Home Blog Page 672

गांधी विचारच जगाला तारणारा, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा: रमेश चेन्नीथला.

भाजपाने लढण्याआधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार: नाना पटोले

गांधी जयंतीनिमित्त मणिभवनला भेट देऊन काँग्रेस नेत्यांचे गांधींजींना अभिवादन.

मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२४
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरक्यावर सुत कातले व भजन गायनही करण्यात आले. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, चरणजित सप्रा, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते असेही चेन्नीथला म्हणाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी याचा विचार करत असतो. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहा, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा. भाजपा सरकारने १० वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024:शांतता, सहिष्णुता व महात्मा गांधींचा वारसा साजरा करूया

सर्व जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीदिनी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा होतो. समाजउभारणीसाठी अहिंसेची ताकद दर्शवणारा हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने २००७ साली घोषित केला होता. 

गांधींचा अहिंसेचा वारसा

महात्मा गांधींचे सत्याग्रह व अहिंसक प्रतिकाराचे तत्वज्ञान आधुनिक इतिहासातील सर्वात जास्त परिणामकारक परिवर्तनकारी शक्तींमधील एक आहे. ब्रिटिशांच्या राज्यविरोधातील त्यांच्या शांततापूर्ण निदर्शनांमधून, विशेषतः १९३० मधील दांडीयात्रेसारख्या आंदोलनांमधून जुलमी शक्तींच्या विरोधात अहिंसा तत्वाच्या ताकदीवर असलेला त्यांचा विश्वास अधोरेखित होतो. महात्मा गांधीसाठी अहिंसेचे तत्व हे केवळ राजकीय आंदोलनांसाठीचे हत्यारच नव्हे तर एक जीवनपद्धती होती. शांतता मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गच चोखाळावे लागतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य आहे, “अहिंसा तत्व हे मानवजातीला उपलब्ध असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. सर्व विनाशकारी आयुधांपेक्षाही याची ताकद जास्त आहे.”  अमेरिकेतील  मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांच्या  मानवी हक्कासाठीच्या चळवळीपासून दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांची वर्णभेदाविरोधातील आंदोलनापर्यंत जगभरातील अनेक चळवळी  याच तत्वाने प्रेरित झाल्या आहेत. त्यांच्या तत्वज्ञानाचा अनेक नेत्यांवर, आंदोलनांवर प्रभाव पडला असून त्यामुळे प्रतिकाराचे व समाजसुधारणेचे शक्तिशाली साधन म्हणून अहिंसा तत्वाचे महत्व अधोरेखित झाले आहे.

महात्मा गांधींची आजच्या जगातील समर्पकता

राजकीय , सामाजिक व पर्यावरणीय समस्यांनी ग्रासलेल्या आजच्या काळात महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वावरील विश्वास आणखी बळकट होतो आहे. दहशतवाद, संघर्ष, हवामान बदल, आणि वाढती विषमता यावर तातडीने शांततामय उपाय शोधण्याची गरज आहे. मानवामधील अंगभूत चांगुलपणावर गांधींच्या असलेल्या विश्वासातून भेदाभेद, तसेच साथरोग किंवा गरिबीसारख्या आधुनिक जगातील समस्यांवर नक्कीच उपाय शोधता येतील.

शांतता ही केवळ एक दूरस्थ आदर्श नसून, गाठता येऊ शकणारे उद्दिष्ट आहे, हा विश्वास त्यांच्या तत्वज्ञानातून मिळतो! त्यांच्या शिकवणीतून आशा व सामंजस्याचा कालातीत संदेश मिळतो.

महात्मा गांधींची विचारधारा केवळ राजकीय आंदोलनांपुरतीच नव्हे तर शाश्वत विकासासाठी देखील उपयोगी आहे. त्यांचे सुप्रसिद्ध वचन आहे, “ जगात सर्वांच्या गरजेपुरती संसाधने आहेत,पण सर्वांच्या हावरटपणाला पुरेशी नाहीत.” यातून अहिंसा व संसाधनाचा जबाबदारीने वापर या दोन्हींमधील परस्परसंबंध अधोरेखित होतो. साधेपणा, संवर्धन व स्वावलंबनासारख्या त्यांच्या तत्वांचे प्रतिबिंब आजच्या काळातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त पडलेले दिसून येते.

अहिंसा तत्वाचा जागतिक उत्सव : गांधींच्या वारशाचा सन्मान

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या द्वारे  महात्मा गांधींच्या शांतता व अहिंसा तत्वज्ञानाचे पुनर्स्मरण  सर्व जगाला होत असते. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या या दिवशी त्यांनी आयुष्यभर प्रसार केलेल्या अहिंसात्मक प्रतिकाराच्या तत्वांना आपण आदरांजली  वाहत आहोत.

भारतात २०२३ साली झालेल्या जी २० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जागतिक नेत्यांसह राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली होती. आपल्या  सर्वसमावेशक, शांततापूर्ण व समरसतापूर्ण भविष्यकाळासाठी  महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या कालातीत तत्वांचे मार्गदर्शन सतत लाभत राहील यात शंका नाही.

2022 मध्ये, युनेस्को महात्मा गांधी शांतता आणि शाश्वत विकास शिक्षण संस्थेने (एमजीआयईपी) या दिवसाच्या स्मरणार्थ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महात्मा गांधींच्या पूर्णाकृती  होलोग्रामने  शांतता आणि शाश्वत समाजांना प्रोत्साहन देण्याचे  एक साधन म्हणून शिक्षणावरील  पॅनेल चर्चेचे नेतृत्व केले.  राजदूत रुचिरा कंबोज आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची कन्या बर्निस ए किंग यांसारख्या मान्यवरांनी आधुनिक आव्हानांना सामोरे जाताना  गांधींजींची आदर्श मूल्ये  आजही किती प्रासंगिक आहेत यावर आपले विचार मांडले होते.

गांधींजींचा वारसा

महात्मा गांधींच्या शिकवणींचा भारताच्या सामाजिक आणि राजकीय चौकटीवर आजही खोलवर प्रभाव आहे. विविध सरकारी विभाग आणि संस्था सक्रियपणे त्यांच्या आदर्शांचे पालन  आणि प्रचार करत आहेत आणि  स्वच्छ, आत्मनिर्भर  आणि शांततापूर्ण  समाजाचे  गांधींचे स्वप्न आधुनिक शासन आणि सार्वजनिक जीवनात अमलात येईल याकडे लक्ष देतात.

2014 मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधींचे स्वच्छतेचे तत्वज्ञान आवश्यक असल्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वात उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक आहे. या अभियानाचा उद्देश स्वच्छ आणि निरोगी भारत निर्माण करणे हा असून, “स्वच्छता हे ईश्वराचे दुसरे रूप  आहे” या गांधींच्या विश्वासाला  अनुसरून आहे. ते नागरिकांना वैयक्तिक आणि सामुदायिक सहभाग वाढवून, त्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी घेण्यास प्रेरित करते.

‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा 2024 अभियान 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाच्या  दशकपूर्तीनिमित्त आयोजित या अभियानाचा  2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी  समारोप झाला. स्वच्छता ही सेवा अभियानाने संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा कायम  राखण्यासाठी वर्तणुकीतील बदल आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.

11 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गांधी दर्शन, राजघाट, दिल्ली येथे महात्मा गांधींना समर्पित विशेष रेल्वे कोच चे उद्घाटन केले. रेल्वे मंत्रालयाद्वारे समर्पित  हा कोच   महात्मा गांधींच्या कालखंडातील काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेला  रेल्वे कोच आहे, जो राष्ट्राला एकत्र आणण्याच्या आणि न्याय आणि समानतेचा पुरस्कार करण्याच्या त्यांच्या ध्येयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रतिष्ठित रेल्वे प्रवासाचे प्रतीक आहे.

उद्घाटनादरम्यान, शेखावत यांनी सांगितले की या रेल्वे कोचचा थेट संबंध महात्मा गांधींच्या जीवनात एक परिवर्तन घडवणाऱ्या घटनेशी आहे आणि त्यांचे विचार  प्रत्यक्ष  सांगण्यासाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कोचमधील गांधींच्या प्रवासाचे तसेच  सहप्रवाशांसोबतच्या संवादाचे समृद्ध  शिल्पांद्वारे  चित्रण एक अविस्मरणीय  अनुभव प्रदान करतो. गांधी दर्शनासाठी येणारे अभ्यागत आता हे  क्षण पुन्हा जगू शकतील , गांधींच्या प्रवासाविषयी माहिती  प्राप्त करू शकतील , जे  अहिंसा आणि सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान घडवण्यात महत्त्वपूर्ण  होते.

हा ऐतिहासिक क्षण महात्मा गांधींच्या चिरस्थायी वारशाला तसेच  भारताचे  स्वातंत्र्य आणि एकतेप्रती  त्यांच्या अतूट  वचनबद्धतेला समर्पक मानवंदना आहे.

खादी: आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचे प्रतीक

साधेपणा आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या हाताने कातलेल्या खादी या कापडाच्या  प्रचारातून महात्मा गांधींनी आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचा केलेला पुरस्कार सतत प्रतिध्वनीत होत  आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग दरवर्षी खादीचा प्रचार करून आणि ग्रामीण सक्षमीकरणाला प्रोत्साहन देऊन गांधी जयंती साजरी करते.  2023 मध्ये गांधी जयंती दिनी कनॉट प्लेस, नवी दिल्ली येथील खादी भवनने 1.52 कोटी रुपयांची उलाढाल करून खादी उत्पादनांच्या विक्रीचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, जे स्वयंपूर्णतेच्या या प्रतीकाला समर्थन देण्याप्रति जनतेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.

डिजिटल स्मरणोत्सव

2019 मध्ये, पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या स्मरणार्थ #Gandhi150 ही  एक विशेष मायक्रोसाइट सुरू केली. या साइटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संग्रहातील  दुर्मिळ व्हिडिओ क्लिप पहायला मिळतात, ज्यात गांधींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण, जसे की त्यांचा प्रवास, अहिंसावरील भाषणे आणि लोकांशी संवाद दर्शवला आहे. या डिजिटल उपक्रमाने जनतेचा लक्षणीय  सहभाग नोंदवला  आहे, आणि 3.6 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि नवीन पिढ्यांपर्यंत गांधींचा संदेश पोहोचवला आहे.

निष्कर्ष

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा महात्मा गांधींच्या शिकवणींच्या चिरस्थायी प्रासंगिकतेचे एक शक्तिशाली स्मरण आहे. केवळ रणनीती म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून अहिंसेचा स्वीकार करून आपण भावी पिढ्यांसाठी अधिक सामंजस्यपूर्ण आणि शाश्वत जग निर्माण करू शकतो. शिक्षण, जागरुकता आणि जागतिक आव्हानांवर अहिंसक उपायांना प्रोत्साहन देऊन  आपण  महात्मा गांधींच्या वारशाचा आणि मानवतेप्रति  त्यांच्या सखोल योगदानाचा सन्मान करतो. अहिंसक कृतीतून शांतता प्राप्त करता येते हा त्यांचा कालातीत संदेश जगभरातील लाखो लोकांना आजही  प्रेरणा देत आहे.

उद्यापासून रंगणार कोथरूड नवरात्र महोत्सव – संदीप खर्डेकर यांची माहिती.

संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, अरुण जिंदल ह्या उद्योजकांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

पुणे-उद्या 3 ऑक्टोबर रोजी भेलकेवाडी, डी पी रस्ता, परांजपे शाळेसमोर, कोथरूड येथे सकाळी 11 वाजता वाघजाई देवीची घटस्थापना होऊन कोथरूड नवरात्र महोत्सवास सुरुवात होईल. यावेळी एकदंत वाद्य पथक यांचे देवीच्या मंडपासमोर स्थिर वादन होणार आहे.
महोत्सवादरम्यान केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर न देता विविध सामाजिक संस्थांना उपयोगी साहित्याची मदत,भोर येथील करंदी गावातील येसाजी कंक शाळेला शालेय साहित्याची मदत करण्यात येणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, विश्वस्त उमेश भेलके तसेच युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले.
महोत्सवादरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्लोबल ग्रुप चे संस्थापक संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी, तसेच वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे संचालक अरुण जिंदल यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले. संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी हे अस्सल पुणेकर असून त्यांनी ग्लोबल ग्रुप च्या माध्यमातून तब्ब्ल 100 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय उद्योगांना पुणे, चाकण, हिंजेवाडी, रांजणगाव, सणसवाडी इ ठिकाणी Built to Suit जागा दीर्घाकालीन काळासाठी लीज वर उपलब्ध करून दिली आणि त्यायोगे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला, श्री. अरुण जिंदल यांनी देखील वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक चलनास गती दिल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
ह्या महोत्सवादरम्यान दिनांक 5 ऑक्टोबर ला रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात “गेम ऑफ पॉवर ” ह्या राजकीय विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल तर दि. 6 ऑक्टोबर ला दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे सिनेतारका, लावणी क्वीन अर्चना सावंत यांचा “अप्सरा आली” हा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल अशी माहिती महिला उत्सव प्रमुख व मा. नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके, सौ.अक्षदा भेलके आणि सौ. कल्याणी खर्डेकर यांनी दिली.
वरील कार्यक्रम मोफत असून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना नाट्यगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच 8 ऑक्टोबर ला बालजत्रा, 9 ऑक्टोबर ला भोंडला आणि महिलांची महाआरती आणि तृतीयपंथीयांना साडी भेट, 11 व 12 ऑक्टोबर ला रासदांडिया आणि 16 ऑक्टोबर ला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे ही सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया एक्सप्रेसने पूर्ण केले AIX कनेक्टसोबतचे विलीनीकरण

एअर इंडिया समूहाच्या परिवर्तनाच्या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड

विलीनीकरणात दोन लो-कॉस्ट कॅरियर्समधील ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण, विमाने
हस्तांतरित करणे, कामकाजाच्या जोडीलाच सुरक्षा आणि देखभाल मान्यता यांचा समावेश
 एअर इंडिया समूह त्यांच्या ५ वर्षीय Vihaan.AI परिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून चार
विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेत

गुरुग्राम, : एअर इंडिया समूहाने एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि AIX कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड(पूर्वीचे एअरएशिया इंडिया) यांच्या कामकाज एकत्रीकरण आणि कायदेशीर विलीनीकरणाचे काम पूर्ण करून त्यातून एका मोठ्या लो-कॉस्ट कॅरियरची स्थापना झाली आहे.
विलीनीकरण झालेली संस्था ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ नावाखाली आणि एकत्रित एअरलाइन कोड IX
सह कार्यरत राहील. हा एअर इंडिया समूहाच्या परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून
त्यायोगे चार विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्यात येत आहे. जागतिक दर्जाची
विमानकंपनी म्हणून उभे राहण्यासाठी हा समूह सध्या विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण
करण्याच्या प्रक्रियेत आहे.
विमानकंपनीच्या रीफ्रेश ब्रँडच्या अनावरणानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एअर इंडिया
एक्सप्रेससाठीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यात विलीनीकरणासाठी सहाय्यक ठरणाऱ्या
ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण आणि एअर ऑपरेटर सर्टिफिकेट्स (AOCs) चे हस्तांतरण
समाविष्ट होते. अशा विलीनीकरणाच्या गुंतागुंतीमुळे, या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी आणि
सहाय्य करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सोबत जवळून काम
करणे आवश्यक होते. या विलीनीकरणाला नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MOCA), नागरी
विमान सुरक्षा ब्युरो (BCAS) आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांचे पाठबळ मिळाले.
मंगळवारी, DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त यांनी DGCA मुख्यालय, नवी दिल्ली येथे
एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह यांना अद्ययावत AOC सुपूर्द केले.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन
या कार्यक्रमाला उपस्थित होते.

DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबत
यशस्वी एकत्रीकरण आणि विलीनीकरण हे प्रशंसनीय आहे आणि विमान कंपन्यांच्या
विलीनीकरणासाठी एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात
मोठी विमानवाहतूक बाजारपेठ म्हणून भारताची वेगाने वाटचाल होत असताना एका मजबूत
नियामक व्यवस्थेची गरज आहे. या गुंतागुंतींच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण टप्पा साध्य करणे,
हे DGCA आणि ऑपरेटर अशा दोघांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतिक आहे.”
DGCA च्या फ्लाइट स्टँडर्ड्स डायरेक्टरेटने तयार केलेल्या लाईव्ह ट्रॅकरसह ही प्रक्रिया सुरळीत
होण्यासाठी देखरेख ठेवणाऱ्या समर्पित टीमने प्रगतीचा सातत्याने मागोवा घेण्यासाठी वेळेत
आव्हानात्मक कार्य पूर्ण करण्यास मदत केली.
एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह म्हणाले, “सुमारे वर्षभरापूर्वी आम्ही
AIX कनेक्ट आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही संस्थांना एका सामाईक ब्रँडच्या मागे आणत
त्यांच्या एकत्रीकरणास सुरुवात केली. त्याच वेळी, आम्ही आज दोन्ही संस्थांच्या कामकाज आणि
कायदेशीर विलीनीकरणात परिणत होणाऱ्या गुंतागुंतीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवर काम केले.
DGCA, BCAS, MoCA, AIX आणि ग्रुप लीडरशिप टीम आणि इतर अनेक सहकाऱ्यांमधील
सहयोगा या संपूर्ण प्रक्रियेच्या यशात महत्त्वाचा ठरला.”
एअर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया
एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबतचे
एकत्रीकरण हे एअर इंडियाच्या Vihaan.ai परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
विलीनीकरण झालेली संस्था भारताभोवती आणि आजूबाजूच्या प्रदेशात नवीन आणि अधिक
आकर्षक मूल्य उत्पादने शोधत असलेल्या विशेषत: देशातील महत्वाकांक्षी तरुण पिढीसाठी हवाई
प्रवासाची सेवा देईल. या विलीनीकरणानंतर विस्ताराचे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबर रोजी
विलीनीकरण होईल. DGCA च्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी
कार्यरत आहोत.”
विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, एअर इंडिया एक्सप्रेस भविष्यातील विकास आणि परिवर्तनाच्या
धोरणावर लक्ष केंद्रित करेल. विमानकंपनीच्या विमानांचा ताफा आतापर्यंत ८८ विमानांवर
पोहोचला आहे. त्यात दरमहा सुमारे चार नवीन विमानांची भर पडत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या
अखेरीस विमानांचा ताफा १०० विमानांचा आकडा ओलांडण्याची अपेक्षा असून विमानकंपनीचे
नेटवर्क भारत, आखाती प्रदेश आणि आग्नेय आशिया येथे पसरलेले आहे.

AIX कार्यरत असलेल्या मार्गांची संख्या ७४ वरून १७१ इतकी वाढली आहे आणि टाटा समूहाने
२०२२ च्या सुरुवातीला एअर इंडियाचे अधिग्रहण घेतल्यानंतर प्रवासी वाहतुकीत ४००% पेक्षा
जास्त वाढ झाली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये, एअरलाईनने एकत्रित ब्रँड ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ चे अनावरण केले.
त्यानंतर, AIX कनेक्टद्वारे चालवली जाणारी विमानसेवाही ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ ब्रँड अंतर्गत
सुरू असून त्यासाठी आवश्यक नियामक मान्यता घेण्यात आली आहे.

अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत -दादा गटाच्या मेळाव्यातला सूर

पुणे- एकीकडे मुंबईत अमित शहा यांनी आता मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि २०२९ ची निवडणूक भाजपा स्व बळावर लढेल असा सूर आवळला असताना दुसरीकडे पुण्यात मात्र दादा गटाच्या मेळाव्यात अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत असा प्रतिसूर उमटल्याने राजकीय वर्तुळात याविषयी औत्सुक्याचा विषय होतो आहे

अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा हॉटेल सेंट्रल पार्क येथे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यामध्ये पुणे शहरातील २५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विकासाच्या कामामुळे प्रभावित होऊन आणि आपल्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला.यावेळी सर्वात मोठी कार्यकारणी असलेल्या शहर कार्यकारणीवर १२५ पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक देखील करण्यात आल्या. यावेळी पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी जोमाने काम करू असा निर्धार केला. या मेळाव्याला पुणे शहरातील प्रदीप देशमुख , दत्ता सागरे , सदानंद शेट्टी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाजाला ‘दिला शब्द केला पूर्ण’

नवीन भूजल महामंडळ तात्काळ स्थापन करण्याचे आदेश

मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

चंद्रपूर,दि.०२- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. मच्छीमार बांधवांच्या उद्धारासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याची ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार रविवार, दि. ३० सप्टेंबरला मुंबई येथे अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी नवीन भुजल महामंडळ तात्काळ स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासोबतच मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मत्सव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र राज्य उपसचिव कि. म. जकाते, महाराष्ट्र राज्य मत्स्यउद्योग विकास धोरण समिती सदस्य अॅड. अमोल बावणे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार,प्रतिनिधी अमित चवले, रमेश सोनवणे, संस्थेचे प्रतिनिधी जितू टिंगूसले यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या तसेच माजी मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या तलावांमधून मत्स्यबीज व मासे वाहून गेले. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याची जाणीव शासनाला आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाला महामंडळ स्थापन करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मच्छिमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ना. श्री. मुनगंटीवार यांच्या आदेशांनंतर महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश ना. श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महामंडळाचे कार्यालय नागपुरात
महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा मच्छिमार समाज व त्यांच्या संस्थांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महामंडळ स्थापन झाल्यावर त्याचे कार्यालय नागपूर येथे असावे, अशी मागणी होती. त्याचा विचार करून ना. श्री. मुनगंटीवार यांनी नागपूरला कार्यालय ठेवण्याच्या सूचना केल्या. सर्वाधिक भुजल संस्था या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपुरात असणे आवश्यक आहे, असे मंत्री महोदयांनी म्हटले.

म्हणून महामंडळाची स्थापना
भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार आहे, याची जाणीव ना. श्री. मुनगंटीवार यांना आहे. त्याचदृष्टीने त्यांनी मासेमारी करणारा समाज व मत्स्य सोसायटी यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक तसेच व्यवसायिक जीवनमान उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

ना. मुनगंटीवार यांचे मानले आभार
ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील मासेमारी समाजात आनंदाचे वातावरण आहे. मासेमारी समाजाकडून ना. श्री. मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. तसेच समाजाकडून त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत.

बोटुकली खरेदीसाठी आर्थिक मदत
मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर मासेमारी संस्थेला प्रति हेक्टर १५०० किलो मत्स्य उत्पादन करणे अनिवार्य असल्याची अट रद्द करण्यात आली आहे. ‘बोटूकली’चे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ना. श्री. मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी शासनाकडून बोटूकली (मत्स्यबीज) खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यासोबतच नायलॉन सूत जाळे, डोंगे यांचे अनुदान सभासदांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे.

कर्जमाफीचा प्रस्ताव
मासेमारी संस्थेवर असणाऱ्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. जुलै २०२४ मध्ये अतीवृष्टीमुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाईबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला

पुणे-गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख – गायी मंचावर; सरकार गोठ्यात!

गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे.

अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते.

लाडक्या बहिणींनंतर मिंधे सरकारने गायींना राज्यमातेचा दर्जा द्यायचा निर्णय घेतला आहे. गाय ही यापुढे राज्यमाता-गोमाता असेल असे सरकारने जाहीर केले. निवडणुका जिंकण्यासाठी मिंधे सरकार काय उचापती करेल याचा नेम नाही. देवांना, गायींनाही राजकारणात आणून निवडणुकांना सामोरे जाण्याचा हा प्रकार हास्यास्पद आहे. किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा असे सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या सरकारला सुनावले. तिरुपती देवस्थानातील लाडूत चरबीयुक्त तूप मिसळले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते, ‘संवैधानिक पदावर असणाऱ्या लोकांनी तरी देवाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावर असता तेव्हा देवाला राजकारणापासून दूर ठेवावे असे अपेक्षित आहे.’ तिरुपतीच्या लाडवाच्या बाबतीत जे घडले तेच महाराष्ट्रात लाडक्या बहिणी व गोमातांच्या बाबतीत होत आहे. आपण ‘हिंदुत्ववादी’ आहोत हे दाखविण्यासाठी भाजप व त्यांचे लोक रोज प्रयत्न करतात. गायीस राज्यमाता म्हणण्याआधी भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांनी हिंदुहृदयसम्राट, वीर सावरकर यांचे गायीबाबतचे विचार समजून घ्यायला हवे होते. गाय ही ‘माता’ असलीच तर ती बैलाची, असे वीर सावरकर म्हणत. गाय हा एक उपयुक्त पशू आहे व उपयुक्त पशू म्हणूनच गायीकडे पाहायला हवे. गोमाता वगैरे थोतांड आहे. गाय शेतीसाठी कामास येते, गाय दूध देते, त्यावर अर्थकारण चालते हेच महत्त्वाचे, असे वीर सावरकर म्हणत व हिंदुत्वाच्या दृष्टीने त्यांचे हे विचार विज्ञानवादी होते. भाजप व मिंधे यांना शेंडी-जानव्याचे हिंदुत्व पुन्हा आणायचे आहे व तरुणांना नोकऱ्या, शिक्षण, आधुनिक विचार देण्याऐवजी गोठ्यात शेण काढायला राबवायचे आहे. पुन्हा गोमातेच्या बाबतीत

मोदी सरकारचा मुखवटा

आधीच साफ गळून पडला आहे. कारण मोदी काळातच गोमांसाची निर्यात वाढली. भारताची गोमांस म्हणजे बीफ निर्यात 216 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी झाली. म्हणजे मोदी काळात गोमातेच्या किंवा राज्यमातेच्या कत्तली जोरात सुरू असून त्या कत्तलींवर मोदी सरकारची अर्थव्यवस्था टिकून आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारताची बीफ निर्यात जास्त आहे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, न्यूझीलंड हे बीफ निर्यात क्षेत्रातील अग्रगण्य देश आहेत. त्यामुळे भाजपचे ‘राज्यमाता’ प्रकरण हा निवडणुकीचा जुमला आहे. भाजपशासित बहुतेक सर्व राज्यांत गोमांस विकले जाते व खाल्ले जाते. गोवा, ईशान्येकडील राज्यांत गोमांस हे मुख्य अन्न असून तेथे भाजपची सरकारे आहेत. जगाच्या गोमांस निर्यात व्यापारात भारताचा वाटा 23 टक्के आहे. 24 लाख टन गोमांस प्रत्येक वर्षी निर्यात होते. मोदी सत्तेवर आल्यावर 2014-2015 साली भारत गोमांस निर्यातीत जगातला पहिल्या क्रमांकाचा देश बनला. मुख्य म्हणजे बीफ निर्यात करणाऱ्यांत अनेक नामवंत कॉर्पोरेट कंपन्या आहेत व या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. गोमांस बाळगण्याच्या आरोपांवरून एका बाजूने माथेफिरू टोळक्यांनी मुसलमानांवर हल्ले करायचे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करायचे व त्याच वेळेला त्यांच्याच सरकारने आणि पक्षाने गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून निवडणुकीसाठी निधी घ्यायचा असे प्रकार मोदी राजवटीत नेहमीच घडत आले आहेत. मुळात गायींचे संवर्धन हा विषय कृषी व माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. गायींना वैदिक काळापासून माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदातही गायीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, पण महाराष्ट्रासह देशातील

गोशाळांची अवस्था

नेमकी काय आहे? त्यांचे संवर्धन, चारापाणी नीट होते काय? गोमाता म्हणायचे व गायींनी चारापाण्याशिवाय तडफडायचे असे सध्याचे चित्र आहे. मुळात देशी गायी कमी दूध देतात व या गायींच्या दुधाला भाव नाही. त्यामुळे देशी गायी शेतकरी पुटुंबाला परवडत नाहीत. गायीइतकीच म्हैसही उपयुक्त आहे. गायी, म्हशी, शेळय़ा, मेंढय़ा असे प्राणी मानवासाठी महत्त्वाचे आहेत. भारताच्या दुग्ध विकासात व त्याबाबतच्या अर्थव्यवस्थेत या प्राण्यांना महत्त्व आहे. आता गायी म्हाताऱ्या होतात, त्या दूध देत नाहीत, शेतकरी त्यांचे पालनपोषण करू शकत नाहीत, अशा भाकड गायींचे करायचे काय? या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही. गोवंशहत्या नाही हे धोरण ठीक, पण ते देशभरात लागू नाही. गायींना नुसते ‘राज्यमाता’ वगैरे म्हणण्यापेक्षा सरकारने म्हाताऱ्या भाकड गायी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या पाहिजेत व राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने या भाकड गायींसाठी मरेपर्यंत विशेष व्यवस्था करायला हवी. ‘राज्यमातां’चा भार शेतकऱ्यांवर टाकू नका. आधीच शेतकऱ्यांची अवस्था भाकड गायी, बैलांप्रमाणे झाली आहे. अशा वेळी शेतकरी भाकड गायींचे पालनपोषण करणार तरी कसे? त्याबाबत काही उपाय करण्याऐवजी राज्यकर्ते गायींना ‘राज्यमाता’ वगैरे दर्जा देऊन जुमलेबाजी करण्यात मग्न आहेत. गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते.

मेट्रो स्टेशनवर पार्किंग स्टेशन निर्माण करण्याची जबाबदारी महापालिकेची आमची नाही -मेट्रोने हाथ झटकले

पुणे-प्रत्येक मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याची राष्ट्रवादीच्या पुणे अर्बन सेल तर्फ़े मागणी केली असता सदर जबाबदारी मेट्रो प्रशासनाची नसून पुणे महापालिकेची असल्याचे सांगत मेट्रो प्रशासनाने हाथ झटकून महापालिकेकडे बोट दाखविल्याचे अर्बन सेलचे शहर अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे .

दुधाने यांनी म्हटले आहे कि,’ आजमितीस पुणे शहरात मेट्रोचा विकास होत असताना मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे, क्रमप्राप्त आहे. काल सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये पार्किंग करिता दुचाकीसाठी प्रति तासासाठी १५ रुपये, तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी ३५ रुपये आकार घेतला जात होता. ही नागरिकांची लूट महामेट्रोने वेळीच थांबवली आहे. तरी या निमित्ताने पुणे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे सर यांची काल प्रत्यक्ष भेट घेऊन पुणे अर्बन असेल तर्फे काही माग महत्त्वाच्या नागरिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मागण्या पुणे अर्बन असेल तर्फे करण्यात आल्या.

मेट्रो स्टेशनवर मेट्रो प्रवाशांसाठी २५% सवलत असून सदर सवलत ५०% करण्यात यावी, अशी मागणी पुणे अर्बन सेलचे सभासद श्री. मदन वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच हस्ते पुणे अर्बन सेलच्या माध्यमातून करण्यात आली. अनेक नागरिकांची घरे आणि मेट्रो स्टेशन यातील अंतर अधिक असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असून याचसह पार्किंग सुविधा कमी खर्चात उपलब्ध असणेही आवश्यक आहे. पार्किंगचा मेट्रो विभागाने ठरविलेला ७.५० रुपये प्रतितास खर्चाचा मेळ घातला असता प्रतिव्यक्ती नागरिंकाचा कामाचा ८ तास गृहीत धरल्यास ६० रुपये खर्च येतो. पार्किंग शुल्क अधिक मेट्रो टिकिट आणि खाजगी वाहनांचा खर्च यातील फरका मधे वाहनांचा खर्च नगण्य असल्यास नागरिकांकडून याचा वापर होणे शक्य नाही, ही बाब यावेळी मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. याचसह प्रत्येक मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली असता सदर जबाबदारी मेट्रो प्रशासनाची नसून पुणे मनपाची असल्याचे सांगत मेट्रो प्रशासनाने मनपाची आणखी एक जबाबदारी प्रकाशात आणली.

सदर जबाबदारी पुणे मनपाची असल्याचे नागरिकांना ठाऊक नसून मनपाकडूनही यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही. भविष्यात मनपातर्फे सार्वजनिक वाहतूक आणि ठिकठिकाणी सार्वजनिक पार्किंग व्यवस्था यावर अधिक लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असून त्या अनुषंगाने काम करावे पुणे अर्बन सेल द्वारे मागनी करण्यत आली आहे.
याप्रसंगी पुणे शहर अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, अर्बन सेलमधील युसूफजी शेख, नवनियुक्त कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी उपस्थित होते.

पुण्यात पुन्हा कोसळले हेलिकॉप्टर : तिघांचा मृत्यू

शहरातून हेलीकॉप्टर जाते म्हटले कि आता वाटेल भीती …

पुणे – बावधन येथे आज बुधवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक अभियंता होता. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. बावधन येथील केके कन्स्ट्रक्शन हिलजवळ सकाळी 6.45 च्या सुमारास ही घटना घडली. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जात होते. त्या आधीच हा अपघात घडला.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला घेऊन जाणार होते. या हेलिकॉप्टरमधून सुनील तटकरे प्रवास करत होते. बुधवारी सुनील तटकरे यांना घेण्यासाठी पुण्याहून मुंबईला जात असताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित गटाचे रायगडचे खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. हेलिकॉप्टरने मुंबईत आले असते, तर तटकरे मुंबईहून पुण्याला जाणार होते. पण, पुण्याहून उड्डाण घेतल्यानंतर ते कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सच्या हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. टेकऑफनंतर सुमारे 10 मिनिटांनी हेलिकॉप्टर 1.5 किमी अंतरावर कोसळले. डोंगराळ भागात हा अपघात झाला. सकाळी तिथे दाट धुके होते.

अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही. घटनेनंतर लगेचच बचावकार्यासाठी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळतात पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले तो रहिवासी भाग नसल्याने मोठी दुर्गघटना टळली. हेलिकॉप्टरमध्ये तिघे प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे प्रवासी कोणत्या दिशेने जात होते, याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही.गेल्या महिन्यात 24 ऑगस्ट रोजी देखील पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली होती. मुंबईमधील ग्लोबल या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. यामध्ये पायलटसह तीन प्रवाशी होते. या घटनेचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केली होती. मुंबईतील ग्लोबल कंपनीचे AW 139 या हेलिकॉप्टर होते. या अपघातामध्ये कॅप्टन आनंद यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले धीर भाटिया, अमरदीप सिंग, एसपी राम हे जखमी झाले होते. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हवण्यात आले होते.

इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला, नेतन्याहू म्हणाले, ‘इराणनं मोठी चूक केलीय, भरपाई करावी लागेल’

बायडेन म्हणाले- इराणचा हल्ला फसला-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंगळवारी रात्री सांगितले की, अमेरिकन सैन्य इस्रायलचे संरक्षण करेल. ते म्हणाले की, सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, आतापर्यंत आम्हाला कळले आहे की इराणचा हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

इराणने आपल्यावर मिसाईल हल्ला केला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणने त्यांच्यावर जवळपास 180 मिसाईल्स डागले आहेत. यातील बहुतांश मिसाईल्सना चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहितीही इस्रायलने दिली आहे.मिसाईल्सच्या या अखंड भडीमारामध्ये पश्चिम किनारपट्टीवरील एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे; तर मध्य इस्रायलमधील एका शाळेचं आणि तेल अव्हीव्हमधल्या एका रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, “इराणने आजच्या रात्री फार मोठी चूक केली आहे. त्याला याची भरपाई करावी लागेल.”गेल्या काही दिवसांपासून इस्रायल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलच्या लष्कराने प्रत्यक्ष जमिनीवरुनही लेबनॉनवर आक्रमण केलं. आपलं हिजबुल्लाह विरोधातील हे मैदानी आक्रमण ‘लिमीटेड, लोकलाईझ्ड आणि टार्गेटेड’ असेल, असेही इस्रायलने स्पष्ट केले होते.

दुसऱ्या बाजूला संयुक्त राष्ट्रांनी तसेच युरोपियन संघाने युद्धविरामसाठीचे आवाहन केलं आहे.
इराणने इस्रायलवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्रं डागली. इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं इराणनेही मान्य केले.त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला. संपूर्ण इस्रायलभर सायरन वाजत होते.

इराणच्या सरकारी माध्यमांनी एक निवेदन देऊन सांगितले की, IRGC ( इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) ने इस्रायलवर डझनाहून अधिक क्षेपणास्त्रं डागली आहेत. जर या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर आणखी हल्ला तीव्र केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.जुलै महिन्यात हमासचे नेते इस्माईल हानिये, हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरात ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे IRGC ने म्हटले आहे.इराणने इस्रायलच्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केले, याची विस्तृत माहिती नंतर देण्यात येईल असे IRGC ने सांगितले.

इस्रायल संरक्षण दलाने सांगितले आहे की आता हे हल्ले थांबले आहेत. या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झाली असल्याचे अद्याप तरी आम्हाला माहीत नाही. हा हल्ला आम्ही योग्यरीत्या हाताळला असे इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.

भारताच्या इस्रायलमधील दुतावासाने तेथे राहाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. यानुसार इस्रायलमध्ये राहाणाऱ्या भारतीयांना सतर्क राहाणाऱ्याचे आणि संरक्षण नियमावलीचे पालन करण्यास सुचवले आहे.भारतीयांनी कोणताही अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित आश्रयस्थानी थांबावे असे यात म्हटले आहे. तेथिल स्थितीवर आपलं सतत लक्ष असून भारतीय दुतावास इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असं यात नमूद केलं आहे.भारतीय नागरिकांनी दुतावासाशी तात्काळ संपर्क साधावा आणि स्वतःची नोंद करावी असं सांगितलं आहे. दुतावासाने +972-547520711, 543278392 या हेल्पलाईनही सुरू केल्या आहेत.

अबब.. चाकण मधून ५० कंपन्यांचे परराज्यात स्थलांतर…महिंद्रा, मर्सिडीज बेंझसह जागतिक कंपन्या म्हणतात आता पुणे नको रे बाबा

पुणे-चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा मिळत नाहीत, तसेच सततची होणारी वाहतूककाेंडीमुळे महिंद्रा, ब्रिजस्टोन, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, बॉश यांच्यासह अनेक जागतिक पातळीवरील कंपन्यांना आता पुणे नकोसे झाले आहे.ऑटोमोबाइल हबमधून कंपन्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीची कोंडी, कचऱ्याचे ढिग, खड्डे , अनधिकृत बांधकामे आणि त्यांना मतांसाठी मिळणारे संरक्षण,प्रदूषण , जल प्रदूषण,वाढत्या गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचा आसरा, विजेचा सातत्याने होणारा लपंडाव अशी यामागील कारणे असल्याचे स्पष्ट सांगितले जात आहे.

चाकण एमआयडीसी पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सरकारी यंत्रणांकडून बैठका घेण्याशिवाय कोणतीच पावले उचलली जात नाहीत. यामुळे आतापर्यंत चाकण एमआयडीसीतील सुमारे ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर द्वीट करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

पुण्यातही आयटीयन्सही वैतागले असून याबाबत एक किस्सा सांगितला जातो आहे काही दिवसांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय कंपनी पुण्यात येण्यास इच्छुक होती. कंपनीची मंडळी पुण्यात आली. सकाळी विमानतळावर उतरल्यानंतर कारने खराडी येथील आयटी पार्क पाहिले त्यानंतर ते पुन्हा हिंजवडीला जाण्यासाठी निघाले. खराडी-हिंजवडी हे अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल साडेचार तास लागले. खराब रस्ते अन वाहतुक काेंडीमुळे संबंधित कंपनीचे लोक पुन्हा पुण्यात फिरकलेच नाही. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुककोंडीमुळे नव्या तर येतच नाहीत पण इथे असलेल्या कंपन्याही इतर राज्यात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर हाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महिंद्रा, ब्रिजस्टोन, मर्सिडीज बेंझ,फोक्सवॅगन, बॉश यांच्यासह अनेक जागतिक पातळीवरील कंपन्या कार्यरत आहेत, परंतु येथील औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी अपुरे आणि अरुंद असलेले रस्त्यांचे जाळे आहे. त्याच महामार्गांवर सतत होणारी वाहतूककोंडीमुळे कारखानदारी तोट्यात जात आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात उच्चस्तरीय बैठक घेऊन सबंधित विभागांना उद्योगजकांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचित करण्यात आले होते. मात्र, या सूचनेला विभागांनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसत आहे.

पायाभूत सुविधांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या येथून इतर राज्यांत जात आहेत. सतत होणारी वाहतूककोंडी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही रस्त्यांचे नूतनीकरण सुरू आहे, परंतु अत्यंत संथ गतीने. यामुळे रस्त्यांमुळे वाहतूककोंडीसह अपघात वाढले आहेत. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. अवजड वाहतूक सकाळी आणि संध्याकाळी अशी सहा तास बंद करण्यात आल्याने कंपन्यांना कच्चा माल वेळेवर मिळण्यास आणि तयार उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यास उशीर होत आहे. याबाबत उद्योजक संघटनांकडून वारंवार तक्रारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंळाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका होऊनही कोणतीही प्रगती होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

चाकण एमआयडीसीमधील कोणत्याही रस्त्यांवरून प्रवास केला, तर रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिग पाहायला मिळेल. एमआयडीसीचे कचरा व्यवस्थापन धोरण केवळ कागदावर आहे की काय, असा प्रश्न हा येथील कचरा पाहून होत आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे सांडपाण्यासह केमिकल युक्त दूषित पाणी जमिनीत खोल खड्डे घेऊन जिरवण्यात येत असल्याने परिसरातील विहिरी, ओढे, भामा नदी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे, परंतु याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाकण एमआयडीसी माथाडी आणि कामगार पुरवठा करणारे ठेकेदार यांच्याकडून सतत कंपनी अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण होत असल्याच्या असंख्य घटना आजवर उघडकीस आल्या आहेत, परंतु त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे उद्योजक खासगीत बोलत आहेत. वाढत्या गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप याला कारणीभूत ठरत आहे.

वाहतूककोंडी, कचरा व्यवस्थापन, वीज, वाढती गुन्हेगारी आणि पाणी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने चाकणमधील ५० कंपन्या परराज्यांत स्थलांतरित झाल्या आहेत. याचबरोबर आताही अनेक कंपन्या परराज्यांत जागा शोधत आहेत. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूककोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास कोंडला आहे. कोंडीमुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात दररोज दोन ते तीन तासांचा वेळ वाया जात असून, उत्पादकतेला फटका बसत असल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजकडून सांगण्यात आले आहे.

निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री भाजपचाच… २०२९ ला भाजपा स्वबळावर

मुंबई -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.आता निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच असेल, अमित शाहांनी स्पष्ट केले आणि अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. यावेळी महाराष्ट्रात महायुतीच सरकार येईलच, परंतु 2029 साली आपल्याला एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे, असेही शाह म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असे आवाहन यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना केले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्र जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अमित शाहांचा हा सलग दोन आठवड्यातला दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा विश्वास दिला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच – अमित शाह

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, ‘महायुतीला रोखण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही. 2024 मध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच असेल असेही अमित शहा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू असेही यावेळी बोलताना अमित शहा यांनी सांगितले.

देशाची दिशा आणि दशा बदलणारी निवडणूक- शाह

यावेळी बोलताना अमित शाह यांनी तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी सलग तीन वेळा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा आणि दशा बदलणारी निवडणूक आहे. ही निवडणूक महायुतीच जिंकणार आहे. निवडणुकीमध्ये पूर्ण उत्साहाने काम करा आणि मतदान वाढवा. 10 टक्के मते वाढल्यास भाजपच्या जागा किमान 20 ते 30 पर्यंत वाढू शकतात. नगरसेवक, आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक बूथवर 10 कार्यकर्ते ठेवा जे दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत बुथच्या कक्षेत फिरत राहतील. तसेच इतर पक्षातील लोक पक्षात आले तरी कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि सन्मान मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

राज्यात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आता वर्षाला ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई, दि. १ : शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्री कालावधीत मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली अशा एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस करीता प्रवेश मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे. आता राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आता वर्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्यमंत्री यांच्याही सहकार्यामुळे राज्यात कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली.

या १० महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत १० महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहे.

५.७९ कोटींचा GST घोटाळाकरणाऱ्या सुशील तिवारी ला अटक-प्रेरणा देशभ्रतारांची धडक कारवाई

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सुशील हरिराम तिवारी वय ३८, या व्यक्तीस १ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याचे  राज्य कर उप आयुक्त तपास – जीएसटी भवन, माझगाव, मुंबई, यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मे. सेफ क्लाइम्बर या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून रू.५.७९ कोटींचा चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट वापरून शासनाची महसुल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी या आरोपीला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त आणि संजय शेटे, राज्यकर उपायुक्त, अन्वेषण, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब शिंदे व नामदेव मानकर, सहायक राज्यकर आयुक्त, अन्वेषण -अ, मुंबई यांनी राबवली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्वाचे योगदान राहीले आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

ज्येष्ठ नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार जाहीर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

मुंबई,दि.१:- दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.सन २०२२-२३ या वर्षातील कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

या पुरस्कारासाठी गठीत केलेल्या शोध समिती बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, कला संचालक राजीव मिश्रा,संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभला असून राज्यातील कलाकारांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेचे लौकिक प्राप्त केले आहे. दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणारे नामवंत कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्याने या पुरस्काराची अधिक उंची वाढेल.अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.