प्रशासकीय घटकांनी कर्तव्यदक्ष रहाणे ही काळाची संविधानिक गरज..!
पुणे दि १८ –
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दगाबाजांना घेऊन सरकार स्थापन करूनही, शिधा – ओवाळणी देऊनही, राज्याची जनता ‘महायुतीला’ साथ देत नसल्याचे सर्व्हे रिपोर्ट आल्याने ‘राज्यातील सत्ताघारी’ मानसिक संतुलन बिघडल्या सारखे वागत आहेत.देशाचे संविधानीक ‘विरोधीपक्ष नेते’ पदी असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विषयी, सत्ता पक्षाचे आमदार हिंसेला चिथावणी देणारी विधाने करत आहेत.हिंसेला चिथावणी देणाऱ्या व विकृतीने पछाडलेल्या आ संजय गायकवाड व अनिल बोंडे यांचे वर ऊच्च न्यायालयाने व पोलीस प्रशासनाने सुमोटो, अटकेची व गुन्हे दाखल करण्याची तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, केवळ ‘विरोधीपक्ष संपुष्टात आणण्या च्या राक्षसी लालसेने’ अनैतिक व असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आलेले ‘महायुतीचे त्रिकुट सरकार’ वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना सत्तेत सामील करून घेते व भ्रष्टाचारास राजमान्यता देते हाच शिव छत्रपतींच्या महाराष्ट्राचा उपमर्द आहे. व त्याच बरोबर (२०१९ मध्ये) भाजप विरोधी कौल दिलेल्यांना देखील, राजकीय व नैतिक मुल्यांना हरताळ फासून सत्तेची सुत्रे सोपवते ही राज्यातील जनतेशी केलेली प्रतारणा आहे..!
राज्याचे बेलगाम, घमेंडखोर व बेजबाबदार गृहमंत्री फडणवीस हेच जर विरोधकांना फोडून काढण्याची भाषा करत असतील व राज्यातील कायदा – सुव्यवस्था लयाला जाऊन दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असेल तर लोकशाहीचे दोन स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘प्रशासन व न्यायालय; या संस्थांनीच् सुमोटो कारवाई करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची गरज आहे.
जनतेच्या कररुपी पैशातुन पोसले जाणारे ‘लोकशाहीचे दोन स्तंभ’ कर्तव्यदक्ष राहणे ही प्रजासत्ताक देशातील संविघानिक गरज आहे. अन्यथा राज्यात निवडुन येणारे मविआ चे सरकार संबंधित घटकांची गंभीर दखल घेऊन, “महाराष्ट्राच्या जनतेप्रती कर्तव्यभिमूख न राहणाऱ्या” प्रशासकांवर कारवाई करेल असा ईशारा देखील काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात दिला..!