Home Blog Page 6

माणवत मर्डर्स’ – उलगडणार एक थरारक रहस्य!

२२ जूनपासून रात्री १०.१५ वाजता सोनी मराठीवर!

कौटुंबिक भावना, नात्यांची गुंतागुंत, विनोद आणि प्रेरणादायी कथांनंतर आता सोनी मराठी प्रेक्षकांना रहस्य आणि थराराच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्यास सज्ज झाले आहे. ‘माणवत मर्डर्स’ ही बहुप्रतीक्षित मालिका २२ जूनपासून दररोज रात्री १०.१५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली ‘माणवत मर्डर्स’ ही मालिका एका गावात घडणाऱ्या गूढ आणि धक्कादायक हत्यांच्या मालिकेभोवती फिरते. प्रत्येक नवीन हत्येसोबत उलगडत जाणारे रहस्य, समोर येणारे अनपेक्षित धागेदोरे आणि सत्याच्या शोधासाठी सुरू असलेला तपास प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणार आहे. मानवी स्वभावातील गुंतागुंत, भीती, लोभ, संशय आणि भावनिक संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण या मालिकेची खासियत ठरणार आहे.

या मालिकेचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे तिची दमदार स्टारकास्ट. आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आणि किशोर कदम यांसारखे गुणी कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे कथानकातील रहस्य, नाट्य आणि भावनिक संघर्ष अधिक परिणामकारकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. ‘माणवत मर्डर्स’ या मालिकेचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले असून, सत्य घटनांवर आधारित या रहस्यमय कथेला त्यांनी प्रभावी आणि वास्तववादी शैलीत साकारले आहे. तपशीलवार मांडणी, उत्कंठा कायम ठेवणारी कथनशैली आणि वास्तवाला धरून केलेले सादरीकरण यामुळे ही मालिका प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.

‘माणवत मर्डर्स’ ही मालिका रहस्य आणि थराराने भरलेली एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. प्रत्येक भागासोबत कथानकात नवे वळण येते, नवे प्रश्न निर्माण होतात आणि सत्याच्या शोधाचा प्रवास अधिक रोमांचक होत जातो. त्यामुळे प्रत्येक भागाच्या शेवटी पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात कायम राहते.

मालिकेची वास्तववादी मांडणी आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय हे तिचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कथेतील प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक व्यक्तिरेखा वास्तवाशी जोडलेली वाटते. यामुळे कथानक अधिक विश्वासार्ह आणि प्रभावी बनते. त्याचबरोबर ही मालिका केवळ गुन्ह्यांच्या तपासापुरती मर्यादित न राहता मानवी मनातील विविध भावभावना, मानसिक संघर्ष आणि व्यक्तींच्या कृतीमागील कारणांचा वेध घेते. उत्कृष्ट निर्मितीमूल्ये, उत्कंठावर्धक कथानक आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे ‘माणवत मर्डर्स’ ही मालिका रहस्यप्रधान कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक विशेष पर्व ठरणार आहे.

माणवत मर्डर्स बद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाल्या,

“मानवत मर्डर्स’मधील रुक्मिणी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाईल. गावात घडणाऱ्या धक्कादायक घटनांमध्ये तिचं आयुष्यही गुंतत जातं आणि त्यातून अनेक अनपेक्षित सत्यं समोर येऊ लागतात. या कथेत प्रत्येक व्यक्ती काहीतरी लपवत असल्यासारखी वाटते, त्यामुळे प्रेक्षकांचा संशय सतत एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वळत राहील. प्रत्येक भागात नवे धागेदोरे, नवी रहस्यं आणि धक्कादायक वळणं उलगडत जात असल्यामुळे प्रेक्षकांना पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहणार आहे. ‘मानवत मर्डर्स’ ही केवळ गुन्हेगारी कथा नाही, तर मानवी नातेसंबंध, भावना आणि सत्याच्या शोधाचा थरारक प्रवास आहे. २२ जूनपासून दररोज रात्री १०.१५ वाजता सोनी मराठीवर हा रहस्यमय प्रवास नक्की अनुभवा.”

माणवत मर्डर्स बद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले,

“माणवत मर्डर्स’मध्ये मी साकारत असलेली रमाकांत कुलकर्णी ही व्यक्तिरेखा सत्याचा शोध घेण्याच्या ध्यासाने झपाटलेली आहे. गावाला हादरवून सोडणाऱ्या या रहस्यमय घटनांमागचे सत्य उलगडण्याचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांना प्रत्येक भागासोबत अधिकाधिक गुंतवून ठेवेल. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे नवे धागेदोरे समोर येतात, संशयाची दिशा बदलते आणि प्रत्येक पात्राभोवतीचे गूढ अधिक गडद होत जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातही सतत प्रश्न निर्माण होतील—खरा गुन्हेगार कोण, या घटनांमागचे कारण काय आणि नेमके कोणावर विश्वास ठेवायचा? अनेक अनपेक्षित वळणं, धक्कादायक खुलासे आणि उत्कंठावर्धक घटनांमुळे ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. रहस्य आणि थरार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘माणवत मर्डर्स’ हा एक वेगळाच अनुभव ठरू शकेल.”

रहस्य उलगडत जाईल, प्रश्न वाढत जातील आणि सत्य समोर येताना प्रत्येक क्षणी थरार अनुभवायला मिळेल. एका गावाला हादरवून सोडणाऱ्या हत्यांच्या मालिकेमागचे गूढ उलगडताना प्रेक्षकांना उत्कंठा, भावनिक संघर्ष आणि तपासाचा रोमांचक प्रवास अनुभवता येणार आहे.

पुण्यात 500 मुलांसोबत पार पडले स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून योगसत्र

0

विद लव्ह एनजीओ आणि एपिफनी स्कूलसोबत 500 मुलांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

पुणे,: आरोग्य आणि समावेशकतेचा संदेश देत विद लव्ह एनजीओने एपिफनी स्कूलच्या सहकार्याने 19 जून रोजी वंचित समुदायातील 500 मुलांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले.

योग मॅट्स नसतानाही मुलांनी चादरी आणि टॉवेल्स अंथरून संपूर्ण उत्साहाने आणि मनापासून योग केला. यामुळे एक महत्त्वाचा संदेश मिळाला की योगासाठी साधनांपेक्षा इच्छाशक्ती, सहभाग आणि सकारात्मक मनोवृत्ती अधिक महत्त्वाची असते.

या कार्यक्रमात मुलांनी उत्साहाने योगासने, प्राणायाम, ध्यान आणि बजाज प्लँकथॉनपासून प्रेरित #100SecondsPlankTogether या उपक्रमात सहभाग घेतला.

“500 Children. One Breath. One Future.” या संकल्पनेखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक मुलाला आरोग्य, आत्मविश्वास आणि आशा मिळण्याचा समान हक्क आहे, हा संदेश देणे हा होता.

विद लव्ह एनजीओच्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या, “आजचा दिवस केवळ योगाचा नव्हता, तर तो आपलेपणाचा उत्सव होता. 500 मुलांना एकत्र योग करताना, हसताना आणि सहभागी होताना पाहणे म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी संधी मिळायला हवी, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण होता.”

एपिफनी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता कदम म्हणाल्या, “असे कार्यक्रम केवळ तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून मुलांसाठी सुंदर आठवणी निर्माण करतात, चांगल्या सवयी रुजवतात आणि त्यांना विशेष व महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देतात.”

या कार्यक्रमाने एपिफनी स्कूलमधील अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजांकडेही लक्ष वेधले. ही मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येतात. अनेकांच्या कुटुंबांवर गरीबी, गुन्हेगारी, मद्यपान आणि कठीण जीवनस्थितीची छाया आहे. काही मुलांचे संगोपन एकल पालक करत असून ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आयोजकांनी व्यक्ती, कुटुंबे, संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला शालेय फी, गणवेश, वह्या, शालेय साहित्य आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार, पुस्तकं आणि क्रीडा साहित्य वाटप तसेच प्रत्येक मुलाला शिकण्याची, वाढण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळावी, या सामूहिक संकल्पाने झाला.

विद लव्ह एनजीओ विषयी:

 विद लव्ह एनजीओ ही पुणेस्थित स्वयंसेवी संस्था असून शिक्षण, आरोग्य, स्वयंसेवा आणि प्रेमळ कृतींच्या माध्यमातून मुलं आणि समुदायांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१००० सूर्यनमस्कारचे उदिष्ट पूर्ण – धीरज घाटे

पुणे :-
अंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम पूर्ण केला
या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने करण्यात आलेले होते

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून पाठिंबा मिळाला योगामुळे केवळ शरीरच तंदुरुस्त राहत नाही तर मन देखील शुद्ध व तंदुरुस्त राहते या उपक्रमासाठी पुण्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरांमध्ये दिनांक 21 जून रोजी अनेक ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याची सुरुवात आज झाली’
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,क्रीडा भारतीचे प्रदेश अध्यक्ष विजय पुरंदरे, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका प्रियांका शेंडगे, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस दीपक पोटे सुशील मेंगडे नामदेव माळवदे, लक्ष्मण आरडे,प्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष आनंद पाटील श्रीमती अनुराधा एडके यांनी केले

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी व पुणे काँग्रेसच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांचा वाढदिवस इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने साजरा.

0

पुणे :-
काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुजी गांधी व पुणे काँग्रेस च्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या वाढदिवस इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचे गौरव ग्रंथाच्या १०० प्रती ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांनी भेट दिल्या व त्यानंतर केक कापण्यात आला.
यावेळी दीप्ती चवधरी म्हणाल्या की, “इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय येथे विविध पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये साहित्यिक, राजकीय आणि विचारवंत व महापुरुषांच्या जीवनातील पुस्तके वाचकांना वाचण्यासाठी सुविधा केली आहे. गेल्या तीन दशकांपासून ग्रंथालयाचा लाभ कार्यकर्ते व नागरिकांना होत आहे. ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांनी अथक परिश्रम घेऊन या पुस्तकांचे संग्रह या ठिकाणी उपलब्ध करू दिले आहेत. आज त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ ऐवजी ग्रंथ भेट देवून माझा सत्कार होत आहे ही बाब माझ्यासाठी फार अभिमानाची आहे. इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयाने असेच पुढेही सामान्य जनतेसाठी विविध पुस्तके व ग्रंथ उपलब्ध करून द्यावीत.”
यावेळी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांतदा जगताप हे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, राजाभाऊ कदम, सुरेश नांगरे, विक्रम शहाणे, नाना भेगडे, एम. एम. फुलगावकर, प्रफुल ढोबळे आदी उपस्थित होते.

पत्रकार विद्याधर कुलकर्णी,विजय जगताप,सागर आव्हाड यांना बालगंधर्व पुरस्कार,अशोककुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन महोत्सव ;-२४, २५ व २६ जून २०२६ रोजीसाजरा होणार

पुणे : पत्रकार विद्याधर कुलकर्णी-(लोकसत्ता) , सागर आव्हाड – (साम टीव्ही) तसेच पत्रकार विजय जगताप – (पुणे वार्ता) यांना आता ‘बालगंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात तब्बल ६५ वर्षे उल्लेखनीय योगदान देणारे ‘मेलडी मेकर्स’चे निर्माते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच तमाशा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आला असे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत,बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव दि. २४, २५ व २६ जून २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने आणि दिमाखात साजरा केला जातो अशी माहिती बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अलविरा मोशन एंटरटेन्मेंट च्या संचालिका दिपाली कांबळे,पराग चौधरी,चित्रसेन भवार,मंदार जोशी,अरुण गायकवाड,शशिकांत कोठावळे आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ एक वास्तू नसून महाराष्ट्रातील कलाकारांच्या भावना, संस्कार आणि कलासाधनेचे केंद्र आहे. महाराष्ट्रातील नाटक, तमाशा, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, मराठी वाद्यवृंद, कलापथक, शाहिरी, झाडीपट्टी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, जादूगार, भारूड आदी विविध कलाप्रकारांतील कलाकारांना एकत्र आणणारा हा महोत्सव राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो.

तसेच या तीन दिवसीय महोत्सवात राज्यभरातील विविध कलाक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०२ कलाकारांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. लावणी, लोकधारा, जादूचे प्रयोग, ऑर्केस्ट्रा, तमाशा तसेच इतर विविध लोककला आणि सांस्कृतिक कलाप्रकारांतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक पुनीत बालन, भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, काँग्रस चे जेष्ठ नेते उल्हासदादा पवार,अलविरा मोशन एंटरटेन्मेंट च्या संचालिका दिपाली कांबळे तसेच डॉ. संजय चोरडिया उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि मान्यवर कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.

पाणी बचाव मोहिमे द्वारे पुणेकरांना पाणी बचतीचे आवाहन

पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग चा उपक्रम

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने आज फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात “पाणी बचाव मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेत  बिटिया फौंडेशन‌ व‌ गुलाबो गॅंगच्या अध्यक्षा संगिता तिवारी ,मा.  मकरंद  टिल्लू, पुण्याचे  नेते व‌ माजी महापौर  अंकुश काकडे, झाशीची  राणी संस्थेच्या अध्यक्षा  रुपाली  पाटील ठोंबरे , माजी उपमहापौर मुकारी अण्णा  अलगुडे तसेच गौरव  गिरीश  बापट ,शोभा पणीकर, भारती लोंढे यांनी सहभाग नोंदवून   पुणेकर नागरिकांना पाणी बचतीचा संदेश दिला.

सध्या खडकवासला धरणसाखळीतील  पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आला असून सध्या फक्त  4.8 TMC पाणी  धरणात  आहे.  पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून पुणेकर नागरिकांनी आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.या पाणी बचाव 

मोहिमे दरम्यान फर्ग्युसन कॉलेज रोडवरील विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना भेट देऊन पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. ग्राहकांना विनाकारण पूर्ण ग्लास पाणी देण्याऐवजी आवश्यकतेनुसार किंवा अर्धा ग्लास पाणी देण्याचे आवाहन करण्यात आले. दररोज हजारो लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी  पुणेकर नागरिकांना पाणी वाचविण्यासाठी पुढील उपाय सुचविण्यात आले :

पिण्याचे पाणी वाया जाऊ देऊ नका.

गळती होणारे नळ तात्काळ दुरुस्त करा.

वाहन धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळा.

हॉटेल्स व रेस्टॉरंट्सनी पाणी वापराबाबत खबरदारी घ्यावी.

प्रत्येक नागरिकाने “थेंबे थेंबे तळे साचे” या भावनेतून पाणी बचतीत योगदान द्यावे.

पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला आणि घटत्या पाणीसाठ्याला तोंड देण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून पुढील पिढ्यांसाठी जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

केमिकल कंपनीच्या गोदामातून १५.४० लाखांचे अॅसिड चोरीला; ३ तासांत टोळी जेरबंद

नांदेड सिटी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. २० जून : नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केमिकल कंपनीच्या गोदामातून चोरीस गेलेले लाखो रुपयांचे ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिड अवघ्या तीन तासांत शोधून काढत नांदेड सिटी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धायरी परिसरातील रिलायबल केमिकल्स कंपनीच्या गोदामातून रॅन्केम कंपनीचे ऑर्थोफॉस्फोरिक अॅसिडचे १५४ कॅन चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर, मोहन मिसाळ आदींच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित वैभव चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार रोहन इंदुलकर आणि निखिल पवार यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १५४ अॅसिड कॅन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी पिकअप वाहन जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

पोलीस पथकाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश आले असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ?आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हेंचा पाठपुरावा

पुणे-शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हेंनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून सुनेचा छळ प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होईल यासाठी पोलिसांना सतर्कतेने आणि हुशारीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तीस वर्षीय विवाहितेचा सासरच्या माणसांनी छळ केल्याची तक्रार दि. २० जुन २०२६ रोजी उघडकीस आली. फिर्यादीचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाला सर्व खर्च तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने पीडितेच्या आई-वडिलांकडून देण्यात आले होते. पती, सासू, सासरे, नंणदा वारंवार पैशाची मागणी करून त्रास देत होते.पती बाहेर दुसऱ्या मुलींसोबत फिरत असे तसेच ते फोटो इंस्टाग्राम वर टाकत असे. सदर पीडीतेला तिचे सोशल मीडिया अकाउंट देखील बंद करण्यास भाग पाडले होते.

या केसच्या संदर्भामध्ये पुणे शहरातल्या कॅन्टोन्मेंटशी संबंधित कोंढवा आणि खराडी भागातल्या डीसीपी विजयलक्ष्मी शिवणकर यांच्याशी आमदार नीलम गोर्हे तपशीलवार सविस्तर चर्चा केली. सध्या भारतीय न्याय संहितेमध्ये जे बदल झालेले आहेत. ते पाहता( ४९८ कलम ) पूर्वीच हे लावल्यावर ते सात वर्षाच्या आधी शिक्षा असल्यामुळे आरोपीला अटक करण्याच्या आधी पूर्व सूचना द्यावी लागते आणि या नवीन तरतुदीमुळे जवळजवळ कोणत्याही केसमध्ये मारहाण किंवा छळ सत्य असलं तरी कारवाई करणे हे अतिशय अवघड झालेल आहे. या पार्श्वभूमी वरती संबंधित महिलेला कलम (४९८ ) लावण्याच्या अगोदर तिला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या कुटुंबीयांनी केलेलं कट कारस्थान याबद्दलचे काही अनुभव असतील तर ते देखील नोंदवून घेणे फार गरजेचे आहे. जेणेकरून तिने याच्यापूर्वी का तक्रार दिली नाही. त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती कोर्टाला आणि न्याय यंत्रणेला व्यवस्थित माहिती होऊ शकेल.

एप्रिल महिन्यामध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे नीलम गोर्हे यांनी महिलांविरुद्ध होणारे गुन्हे व महिला बाल कल्याणचे आयुक्त यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्या बैठकीमध्ये त्यांनी असे निर्देश दिलेले होते हे ४९८ लावत असताना तो लावल्यावरती कौटुंबिक संरक्षण अधिकाऱ्यांकडेही ती केस नोंदवून त्यानुसार दिवाणी कायद्यानुसार सुद्धा त्यामध्ये कसा न्याय मिळू शकेल याबद्दल त्यांना महिला तक्रारदारांना अवगत करण्यात यावे. जेणेकरून त्यामध्ये संपत्तीत वाटा किंवा राहण्याच्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकेल या घटनेमध्ये तशीच ताबडतोब पुढील कारवाई आवश्यक आहे. याच्या संदर्भात डीसीपी विजयालक्ष्मी शिवणकर यांचे लक्ष वेधले आहे व पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदनाद्वारे अवगत केले आहें .
डिसीपी विजयालक्ष्मी शिवणकर यांनी महिलांना सुरक्षा देण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत असून सर्व वस्तुस्थितीची माहिती घेऊन आम्ही अगदी योग्य ती कारवाई करू.तसेच केस हाताळण्याबाबत दिलेल्या सुचनाांचा अंतर्भाव करण्याचे डीसीपींनी आश्वासन पिडीत मुलीचे समुपदेशन करण्यास लक्ष देण्याबाबतही सकारात्मक भुमिका घेतली .

पीडितेची आर्थिक परिस्थिती नसतानाही वारंवार धमक्या देऊन तिचे खच्चीकरण करण्यात येते असे अनेक गुन्हे समोर येऊन पीडितांना न्याय मिळेल असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले
आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये याची दक्षता घेण्यात यावी. अश्या अपप्रवृत्ती व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात अश्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारच्या घटनांना निश्चितच आळा बसेल असेही त्या म्हणाल्या.
महिलांनी सुद्धा सजग राहून सावधानता बाळगावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.

‘कौशिक आश्रम’ हे कर्तव्यपूर्तीचे केंद्र,भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

पुणे, २० जून –
घरातील ज्येष्ठ मंडळींची विशिष्ट वयानंतर आपण जी सेवा करतो, ती सेवा नसते, तर ते कर्तव्य असते. ‘कौशिक आश्रम’ हे देखील संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची सेवा करणारे कर्तव्यपूर्तीचे केंद्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी शनिवारी केले.

पुण्यातील मित्रमंडळ सोसायटीमध्ये असलेल्या ‘कौशिक आश्रम’ या वास्तूच्या पुनर्निर्माणानिमित्त आयोजित ‘कृतज्ञता सत्कार कार्यक्रमा’त श्री. जोशी बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. नानासाहेब जाधव आणि संस्थेचे विश्वस्त दिवाकर पांडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

‘कौशिक आश्रम’पुनर्निर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या हितचिंतकांचा प्रातिनिधिक सत्कार जोशी, प्रा. जाधव आणि पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘कौशिक आश्रम’ हे विश्रांतीस्थान नाही तसेच ते सेवाकेंद्रही नाही. समाधान आत्मीयतेमध्ये असते. असे आत्मीयतेचे, समाधानाचे, आनंदाचे वातावरण ज्या वयात अनुभवायला मिळाले पाहिजे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते ‘कौशिक आश्रम’ येथे राहणार आहेत. त्यांना येथे तसेच वातावरण अनुभवता येईल, असे जोशी यांनी सांगितले.

या इमारतीला ऑफिसचे स्वरूप येणार नाही. हे घर आहे, असे वातावरण जिथे अनुभवायला मिळेल, अशी ही वास्तू आहे. पुढेही येथे समाधानाचे वातावरण राहील याची खात्री देतो, असेही भय्याजी जोशी म्हणाले. डॉ. जगदीश करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मैत्रीचा संदेश देणारे केंद्र
कार्यक्रमापूर्वी मित्रमंडळ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर भय्याजी जोशी यांनी संवाद साधला. ‘कौशिक आश्रम’ आमच्या सोयायटीमध्ये असल्याचा आम्हालाही आनंद आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा धागा पकडून भय्याजी जोशी म्हणाले की, कायम मैत्रीचा संदेश देणारे ‘कौशिक आश्रम’ हे केंद्र आहे आणि हाच संदेश हे केंद्र पुढेही देत राहील.

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

पुणे, : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्रांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय, अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी वापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. कृषि विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. जेजुरकर यांनी दिला आहे. अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार आल्यास नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कारवाईच्या वेळी पुणे अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी निलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांतील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या “गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देणे” या योजनेंतर्गत पुणे विभागातील पात्र लाभार्थ्यांसाठी १०२ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनुसूचित जाती घटकांतील चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती व्यवसाय करणाऱ्या पात्र गटई कामगारांना टप्प्याटप्प्याने पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या गटई स्टॉलमुळे लाभार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज व्यवसायस्थळ उपलब्ध होणार असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाला बळकटी मिळण्यास हातभार लागणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

माहिती अधिकाराचा नवा नियम:नागरिकांच्या न्यायप्रवेशाच्या अधिकारावर मर्यादा अन वकिलांच्या अधिकारांवरही गदा आणणारा-मिलिंद पवार

माहितीच्या अधिकारावरील गदा : महाराष्ट्र माहिती आयोगाच्या नव्या नियमांतील नियम २०(३) बाबत गंभीर आक्षेप

पुणे- महाराष्ट्र शासनाने माहिती आयोगाच्या कामकाजासाठी अधिसूचित केलेल्या नव्या नियमांमधील नियम २०(३) अत्यंत चिंताजनक असून, त्याद्वारे अपीलकर्ता किंवा तक्रारदार यांना सुनावणीदरम्यान मदत करणारी व्यक्ती “विधी व्यवसायी (वकील) असणार नाही” अशी अट घालण्यात आली आहे. असे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी म्हटले आहे. या गंभीर विषयावर आपण ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


ॲड. पवार यांनी म्हटले की, नियम २०(३) मधील ही तरतूद केवळ वकिलांच्या व्यावसायिक अधिकारांवर गदा आणणारी नाही, तर सामान्य नागरिकांच्या न्यायप्रवेशाच्या अधिकारावरही मर्यादा आणणारी आहे. माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकांना प्रशासनास जबाबदार धरण्याचे प्रभावी साधन आहे. अनेक वेळा माहिती आयोगासमोर कायदेशीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होत असतात.अशा परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलामार्फत किंवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे मांडणी करण्याचा अधिकार नाकारणे हे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळविण्याचा आणि स्वतःचे म्हणणे प्रभावीपणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. मग माहिती आयोगासमोरील अपील किंवा तक्रारीमध्ये नागरिकांना वकिलांची मदत घेण्यास प्रतिबंध का? असा सवाल ॲड. पवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने या नियमामागील भूमिका स्पष्ट करावी. माहितीचा अधिकार अधिक सक्षम करण्याऐवजी, नागरिकांच्या हातातील कायदेशीर साधने कमी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मागणी अशी आहे की, नियम २०(३) तात्काळ मागे घेण्यात यावा किंवा त्यामध्ये सुधारणा करून नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलामार्फत अथवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे माहिती आयोगासमोर हजर राहण्याचा अधिकार अबाधित ठेवावा.
माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा कणा आहे. या अधिकाराच्या अंमलबजावणीवर कोणत्याही प्रकारची मर्यादा आणण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल, असेही ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी स्पष्ट केले.

‘वारसा हक्का’ने नव्हे तर.. संघर्षातून उभे रहात आहे राहूल गांधींचे नेतृत्व …!_ काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी


राहुल गांधींचा जन्मदिन छायाचित्र प्रदर्शनातून साजरा…!
उलगडले व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू …!
‘निःस्वार्थी राष्ट्रसेवा व राष्ट्र भक्ती’चा डीएनए राहुल गांधीं मध्ये…!

पुणे –
राजेशाही-निज़ामशाही-मोघल साम्राज्यात विभागलेला भारत, ब्रिटीशां’च्या गुलामगिरीत खितपत होता.
मात्र महात्मा गांघी, नेहरू, पटेल, आझाद, भगतसिंह – राजगुरूंसह काँग्रेस नेत्यांच्या व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान व दीर्घ संघर्षातून स्वातंत्र्योत्तर ‘प्रजासत्ताक भारत’ उभारल्याचे श्रेय निर्विवादपणे काँग्रेस’लाच् जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्याचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व राज्य एनएसयुआय च्या आजी – माजी पदाधिकारी श्री ऋत्विक धनवट, अक्षय कांबळे व सहकारी यांनी ‘काँग्रेस नेते व संसदीय विरोधी पक्ष नेते राहूल जी गांधी’ यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून, मा राहुल’जीं च्या जीवनातील विविध घटकांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांच्या प्रयत्नांचा व त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंबाबतची माहिती दर्शवणारे छायाचित्र प्रदर्शनाचे समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व दिप्ती चवधरी यांचे उपस्थितीत झाले. सदरचे छायाचित्र प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आयोजित करण्यात आले होते.


समोरोप प्रसंगी बोलतांना, गोपाळदादा पुढे म्हणाले की, देशाच्या उभारणीतील योगदान व उत्तरदायीत्वाचे भान ठेवून ‘गांधी – नेहरू’ कुटुंबातील नेत्यांनी, ‘बापूं’च्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना रुजवली व संविधानीक लोकशाही व्यवस्था मजबूत करत देशात राष्ट्रीय संपत्तीचे जाळे निर्माण केले.
देशाच्या एकात्मतेसाठी, राजधर्माच्या कर्तव्य भावनेतून अपेक्षित योगदान व बलिदान दिले, यातूनच नेहरू -गांधी कुटुंबियांचे निःस्वार्थी नेतृत्व, देशात परीस्थिती प्रमाणे प्रस्थापित झाले. देशाप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून, वारसा हक्काने नव्हे तर.. प्रतिकूल परिस्थितीतुनही संघर्षातून काँग्रेस नेते राहूल जी गांधींचे नेतृत्व उभे रहात असल्याचा व त्यावर (२०२४ लोकसभेत, कांग्रेसच्या दुप्पट जागा वाढून) जनतेचे समर्थन मिळत असल्याचे, उचित समाधान काँग्रेसजनांस असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्याचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.


संकुचित स्वहिता’पेक्षा व्यापक राष्ट्रहित जोपासण्याचा डीएनए’ राहूल गांधीं मध्ये अवतरल्यानेच,
६० वर्षांच्या देशाच्या प्रगतीच्या व पुण्याईच्या कर्मसंचित पाठबळावर, देशवासियांचा आशिर्वाद व प्रेमाच्या शक्तीवर राहूलजी गांधी यांनी देशाचा चतुष्कोण साधणारी सु १२,००० किमी चीं पदयात्रा थंडी -उन – पावसाची तमा न बाळगता केली, या देशप्रेमापोटी केलेल्या कर्म संचित वाटचालीचे श्रेय देश-हितामध्ये बदलून, नियती राहूलजींना संधी दिल्यावाचून राहणार नसल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
“६० वर्षांच्या सत्य, वास्तविकतेच्या व कर्तव्यशील नैतिकतेच्या देश साक्षी असलेल्या कर्म संचित पुण्याई’वर;
१२ वर्षांच्या केवळ स्वहीत साधणाऱी, सत्ताधीशांची अनैतिक कारकिर्द’ हावी ठरणार नसल्याचा आत्मविश्वास ही गोपाळदादा तिवारी यांनी दर्शवला.
१२ वर्षांच्या तपपुर्तीचे ढोल बडवतांना नेहरू- गांधी वर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे एक ही आरोप सिद्ध करू न शकल्याने, निःस्वार्थी राष्ट्रसेवा व निर्दोष राष्ट्र भक्ती’चा डीएनए’ राहुल गांधींच्या पुर्वज नेत्यांकडून अर्थात पं नेहरू, इंदीराजी व राजीवजी या दिवंगत पंतप्रधानाकडून त्यांचे मध्ये उतरल्याचे सिद्ध झाले असल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.
समारोप प्रसंगी सर्वश्री सिध्दार्थ जांभूळकर, साहेबराव क्षीरसागर, ॲड श्रीकांत पाटील, लक्ष्मीकांत हुंडेकर, राजेश सुतार उपस्थित होते.

ओमराजेंचा यू टर्न: ठाकरेंना सोडणाऱ्या 5 MP ची खासदारकी धोक्यात

शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही‘,

धाराशिव :‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि 5 जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,’ असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचे दिसते. दुर्दैवी आणि धक्कादायक निकाल तब्बल 20 वर्षांपू्र्वी झालेल्या पवनराजे हत्याकांड निर्णयाचा निकाल आज आला. या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘आज लागलेला निकाल दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. तिथेही निकाल नाही मिळाला, तर पुढे सर्वोच्च न्यायालयात जावू.’ ओमराजे म्हणाले की, ‘सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच न्यायालय आणि संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागेल,’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ओमराजे पुढे म्हणाले की, ‘सुरुवातीच्या तपास यंत्रणा मॅनेज होत्या. त्यानंतर सीबीआयकडे तपास आला. तिथून तपास झाला. सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे. सहा खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर आहेत. आपल्या राजकीय भूमिकेवर ते म्हणाले की, ‘मी मतदार संघात जाईन. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. या केसचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. गेली 20 वर्ष झाली. वडील, त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. त्यामुळे हा निकाल माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. आता मतदारसंघात जाईन. लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन.\

’ ओमराजे विधानाने 5 खासदारांची धाकधूक वाढली; ‘2/3’ चा कायदेशीर पेच? शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या ताज्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अचानक खळबळ उडवून दिली आहे. ओमराजे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, “मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स वाढवला आहे. ओमराजेंच्या या भूमिकेमुळे केवळ त्यांच्याच नाही, तर त्यांच्यासोबत जाऊ इच्छिणाऱ्या इतर 5 खासदारांच्या भवितव्यावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. जर ओमराजे ठाकरे गटातच कायम राहिले, तर इतर पाच जणांची खासदारकी रद्द होऊ शकते, असे कायदेशीर सूत्रांचे म्हणणे आहे. खासदारकी धोक्यात येण्यामागचे गणित काय? संसदेतील पक्षांतरबंदी कायद्यानुसार (Anti-Defection Law) मूळ पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी एकूण लोकप्रतिनिधींपैकी किमान दोन-तृतियांश (2/3) सदस्यांचा पाठिंबा असणे अनिवार्य आहे.

ठाकरे गटाचे संख्याबळ: लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. कायदेशीर गरज: पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 9 पैकी किमान 6 खासदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पेच कुठे अडकला?: सुरुवातीला 6 खासदार फुटणार अशी चर्चा होती. मात्र, आता ओमराजे निंबाळकर यांनी माघार घेतली किंवा ते ठाकरे गटासोबतच राहिले, तर बंडखोरांची संख्या केवळ 5 वर मर्यादित राहील. म्हणजेच आवश्यक असलेला दोन-तृतियांश आकडा गाठता येणार नाही. ‘शरद यादव केस’चा बडगा आणि व्हीपचे हत्यार जर बंडखोर खासदारांची संख्या 5 वरच रेंगाळली, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बजावलेल्या ‘व्हीप’ (Whip/पक्षआदेश) नुसार, ठाकरे गटाकडून या पाचही खासदारांना अपात्र ठरवण्याची अधिकृत शिफारस लोकसभा अध्यक्षांकडे केली जाईल. या कायदेशीर लढाईत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयाच्या ‘शरद यादव विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्याचा दाखला देण्याची शक्यता आहे, ज्याअन्वये पक्षाच्या धोरणांविरुद्ध उघड भूमिका घेणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करता येऊ शकते. यामुळे या पाचही खासदारांना थेट घरी जावे लागू शकते. सर्व काही ओमराजेंच्या निर्णयावर प्रलंबित थोडक्यात सांगायचे तर, शिवसेनेच्या या अंतर्गत बंडखोरीची संपूर्ण सूत्रे आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आली आहेत. त्यांनी घेतलेला एक निर्णय या 5 बंडखोर खासदारांना कायदेशीर सुरक्षा देऊ शकतो किंवा त्यांचे संसद सदस्यत्व धोक्यात आणू शकतो. आता ओमराजे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अचानक घेतला यू टर्न ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे. समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही,’ अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे सुतोवाच दि केले होते. मात्र, आता पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर त्यांनी ही भूमिका बदलल्याचे दिसते.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागला असून, सीबीआय विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री Padamsinh Patil यांच्यासह सर्व आठ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती S. R. Navandar यांनी हा निकाल देताना तपास यंत्रणांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींना दोषी ठरविण्यासाठी आवश्यक असलेले ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले.

3 जून 2006 रोजी झाली होती हत्या

3 जून 2006 रोजी Kalamboli येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

न्यायालयाचे तपास यंत्रणांवर ताशेरे

निकाल देताना न्यायालयाने तपासातील अनेक गंभीर त्रुटी अधोरेखित केल्या. खटल्याचा मोठा आधार असलेल्या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबातील विसंगती, त्याच्या कथनातील बदल, तसेच त्याच्या विश्वासार्हतेबाबत न्यायालयाने गंभीर शंका व्यक्त केली.

न्यायालयाने नमूद केले की, माफीच्या साक्षीदाराला काही काळ बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आल्याचा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला. तसेच आरोपींचे मोबाईल फोन जप्त न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) न तपासणे आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा न करणे या तपासातील गंभीर त्रुटी ठरल्या.

“राजकीय वैमनस्य पुरेसे नाही”

न्यायालयाने पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद आणि वैमनस्य असल्याचे मान्य केले. मात्र, केवळ राजकीय संघर्ष किंवा वैमनस्याच्या आधारे कोणालाही दोषी ठरविता येत नाही. त्यासाठी ठोस, विश्वासार्ह आणि कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावे आवश्यक असतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

न्यायालयाने संशयाचा फायदा देत खालील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली :

  • डॉ. पद्मसिंह पाटील
  • सतीश मंदाडे
  • मोहन शुक्ला
  • शशिकांत कुलकर्णी
  • कैलास यादव
  • दिनेश तिवारी
  • पिंटू सिंग
  • छोटे पांडे
निंबाळकर कुटुंबासाठी मोठा धक्का

या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी गेली दोन दशके Omraje Nimbalkar आणि निंबाळकर कुटुंबाने कायदेशीर लढा दिला होता. मात्र, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने हा निकाल कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.