मुंबई, २३ सप्टेंबर २०२४: जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी व्यावसायिक पोर्ट ऑपरेटर जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (“कंपनी”)ने नेदरलँड्समधील IHC ड्रेजिंग कडून एक नवीन, अत्याधुनिक ड्रेजरची डिलिव्हरी घेतली आहे.
दुसऱ्या ड्रेजर मधील गुंतवणूक कंपनीच्या आर्थिक वर्ष २०३० विकास योजनेशी सुसंगत असून त्याअंतर्गत क्षमता १७० दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) वरून ४०० MTPA पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा नवीन ड्रेजर अनेक बंदरांवर कंपनीच्या ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड विस्तार प्रकल्पांना मदत करेल.