Home Blog Page 687

बदलापूर प्रकरणातील आरोपी ठार:पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार, प्रत्युत्तरात पोलिसांनीही केला गोळीबार

0

आरोपीने कशी हिसकावली बंदूक?

मुंबई–बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आधीच्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असतांना अक्षयने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आहे. या घटनेत अक्षय शिंदे यालाही गोळी लागली आहे. आरोपीने तीन राऊंड फायर केल्याची माहिती होती.

आज बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता शिंदे याने एका हवालदाराकडून शस्त्र हिसकावले आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी- वडेट्टीवार
या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत लिहिले की, अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..
बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही.

भ्रष्टाचाराचा अड्डा, पुणे पालिकेचा खड्डा..पथ विभाग प्रमुखांच्या कार्यालयात आप ची निदर्शने

पुणे- महापालिकेच्या पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात घुसून आज आम आदमी पार्टीने ‘भ्रष्टाचाराचा अड्डा, पुणे पालिकेचा खड्डा.. अशा घोषणा देत निदर्शने केली .

या संदर्भात आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत व शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी म्हटले आहे कि,’वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेला घाम फुटत नाही, अधिकारी कारवाई करत नाहीत. भाजप त्यांच्या लाडक्या ठेकेदार यांना पालिका अधिकारी घाबरत आहेत का?नवीन बनवलेले रस्ते एका वर्षात खराब होतात, बुजवलेले खड्डे 5 दिवसात खराब होत आहेत. किती मोठं भ्रष्टाचार भाजप हे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत घडवून आणत आहे याचा अंदाज पुणेकरांना आला आहे.आम आदमी पार्टी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संयम सुटला आहे आत्ता, हजारो वेळी फोन करून, पत्रव्यवहार, आंदोलन करून प्रश्न सुटत नाही.शेवटी पथ विभाग प्रमुख श्री अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठेवून तिला पुष्पहार अर्पण केले.सर्व खड्डे 5 दिवसात बुजवले नाहीत तर आम्ही पालिकेला टाळे ठोकू. दुर्दैव म्हणजे महामहील राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी पालिकेला खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. पुणे शहराची नाचक्की भाजप च्या कार्यकाळात जास्त होत आहे. पालिकेला जाग यावी म्हणून श्री अनिरुद्ध पावसकर यांची खुर्ची उचलून टेबल वर ठवली आणि हार फुल घातले. कारवाई झाली नाही तरी चप्पल चा हार घालू. असे महासचिव सतीश यादव यांनी म्हटले आहे.
यावेळी उपस्थित शहराध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महिला आघाडी अध्यक्ष भोसले, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित मस्के, निलेश वांजळे, शंकर पोटघन, सुभाष करांडे, विकास चव्हाण, कानिफनाथ घोरपडे, किरण साठे, अविनाश भाकरे, संतोष काळे उमेश बागडे, अभिजीत गायकवाड ऋषिकेश मारणे, गुणाजी मोरे, सुरेखा भोसले महिला आघाडी अध्यक्ष, शंकर थोरात आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते .

पुणे विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव:मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली मंजूरी

पुणे-पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शासनाला काही दिवसांपूर्वी दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

याबाबत मोहोळ म्हणाले, हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल, या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. त्यांनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे.या संदर्भातील प्रस्तार सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून चर्चा केली होती. आपल्या प्रस्तावानंतर काहीच दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ होतं. इतकंच नाही तर तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेल्याने लोहगाव आणि तुकोबाराय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार, प्रसारात तुकोबारायांनी मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबारायांचं नाव पुण्याच्या आंतराष्ट्रीय विमामतळाला देणे, हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे. आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. मला विश्वास आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल.

बँकेत कोट्यावधी तरीही ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास टाळाटाळ कशाला करता ?



काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल..!
सेवा निवृत्तां विषयी प्रशासनाची ऊतार वयात सहानभुतीच् हवी.
पुणे –

आयुष्यभराची सेवा केल्यावर ‘निवृत्ती नंतरच्या ऊतार वयांत मिळणाऱ्या रकमेवरच’ सेवा निवृत्त सेवकांना गुजरान करावी लागत असल्याने, सेवा निवृत्तां प्रती, त्यांचे ऊतार वयात प्रशासनाची सहानभुतीच् हवी असे उदगार ‘पुणे मनपा निवृत्त सेवक संघाच्या’ सुवर्ण महोत्सवी सभा व नुतन कार्यकारीणी निवड प्रसंगी, पीएमपीएमएल इंटक कामगार संघटनेचे सल्लागार व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी काढले.
ते पुढे म्हणाले की, महानगरपालीकेचे कोट्यावधी रुपये बँकेत (फीक्स्ड डिपॅा) ठेवीं मध्ये असुनही, निवृत्त सेवकांना’ ७ वा वेतन आयोग फरक, ग्रॅज्यूईटी, इ रक्कम ‘एक रकमी मिळणे आवश्यक असतांना’, विनाकारण ती देण्यास ‘मनपा प्रशासनाची’ टाळाटाळ व हप्त्याने देण्याचे धोरण का ? असा सवाल ही त्यांनी केला.
निवृत्ती नंतर सर्वच कामगारांना सरसकट पेन्शन मिळत नाही, मात्र ‘वेतन फरक व ग्रॅज्यूईटी’ इ. किमान वेळेत व तातडीने मिळणे आवश्यक आहे. निवृत्ती नंतर सेवकांना शारीरीक व्याधी, प्रवास, आजारपण इ करीता पैशांची चणचण भासते व पगाराचा मुख्य स्त्रोत बंद झाल्याने त्यांचे हाल होत आहेत, हे आपण जवळून पाहीले आहे. निवृत्ती नंतर ही सेवकांना हक्काच्या वेतन फरकाच्या रकमेसाठी ‘आंदोलन – ऊपोषण’ करावे लागणे हीच मुळात शरमेची व लाजिरवाणी बाब असल्याची प्रखर टिका त्यांनी या प्रसंगी केली.

३५ % सेवा निवृत्तांचे ‘वेतन फरकाची वाट पहात’ निधन झाल्याचेही माजी अघ्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
पुढील ३ वर्षां करीता माजी सहाय्यक आयुक्त जयंतबापू पवार (अध्यक्ष) व संजय मोरे (कार्याध्यक्ष), हणुमंत खलाटे (सरचिटणीस) यांचे नेतृत्वाखाली ११ जणांची कार्यकारीणीची निवड या वेळी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री भाई वैद्य यांनी दि. १३/१२/१९७४ रोजी केली. यामधे ‘पुणे महानगर पालिका, पी.एम.पी एम. एल. व शिक्षण मंडळ’ ‌यामधून निवृत्त झालेल्या सर्व वर्गाच्या सेवकांचा समावेश‌आहे.या संघटनेमार्फत निवृत्त झालेल्या सेवकांना लवकरात लवकर पेन्शन मिळवून देणे, ग्रॅज्युएटी, शिल्लक रजेचे पैसे तसेच वैद्यकीय बिले इ सेवा मिळवून देणे आणि निवृत्त सेवकांच्या वैयक्तिक वा सामूहिक अडचण असल्यास त्या प्राधान्याने सोडविणे, यासाठी संघटना कार्यरत असल्याचे अध्यक्ष जयंत बापू पवार यांनी सांगितले. पीएमपीएमएल प्रमाणेच मनपा व शिक्षण मंडळ निवृत्त सेवक प्रश्नी देखील गोपाळ तिवारी यांनी लक्ष घालून संघटनेस सहकार्य व मार्गदर्शन करण्याची मागणी देखील अघ्षक्ष जयंत बापू पवार यांनी केली.
या प्रसंगी, पीएमटी इंटक अध्यक्ष राजेंद्र खराडे, जेष्ठ नागरीक संघाचे सुभाष थोरवे, इंटक उपाध्यक्ष सागर कांबळे,
शिवसेनेचे सुधीर कुरुमकर, काँग्रेस ब्लॅाक अघ्यक्ष हेमंत राजभोज, हरीभाऊ महाले, राजा ओतारी, अशोक बालवे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, नरेश आवटे इ उपस्थित होते. सुत्र संचालन सरचिटणीस हणमंत खलाटे यांनी केले. संजीव मोरे, खराडे, कदम इ ची भाषणे झाली.
या प्रसंगी “निवृत्त सेवकांच्या गुणवंत पाल्यांचा – विद्यार्थ्याचा, संधटनेचे वतीने गौरव पदक, प्रशस्ती पत्र व रोख रक्कम देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव – सत्कार करण्यात आला”
पुर्वीच्या कार्यकारीणीत सरचिटणीस पदाची धूरी संभाळणारे जयंत बापू पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदाचे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष असल्याने संघाची स्वता:ची वास्तू करणे, निवृत्तांसाठी विवीध उपक्रम राबविणार असल्याचे आणि सेवकांना ७ व्या वेतन आयोगाचे शिल्लक असलेले हप्ते एकरकमी मिळवण्याचे प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
“पुणे मनपा निवृत्त सेवक संघाचा” राज्यात चांगल्या कामासाठी नावलौकिक असल्याचे ही माजी अघ्यक्ष राजे भोसले यांनी सांगितले.

पुढील ३ वर्षा करीता नुतन कार्यकारीणी पुढील प्रमाणे ..
सर्वश्री जयंत बापू पवार (अध्यक्ष), संजीव मोरे (कार्याध्यक्ष); हनुमंत खलाटे (जनरल सेक्रेटरी); उत्तम कदम(खजिनदार); मा.ज्ञानोबा नवले (सेक्रेटरी); मा.कुसुम चव्हाण (इंटरनल ऑडीटर); मा.भारत धावारे (सेक्रेटरी); शिवाजी जाधव (सेक्रेटरी); सिताराम कांबळे (सेक्रेटरी ); मा.दीपक पाथरकर (सदस्य); मा.बाबुराव गावंडे (सदस्य); मा.वंदना जाधव (सदस्य); मा.प्रविण बारवकर (सदस्य); दत्तात्रय कुरणे (निमंत्रित) ; बाळासाहेब तनपुरे (निमंत्रित); सदाशिव चिल्लाळ (निमंत्रित); बाळकृष्ण आंग्रे (सल्लागार); हरिभाऊ जगताप (सल्लागार); गोविंद दारविटकर (सल्लागार)

आतिशींनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी सोडली:म्हणाल्या- भरताने जसे सिंहासनावर पादुका ठेवून राज्य केले, त्याप्रमाणेच दिल्लीचा कारभार बघेन

नवी दिल्ली- दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी (23 सप्टेंबर) पदभार स्वीकारला. आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्या मुख्यमंत्री कार्यालयात गेल्या आणि सर्व औपचारिकता पूर्ण केली. यादरम्यान आतिशी यांनी सीएम ऑफिसमध्ये रिकामी खुर्ची सोडली आणि स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसल्या.आतिशी म्हणाल्या- त्यांनी ही रिकामी खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सोडली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर दिल्लीची जनता केजरीवाल यांना पुन्हा या खुर्चीवर बसवेल. तोपर्यंत ही खुर्ची याच खोलीत राहून केजरीवालजींची वाट बघेन.दिल्ली मद्य धोरण प्रकरणात 13 सप्टेंबर रोजी जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 21 सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या.

मी भरताप्रमाणे 4 महिने राज्य करेन: आज मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आज माझ्या मनात तेच दुःख आहे जे प्रभू श्री राम 14 वर्षांच्या वनवासात गेल्यावर भरताच्या मनात होते. ज्याप्रमाणे भरतजींनी 14 वर्षे प्रभू श्री रामाच्या सिंहासनावर पादुका ठेवून अयोध्येवर राज्य केले. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यांसाठी मी दिल्ली सरकार चालवणार आहे.
केजरीवालांमध्ये रामासारखी मर्यादा: एक वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्री राम यांनी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. म्हणूनच आपण प्रभू श्री रामाला मर्याद पुरुषोत्तम म्हणतो. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी मर्यादा आणि नैतिकतेचे उदाहरण आहे. नेमक्या याच पद्धतीने अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणात शिष्टाचार आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला आहे.

भारत सर्वधर्मियांचा देश, राणे पुत्राची ही कोणत्या प्रकारची भाषा? मी कोणत्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशी झालेली पाहिली नाही

रत्नागिरी:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम वादात राहणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला. पण त्यांचे चिरंजीव हल्ली ज्या पद्धतीने बोलतात, ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज या लोकांची भाषा कशा प्रकारची आहे ते पाहा, भारत सर्वधर्मियांचा देश आहे. येथे हिंदू, शिख व मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात. एका केंद्रीय मंत्र्यांची मुले मुस्लीम समाजाविषयी ज्या पद्धतीने जाहीर गरळ ओकतात, पण त्यानंतरही त्यांना आवर घातली जात नाही. उलट टीव्हीवर त्यांनी बोलावे याची काळजी घेतली जाते. याचा अर्थ सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. पण जेव्हा सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते, तेव्हा जनता एक होऊन त्यांची जागा दाखवते,असे ते म्हणाले.

शरद पवार यांची सोमवारी रत्नागिरीच्या चिपळून येथे सभा झाली. या सभेत बोलताना पवारांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या वादग्रस्त विधाने करणाऱ्या मुलांचा विशेषतः भाजप आमदार नीतेश राणे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, सत्ता येते व जाते. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचे असतात. आणि सत्ता नसेल तेव्हा चिंता करायची नसते. काम करत राहायचे असते. संयम ठेवायचा असतो.

मी स्वतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. माझ्याही घरात एक मुलगी आहे. देशाच्या संसदेत चांगले काम करण्याचा तिचा नावलौकीक आहे. विनम्रपणा हा तिचा लौकीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला. या मुख्यमंत्र्याने माझ्यासोबतही काम केले. पण त्यावर मला काही बोलायचे नाही. पण त्यांचे चिरंजीव सध्या ज्या पद्धतीने बोलतात, ते पाहता मी महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा कशा प्रकराची आहे? समाजात सर्व जाती धर्माचे लोक राहतात हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

शिवाजी महाराजांचा पुतळाही कोसळतो :म्हणजे भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला पोहोचला हे दिसते

शरद पवार पुढे म्हणाले, आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवरही. सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. तो पडला. राज्य सरकारने सांगितले वाऱ्यामुळे पुतळा पडला. मुंबईला शिवाजी पार्कात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इंडिया गेटजवळ पुतळा आहे. हे पुतळे 80 वर्षापूर्वीचे आहेत. समुद्राजवळ आहेत. भरपूर वारा आहे. त्या पुतळ्यांना कधी धक्का बसला नाही. आणि सिंधुदुर्गातील पुतळा पडतो. वाऱ्यामुळे? काय चाललंय हे. पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला. महाराजांचा पुतळा आणि त्यातही पैसे खाणे सोडत नाहीत. कसे लोक आहेत. महाराजांनी मावळ्यांना आदेश दिला की शेतातून जात असाल तर पिकाच्या देठाला हात लागता कामा नये. सर्वांना सोबत घेऊन जाण्यास सांगणारे शिवाजी महाराज आणि त्यांचा पुतळा. भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला पोहोचला हे यातून दिसून येते, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी पुण्यात एका खडड्यात पडलेल्या ट्रकच्या घटनेवरही भाष्य केले. पुण्यात 4 दिवसांपूर्वी एक अपघात झाला. पुणे महापालिकेचा एक ट्रक रस्त्याने जात होता. तो अचानक एका खड्ड्यात पडला. ही भ्रष्टाचाराची घटना आहे. लोकांना भ्रष्टाचार कुठे व किती करावा याची काहीही मर्यादा राहिली नाही. याची किंमत सत्ताधाऱ्यांना चुकवावी लागेल. मी गाड्याने प्रवास करतो हे मला माहिती आहे. मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून या रस्त्याची माहिती देणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे – डॉ. मोरेश्वर सुखदेवे 

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आज आपल्याकडे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. समाजातील खालच्या स्तरातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा माफक दरात मिळणे ही काळाची गरज आहे. आरोग्य विषयक सोई सुविधा सामान्य नागरिकाच्या आवाक्यात असतील तरच सुदृढ समाज निर्माण होईल असे मत नाबार्ड चे माजी महाप्रबंधाक, राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित, पुणेचे अध्यक्ष डॉ. मोरेश्वर सुखदेवे यांनी व्यक्त केले.

बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित, पुणे च्या अधीमंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे इंटरनॅशनल स्कूल, विद्यानगर येथे संपन्न झाली यावेळी डॉ. सुखदेवे बोलत होते. याप्रसंगी ससुन रुग्णालय,बी. जे. मेडिकल कॉलेज चे माजी प्राध्यापक तथा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. टी. गायकवाड, सहकार विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, इंजि. पोपटराव वाघमारे, डॉ. मंगल आयरेकर, डॉ. उज्वला बेंडे, इंजि. अनिलकुमार सुर्यवंशी, राजाभाऊ काळबांडे, प्रा. गौतम मगरे , दीपक म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. मोरेश्वर सुखदेवे म्हणाले, बोधिसत्व सहकारी रुग्णालय हे राज्यातील पहिले सहकारी रुग्णालय आहे. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्यसेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. आज आमचे 1900 सभासद आहेत. आज एक ओपीडी, एक रुग्णालय सुरू केले आहे. भविष्यात एक सुसज्ज रुग्णालय स्व मालकीच्या इमारतीत उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, लोकसहभागातून उभा राहणारा हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी करत भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मानस असल्याचेही डॉ. सुखदेवे यांनी सांगितले.

डॉ. पी. टी. गायकवाड म्हणाले, सहकारी तत्वावरील रुग्णालय ही वेगळी संकल्पना घेऊन आम्ही तीन वर्षे सामाजिक कार्य करत आहोत, टिंगरे नगर येथील ओपीडी आणि दापोडी येथे 30 खटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील दोन महिन्यापूर्वी सुरू केले आहे, याला रुग्णांचा चांगला फिडबॅक मिळत आहे, विविध आजारांवर माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि उपकरणे आमच्याकडे उपलब्ध आहेत याचा सामान्य, गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.

डॉ. आनंद जोगदंड म्हणाले, राज्यातील पहिल्या सहकारी रुग्णालयांसाठी आम्ही बघितलेले स्वप्न आता आकार घेत आहे. एक ओपीडी, एक रुग्णालय यानंतर आता आम्हाला म्हाडाच्या वतीने एक जागा उपलब्ध झाली असून त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या जमिनीची खरेदी आणि बांधकाम यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी सभासदांनी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन डॉ. जोगदंड यांनी केले.

दरम्यान, सभेमध्ये 2023 – 24 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदास मान्यता आणि 2024 – 25 चे अंदाजपत्र मंजूर करण्यात आले.

पुण्यातील दिल्ली पब्लिक स्कूल आणि औरंगाबादमधील स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील TCS InQuizitive 2024 स्पर्धा जिंकली

12 शहरांमधील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी TCS इनक्विझिटिव्हचे आयोजन केले जात आहे. देशातील हुशार मनांना, मेंदूंना बौद्धिक खाद्य पुरवणे आणि त्यांचे तंत्रज्ञान कौशल्य वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे.

पुणे, 23 सप्टेंबर, 2024: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) ने त्यांच्या प्रमुख वार्षिक प्रश्नमंजुषा, TCS InQuizitive च्या पुण्यात रंगलेल्या कार्यक्रमात 35 शाळांमधील 130 हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग अनुभवला. इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला होता. या कार्यक्रमात शहरातील मुलांची बौद्धिक क्षमता लक्षात आली.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विभागीय अंतिम फेरीत प्रश्नोत्तराच्या पाच फेऱ्या रंगल्या. यात दिल्ली पब्लिक स्कूल (मोहम्मद वाडी), पुणे येथील 15 वर्षीय जिनांश शाह विजेता ठरला. तर औरंगाबादच्या स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलच्या 14 वर्षीय मोहम्मद अरीबने उपविजेतेपद पटकावले. हे दोन्ही विद्यार्थी आता राष्ट्रीय फायनलमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करतील आणि देशभरातील अन्य 11 प्रादेशिक फेऱ्यांमधील चॅम्पियनशी स्पर्धा करतील. सन्माननीय अतिथी डॉ. सुनील एस भागवत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणेचे संचालक आणि सचिन रत्नपारखी, VP आणि क्षेत्रीय प्रमुख, TCS पुणे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

डॉसुनील एसभागवतइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चपुणेचे संचालक म्हणाले, “इनक्विझिटिव्ह सारख्या प्रतिभा स्पर्धा केवळ विजेत्यांना ओळखण्यासाठी नव्हे तर सर्व सहभागींना प्रेरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेतव्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने प्रतिभावंतांना त्यांचे कौशल्य दाखवण्यास वाव मिळतोतसेच आपण याला प्रोत्साहन देत राहिलोतर भारताचे भविष्य गेल्या 75 वर्षांपेक्षा अधिक उजळ होईल.

सचिन रत्नपारखी, VP आणि क्षेत्रीय प्रमुख, TCS पुणे म्हणाले, “तरुणांच्या मनात जिज्ञासा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना सखोल विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी अशा इनक्विझिटिव्ह स्पर्धा विद्यार्थ्यांची प्रतिभा अनलॉक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहेटेक लर्निंगचे गेमिफाय आणि लोकशाहीकरण करून, TCS पुढच्या पिढीला नवनिर्मितीसाठी सक्षम बनवते.

टीसीएस इनक्विझिटिव्ह हा एक नावीन्यपूर्ण शिक्षण उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा, अभियांत्रिकी आणि कला यांसारख्या क्षेत्रातील कुतूहल आणि जागरूकता वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यात सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलला द्वितीय पुरस्कार

२०२१-२३ या काळात स्कूलची सुवर्ण कामगिरी

पुणे, २३ सप्टेंबरः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल ने वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत सलग दोन वर्षे जिल्हा शालेय स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्कूलच्या खेळाडूंनी हा पुरस्कार पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते स्विकारला.
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि चॉईस कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार व शिवाजी कोळी उपस्थित होते.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा प्रशिक्षकांनी स्कूलच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतले. तसेच शारीरिक व मानसिक रूपाने मजबूत केले. त्यांच्या मनात विजयाचे बीज पेरले. त्यामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरीय विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन सुवर्ण, रजत आणि रौप्य पदकावर नाव कोरले. परिणाम स्वरूप जिल्हास्तरावर सर्वाधिक पदके घेऊन द्वितीय स्थान प्राप्त केले.
स्कूल ने केलेल्या या पराक्रमाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्रिन्सिपल संगीता राऊतजी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

– आमदार सिद्धार्थ शिरोळे व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ
– गड किल्ले, जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या प्रचारासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२४ : जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाच्या वतीने नुकतेच ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालय येथून सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेस आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. या मॅरेथॅान स्पर्धेसाठी शिरोळे यांनी आपल्या आमदार निेधीतून १० लाख रूपये दिले आहेत.

पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, दिनेश काळे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ सुहास दिवसे यांनी सांगितले.

डॉ. दिवसे पुढे म्हणाले, “ आज ३५० वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आपणा सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचा ठसा उमटलेला आहे. युनोस्कोने राज्यातील ११ किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड हे तीन किल्ले आहेत. हे सर्व गड किल्ले आपणास वारसा नामंकनात आणायचे आहेत.”

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत. त्यांची ओळख जगाला व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. किल्ल्यांचे महत्त्व, गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा आपण कसा जपत आहोत हे युनोस्को समोर आपल्याला प्रदर्शित करायचे आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीनही किल्ल्यांचे जीएसआय कोड द्वारे मॅपिंग स्टोरी तयार केली आहे अशी माहितीही डॉ दिवसे यांनी दिली.

आमदार शिरोळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील ११ गड किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत याचा मनापासून आनंद  आहे. पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

स्पर्धेसोबतच यावेळी दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरकडून आपल्या विस्तार योजनेला पाठबळ देण्यासाठी ड्रेजरची डिलिव्हरी

मुंबई, २३ सप्टेंबर २०२४: जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी व्यावसायिक पोर्ट ऑपरेटर जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (“कंपनी”)ने नेदरलँड्समधील IHC ड्रेजिंग कडून एक नवीन, अत्याधुनिक ड्रेजरची डिलिव्हरी घेतली आहे.

दुसऱ्या ड्रेजर मधील गुंतवणूक कंपनीच्या आर्थिक वर्ष २०३० विकास योजनेशी सुसंगत असून त्याअंतर्गत क्षमता १७० दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) वरून ४०० MTPA पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा नवीन ड्रेजर अनेक बंदरांवर कंपनीच्या ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड विस्तार प्रकल्पांना मदत करेल.

Infra pic_23

जुनी पेन्शन  लागू करा, अन्यथा आमरण उपोषणाचा  माजी सैनिकांचा इशारा

पुणे:

राज्य शासनात कार्यरत माजी सैनिकांना  ‘जुनी पेन्शन योजना सुरू करा’ या मागणीसाठी   शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सैनिक कल्याण विभाग  संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत  मुख्यमंत्री  आणि  अपर मुख्य सचिव  सामान्य प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले. माजी सैनिकांची मागणी पूर्ण न झाल्यास  आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १२  वाजता घोरपडी येथील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.
 शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बाजीराव देशमुख ,सरचिटणीस बाळासाहेब जाधव, पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, सैनिक कल्याण विभाग उपाध्यक्ष संजय मोहिते, राज्य सल्लागार सुरेश माने, दिलावर शादीवान, विलास घाडगे, विभागीय सहसचिव संजय बोराटे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा माजी चिटणीस दीपक पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासनचे संचालक कर्नल(नि) दीपक ठोंगे  तसेच उपसंचालक मेजर(नि) शिल्पा खोपकर, लेफ्टनंट कर्नल (नि) हांगे, मेजर (नि) कापले यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन सविस्तर मुद्दे मांडले. २००५ पूर्वी राज्य शासनात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ च्या योजनेनुसार  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील २९००  माजी सैनिक मागील पाच वर्षापासून लढा देत आहेत .त्यानंतर सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने  अखेर  माजी सैनिक  संघटनेनं आंदोलनाचा हा निर्णय घेतला. 

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; चाकण परिसरात तीन तास वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. २३ सप्टेंबर २०२४: महापारेषण कंपनीच्या आळेफाटा २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण परिसरातील १२ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. २३) सकाळी तीन तास खंडित होता. मात्र महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून चिंचवड २२० केव्ही उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, चाकण परिसरातील वाकी, बिरदवडी, रोहकल, कडाची वाडी, रासे, रहाणुबाई मळा, मेदनकरवाडी या परिसराला महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन २२ केव्ही या दोन वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र महापारेषणच्या आळेफाटा २२० केव्ही उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये (आयसीटी) बिघाड झाल्यामुळे सोमवारी (दि. २३) सकाळी ८.१५ वाजता या दोन्ही वीजवाहिन्यांवरील सुमारे १२ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

तथापि हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे लक्षात येताच महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये सकाळी ११.१५ वाजता चिंचवड २२० केव्ही उपकेंद्रातील पर्यायी व्यवस्थेतून महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, महापारेषणकडून नादुरुस्त झालेले इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

प्रो कबड्डी लीग 2024 साठी स्टार स्पोर्ट्सच्या हाय-ऑक्टेन मोहिमेमध्येरितेश देशमुख दाखविणार कबड्डीचा थरार

मुंबई: स्टार स्पोर्ट्स हे प्रो कबड्डी लीगचे (पीकेएल) अधिकृत प्रसारक आहेत. स्टार स्पोर्ट्सने आगामी पीकेएल सीझन 11 साठी पहिल्या ब्रँडिंग जाहिरातींचे अनावरण केले असून, त्यात बॉलीवूड सुपरस्टार रितेश देशमुख कबड्डीचा थरार दाखविणार आहे. 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणाऱ्या स्पर्धेसह हे ॲक्शन-पॅक कॅम्पेन दर्शकांना जंगलाच्या हृदयाचा ठाव देते. महाकाय दृश्य, शक्ती आणि अथक धैर्य याद्वारे कबड्डीची तीव्रता जिवंत केली जाते. हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ यांसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारे कॅम्पेन पीकेएल हंगामातील सर्वात रोमांचकारी ठरेल, याची प्रचिती देते.
Link to watch the promo feat. Riteish Deshmukh – YouTube
प्रोमोमध्ये रितेश एकाकी योद्धा म्हणून येतो, धोकादायक लोकांना हेरताना वाघाची चपळता दाखवितो. हीच तीव्र अंतःप्रेरण, वेग आणि मानसिक कणखरपणाचे एक ज्वलंत रूपक, जे कबड्डी चॅम्पियन्सची व्याख्या करते. हा लघुपट कबड्डीतील धडधड अत्यंत योग्यप्रमाणे अधोरेखीत करतो. दर्शकांना अशा जगाकडे आकर्षित करतो, जिथे प्रत्येक चाल ही एक लढाई असते आणि प्रत्येक निर्णय हा विजय व पराभव यातील फरक असू शकतो.
कथनाला अधोरेखित करणाऱ्या उद्बोधक गाण्यासोबत एकत्रितपणे आकर्षक व्हिज्युअल, खेळाच्या केंद्रस्थानी असलेली शक्ती आणि रणनीती हायलाइट करते, त्यातून सीझन 11 ची अपेक्षा नवीन उंचीवर जाते.
रितेश देशमुख म्हणाला, “कबड्डी हा एक खेळ आहे, जो आपल्या संस्कृतीच्या जडणघडणीत रुजलेला आहे आणि या मोहिमेचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे. लघुपटातील तीव्रता आणि अभिमान कबड्डीपटूंच्या योद्धा भावनेला प्रतिबिंबित करतो – ते तीव्र, निर्भय आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. पीकेएल हा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. मला खात्री आहे की, हा हंगाम त्या उत्साहाला आणखी एका पातळीवर नेईल.”
प्रेक्षकांना या खेळाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या उद्दिष्टाने, मशाल स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सने “डिफाइन युअर टीम्स सुपरपॉवर” ही मोहीम सुरू केली, ज्यामध्ये चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाच्या सुपरपॉवर्ससाठी मतदान करण्याचे निमंत्रण दिले गेले. या मोहिमेने पीकेएल ११ च्या टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कॅम्पेनला आकार दिला. या उपक्रमाला १.०५ लाख मतं मिळाली असून, संबंधित पोस्ट्सना १.१२ दशलक्ष व्ह्यूज, १.४५ दशलक्ष रीच आणि १.१९ लाख इंटरअॅक्शन्स मिळाले. महाराष्ट्रातील चाहत्यांनी निवडलेल्या तीन प्रमुख गुणधर्म – आश्चर्य, चपळता आणि संतुलन – रितेश देशमुख यांच्या प्रमोशन फिल्ममध्ये दाखवले आहेत, जे महाराष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. पीकेएल हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी ही पोल्स अधिकाधिक वाढवली जातील.
यावेळी पीकेएल तीन-शहरांच्या फॉर्मेटमध्ये परतणार आहे. 2024 ची आवृत्ती हैदराबादमधील GMC बालयोगी क्रीडा संकुलात 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सुरू होईल. त्यानंतर, ती दुसऱ्या टप्प्यासाठी नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये जाईल, 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 1 डिसेंबरला संपेल. तिसरा टप्पा येथे सुरू होईल 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये. पवन सेहरावत, परदीप नरवाल आणि फझेल अत्राचली यांसारख्या स्टार खेळाडूंसह मॅटवर वर्चस्व गाजविण्यासाठी PKL 11 कबड्डी या दोघांचेही लक्ष वेधून घेईल, याची खात्री देते. चाहते आणि नवीन दर्शक सारखेच.
तेलुगू टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स या सीझन ओपनरमध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. या थरारक हंगामाची जबरदस्त सुरुवात होईल. रात्रीचा दुसरा सामना अधिक आतषबाजी करायला लावणार आहे. जसे घरी डायनॅमिकसह हॉर्न लॉक करते दबंग दिल्ली के.सी. संपूर्ण भारतातील चाहते नाटक, तीव्रता आणि नॉन-स्टॉप ॲक्शनने भरलेल्या सीझनची तयारी करू शकतात, हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने + हॉटस्टारवर थेट पाहू शकतात!
१८ ऑक्टोबर 2024 पासून प्रो कबड्डी लीग सीझन 11 पहा,
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर थेट पाहू शकता

विधानसभा निवडणुकीसाठीची काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न.

मुंबई, दि, २३ सप्टेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, असा घणाघाती हल्ला प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धनोरकर, खा. नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली. वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बि, बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही. भाजपा शेतकरी विरोधी आहे.
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे.
असेही पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये जो रोष होता तो त्यातून व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. त्यासाठी ज्या साधनांचा त्यांनी वापर केला ते जनता ओळखून आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व मविआ सत्तेवर नक्की येईल याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर तोफ डागत म्हणले की, महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे व झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्ष दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आढावा बैठकीवेळी विदर्भातून मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.