काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल..!
सेवा निवृत्तां विषयी प्रशासनाची ऊतार वयात सहानभुतीच् हवी.
पुणे –
आयुष्यभराची सेवा केल्यावर ‘निवृत्ती नंतरच्या ऊतार वयांत मिळणाऱ्या रकमेवरच’ सेवा निवृत्त सेवकांना गुजरान करावी लागत असल्याने, सेवा निवृत्तां प्रती, त्यांचे ऊतार वयात प्रशासनाची सहानभुतीच् हवी असे उदगार ‘पुणे मनपा निवृत्त सेवक संघाच्या’ सुवर्ण महोत्सवी सभा व नुतन कार्यकारीणी निवड प्रसंगी, पीएमपीएमएल इंटक कामगार संघटनेचे सल्लागार व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी काढले.
ते पुढे म्हणाले की, महानगरपालीकेचे कोट्यावधी रुपये बँकेत (फीक्स्ड डिपॅा) ठेवीं मध्ये असुनही, निवृत्त सेवकांना’ ७ वा वेतन आयोग फरक, ग्रॅज्यूईटी, इ रक्कम ‘एक रकमी मिळणे आवश्यक असतांना’, विनाकारण ती देण्यास ‘मनपा प्रशासनाची’ टाळाटाळ व हप्त्याने देण्याचे धोरण का ? असा सवाल ही त्यांनी केला.
निवृत्ती नंतर सर्वच कामगारांना सरसकट पेन्शन मिळत नाही, मात्र ‘वेतन फरक व ग्रॅज्यूईटी’ इ. किमान वेळेत व तातडीने मिळणे आवश्यक आहे. निवृत्ती नंतर सेवकांना शारीरीक व्याधी, प्रवास, आजारपण इ करीता पैशांची चणचण भासते व पगाराचा मुख्य स्त्रोत बंद झाल्याने त्यांचे हाल होत आहेत, हे आपण जवळून पाहीले आहे. निवृत्ती नंतर ही सेवकांना हक्काच्या वेतन फरकाच्या रकमेसाठी ‘आंदोलन – ऊपोषण’ करावे लागणे हीच मुळात शरमेची व लाजिरवाणी बाब असल्याची प्रखर टिका त्यांनी या प्रसंगी केली.
३५ % सेवा निवृत्तांचे ‘वेतन फरकाची वाट पहात’ निधन झाल्याचेही माजी अघ्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
पुढील ३ वर्षां करीता माजी सहाय्यक आयुक्त जयंतबापू पवार (अध्यक्ष) व संजय मोरे (कार्याध्यक्ष), हणुमंत खलाटे (सरचिटणीस) यांचे नेतृत्वाखाली ११ जणांची कार्यकारीणीची निवड या वेळी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री भाई वैद्य यांनी दि. १३/१२/१९७४ रोजी केली. यामधे ‘पुणे महानगर पालिका, पी.एम.पी एम. एल. व शिक्षण मंडळ’ यामधून निवृत्त झालेल्या सर्व वर्गाच्या सेवकांचा समावेशआहे.या संघटनेमार्फत निवृत्त झालेल्या सेवकांना लवकरात लवकर पेन्शन मिळवून देणे, ग्रॅज्युएटी, शिल्लक रजेचे पैसे तसेच वैद्यकीय बिले इ सेवा मिळवून देणे आणि निवृत्त सेवकांच्या वैयक्तिक वा सामूहिक अडचण असल्यास त्या प्राधान्याने सोडविणे, यासाठी संघटना कार्यरत असल्याचे अध्यक्ष जयंत बापू पवार यांनी सांगितले. पीएमपीएमएल प्रमाणेच मनपा व शिक्षण मंडळ निवृत्त सेवक प्रश्नी देखील गोपाळ तिवारी यांनी लक्ष घालून संघटनेस सहकार्य व मार्गदर्शन करण्याची मागणी देखील अघ्षक्ष जयंत बापू पवार यांनी केली.
या प्रसंगी, पीएमटी इंटक अध्यक्ष राजेंद्र खराडे, जेष्ठ नागरीक संघाचे सुभाष थोरवे, इंटक उपाध्यक्ष सागर कांबळे,
शिवसेनेचे सुधीर कुरुमकर, काँग्रेस ब्लॅाक अघ्यक्ष हेमंत राजभोज, हरीभाऊ महाले, राजा ओतारी, अशोक बालवे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, नरेश आवटे इ उपस्थित होते. सुत्र संचालन सरचिटणीस हणमंत खलाटे यांनी केले. संजीव मोरे, खराडे, कदम इ ची भाषणे झाली.
या प्रसंगी “निवृत्त सेवकांच्या गुणवंत पाल्यांचा – विद्यार्थ्याचा, संधटनेचे वतीने गौरव पदक, प्रशस्ती पत्र व रोख रक्कम देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव – सत्कार करण्यात आला”
पुर्वीच्या कार्यकारीणीत सरचिटणीस पदाची धूरी संभाळणारे जयंत बापू पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यंदाचे ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्ष असल्याने संघाची स्वता:ची वास्तू करणे, निवृत्तांसाठी विवीध उपक्रम राबविणार असल्याचे आणि सेवकांना ७ व्या वेतन आयोगाचे शिल्लक असलेले हप्ते एकरकमी मिळवण्याचे प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
“पुणे मनपा निवृत्त सेवक संघाचा” राज्यात चांगल्या कामासाठी नावलौकिक असल्याचे ही माजी अघ्यक्ष राजे भोसले यांनी सांगितले.
पुढील ३ वर्षा करीता नुतन कार्यकारीणी पुढील प्रमाणे ..
सर्वश्री जयंत बापू पवार (अध्यक्ष), संजीव मोरे (कार्याध्यक्ष); हनुमंत खलाटे (जनरल सेक्रेटरी); उत्तम कदम(खजिनदार); मा.ज्ञानोबा नवले (सेक्रेटरी); मा.कुसुम चव्हाण (इंटरनल ऑडीटर); मा.भारत धावारे (सेक्रेटरी); शिवाजी जाधव (सेक्रेटरी); सिताराम कांबळे (सेक्रेटरी ); मा.दीपक पाथरकर (सदस्य); मा.बाबुराव गावंडे (सदस्य); मा.वंदना जाधव (सदस्य); मा.प्रविण बारवकर (सदस्य); दत्तात्रय कुरणे (निमंत्रित) ; बाळासाहेब तनपुरे (निमंत्रित); सदाशिव चिल्लाळ (निमंत्रित); बाळकृष्ण आंग्रे (सल्लागार); हरिभाऊ जगताप (सल्लागार); गोविंद दारविटकर (सल्लागार)