० मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली होती. गणेश विसर्जन सुरळीत व्हावे याकरिता प्रत्येक विसर्जन घाटावरती व विसर्जनच्या ठिकाणी हौदाची सोय करण्यात आली होती . प्रत्येक हौदावरती पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. तसेच घाट परिसरामध्ये जीव रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. विसर्जन मार्गांमध्ये विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य सुविधेचे नियोजन करण्यात आले होते. श्री गणेश विसर्जन सोहळा दिनांक १७/९/२४ रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी १८/९/२४ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संपन्न झाला. हा संपूर्ण सोहळा \ उपायुक्त परिमंडळ क्रं ५ डॉक्टर चेतना केरुरे, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बंडगर व महेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता सेवक आणि स्थापत्य व विद्युत अभियंता यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण सोहळा आनंददायी वातावरणा मध्ये पार पडला. ‎कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान राबविण्यात येत असून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या टॅग लाईन अंतर्गत पुणे शहरामध्ये स्वच्छते बाबतची जनजागृती व स्वच्छतेचे काम सुरु आहे.

‘गायकवाड-बोंडें’वर न्यायालय आणि पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी -तिवारी

प्रशासकीय घटकांनी कर्तव्यदक्ष रहाणे ही काळाची संविधानिक गरज..!
पुणे दि १८ –
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दगाबाजांना घेऊन सरकार स्थापन करूनही, शिधा – ओवाळणी देऊनही, राज्याची जनता ‘महायुतीला’ साथ देत नसल्याचे सर्व्हे रिपोर्ट आल्याने ‘राज्यातील सत्ताघारी’ मानसिक संतुलन बिघडल्या सारखे वागत आहेत.देशाचे संविधानीक ‘विरोधीपक्ष नेते’ पदी असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विषयी, सत्ता पक्षाचे आमदार हिंसेला चिथावणी देणारी विधाने करत आहेत.हिंसेला चिथावणी देणाऱ्या व विकृतीने पछाडलेल्या आ संजय गायकवाड व अनिल बोंडे यांचे वर ऊच्च न्यायालयाने व पोलीस प्रशासनाने सुमोटो, अटकेची व गुन्हे दाखल करण्याची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, केवळ ‘विरोधीपक्ष संपुष्टात आणण्या च्या राक्षसी लालसेने’ अनैतिक व असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आलेले ‘महायुतीचे त्रिकुट सरकार’ वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना सत्तेत सामील करून घेते व भ्रष्टाचारास राजमान्यता देते हाच शिव छत्रपतींच्या महाराष्ट्राचा उपमर्द आहे. व त्याच बरोबर (२०१९ मध्ये) भाजप विरोधी कौल दिलेल्यांना देखील, राजकीय व नैतिक मुल्यांना हरताळ फासून सत्तेची सुत्रे सोपवते ही राज्यातील जनतेशी केलेली प्रतारणा आहे..!
राज्याचे बेलगाम, घमेंडखोर व बेजबाबदार गृहमंत्री फडणवीस हेच जर विरोधकांना फोडून काढण्याची भाषा करत असतील व राज्यातील कायदा – सुव्यवस्था लयाला जाऊन दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असेल तर लोकशाहीचे दोन स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘प्रशासन व न्यायालय; या संस्थांनीच् सुमोटो कारवाई करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची गरज आहे.
जनतेच्या कररुपी पैशातुन पोसले जाणारे ‘लोकशाहीचे दोन स्तंभ’ कर्तव्यदक्ष राहणे ही प्रजासत्ताक देशातील संविघानिक गरज आहे. अन्यथा राज्यात निवडुन येणारे मविआ चे सरकार संबंधित घटकांची गंभीर दखल घेऊन, “महाराष्ट्राच्या जनतेप्रती कर्तव्यभिमूख न राहणाऱ्या” प्रशासकांवर कारवाई करेल असा ईशारा देखील काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात दिला..!

केंद्र सरकारच्या एनपीएस वात्सल्य योजनेचा शुभारंभ, पुण्यात योजनेच्या नोंदणीस सुरूवात

एनपीएस वात्सल्य योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल-पुणे जिल्हा परिषद सीईओ संतोष पाटील

पुणे, दिनांक १८:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे येथे करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक तथा राज्यस्तरीय बँकर्स समिती संयोजक चित्रा दातार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक जावेद मोहनवी, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक जोशी पुथूर तसेच कॅनरा बँकच्या उपमहाव्यवस्थापक लीना पिंटो, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील म्हात्रे पुल परिसरातील सिद्धी बँक्वेट हॉल येथे जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात पुणे येथे करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पपेट शो तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. यादरम्यान, उपस्थितांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले संबोधनही लक्षपूर्वक ऐकत योजनेची माहिती घेतली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यंदाच्या अर्थसंकल्पात एनपीएस वात्सल्य ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली होती. वात्सल्य याचा अर्थच मूळात माया आणि ममता असून त्याचे प्रतिबिंब या योजनेत दिसून येते.
ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी केवळ पेन्शन या कारणासाठी शासकीय नोकरीस प्राधान्य दिले जायचे. नंतरच्या काळात एनपीएसच्या स्वरुपात पेन्शनची संधी खासगी नोकरदारांनाही उपलब्ध करून देण्यात आली. आता अल्पवयीन मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली असून या योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल, याचा विश्वास वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक चित्रा दातार यांनी उपस्थितांना योजनेविषयी सविस्तर माहिती देत अधिकाधिक संख्येने यामध्ये मुलांची खाती उघडण्यासाठी आवाहन केले.

एनपीएस वात्सल्य योजनेविषयी-
एनपीएस वात्सल्य ही ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान एक हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करु शकतो. मुलाच्या १८ वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे.

मुलगा १८ वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते १८ या वयोगटात उघडण्याची ही योजना असून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

सकाळचे प्रदूषण कमी झाले पाहिजे:नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ


मुंबई-सकाळी होणारे प्रदूषण कमी व्हायला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः सहभाग घेत स्वच्छता केली. इतकेच नाही तर कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर देखील त्यांनी चालवणे. यात गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत देखील एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची रोज सकाळी होणारी पत्रकार परिषद सत्ताधारी पक्षांकडून नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून त्यांना अनेकदा विरोधी पक्षांनी टोला देखील लगावला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सकाळी होणारे हे प्रदूषण आता कमी व्हायला हवे, असे म्हणत त्यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.

पीएमपीएमएल चे 1748 बदली कर्मचारी अखेर कायम…!!

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही

पुणे: पी एम पी एम एल च्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत नियमीत सामावून घेण्यासाठी, आवश्यक असलेला २४० दिवसांचा कालावधी पुर्ण होवून सुद्धा, पीएमपीएमएलच्या प्रशासनाकडून सेवेत पुर्णत: समावून न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आज शिवसेना शहर प्रमुख प्रमुखा नाना भानगिरे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर आज अखेर 1748 पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येण्याबाबतचा आदेश पीएमपीएमएल च्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढला आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नियमित करण्याचा आदेश निघाल्याने पी एम पी एम एल चे बदली कर्मचाऱ्यांना आता कायम करण्यात येणार आहे.
पीएमपीएमएल च्या कर्मचारी सेवाशर्तीनुसार कर्मचाऱ्यास नोकरीत नियमीत होण्याआधी २४० दिवस बदली कर्मचारी म्हणून सेवा बजवावी लागते.सदर कालावधीत कर्मचाऱ्याचे कामातील सातत्य प्रगती बघुन त्यास सेवेत कायम करणेबाबत निर्णय घेतला जातो.त्यानुसार २४० दिवसांचा कालावधी समाप्त होवून देखील पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने वाहक चालक आणि अन्य संवर्गातील एकुण सुमारे 1748 कर्मचारी नियमीत केले नव्हते.सदर कर्मचारी रोजदांरी पद्धतीने कार्यरत होते‌ नियमित कर्मचाऱ्यांच्या इतकेच काम करुन सुद्धा सेवेची निश्चिती नसल्याने कर्मचारी सातत्याने आंदोलनाच्या पावित्र्यात होते
या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे,यासाठी गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षातर्फे पी.एम.पी.एम.एल.प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता‌ ‌दरवेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत नव्हती. पी. एम.पी.एल प्रशासन दाद देत नसल्याने पक्षातर्फे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वात पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी संप देखील पुकारण्यात आला होता, आज आदेश न निघाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचे देखील प्रशासनास सांगण्यात आले होते,अखेर आज पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ यांनी कर्मचाऱ्यांना नियमीत करण्याचे आदेश काढले. कर्मचाऱ्यांना नियमित केल्याबद्दल या कर्मचाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पी.एम.पी.एम.एल प्रशासनाने आज हा आदेश निर्गमित केला असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे देखील मनापासून आभार मानतो. पी.एम.पी.एम.एल चे कर्मचारी कायम सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या सर्व संघटनांचे, पी एम पी एम एल कर्मचाऱ्यांचे ही आभार मानतो.

भाजपा खासदार अनिल बोंडेंच्या विधानामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका, बोंडेंना तात्काळ अटक करा: यशोमती ठाकूर.

0

काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपा खासदार अनिल बोंडेवर अमरातीवतीमध्ये गुन्हा दाखल.

मुंबई/अमरावती, दि. १८ सप्टेंबर
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बोंडे यांचे विधान समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनिल बोंडेंवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना गराडा घालण्यात आला. अनिल बोंडे हे गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी, असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा अनिल बोंडे यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या मागणीची दखल घेऊन पोलीसांनी खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात कलम १९२, ३५१(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी माजी मंत्री आमदार ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बबलु शेखावत,प्रवक्ते मिलींद चिमोटे, हरीष मोरे, हरीभाऊ मोहोड, भैय्या पवार, प्रविण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेष काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडु हिवसे, राजु बोडखे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने जागतिक वारसा नामांकनासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत जनजागृती

पुणे, दि. १८: जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत आकर्षक जागतिक वारसा रथाद्वारे लोकमान्य टिळक चौक येथे जनजागृती करण्यात आली.

यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन समितीचे किरण इंदलकर, उप जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे, गणेश दानी, डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) प्राध्यापक निलेश जाधव, मे. शिवाई कृष्णा प्रा. लि.चे उदय शिंदे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, शिवदुर्गसवर्धन संस्थेचे पंडित अतिवाडकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणकीदरम्यान शहरातील अलका सिनेमागृह चौकात आकर्षक एलईडी स्क्रीनवर गडकिल्ल्यांची माहिती देणारे छायाचित्रण दाखविण्यात आले. यामध्ये गडकिल्ल्यांची माहिती, नकाशे, छायाचित्रे आदींचा समावेश करण्यात आला. जागतिक वारसा रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचार-प्रसार मोहिमेत डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित १२ गडकिल्ल्यांच्या माहिती दिली. नामांकनाच्या प्रसारासाठी १० हजार हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केल्या. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे डॉ. वाहणे यांनी कळविले आहे.
0000

दगडूशेठ 12 तास अगोदर तरीही मिरवणूकीची 28 तास 45 मिनिटांनी सांगता

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठीचे प्रयत्न फसलेअखेर २८ तासांनीच संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक-

यापूर्वी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दगडूशेठचे विसर्जन होत असत, दगडूशेठ गणपती जात नाही तोवर गर्दी राहते आणि पोलिसांवर तणाव राहतो,या काळात संपूर्ण शहर आणि परिसर वेठीस धरला जातो असा आरोप होत असत या पार्श्वभूमीवर गणपतीपुढील अनेक पथकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या.. मिरवणुकीची लवकर सांगता व्हावी यासाठी गेल्या वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत लवकर सहभागी होत आहे , यंदा तर दगडूशेठ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होऊन रात्री सव्वा आठ वाजता या गणपतीचे विसर्जन झाले, ऐतिहासिक निर्णय घेतलेल्या दगडूशेठ मंडळाचे गेल्यावर्षी कौतुक झाले आणि याही वर्षी होईल पण ….तरीही मिरवणुकीचा कालावधी कमी मात्र झाला नाही … तरीही होतो तेवढाच कालावधी मात्र वाढू न देता कायम राखण्यात यश मिळाले आहे


पुणे-
शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. त्यानंतर आज दुपारी ३ वाजता भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळांच्या मिरवणुकीने सांगता झाली. ही विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 45 मिनिटे चालली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त संदीपसिंह गिल हे उपस्थित होते. यावेळी अमितेशकुमार म्हणाले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीकरिता जवळपास आठ हजार अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर होते, त्यामुळे शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. या सर्व घडामोडीदरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन केल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली. या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अखेरचा मंडळ भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळ हे गणपती विसर्जनासाठीचे शेवटचे मंडळ ठरले असून ही मिरवणूक २८ तास चालल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील ऐतिहासिक गणेशाेत्सव मिरवणूक यंदा वेळेत पार पाडण्यासाठी पाेलिसांनी वेगवेगळ्या गणेश मंडळाशी चर्चा करुन नियाेजन केले होते. डीजेचा वापर मर्यादित ठेवण्यासाेबत लेझरवर बंदी घालण्याचा तसेच या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला होता. पण पोलिसांच्या आदेशांना हरताळ फासत गणेश मंडळांनी डीजेच्या मोठमोठ्या थप्प्या लावत ध्वनी प्रदूषण केले. गणेश मंडळांना पुढे ढकलण्यासाठी पाेलिस पथकांची मिरवणूक मार्गावर तसेच अलका चाैकात कमतरता असल्याचेही या प्रकरणी दिसून आले.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मिरवणूक १७/०९/२०२४ रोजी दुपारी १५.५१ सुरू बेलबाग चौकात आली दुपारी १६.३५ वा.विसर्जन झाले १७/०९/२०२४रोजी रात्रौ २०.५६ वा.

हुतात्मा बाबु गेनू मंडळ१८/०९/२०२४ रोजी पहाटे ०१.१४ वा. मिरवणूक सुरू ,१८/०९/२०२४रोज १ पहाटे ०३.०६ वा.लक्ष्मीरोड ला आली, १८/०९/२०२४ रोजी सकाळी ०६.१५ वा. विसर्जन झाले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०३.१० वा. मिरवणूक सुरू, १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०४.२३ वा लक्ष्मीरोड ला आली. १८/०९/२०२४रोजी सकाळी ०८.०६ वा. विसर्जन झाले.

अखील मंडई गणपती मंडळ मिरवणूक १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०४.२५ वा.सुरू, १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०५.२५ वा.लक्ष्मीरोड ला आली १८/०९/२०२४रोजी सकाळी ०९.१० वा. विसर्जन झाले

डीजेचा आवाज कमी किंवा बंद करण्याच्या मुद्यावरून काही ठिकाणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पाेलिस यांच्यात वादावादीचेही प्रसंग घडले. मानाचे गणपतीच्या मिरवणुकीने अधिक काळ घेतल्याने उर्वरित मंडळांना त्यांचे पारंपारिक वाद्य तसेच डीजे वाजवण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने मंडळानी नाराजी व्यक्त केली. टिळक रस्ता व कुमठेकर रस्त्यावरील डीजे पथक असलेल्या मंडळांनी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यामुळे ही मिरवणूक रेंगाळली गेली. अनेक मंडळांनी उच्च क्षमतेच्या साऊंडचा वापर केल्याने सदर मंडळांविराेधात कारवाई करण्याचा इशारा पाेलिसांकडून देण्यात आला आहे. पाेलिसांकडून ध्वनीवर्धकाची आवाज मर्यादा तपासणीसाठी 126 पथके नेमण्यात आली हाेती.मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही .गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ध्वनिपातळीत घट होऊनही ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीतही सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनि पातळीची नोंद झाली. त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकात सर्वाधिक ११८ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.

दहा प्रमुख चौकातील सरासरी ध्वनिपातळी
बेलबाग चौक – ९९.८
गणपती चौक – ९५.८
लिम्बराज चौक – ९८.१
कुंटे चौक – ९४.९
उंबऱ्या गणपती चौक – ९२.२
गोखले चौक – ९३.५
शेडगे विठोबा चौक – ९२.८
होळकर चौक – ९४
टिळक चौक – ९६.७
खंडूजी बाबा चौक – ९०.२

मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ कायम राखण्यात मात्र यश

2016 : 28 तास 30 मिनिट
2017 : 28 तास 05 मिनिट
2018 : 27 तास 15 मिनिट
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 40 मि.

पुणे शहरातील ०४ मुख्य मिरवणुक मार्गापैकी लक्ष्मी रोड १३१ टिळक रोड १७०, कुमठेकर रोड ५४, केळकर रोड ९७ असे एकुण ४५२ मंडळांनी अलका टॉकीज चौका मध्ये येवुन त्यांचे विसर्जन झालेले आहे. तसेच खडकी, लष्कर, येरवडा, कर्वेरोड, दत्तवाडी व शहराच्या इतर भागात शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये ३७६३ सार्वजनिक व १०१४६३७ घरगुती गणेश मंडळांनी विसर्जन केले आहे. गणेश विसर्जन मिरवणुका दिनांक १७/०९/२०२४ रोजी १०.१५ वा. सुरु झाल्या व दिनांक १८/०९/२०२४ रोजी सायं १५.०० वा. अलका चौक याठिकाणी विसर्जन मिरवणुक समाप्त झाली. (२८ तास ४५ मिनिटे)

विसर्जनाच्या दिवशी देखील पुण्यात दोन खून

पुणे- पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात पोलिस गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदाेबस्तात असताना, पुण्यात 2 खून झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत बावधन येथे एका तरुणाचा गळा धारदार हत्याराने कापण्यात आला असून पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये प्रेम प्रकरणातून एका महिलेचा खून करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन याठिकाणी तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी आहे. सदर ठिकाणी काम करत असलेला तरुण प्रवीण कुमार भाेला महतू (वय-26,मु.रा. बिहार) याचा काेणीतरी अज्ञात व्यक्तीने अनाेळखी कारणासाठी धारदार हत्याराने गळा कापून निघृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिस करत असून सदर हल्लेखाेराची ओळख पटवून त्याचा शाेध घेण्यात येत आहे.

तर, विश्रांतवाडी याठिकाणी घडलेल्या खुनाबाबत पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी माहिती दिली की, गाैरी देवळेकर (वय-25) हीचा तिचा जुना प्रियकर अमाेल दिलीप कांबळे (25,रा. रत्नागिरी) याने चाकूने वार करुन निघृण खून केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गाैरी देवळेकर ही मुळची रत्नागिरी येथील रहिवासी असून तिचे तीन वर्षापूर्वी बीड मधील पिंपळनेर येथील एका तरुणासाेबत प्रेमविवाह झाला हाेता. मागील दाेन महिन्यापूर्वी ती पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कळसवाडी याठिकाणी रहाण्यास आली हाेती. आराेपी अमाेल कांबळे यास तिने त्याच्याशी विवाह न करता दुसऱ्यासाेबत प्रेमविवाह केल्याचा राग हाेता त्यातून ती पुण्यात रहाण्यास आल्याचे समजातच ताे रत्नागिरी येथून पुण्यात आला. त्याने तिचा शाेध घेऊन तिच्याशी संर्पक करत, तिला मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता भेटून तिच्यावर थेट चाकूने हल्ला केला. या घटनेत ती जखमी झाली हाेती तिला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता तिचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आराेपीस अटक करण्यात आली आहे.

कात्रज चौक: दुचाकीवरील तरुणीस चिरडून टँकरसह चालक फरार

पुणे -कात्रज चाैकातून काेंढवा रस्त्याने व्हेस्पा दुचाकी (एमएच 12 युजी 8335) वरुन जात असलेल्या 24 वर्षीय तरुणीस कात्रज चाैकातील काेंढवा रस्त्याचे काॅर्नरवर कात्रज चाैकाकडून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात टँकरने भीषण धडक दिली. या अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यु झाला आहे. मानसी रमेश पवार (वय-24,रा. आंबेगाव पठार,पुणे) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी अज्ञात टँकर चालक विराेधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई विठ्ठल एकनाथ चिपाडे यांनी तक्रार दाखल केली आहे. मयत मानसी पवार ही कात्रज चाैकातून काेंढवा रस्त्याने तिच्या दुचाकीवर जात हाेती. त्यावेळी कात्रज चाैकाकडून भरधाव वेगात आलेल्या सदर अनाेळखी टँकरने तिच्या दुचाकीस पाठीमागून जाेरात धडक दिली. टँकर चालकाने अविचाराने, हयगवीने, रहादारीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवून सदर दुचाकीस धडक देऊन अपघातात जबर जखमी करुन तरुणीच्या मृत्युस कारणीभूत हाेऊन दुचाकीचे नुकसान केले आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहे.

विसर्जनाची धामधूम अन मॉलच्या गेटवर गोळीबार

पुणे : पुण्यामध्ये आणखी एका गोळीबाराची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7च्या रोडवर हा गोळीबार करण्यात आला आहे. पांढऱ्या गाडीतून येऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

एकीकडे महाराष्ट्रात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. लाडक्या बाप्पांना वाजत गाजत निरोप दिला जात आहे. ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन सुरू असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. गणपती विसर्जनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.पुणे-बंगळुरू हायवेलगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 7 जवळ संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. फिनिक्स मॉलमध्ये सध्या काम सुरू आहे, इकडे काम करणाऱ्या अविनाश नावाच्या कामगाराला एक व्यक्ती भेटायला आला. अविनाश या व्यक्तीला भेटून गेल्यानंतर त्याने हवेत गोळीबार केला. या आरोपीनं नेमका गोळीबार का केला? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सत्तेचा माज आल्याने थेट राहुल गांधींनाही धमक्या, संजय गायकवाड,अनिल बोंडे ला अटक का होत नाही ?खासदार वर्षा गायकवाड संतापल्या

जिथे राहुल गांधींबद्दल अशा धमक्या दिल्या जातात तिथे सामान्य माणूस किती दहशतीखाली असेल ?

मुंबई-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षातील नेते उघड उघड धमक्या देत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. नरेंद्र मोदींच्या दोन मंत्र्यांनी राहुल गांधींवर मुक्ताफळे उधळल्यानंतर आता राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधी यांच्याबद्दल खालची पातळी गाठली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या अनिल बोंडेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड व भाजपाचा खासदार अनिल बोंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे पण राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. विरोधी पक्षनेत्याला धमक्या देणे हा सत्तेचा माज आहे पण हा माज जास्तकाळ चालणार नाही. महायुतीचे सरकारच गुंडांना प्रोत्साहन देत आहे, अशा गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येते पण काँग्रेसची ती संस्कृती नाही, ही संस्कृती भाजपाची आहे व एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही त्याची लागण झालेली आहे. सुमारदर्जाचे हे लोक सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधींना धमक्या देत आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची या लोकांची औकात नाही. भाजपा शिवसेनेच्या या अपप्रवृत्तीला जनताही धडा शिकवेल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

राजकारणात वैचारिक मतभेद असतात, त्यावर टीका केली जाते पण थेट जीवे मारणे, अतिरेकी म्हणणे, जीभ कापा, चटके द्या, अशी भाषा करणे ही मानसिक विकृती आहे आणि ही विकृती भाजपामध्ये मागील १० वर्षात जास्तच वाढीस लागली आहे, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे त्यापेक्षा अत्यंत घातक आहे. खासदार राहुल गांधी यांना धमकी दिल्याबद्दल भाजपा व शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून साधा निषेधही केला नाही यातून अशा प्रवृत्तींना भाजपा शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसते असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी:विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

0

नवी दिल्ली-वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. अहवालानुसार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये वन नेशन वन इलेक्शनचे आश्वासन दिले होते.
15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधानांनी वन नेशन-वन इलेक्शनचा पुरस्कारही केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असल्याचे ते म्हणाले होते.
वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता. हा अहवाल 18 हजार 626 पानांचा आहे.
2 सप्टेंबर 2023 रोजी पॅनेलची स्थापना करण्यात आली. हा अहवाल भागधारक-तज्ञांशी चर्चा केल्यानंतर 191 दिवसांच्या संशोधनाचा परिणाम आहे. समितीने सर्व विधानसभांचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप

मयूरपंखी रथ ठरला भाविकांचे आकर्षण

पुणे :सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट आणि त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि भंडारा उधळत काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपविण्याचा आम्ही प्रयत्न केला.
या संपूर्ण उत्सवात पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार!
पुनीत बालन(विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)

मंगळवारी सकाळी अनंत चतुर्थीला आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते रंगारी बाप्पाची पुजा व आरती झाली. त्यांनतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाड्यातून मयुरपंखी रथातून बाप्पा महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. याठिकाणी प्रथा परंपरेनुसार टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक रथाला ओढणाऱ्या बैलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी रथासाठी बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला होता. 132 वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र रथ तयार करण्यात आला होता. सोनेरी आकर्षक असे मयुरपंखी रथ मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता. उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या रथाचे सारथ्य केले. साधारण पहाटे सव्वा तीनच्या सुमारास प्रत्यक्ष मिरवणुकिला सुरवात झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगरा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ मर्दानी खेळांच्या पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाराची उधळण केली जात होती. तर मिरवणूक मार्गावरील गणेश भक्तांकडून फुलांची उधळण केली जात होती. तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. सकाळी साडेसात वाजता टिळक चौकात मयूरपंखी रथ आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी साडे आठच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.