Home Blog Page 679

जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार,आयजी च्या जीवावर बायजी उदार-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – अर्धवट स्थितीत असलेल्या मेट्रोच्या उदघाटनाच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपचा प्रचार सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाच्या जोरावर केला जात आहे, हा प्रकार म्हणजे, आयजी च्या जीवावर बायजी उदार अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) केली.

मेट्रो रेल्वे च्या प्रकल्पाची कामे अर्धवट स्थितीत आहेछ. पादचारी पूल, मेट्रो स्टेशनला जोडणारी वाहतूक व्यवस्था आदी अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. तरीही या प्रकल्पाचे पाचव्यांदा उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार होते. या करीता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार होती, त्या सभेच्या मांडव तसेच अन्य तयारीसाठी आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींसाठी सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. हा पैसा भाजप देणार आहे का? असा सवाल मोहन जोशी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारला आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, पावसामुळे मोदी यांची सभा रद्द करण्यात येत आहे. तर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणतात की, वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांना त्रास होऊ नये या करीता सभा रद्द केली. ही कारणे विसंगत आणि पुणेकरांची दिशाभूल करणारी आहेत. गेल्यावर्षी १ऑगस्ट रोजी पंतप्रधान पुण्यात आले तेव्हा शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी भागांमधील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मोहोळ यांना ते आठवत नाही का? अशीही विचारणा मोहन जोशी यांनी केली आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्प ही काँग्रेसची योजना. या करीता २०१४ साला पर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या विविध खात्यांची मंजुरी घेण्याचे काम माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने भाजपचे सरकार आले आणि भाजपच्या नेत्यांनी प्रकल्प लांबवत नेला. १६ साली पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आठ वर्षे झाली, तरी प्रकल्प अर्धवट अवस्थेतच आहे आणि अशा अर्धवट अवस्थेतील प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान वारंवार करत आहेत, अशी टीका मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सरकारचा पैसा आणि सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार कसा करून घ्यावा, हे भाजपकडून शिकण्यासारखे आहे, असा शेरा मोहन जोशी यांनी भाजपला उद्देशून भारला आहे.

उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर-उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे,दि. २९ :- राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर आहे असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या उद्योग विभागाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवाजी पाटील, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.

मी स्वत: उद्योजक असून उद्योजकांच्या अडचणींची आणि त्यांच्या समस्येची मला चांगली जाणीव आहे असे सांगून उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांची पारदर्शकता दाखविणारा आहे. उद्योगांसाठी शासन सकारात्मक आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान आणि मोठया उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही पुढाकार घेत आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही. उद्योग विभागावर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते हे टिका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले केले.

औद्योगिक क्षेत्रात जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुतवणूक आली असून परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील २८९ औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बीडकीन औद्योगिक क्षेत्रात ५२ हजार कोटी रुपयांची, एक लाख कोटी रुपयांची विदर्भात तसेच कोकण औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेद्वारे महिलांना शासनातर्फे आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम बाजारात येण्यामुळे त्याचा उद्योग क्षेत्राला फायदा होणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत १० नवीन उद्योजकांना उद्योगमंतत्र्यांच्याहस्ते पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले.

खासदार श्री.बारणे म्हणाले, उद्योजकांचा उद्योग विभागातर्फे सत्कार करणे चांगली संकल्पना आहे. पुणे व परिसरातील उद्योजक व कामगारांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले असून, रिंग रोड व मेट्रोच्या जाळयामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योगस्नेही धोरणामुळे उद्योगांची भरभराट झाली आहे. विभागीय आयुक्त या नात्याने विभागातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल व प्रशासनाकडून उद्योजकांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.

सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भंडारी म्हणाले, राज्यात १४ ठिकाणी उद्योग भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. लॉजिस्टीक पार्क स्थापनेसह पाच ठिकाणी स्कील डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, राज्यात आलेले नवीन प्रकल्प, तेथे झालेली विदेशी गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि या माध्यमातून औद्यागिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी याची माहिती यावेळी देण्यात आली.

उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

‘इंडिया ग्लास सोल्युशन’ कारखान्यात अपघात चार कामगारांचा जागीच मृत्यू


पुणे: पुण्यातील येवलेवाडी भागातील ‘इंडिया ग्लास सोल्युशन’या नावाने मोठा काचेचा कारखान्यातून काच उतरवताना मोठा अपघात झाला. या अपघाता काच अंगार पडल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच चार कामगार जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पुण्यात खळबळ उडाली.

अमित शिवशंकर कुमार (वय २७, धंदा मजूर, सध्या राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे, कायमचा पत्ता- रायबरेली उत्तर प्रदेश), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३ वर्षे धंदा मजूर, सध्या राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे. कायमचा पत्ता- उत्तर प्रदेश), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ वर्षे धंदा मजुरी राहणार धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू. पुणे. कायमचा पत्ता- सलोन, रायबरेली उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या कामगरांची नावे आहेत.

तर जगतपाल संतराम सरोज (वय ४९ वर्षे, धंदा मजुरी, रा. धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू.) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहित नाही) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला जात असून कंपनीच्या मालकावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. हा अपघात रविवारी (दि.२९) दुपारी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी भागात ‘इंडिया ग्लास सोल्युशन’या नावाने मोठा काचेचा कारखाना आहे. या कारखान्यात काचावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते विक्रीसाठी बाजारात आणले जातात. प्रक्रियेसाठी विविध भागातून या कारखान्यात काचा येत असतात. अशाच काचेचा ट्रक रविवारी (दि.२९) कारखान्यावर आला होता. ट्र्क मधील काच उतरवून घेण्यासाठी १० कामगार एकत्र आले होते. त्यांच्याकडून नियोजनानुसार काच उतरवण्याचे काम सुरु होते.

ट्रकमधून मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना काचेचे स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटल्याने दोन मोठे काचेचे स्लाईड या मजुरांच्या अंगावर पडले. यात अंगावरच काच पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसल्याने चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर कामगारांवर उपचार सुरु आहेत. भीषण घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थनिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने मोठी खळबळ माजली असून, पोलीस हा कारखाना कोणाचा याचा शोध घेत आहेत.

येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात ही मोठी दुर्घटना घडली. चार कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. मृतांचा पंचनामा केला जात आहे. तसेच या प्रकरणी चौकशी केली जात असून या प्रकरणी गु्न्हा दाखल केला जाणार आहे. कारखान्याच्या मालकाचा शोध घेतला जात असून त्याच्यावर देखिल गन्हा दाखल केला जाईल.

  • विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन.

कोंढव्यातील येवलेवाडी येथील इंडिया ग्लास सोल्युशन या काचेच्या कारखान्यात अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले एका बाजूचे काचेचे मोठे बॅक्स कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले. यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याचे मालक हुसेन ‘तय्यब अली मिठावाला’ असे नाव आहे. अग्नीशमन दलाच्या दहा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • समीर शेख, स्टेशन ड्युटी ऑफिसर, कोंढवा अग्नीशमन दल केंद्र.

आचारसंहिता लागण्यापूर्वी पदोन्नती देण्याची मागणी -पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना आक्रमक

महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. प्रशासनाकडून याबाबत वेळखाऊ धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती द्यावी, अशी मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. प्रशासनाकडून याबाबत वेळखाऊ धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नती द्यावी, अशी मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढणेच्या अनुषंगाने विभागीय पदोन्नती समितीची बैठक प्रतिवर्षी सप्टेंबरमध्ये घ्यावी. त्यात पदोन्नतीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आदेश सरकारने याआधीच दिले आहेत. पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढणेसाठी विहित वेळापत्रकाचे पालन करावे ज्यामुळे पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तपूर्वी पदोन्नतीपासून वंचित राहावे लागणार नाही. असे परिपत्रक असतानाही गेल्या वर्षी वरिष्ठ लिपिक ते उपअधीक्षक पदासाठी पदोन्नती समितीची बैठक आयोजित करणेत आलेली नव्हती. त्यामुळे उपअधीक्षकपदाच्या अनेक जागा रिक्त असून अनेक कार्यालयात उपअधीक्षक नसल्याने कार्यालयीन कामाची गैरसोय होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका या केव्हाही घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वरिष्ठ लिपिक ते उपअधीक्षक पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पदोन्नती समितीची बैठक घेऊन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिक संवर्गातील लिपिक टंकलेखक वर्ग-३ या पदावरील सेवकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द केली आहे. या सेवाज्येष्ठता यादीतील सेवकांना पदोन्नती देणेसाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुखांना व सेवकांना गोपनीय अहवाल व इतर माहिती पाठविणेबाबत अवगत केलेले आहे. सेवाज्येष्ठता यादीतील बऱ्याच खात्यांनी/सेवकांनी सामान्य प्रशासन विभागास माहिती सादर केलेली आहे. कागदपत्रे / अहवाल सादर करणेस पुरेसा वेळ सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवकांची २०२२ मध्येही पदोन्नतीसाठी कागदपत्रे मागविली होती. पदोन्नती समितीची बैठक घेऊन ती प्रक्रिया पूर्ण करणेत आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ लिपिक पदाच्या बरेच जागा रिक्त असून वरिष्ठ लिपिक नसल्याने कार्यालयीन कामकाजात गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे पदोन्नती देण्यात यावी, असे संघटनेने म्हटले आहे.

लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असल्याचा संदेश देणारी ही सन्मानयात्रा – खासदार डॉ. अजित गोपछडे 

-वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत 

पिंपरी-चिंचवड : वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. हा संदेश देणारी यात्रा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विरोधकांनी विष पसरवण्याचे काम केले; त्याला उत्तर देणारी ही यात्रा आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली.  

लिंगायत समाजातील युवक, तरुण व सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने राज्यात वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या १७ जिल्ह्यामध्ये भक्ती स्थळ (राजूर, अहमदपूर) ते शक्ती स्थळ (श्रीक्षेत्र मंगळवेढा) अशी लिंगायत सन्मान यात्रा जाणार आहे. ही यात्रा आज (रविवार, दी. २९) ६०विधानसभा मधील प्रवास करीत पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. या निमित्त गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली, नेवाळे वस्ती येथे वीरशैव लिंगायत समाज सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे बोलत होते. 

यावेळी आमदार उमा खापरे, दानेश तिमशेट्टी (हिंदू वीरशैव लिंगायत मंच.पिंपरी चिंचवड शहर संयोजक), नारायणराव बहिरवाडे (महात्मा बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष), गुरुराज चरंतीमठ (मार्गदर्शक, हिंदू वीरशैव लिंगायत मंच), एस बी पाटील (मार्गदर्शक हिंदू वीरशैव लिंगायत मंच),संतोष यादवाडे,राष्ट्रीय जंगम समाजाचे अध्यक्ष श्रवण जंगम,आकाश पाटील,गणेश पाटील,मंगेश पाटील,चंद्रशेखर पाटील यांसह लिंगायत समाजातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले, ही यात्रा राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. लोकसभेत मिळालेल्या अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी ही यात्रा नसून लिंगायत समाजाला एकत्रीत करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. तसेच या समाजातील बलस्थानांना ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. सध्या राज्यात जी जातीय तेढ निर्माण केला जात आहे; त्याला उत्तर म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, लिंगायत समाजातील ५७ पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समरसता आणि हिंदूतवाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करत आहे. लिंगायत समाजाला एकत्रीत करणे, त्यांच्यात जनजागृती करणे, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या व सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, लिंगायत समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळवून देणे, निवासी वस्तीच्या संदर्भात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक येथे युवकांना मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देणे, लिंगायत समाजासाठी आरक्षित झालेल्या स्मशानभूमी किंवा दफन भूमी त्यांना मिळवून देणे; १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दीड कोटी लिंगायत आहेत. त्यांचा गेलेला स्वाभिमान पुन्हा मिळवून देणे हा आमचा या यात्रे  मागील उद्देश आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणासाठी पुणे आणि नवी मुंबई येथे भूखंडास मान्यता दिल्याचेही डॉ. गोपछडे यांनी सांगितले

या यात्रेचा सन्मान मंगळवेढा येथे होणार असून या सभेला लाखोंच्या संखेने समाज बांधवांनी यावे असे आवाहन करताना डॉ. गोपछडे ती समाजाची संकल्प सभा असेल असेही सांगितले. 

आमदार उमा खापरे म्हणाल्या, डॉ. अजित गोपछडे यांनी यापूर्वी डॉक्टर सेलच्या माध्यमातून राज्यभर प्रभावी कार्य केले आहे. आता राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर त्यांनी लिंगायत समाजाला एकत्र करण्यासाठी काढलेली ही सन्मान यात्रा राजकीय नसून लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे. 

या मेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान डॉ. गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून प्रदूषणातही वाढ होत आहे, त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून याकरीता मेट्रोसारखे प्रकल्प महत्वाचे आहेत, आगामी काळात मेट्रोचे जाळे वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दूरदृष्यप्रणालीद्वारे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आश्विनी जगताप, आदी मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित होते.

उद्योग आणि पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या मदतीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज राज्यात विविध उद्योग येत असून उद्योगाला चालना देण्याकरीता राज्य शासन सहकार्य करीत आहेत. राज्यात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक झाली आहे, विविध क्षेत्रातील उद्योजक राज्याकडे आकर्षित होऊन उद्योगाला चालना देत आहेत. आपले राज्य उद्योगस्नेही झाले असून उद्योग आणि पायाभूत सुविधेत देशात महाराष्ट्र अग्रेसर झाले आहे.

पुरंदर विमानतळाकरीता भूसंपादनाची कार्यवाही करा
पुरंदर विमानतळाकरीता लवकरात लवकर जागा अधिग्रहित करुन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा. याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, आगामी काळात पुरंदर विमानतळाचे काम सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाकरीता राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याठिकाणी ऐतिहासिक स्मारक होत आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी
राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ९० लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे, याकरीता वर्षभरासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातून पहिली रेल्वे कोल्हापूर येथून आयोध्याकरीता सोडण्यात आली असून आगामी काळात राज्यासह पुण्यातून याकरीता प्रयत्न करावेत. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता मेट्रोच्या कामाला गती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या कामाला सन २०१४ पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक ‘मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईल, असे नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले.

पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी ५०० वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील, श्री. फडणवीस म्हणाले.

पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट
पुणे ही सांस्कृतिक, तंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक ‘मॅग्नेट’ आहे. पुणे शहर व परिसरात सुमारे १ लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे. पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी ५० ते १०० वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे.

भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता १० कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

श्री. मोहोळ म्हणाले, केंद्र शासनाच्यामदतीने पुणे शहराला मेट्रो, आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन विमानतळाचे टर्मिनल, स्मार्ट सिटी, चांदणी चौकातील पूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बस, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी वंदेभारत एक्सप्रेस, पुण्यात ३३ किमी मेट्रोचे मार्ग पूर्ण झाले आहेत. महिला सक्षमीकरणाकरीता बेटी-बचाव, बेटी पढाव, लखपती दीदी अशा योजना राबविण्यात येत असल्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद- मंत्री छगन भुजबळ
मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य तसेच भिडेवाडा स्मारक येथील नूतन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती देऊन मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विविध शिक्षण, आरोग्य अशा सामाजिक सुधारणा केल्या. भिडेवाडा येथील स्मारकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याचा आंनद आहे, असही श्री. भूजबळ म्हणाले.

मंत्री श्री. चंद्रकांत पाटील प्रास्ताविकात म्हणाले, पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावर कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे रहदारीचे भाग जोडल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत व्यापारालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट येथून शहरातील विविध भागात जाणे शक्य होणार आहे. भिडेवाडा येथील स्मारक हा आपल्या श्रद्धेचा विषय मार्गी लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.
0000

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण


जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन

बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे केले लोकार्पण

सोलापूर विमानतळाचे  केले उद्घाटन

भिडेवाडा येथे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या  पहिल्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी

“महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांमुळे शहरी विकासाला चालना मिळेल आणि लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल”

“पुणे शहरातील नागरिकांचे  जीवनमान अधिक सुखकर करण्याच्या  स्वप्नाच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत”

“सोलापूरला थेट हवाई मार्गाने जोडण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण “

“भारत आधुनिक झाला पाहिजे, परंतु भारताचे  आधुनिकीकरण आपल्या मूलभूत मूल्यांवर आधारित असले पाहिजे”

” मुलींसाठी बंद असलेली  शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी उघडली”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले.

दोन दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे पुण्यातील त्यांचा कार्यक्रम रद्द झाल्याची आठवण पंतप्रधानांनी आपल्या करून दिली आणि आजच्या आभासी कार्यक्रमाचे श्रेय तंत्रज्ञानाला दिले. थोर व्यक्तींची ही  प्रेरणादायी भूमी महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय पाहत आहे, असे ते म्हणाले.जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी या दोन कार्यक्रमांचा उल्लेखही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.  भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील जीवनमान अधिक सुखकर  करण्याच्या दिशेने झपाट्याने होत असलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर शहराशी थेट हवाई संपर्कासाठी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले, “भगवान विठ्ठलाच्या भक्तांनाही आज विशेष भेट मिळाली आहे”. सध्याच्या विमानतळाचे  अद्ययावतीकरण झाल्यानंतर टर्मिनलची क्षमता वाढली असून प्रवाशांसाठी नवीन सेवासुविधा उपलब्ध  झाल्या आहेत, त्याचा लाभ भगवान विठ्ठलाच्या भक्तांना मिळत असल्याचे ते म्हणाले. विमानतळामुळे व्यवसाय, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदनही केले.

“आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे”, असे सांगताना त्यांनी पुण्यासारख्या शहरांना प्रगती आणि नागरी विकासाची केंद्रे बनवण्याच्या गरजेवर भर दिला. पुण्याची प्रगती आणि  वाढत्या लोकसंख्येच्या  पायाभूत सुविधांवरचा ताण  याबाबत बोलताना  विकास आणि क्षमता वाढवण्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सध्याचे राज्य सरकार पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरणासाठी आणि शहराचा विस्तार करताना दळणवळणाला चालना देण्यासाठी काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुणे मेट्रोबद्दल 2008 मध्ये चर्चा सुरू झाली, परंतु आपल्या  सरकारने जलद निर्णय घेतल्यानंतर 2016 मध्ये त्याची पायाभरणी झाली. त्यामुळे आज पुणे मेट्रोची व्याप्ती आणि विस्तार वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आजच्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान  म्हणाले, एकीकडे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन झाले आहे, तर दुसरीकडे स्वारगेट ते कात्रज मार्गाची पायाभरणीही झाली आहे. या वर्षी मार्चमध्ये रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो सेवेचे  उद्घाटन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. वेगवान  निर्णय घेऊन अडथळे दूर केल्यामुळे 2016 पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. सध्याच्या सरकारने पुण्यात मेट्रोचे आधुनिक जाळे तयार केले आहे, तर मागील सरकारला आठ वर्षांत मेट्रोचा जेमतेम  एक खांब उभा करता आला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासाभिमुख प्रशासनाचे महत्त्व विशद करतानाच या  सातत्यात कोणताही   अडथळा आल्यास  राज्याचे मोठे नुकसान होते असे त्यांनी सांगितले. दुहेरी इंजिन सरकार सत्तेत येण्यापूर्वी मेट्रोच्या उपक्रमापासून ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनपर्यंत तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सिंचन प्रकल्प अशा विविध रखडलेल्या प्रकल्पांची उदाहरणे त्यांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रस्तावित ऑरिक सिटीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या बिडकीन औद्योगिक क्षेत्राबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरवर असलेल्या या प्रकल्पात अडसर आले होते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिन सरकारमुळे त्याला नवसंजीवनी मिळाली असे ते म्हणाले. बिडकीन औद्योगिक क्षेत्र देशाला समर्पित केल्याचे त्यांनी जाहीर केले. या क्षेत्राकडे लक्षणीय गुंतवणूक आणून रोजगाराच्या संधी तयार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. “बिडकीन औद्योगिक क्षेत्र 8,000 एकरावर पसरलेले असून या क्षेत्राच्या विकासामुळे हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येईल आणि हजारों युवकांना रोजगार मिळेल” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रातील युवावर्गासाठी आज मोठी शक्ती बनत आहे, यावर त्यांनी भर दिला. आधुनिकीकरण देशाच्या मूलभूत तत्वांवर आधारित असले पाहिजे आणि भारत आपला समृद्ध वारसा पुढे नेत आधुनिक आणि विकसित होईल,  असा पुनरुच्चार त्यांनी केला. भविष्याच्या दृष्टीने सज्ज अशा पायाभूत सेवासुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि ज्यावेळी समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या यात्रेत सहभागी होईल तेव्हा ते प्रत्यक्षात साकार होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सामाजिक परिवर्तनातील महिलांच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या वारशाला विशेषतः पहिली मुलींची शाळा सुरु करून महिला साक्षरतेची चळवळ उभारणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना अभिवादन केले. पंतप्रधानांनी सावित्रीबाई फुले स्मारकाची पायाभरणी केली, यामध्ये कौशल्य विकास केंद्र, वाचनालय आणि इतर आवश्यक सुविधा असतील. हे स्मारक सामाजिक सुधारणा चळवळीला एक चिरस्मरणीय श्रद्धांजली ठरेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असे विशेषतः शिक्षण घेण्यात अनेक समस्या येत असत असे सांगून शिक्षणाची कवाडे महिलांसाठी उघडणाऱ्या सावित्रीबाई फुलेंसारख्या दृष्ट्या व्यक्तींची त्यांनी प्रशंसा केली. स्वातंत्र्य मिळल्यानंतर देखील भूतकाळातील मानसिकता बदलण्यासाठी देशाने संघर्ष केला मात्र याआधीच्या सरकारांनी अनेक क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रवेशावर निर्बंध आणले, असे पंतप्रधान म्हणाले.  शाळांमध्ये शौचालयासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मुलींचे  शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत गेले, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारने अनेक कालबाह्य पद्धतींचे उच्चाटन केले असून यामध्ये मुलींचा सैनिकी शाळांमध्ये प्रवेश आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांची भूमिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भवती महिलांना त्यांचे काम सोडावे लागते या समस्येकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाच्या उल्लेखनीय परिणामांना अधोरेखित केले आणि उघड्यावर शौचास जाण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाल्यामुळे मुली आणि महिला यांच्या सर्वाधिक लाभार्थी आहेत, शाळेतील स्वच्छतेच्या सुधारणांमुळे मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.   महिलांच्या सुरक्षेसाठी केलेले कठोर कायदे आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेत महिलांचे नेतृत्व सुनिश्चित करणाऱ्या नारी शक्ती अधिनियमाचा त्यांनी उल्लेख केला. “जेव्हा प्रत्येक क्षेत्राची कवाडे मुलींसाठी खुली होतात, तेव्हाच राष्ट्राच्या प्रगतीचे द्वार खुले होते” असे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले स्मारक या संकल्पांना आणि महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेला आणखी ऊर्जा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे असा आपला विश्वास असल्याचे सांगून  “विकसित महाराष्ट्र, विकसित भारत” हे उद्दिष्ट आपण सर्व मिळून साध्य करू” असे ते आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन झाले. त्यामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 2,955 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी करण्यात आली.  सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील विस्तार मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.

सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किमी अंतरावर 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक आर्थिक केंद्र म्हणून यात प्रचंड क्षमता आहे. एकूण 6,400 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून तो तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे.

पंतप्रधानांनी  सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन केले. या विमानतळामुळे संपर्क सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील आणि सोलापुरात जाणारे पर्यटक, तिथले व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सोयीचे होईल. सुमारे 4.1 लाख प्रवाशांना (वार्षिक) सेवा देण्यासाठी सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.  भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

उल्हासनगरच्या नागरिकांचा विरोधमोडून काढत अक्षयचा दफनविधी:बदलापूर आरोपीचा अंत्यविधी हायकोर्टाने सरकारला दिला होती सोमवारपर्यंतची मुदत

0


मुंबई-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर सहा दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्हासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. या दफनविधीस उल्हासनगरमधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत स्मशानभूमीत येऊन आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दफनविधीसाठी सोमवारपर्यंत जागा मिळवून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.

२३ सप्टेंबर रोजी अक्षयचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आले. २४ सप्टेंबरला मुंबईतील जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टेमनंतर अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. मृतदेहावर बदलापूर, अंबरनाथ आणि कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यास तेथील नागरिकांनी तसेच मनसेने जोरदार विरोध दर्शवला हेाता. अंबरनाथ स्मशानभूमीत विरोधाचे फलकही लावलेे होते. गेल्या ३ दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांकडून जागेचा शेाध सुरू होता. अक्षयचा मृतदेह दफन करण्यास जागा मिळत नसल्याने त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी वकील अमित कटारनवरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले हेाते.

आंदोलक आत घुसू नयेत म्हणून स्मशानभूमीला लावले कुलूप

रविवारी पोलिसांनी उल्हासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. दफनविधीसाठी खड्डाही खोदला होता. स्थानिक नागरिकांनी विरोध करत हा खड्डा बुजवला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आंदोलक स्मशानभूमीत शिरू नये म्हणून स्मशानभूमीच्या दोन्ही गेटला कुलूप लावत बुजवलेला खड्डा प्रशासनाने पुन्हा खोदला. अक्षयच्या आईवडिलांनी कळवा येथून मृतदेह ताब्यात घेत संध्याकाळी सहाला कडक पोलिस बंदोबस्तात अक्षयचा मृतदेह दफन केला.
अक्षयचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयातून उल्हासनगर येथील स्मशानभूमीमध्ये याच रुग्णवाहिकेतून नेला गेला.

भाजपने केलाय मेट्रोचा टप्प्याटप्प्याचा खेळ अन राजकीय इव्हेंटबाजी,PM च्या भाषणापेक्षा जन सुविधा महत्त्वाची:महाविकास आघाडीकडून मेट्रोचे उद्घाटन

पुणे: वाहतूक समस्या आजही सुटलेली तर नाहीच पण ती सोडविण्याचा प्रयत्न म्हणुनच कॉंग्रेस: राष्ट्रवादीने आणलेल्या मेट्रोचा टप्प्याटप्प्याचा खेळ अन इव्हेंटबाजी करत राजकीय संधीसाधूपणाचेच प्रदर्शन सुरू ठेवले आहे असा आरोप करून पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा जनतेची सुविधा महत्त्वाची आहे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका उद्घाटन करण्यात आले. स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही.
पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. “खरंतर कितीही पाऊस असला तरी पंतप्रधानांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करणे शक्य होते. मात्र इव्हेंटबाजीचा हव्यास पुणेकरांच्या हिताच्या आड आला. जिथे सभा होणार होती त्या मैदानावर चिखल असल्याने नरेंद्र मोदींची भाषण ठोकण्याची संधी हुकली म्हणून संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमास रद्द करण्यात आला. हा समस्त पुणेकरांचा अपमान होता.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद प वर पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. जनतेचा हितासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून या मेट्रो मार्गीकेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, मोहनदादा जोशी, संजय मोरे, गजानन थरकुडे, संगीताताई तिवारी, आशाताई साने, उदय महाले, अजित दरेकर, किशोर कांबळे, दिलशाद आत्तार, रमीज सय्यद आणि मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश चेन्निथला आणि नाना पटोले करणार 30 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे दि. 3 ऑक्टोबर रोजी शानदार उद्घाटन


पुणे:कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, भजन, भक्ती आणि साहित्य याचा मनोहारी संगम असणारा आणि नवरात्रात सलग 10 दिवस चालू असणारा ‌‘पुणे नवरात्रौ महोत्सव‌’ हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमाखदार 30वे वर्ष साजरे करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्निथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे याचे शानदार उद्घाटन संपन्न होईल, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विधिवत घटस्थापना – शिवदर्शन येथील दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिरात गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर सौ. जयश्री बागुल व श्री आबा बागुल यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होईल.
विशेष आकर्षण– सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती हे विशेष आकर्षण असेल.
‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’- विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‌‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन गौरविले जाते. राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना यंदा (दि. 3) उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
नेत्रदीपक उद्घाटन सोहळा – कार्यक्रमाचा प्रारंभ सनईच्या मंजुळ सुरांनी होणार असून दीपप्रज्वलनाने 30व्या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देवीची सामूहिक आरती होईल.
महोत्सवाची सुरुवात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या ‌‘दुर्गा नमनाने‌’ होईल. त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे ‌‘देवीचा जागर व गोंधळ‌’ सादर करणार आहेत.
‘नृत्यरंग‌’ कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा नृत्याविष्कार व बॉलीवुड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे करणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध उद्योजक, बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी आमदार उल्हास पवार, आमदार,रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संग्रामदादा थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार संजय जगताप, शहर अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे, माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा गट संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- भव्य उद्घाटन सोहळा: श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास ‌‘परंपरा‌’ कार्यक्रम, हिंदी-मराठी संगीत रजनी ‌‘मेलडी बिटस्‌‍‌’, ‘महाराष्ट्राचा लोकमेळा‌’, सलग ‌‘12 तासांचा लावणी महोत्सव‌’, हिंदी गीतांचा सुरेल नजराणा ‌‘ऑल टाईम्स हिट्स‌’, ‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन आणि अजय-अतुल‌’ यांची लोकप्रिय गीते, ‘रिदम बेसवर आधारित बहारदार ऑर्केस्ट्रा‌’, ‘जुनून‌’ अंतर्गत फिल्मी कव्वाली आणि सुफी गाणी‌’, ‘बॉलिवुड म्युझिकल बिटस्‌‍‌’ अंतर्गत हिंदी ऑर्केस्ट्रा, ‘अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ असे भरगच्च कार्यक्रम दि. 3 ते दि. 12 ऑक्टोबर या काळात रोज सायंकाळी 7.00 वाजता पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे संपन्न होतील.
महोत्सवाचे थेट प्रक्षेपण- ‌‘पुणे नवरात्रौ महोत्सवा‌’चा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षेपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे.
रसिकांसाठी सर्व कार्यक्रम विनामूल्य- नवरात्रौच्या कालावधीत सलग 10 दिवस आणि तब्बल 30 वर्षे चालू असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. या महोत्सवाअंतर्गत पुणे नवरात्रौ महिला महोत्सवही गेली 25 वर्षे साजरा होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम सविस्तर माहिती : –
गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‌‘परंपरा‌’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार असून श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे.
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी प्रस्तुत हिंदी-मराठी संगीत रजनी ‌‘मेलडी बिटस्‌‍‌’चे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रेया मयुराज, स्वप्ना पानसे यांचा सहभाग आहे.
शनिवार, दि. 5 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‌‘महाराष्ट्राचा लोकमेळा‌’ प्रा. गणेश चंदनशिवे, योगेश चिकटगावकर, शाहीर यशवंत जाधव, संपदा सादर करणार आहेत.
रंगणार 12 तासांचा लावणी महोत्सव
रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी : दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत लावणी महोत्सवाचे आयोजन होणार असून यात ‌‘छत्तीस नखरेवाली‌’, ‘ओरिजनल जल्लोष अप्सरांचा‌’, ‘तुमच्यासाठी कायपण‌’, ‘कैरी मी पाडाची‌’ आणि ‌‘चंद्रकला‌’ असे लावण्यांचे कार्यक्रम रंगणार आहेत.
सोमवार, दि. 7 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : हिंदी गीतांचा सुरेल नजराणा ‌‘ऑल टाईम्स हिट्स‌’ सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, चारुलता पाटणकर, धनंजय पवार व भव्य वाद्यवृंदासह सादर करणार आहेत.
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : मुकेश देढीया, मकरंद पाटणकर, धनंजय पवार, तेजस्वीनी, राधिका अत्रे ‌‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन आणि अजय-अतुल हिट्स‌’ अंतर्गत लोकप्रिय गीतेसादर करणार आहेत.
बुधवार, दि. 9 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‌‘रेट्रो रिदम्स‌’ अंतर्गत रिदम बेसवर आधारित बहारदार ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे. सौरभ दप्तरदार, कोमल कृष्णा व राजेश्वरी पवार यांचा सहभाग असणार आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‌‘जुनून‌’ अंतर्गत फिल्मी कव्वाली आणि सुफी गाणी यांचे सादरीकरण होणार आहे. संदीप पंचवाटकर, विवेक पांडे, राजेश्वरी पवार आणि भाग्यश्री बंगारे यांचा सहभाग आहे.
शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‌‘बॉलिवुड म्युझिकल बिटस्‌‍‌’ अंतर्गत हिंदी ऑर्केस्ट्राचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. पल्लवी पत्की-ढोले, सा रे ग म फेम रफी हबिब, विनोद कुमार, कविता जावळकर आणि संतोष कुमार यांचा सहभाग आहे.
शनिवार, दि. 12 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : दसऱ्याच्या दिवशी हिंदी-मराठीतील गाजत असलेली प्रसिद्ध जोडी अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी आणि रोहित राऊत यांचे ‌‘अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’मध्ये रंगारंग सादरीकरण होणार आहे.
नवरात्रौ महोत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही संस्थेतर्फे राबविण्यात येतात. शादेय नवरात्रीनिमित्त पुणेकर भाविकांनी जागृत देवस्थान आलेल्या श्री लक्ष्मीमातेचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सौ. जयश्री बागुल (अध्यक्षा, पुणे नवरात्रौ महिला महोत्सव), घन:श्याम सावंत (उपाध्यक्ष), श्री गणेश सह. बँक लि. पुणेचे चेअरमन नंदकुमार बानगुडे (कोषाध्यक्ष), नंदकुमार कोंढाळकर (सचिव), श्री गणेश सह. बँक लि. पुणेचे चेअरमन रमेश भंडारी (सदस्य), कपिल बागुल (सदस्य), सागर बागुल (सदस्य) हेमंत बागुल (सदस्य), महेश ढवळे (सदस्य), सागर आरोळे (सदस्य) हे मुख्य पदाधिकारी आहेत. राजेंद्र बागुल, जयवंत जगताप, अमित भगत, इम्तियाझ तांबोळी, अभिषेक बागुल, टी. एस. पवार, राजेंद्र बडगे, विलास रत्नपारखी हे कार्यकारिणी सदस्य असून ‌‘संवाद, पुणे‌’चे सुनील महाजन, अधिश प्रकाश पायगुडे सांस्कृतिक प्रमुख आहेत. घटस्थापना, पूजाअर्चा व धर्मिक विधीचे प्रमुख वेदमूर्ती श्री. श्रीकांत दंडवते गुरुजी, श्री. होतीलाल शर्मा गुरुजी आहेत.

सुरेल गायन, विलोभनिय नृत्याविष्काराला रसिकांची दाद


आयसीसीआरतर्फे ‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत सादरीकरणात प्रभुत्व असलेल्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना आज अनोख्या मैफलीचा आनंद घेता आला.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.27) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी, कार्यक्रम अधिकारी आणि सल्लागार संजीवनी स्वामी, भारतीय विद्या भवनचे प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.
मैफलीच्या पहिल्या सत्रात अर्चना सहकारी यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात एक निषाद बिहागडा रागातील मध्य लयीतील ‌‘बैरन बिन‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून डॉ. सहकारी यांनी द्रुत बिहागडामधील ‌‘पाती ना भेजी‌’ हा छोटा ख्याल बहारदारपणे सादर केला. ‌‘ओ दिलदारा आजा रे‌’ हा खमाज रागातील पं. कुमार गंधर्व यांनी रचलेला टपख्याल सादर करून त्यांनी रसिकांना तृप्त केले. सुरेल आवाज, सहज फिरत आणि उत्तम गायनशैली यामुळे डॉ. सहकारी यांच्या गायन मैफलीत रंग भरले.
डॉ. अर्चना सहकारी यांना रोहित प्रभुदेसाई (तबला), मेघा प्रभुदेसाई (संवादिनी), अनोखी गुरव (सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांचे बहारदार नृत्य झाले. त्यांनी आपल्या नृत्याविष्काराची सुरुवात गुरू केलुचरण महोपात्रा यांनी रचलेल्या महिषासुरमर्दिनीचे रूप दर्शविणाऱ्या रचनेने केली. स्त्रीशक्तीची महती सांगणाऱ्या या दुर्गा अष्टपदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर मौमिता वत्स घोष यांनी ओडिसी नृत्यातील पल्लवी हा प्रकार सादर केला. ज्यात सहज सोप्या नृत्यविष्कारापासून सुरुवात होऊन क्लिष्ट व जलद हालचालींचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता त्यांनी राधा-कृष्णाच्या नात्याचे दर्शन घडविणाऱ्या पंडित भुवनेश्वर यांनी रचेलेल्या आणि गुरू पंडित केलुचरण महापात्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‌‘धीरे समिरे यमुना तिरे‌’ या रचनेने केली. या नृत्य रचनेद्वारे राधा-कृष्णाच्या नात्यातील आत्मा-परमात्म्याचे अनुबंध उलगडले गेले. जलद पदन्यास, तालबद्ध हालचाली अन्‌‍ विलोभनिय हावभाव यातून मौमिता यांचा नृत्याविष्कार लक्ष्यवेधी ठरला. मौमिता वत्स घोष यांचे पुण्यातील पहिले नृत्य सादरीकरण होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. पंडित सुहास व्यास यांचा सन्मान सुदर्शन शेट्टी यांनी केला तर कलाकारांचा सत्कार पंडित सुहास व्यास यांनी केला.

पंडित सुहास व्यास म्हणाले, आयसीसीआर ही संस्था देशातील सांस्कृतिक चळवळीच्या वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून होरायझन सिरीजद्वारे नवनवीन कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. देशाच्या विविध भागातच नव्हे तर देशाबाहेरही भारतीय कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे विदेशात भारतीय संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत आहे..

आयसीसीआर आणि भारतीय विद्याभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनीवन कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते, असे प्रा. नंदकुमार काकिर्डे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका घैसास यांनी केले.

संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासासह नक्षल भागात विकासात्मक जडणघडण – उद्योगमंत्री उदय सामंत

0

नागपूर– महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध होऊन ज्या भागात आजवर उद्योगाची बीजे रुजली नव्हती त्या भागात आम्ही लक्ष केंद्रीत केले. गत दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला संपूर्ण भारतात अव्वल आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आता महाराष्ट्राकडे वेधून घेतले आहे. नक्षल भागात विकासात्मक जडणघडणीतून गडचिरोली जिल्ह्याचे स्वरूप आता पूर्णतः बदलून दाखविले आहे. आजवर नक्षलवादी जिल्हा म्हणून जी ओळख होती ती मिटविण्यात आपले शासन यशस्वी ठरल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.

हॉटेल सेंटर पॅाईंट येथे महाराष्ट्राच्या औद्योगिक यशाला अधोरेखित करणाऱ्या ‘महाराष्ट्राची औद्योगिक भरारी’ या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. आशीष जायस्वाल, अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) तथा समन्वयक महाराष्ट्राची उद्योग भरारी प्रदीप चंद्रन, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य अभियंता राजेश झंझाळ, उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, वर्धा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, हिंगणा इंडस्ट्रीज  असोसिएशनचे पी. मोहन, लॉयड ग्रूपचे संचालक तथा प्रकल्प  प्रमुख व्यंकटेशन, आवादा ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक मुर्तुझा, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे घिमे, परनार्ड रिकार्ड इंडियाचे संचालक राजेंद्र देशमुख यांच्यासह पूर्व विदर्भातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचा शुभारंभ नागपूरपासून होत असल्याचा विशेष उल्लेख उद्योगमंत्री सामंत  यांनी करून विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. एमआयडीने उद्योजकांना केवळ जागा उपलब्ध करून देणे या उद्देशापर्यंतच सीमित असलेल्या महामंडळाचे स्वरूप आता आपण पूर्णपणे बदललेले आहे. चांगल्या उद्योजकांना, विदेशी गुंतवणूकदारांना, विदेशातील उद्योजकांना जर राज्यात निमंत्रित करायचे असेल तर त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला आम्ही प्राधान्य दिले. या प्रयत्नांमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत सोईसुविधांसाठी आम्ही प्राधान्याने लक्ष दिले आहे. यात पूर्व विदर्भातील 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीज, मलनिःसारण व्यवस्था, पोलिस स्थानक या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. उद्योजकांबरोबर कामगारांनाही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यांचेही आरोग्य सुदृढ राहण्याची गरज आहे. एमआयडीसीच्या क्षेत्रात केंद्र सरकारची रुग्णालये साकारावीत यासाठी कोणताही मोबदला न घेता त्यांना रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जात  असल्याचे उद्योगमंत्री सामंत यावेळी म्हणाले.

विदर्भातील कापूस उत्पादक शेतक-यांना औद्योगिक क्षेत्राची जोड मिळावी यासाठी अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यमातून होणार आहे. भंडारा,  गोंदिया,  चंद्रपूर, गडचिरोली,  वर्धा या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राला एक वेगळी दिशा आपण देत आहोत. नागपूर विभागात सुमारे 1 हजारापेक्षा अधिक हेक्टर भूखंड वाटप करून यातून 42 हजार 937.43 कोटी रुपये गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी सांगितले. यातून 29 हजार 927 रोजगार निर्मिती झाली आहे. उद्योगवाढीला चालना मिळून 80 हजार रोजगार निर्मिती यामाध्यमातून झाली आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे 35 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. विदर्भातून कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.

याच उपक्रमात आपण लाडक्या बहिणींचा प्रातिनिधीक गौरव केला. तो गौरव योजनांसाठी नसून राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये, राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये त्यांनाही प्राधान्य मिळावे, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी लवकरच विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक 75 हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्यातील युवकांच्या कौशल्य रुजावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रांना स्थानिक पातळीवरील उद्योजकांनी पुढे येऊन त्यात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान एमआयडीसी, डायरेक्टोरेट आफ इंडस्ट्रीज, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातर्फे व्यवसायासाठी देण्यात येणारे अनुदान, पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवा कार्यप्रशिक्षण योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

नारायण सेवा संस्थानचा मोफत मॉड्युलर आर्टिफिशियल लिंब फिटमेंट कॅम्प २९ सप्टेंबरला

  • टिंगरे नगर, तिरुपती गार्डन येथे ३६० दिव्यांगांना लावले जाणार कृत्रिम अवयव

पुणे,: देश-विदेशात दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थान तर्फे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्य देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी पुण्यात मोफत नारायण लिंब आणि कॅलीपर्स फिटमेंट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर तिरुपती गार्डन मंगल कार्यालय, टिंगरे नगर, रोड नं. २, विश्रांतवाडी येथे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.
नारायण सेवा संस्थानचे मीडिया व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संस्थान गेल्या ३९ वर्षांपासून विविध राज्यांमधील दिव्यांग बंधू-भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या परंपरेत, ९ जून रोजी संस्थानने पुण्यात मोफत लिंब मेजरमेंट कॅम्प आयोजित केला होता, ज्यात सुमारे ५०० लोक सहभागी झाले होते. यापैकी ३६० जणांना कृत्रिम अवयव बसविण्याचा निर्णय घेतला गेला. आता त्यांचे हात-पाय लावण्यासाठी शिबिर आयोजित केले जात आहे.
गौड़ यांनी सांगितले की, नारायण सेवा संस्थानने रायपूर, लखनऊ, कोलकाता, जयपूर, विशाखापट्टणम, गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये अशा प्रकारचे शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. पुण्यातील शिबिरासाठी 25 पेक्षा अधिक स्वयंसेवी संघटना, जसे की रामा हॉस्पिटॅलिटी, यशश्वी ग्रुप, अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन, राउंड टेबल इंडिया, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय, जय शिवराय प्रतिष्ठान आणि इतर संस्था एकत्र येऊन काम करणार आहेत.
पुण्यातील या शिबिरात 360 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोफत लिंब बसवून एक नवीन जीवनदान दिले जाणार आहे. यासाठी संस्थानने केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना, प्रशासकीय अधिकारी, आणि समाजसेवकांना आमंत्रित केले आहे. दिव्यांगांना शिबिरामध्ये मोफत जेवण आणि फिटमेंटनंतर चालण्याचे प्रशिक्षण तसेच उपकरणांच्या वापर व देखभालीची माहिती दिली जाणार आहे.
नारायण सेवा संस्थान 1985 पासून मानवसेवेत कार्यरत आहे. संस्थापक कैलाश मानव यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकल्पांद्वारे त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून सशक्त बनवले आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिर,श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन ; तब्बल ५७२ हून अधिक रुग्णांची नोंदणी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, इनरव्हील क्लब ऑफ खडकी डिस्ट्रिक्ट ३१३, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लिमिटेड, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड व जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिराचे आयोजन बाबुराव सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे करण्यात आले आहे.

यावेळी टाटा ऑटोकॉम्प सिस्टीमचे चेअरमन अरविंद गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीजचे सुधीर मेहता, अध्यक्ष अरिहंत मेहता, संचालिका रितिका मेहता, इनरव्हील क्लब ऑफ खडकी च्या अध्यक्ष डाॅ.सुनीती गोयल, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ज्या रुग्णांना हात किंवा पाय नाहीत. त्यांना जयपूर फूट बसवून देण्यात येणार आहे. रुग्णांना कोणावरही अवलंबून न राहता आनंदाने जीवन व्यतीत करता यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयपूर फूट सोबतच व्हील चेअर, कुबड्या, कॅलिपर चे देखील वाटप शिबिरात झाले आहे. तब्बल ५७२ रुग्णांची नोंदणी झाली असून शिबिराचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून रुग्ण आले आहेत.

विधानसभा निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा.काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी.

0
  • गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची अद्याप मदत नाही, अवकाळी पावसासारखेच अवकाळी सरकार.

मुंबई, विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली.
यासंदर्भात टिळक भवन मध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजपा युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही. अशी मागणी काँग्रेसने केली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सीडको, प्रदुषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ७३ टक्के ओला भागात दुष्काळ आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असेही पटोले म्हणाले.

खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा..
यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची कालमर्यादा संपली असतानाही सरकारने त्यांना कालमर्यादा वाढवून दिली आहे. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सरकार दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. कालमर्यादा संपलेल्या पोलीस महासंचालक यांना पदावरून हटवावे, तसेच राज्यातील अनेक विभागात शिपाई ते अधिकारी हे ३ वर्षांपासून त्याच जागी काम करत आहेत, ते बदलले पाहिजेत अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका निवडणूक आयोगाकडे मांडली. त्यावर अशा प्रकारचे वादग्रस्त अधिकारी निवडणूक काळात राहणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे.
खासगी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत अशी भूमिकाही यावेळी मांडल्याचे मुनाफ हकीम यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, डॉ. गजानन देसाई, काकासाहेब कुलकर्णी, मदन जाधव आदी उपस्थित होते.