पुणे- एकीकडे मुंबईत अमित शहा यांनी आता मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि २०२९ ची निवडणूक भाजपा स्व बळावर लढेल असा सूर आवळला असताना दुसरीकडे पुण्यात मात्र दादा गटाच्या मेळाव्यात अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत असा प्रतिसूर उमटल्याने राजकीय वर्तुळात याविषयी औत्सुक्याचा विषय होतो आहे
अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा हॉटेल सेंट्रल पार्क येथे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यामध्ये पुणे शहरातील २५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विकासाच्या कामामुळे प्रभावित होऊन आणि आपल्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला.यावेळी सर्वात मोठी कार्यकारणी असलेल्या शहर कार्यकारणीवर १२५ पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक देखील करण्यात आल्या. यावेळी पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी जोमाने काम करू असा निर्धार केला. या मेळाव्याला पुणे शहरातील प्रदीप देशमुख , दत्ता सागरे , सदानंद शेट्टी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.