पुणे-प्रत्येक मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याची राष्ट्रवादीच्या पुणे अर्बन सेल तर्फ़े मागणी केली असता सदर जबाबदारी मेट्रो प्रशासनाची नसून पुणे महापालिकेची असल्याचे सांगत मेट्रो प्रशासनाने हाथ झटकून महापालिकेकडे बोट दाखविल्याचे अर्बन सेलचे शहर अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे .
दुधाने यांनी म्हटले आहे कि,’ आजमितीस पुणे शहरात मेट्रोचा विकास होत असताना मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे, क्रमप्राप्त आहे. काल सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये पार्किंग करिता दुचाकीसाठी प्रति तासासाठी १५ रुपये, तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी ३५ रुपये आकार घेतला जात होता. ही नागरिकांची लूट महामेट्रोने वेळीच थांबवली आहे. तरी या निमित्ताने पुणे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे सर यांची काल प्रत्यक्ष भेट घेऊन पुणे अर्बन असेल तर्फे काही माग महत्त्वाच्या नागरिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मागण्या पुणे अर्बन असेल तर्फे करण्यात आल्या.
मेट्रो स्टेशनवर मेट्रो प्रवाशांसाठी २५% सवलत असून सदर सवलत ५०% करण्यात यावी, अशी मागणी पुणे अर्बन सेलचे सभासद श्री. मदन वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच हस्ते पुणे अर्बन सेलच्या माध्यमातून करण्यात आली. अनेक नागरिकांची घरे आणि मेट्रो स्टेशन यातील अंतर अधिक असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असून याचसह पार्किंग सुविधा कमी खर्चात उपलब्ध असणेही आवश्यक आहे. पार्किंगचा मेट्रो विभागाने ठरविलेला ७.५० रुपये प्रतितास खर्चाचा मेळ घातला असता प्रतिव्यक्ती नागरिंकाचा कामाचा ८ तास गृहीत धरल्यास ६० रुपये खर्च येतो. पार्किंग शुल्क अधिक मेट्रो टिकिट आणि खाजगी वाहनांचा खर्च यातील फरका मधे वाहनांचा खर्च नगण्य असल्यास नागरिकांकडून याचा वापर होणे शक्य नाही, ही बाब यावेळी मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. याचसह प्रत्येक मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली असता सदर जबाबदारी मेट्रो प्रशासनाची नसून पुणे मनपाची असल्याचे सांगत मेट्रो प्रशासनाने मनपाची आणखी एक जबाबदारी प्रकाशात आणली.
सदर जबाबदारी पुणे मनपाची असल्याचे नागरिकांना ठाऊक नसून मनपाकडूनही यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही. भविष्यात मनपातर्फे सार्वजनिक वाहतूक आणि ठिकठिकाणी सार्वजनिक पार्किंग व्यवस्था यावर अधिक लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असून त्या अनुषंगाने काम करावे पुणे अर्बन सेल द्वारे मागनी करण्यत आली आहे.
याप्रसंगी पुणे शहर अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, अर्बन सेलमधील युसूफजी शेख, नवनियुक्त कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी उपस्थित होते.