आरोपीने कशी हिसकावली बंदूक?
मुंबई–बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आधीच्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असतांना अक्षयने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आहे. या घटनेत अक्षय शिंदे यालाही गोळी लागली आहे. आरोपीने तीन राऊंड फायर केल्याची माहिती होती.
आज बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता शिंदे याने एका हवालदाराकडून शस्त्र हिसकावले आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी- वडेट्टीवार
या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ट्वीट करत लिहिले की, अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..
बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही.