२०२१-२३ या काळात स्कूलची सुवर्ण कामगिरी
पुणे, २३ सप्टेंबरः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल ने वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत सलग दोन वर्षे जिल्हा शालेय स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्कूलच्या खेळाडूंनी हा पुरस्कार पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते स्विकारला.
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि चॉईस कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार व शिवाजी कोळी उपस्थित होते.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा प्रशिक्षकांनी स्कूलच्या खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतले. तसेच शारीरिक व मानसिक रूपाने मजबूत केले. त्यांच्या मनात विजयाचे बीज पेरले. त्यामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरीय विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन सुवर्ण, रजत आणि रौप्य पदकावर नाव कोरले. परिणाम स्वरूप जिल्हास्तरावर सर्वाधिक पदके घेऊन द्वितीय स्थान प्राप्त केले.
स्कूल ने केलेल्या या पराक्रमाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्रिन्सिपल संगीता राऊतजी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.