Home Blog Page 57

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाची कंत्राटी सफाई सेविका श्रीमती रूपाली सिद्धेश्वर माळी झाल्या १२ वी उत्तीर्ण…….!

पुणे -धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडे कंत्राटी पद्धतीमध्ये सफाई काम करणाऱ्या महिला सेविका श्रीमती रूपाली माळी या बारावी उत्तीर्ण मध्ये 53% मार्क घेऊन पास झाल्या. पतीच्या निधनानंतर सासरच्या आणि साथ सोडली त्यामुळे आपल्या माहेरी राहून धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये कंत्राटी सफाई सेविका म्हणून काम करू लागला आणि आपल्या लहान दोन बाळांचा सांभाळ करत करत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन त्या बारावी पास झाल्या. पतीच्या निधनानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी श्रीमती रूपाली माळी या सासरहून माहेरी राहण्यासाठी धनकवडी मध्ये राहायला आल्या. स्वतःचा आरोग्य धोक्यात घालून मुलांना सांभाळण्यासाठी व स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ना वीलाजाणे सफाई काम करू लागल्या काम करत असताना शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी बाहेरून परीक्षेचा फॉर्म भरला. दिवसभर सफाई चे काम करायचे आणि उरलेल्या वेळामध्ये धुणी भांडी व स्वयंपाकाचे काम करत करत संध्याकाळी मुलांचा अभ्यास घेऊन स्वतः पण त्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. डोक्यावरील पतीचे छत्र नसताना सुद्धा त्यांनी जीवनात शिक्षण शिकून काहीतरी वेगळं घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मला माझ्या जीवनात शिक्षण शिकण्याची उमेद माझे भाऊ व आई यांनी मला प्रेरणा दिली. तसेच मला पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ.मुक्ता मनोहर अध्यक्ष कॉ. उदय भट, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. वैजीनाथ गायकवाड, कॉ. शोभा बनसोडे, कॉ. विजय पवार यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. त्यामुळे मी उच्च शिक्षण पूर्ण करून माझ्या दोन्ही मुलांना शिकवून मोठं करायचं आहे.
पतीच्या निधनाची बातमी ऐकूण माझे वडीलांचे देखील अकाली निधन झाले. वडील व पतीचे छत्र हरपले त्यामुळे मी खच्चून न जाता शिक्षणाची ओढ कायम आहे म्हणून १२ वी पास झाले अशा भावना व्यक्त केल्या.

अखेर ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा मृत्यू:प्रियकरावर खुनाचा गुन्हा

पुणे-प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर दिलीप राठोड (वय २२, रा. हिंगोली) याला अटक केली आहे. उजालादेवीचा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी आणि आरोपी राठोड हे विमाननगरमधील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते, जिथे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी राठोड चंदननगरमधील पठारे वस्ती परिसरात आला. त्यावेळी उजालादेवीचा भाऊ आणि वहिनी कामावर गेले होते. राठोड तिच्या घरात शिरला आणि तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने ब्लेडने तिचा गळा चिरला आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीला रहिवासी आणि पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपी राठोडला हिंगोली परिसरातून अटक केली. उजालादेवीने लग्नास नकार दिल्याने आणि तिचे लग्न ठरल्याने राठोड तिच्यावर चिडला होता. याच वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्ला झाल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरलेला असल्याने तिला नीट ओरडताही येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कमालीचे धैर्य दाखवत आपल्या भावाला फोन केला.

“दादा, मला एका मुलाने मारलंय, गळ्यातून आवाज येत नाहीये, तू लवकर घरी ये…” इतके बोलून तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. समोर आपली बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पाहून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले.

जखमी तरुणीला जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी विचारले की ‘हल्ला कोणी केला?’, तेव्हा जखमेमुळे तिला बोलणे अशक्य होते. तिने केवळ खुणेने कागद आणि पेन मागितला. थरथरत्या हाताने तिने त्या कागदावर आरोपीचे नाव— ‘दिलीप राठोड’ असे लिहिले आणि गुन्हेगाराचा चेहरा समोर आला.

पेशवेकालीन श्री उमामहेश्वर मंदिरात मोगरा महोत्सव

वासंतिक चंदन उटी सोहळा ;  भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांचे कार्यक्रम

पुणे : शुक्रवार पेठ येथील राजा दिनकर केळकर संग्रहालयासमोरील पेशवेकालीन श्री उमामहेश्वर मंदिरात ‘श्रीं’ चा वासंतिक चंदन उटी सोहळा आणि मोगरा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला झाला. भगवान शंकरांच्या पिंडीवर मुखवटा व चंदन लेपन करण्यात आले होते.

आदिमाया प्रतिष्ठान पुणे तसेच नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर आकर्षक विविधरंगी फुलांची सजावट, मोगऱ्याचा दरवळ आणि पारंपरिक रोषणाईने उजळून निघाला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

सोहळ्यास नगरसेवक राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, देवेंद्र वडके यांसह श्री उमा महेश्वर मंदिर सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. कमलेश कामठे, स्वामी भक्त परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

विविध भजनी सेवा मंडळांनी भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय केले. श्री भागीरथी सेवा भजनी मंडळ, श्री स्वामी शंकर भजनी सेवा मंडळ, श्री गुरु माऊली भजनी सेवा मंडळ, श्री वटवृक्ष भजनी सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ मंडई मठ पुणे तसेच श्री स्वामी ॐ मल्हारी भजनी सेवा मंडळ यांनी सहभाग घेतला.

‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’

विवेक सावंत यांच्याशी १६ मे रोजी  संवाद

पुणे :

एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने  ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’  या विषयावर महाराष्ट्र ज्ञान  महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांच्याशी  संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार,दि.१६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हे संवाद सत्र फाऊंडेशनच्या नवी पेठ(पुणे ) इमारतीमधील प्रशिक्षण सभागृहात होईल.  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष साथी सुभाष वारे हे ही या संवाद सत्रात सहभागी असतील.महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्त हे आयोजन केले जात आहे. 

पुरोगामी, विवेकी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या संवाद सत्रात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.सहभाग घेण्यासाठी उपेंद्र टण्णू (9881701881) किंवा राहुल भोसले (9822962850) यांचेकडे नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले  आहे.

चऱ्होलीत मध्यरात्री ‘अटलांटिका’ सोसायटीत मोठी गॅस गळती; अग्निशामक दलाच्या तत्परतेने २०० कुटुंबांचा जीव वाचला

पुणे:चऱ्होली येथील डी. वाय. पाटील कॉलेज जवळील ‘अटलांटिका’ सोसायटीत शनिवारी मध्यरात्री गॅस गळतीची मोठी घटना घडली. सोसायटीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये एम.एन.जी.एल. (MNGL) गॅसचा उग्र वास पसरल्याने २०० कुटुंबांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. मात्र, अग्निशामक दल आणि MNGL च्या पथकाने वेळेत धाव घेत गळती रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

​नेमकी घटना काय?
​अटलांटिका सोसायटीमध्ये एम.एन.जी.एल. पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. शनिवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास काही दक्ष नागरिकांना पार्किंग परिसरात गॅसचा उग्र वास येत असल्याचे जाणवले. काही वेळातच हा गॅस संपूर्ण पार्किंगमध्ये पसरल्याचे लक्षात येताच रहिवाशांची पाचावर धारण बसली. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले.

​अग्निशामक दलाची तत्परता
​घटनेची माहिती मिळताच चोविसावाडी अग्निशामक उपकेंद्राचे जवान अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये लीडिंग फायरमन मनोज मोरे, फायरमन श्रावण चिमटे, राजवैभव सहजराव, शुभम यादव आणि वाहन चालक संभाजी दराडे यांचा समावेश होता.
​जवानांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली असता, संपूर्ण पार्किंगमध्ये सीएनजी गॅसचा उग्र वास दरवळत होता. प्राथमिक तपासात नेमकी गळती कुठून होतेय हे समजत नसल्याने, जवानांनी तातडीने एम.एन.जी.एल. प्रशासनाशी संपर्क साधला.

​मोठा अनर्थ टळला
​अग्निशामक दलाच्या सूचनेनुसार एमएनजीएलचे तांत्रिक पथक अवघ्या १५-२० मिनिटांत चऱ्होलीतील अटलांटिका सोसायटीत पोहोचले. सखोल पाहणी केल्यानंतर एका चेंबरमधून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तातडीने सोसायटीचा मुख्य गॅस पुरवठा बंद केला. गळती थांबल्याची खात्री पटल्यानंतर तेथील २०० कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

​आज होणार दुरुस्ती
​आज शनिवारी सकाळी एमएनजीएलचे अधिकारी घटनास्थळाची पुन्हा पाहणी करून गळती होत असलेल्या ठिकाणाची कायमस्वरूपी दुरुस्ती करणार आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे चऱ्होली परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, चोविसावाडी अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य धोका टळला आहे.

सुवेंदू यांनी बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली: PM मोदी मंचावर एका ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या पाया पडले

कोलकाता – सुवेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, एनडीए आणि भाजपशासित राज्यांचे २० मुख्यमंत्री उपस्थित आहेत. कार्यक्रमात सर्वप्रथम मोदींनी व्यासपीठावर रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.यानंतर पंतप्रधानांनी व्यासपीठावर भाजपचे ९८ वर्षीय कार्यकर्ते माखनलाल सरकार यांचा सत्कार केला. व्यासपीठावर येताच पंतप्रधान थेट सरकार यांच्याकडे गेले, त्यांना शाल पांघरली आणि नंतर त्यांच्या पाया पडले. यानंतर सरकारने पंतप्रधानांना बराच वेळ मिठी मारून ठेवली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुवेंदु यांच्या व्यतिरिक्त आणखी ४ आमदारही शपथ घेऊ शकतात असा दावा केला जात आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.पंतप्रधान मोदींनी मैदानातील प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत समिक भट्टाचार्य आणि सुवेंदु अधिकारी देखील उपस्थित होते.

सुवेंदू अत्यंत आध्यात्मिक, घरच्यांना भीती होती की मुलगा संन्यासी होऊ नये

1970 मध्ये पूर्व मेदिनीपूरमधील कोंतली गावात जन्मलेल्या सुवेंदुचा लहानपणापासूनच श्रद्धेकडे कल होता. प्रत्येक शनिवारी रामकृष्ण मिशनला जाणे हे त्यांचे ठरलेले नित्यकर्म होते. ते लहानपणी इतके धार्मिक होते की घरच्यांना भीती वाटू लागली होती की मुलगा संन्यासी होऊ नये.

घरात जमा झालेले नाणेही ते गुपचूप मिशनमध्ये दान करून येत असत. कुटुंबाला वाटत होते की, ते कधीही घर सोडू शकतात. पण सुवेंदुने दुसरा निर्णय घेतला… संन्यास नाही, राजकारण करणार आणि लग्नही करणार नाही.

80 च्या दशकाच्या शेवटी कांथीच्या प्रभात कुमार कॉलेजमधून सुवेंदुच्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात झाली. हळूहळू त्यांनी पूर्व मेदिनीपूरमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
माखनलाल, ज्यांच्या पायांना मोदींनी स्पर्श केला
पदग्रहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील सर्वात जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या माखनलाल सरकार यांना मंचावर सन्मानित केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.१९५२ मध्ये काश्मीर आंदोलनादरम्यान, जेव्हा माखनलाल सरकार श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी तिथे गेले होते, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. माखनलाल सरकार हे स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीशी संबंधित असलेल्या सुरुवातीच्या तळागाळातील नेत्यांपैकी एक आहेत.

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

पुणे, दि. ९ : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात सोफोश सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात थॅलेसेमिया बालरुग्णांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी बालरुग्णांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, मेट्रन श्रीमती केदारी, समाजसेवा अधीक्षक विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे, संबंधित विभागातील डॉक्टर, परिचारिका, सुमारे ५० थॅलेसेमिया बालरुग्ण, सोफोश संस्थेचे पदाधिकारी तसेच रुग्णांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव व मेट्रन श्रीमती केदारी यांनी मार्गदर्शन करताना थॅलेसेमिया रुग्णांसाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी ऐच्छिक रक्तदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शंकर मुगावे यांनी थॅलेसेमिया आजार, त्यावरील उपचार तसेच ऐच्छिक रक्तदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. जनकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या २४ हजार नागरिकांच्या रक्त तपासणी सर्वेक्षणात सुमारे ३ टक्के नागरिकांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील महाविद्यालये, सामाजिक संस्था, सत्संग मंडळे आदी विविध स्तरांवर जनजागृती, प्रचार-प्रसार, प्रबोधन व रक्त तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या अभियानामध्ये शासनासोबत जनकल्याण समिती आणि भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्था (ISBTI) यांचा प्रमुख सहभाग असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी स्वतः जनजागृतीचे माध्यम बनून समाजात जागरूकता निर्माण करावी तसेच तरुणांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही डॉ. मुगावे यांनी केले. “ऐच्छिक रक्तदान ही आजची काळाची गरज आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोथरूडच्या रंगमंचावर नव्या स्वप्नांची ‘नांदी’!

0

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’चे लोकार्पण

पुणे: कोथरूडमधील घराघरांत दडलेल्या सुप्त कलागुणांना आता हक्काचं आकाश मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून, केवळ हौशी आणि नवोदित कलाकारांसाठी ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ या संस्थेचा श्रीगणेशा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने कोथरूडच्या सांस्कृतिक वैभवात एका नव्या, संवेदनशील अध्यायाची भर पडली आहे.

केवळ राजकारण आणि समाजकारण न थांबता, समाजातील कलाकारांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या ध्येयातून ही संस्था उभी राहिली आहे. आजच्या लोकार्पण सोहळ्याने सिद्ध केले की, जेव्हा सत्तेचा वापर कलेच्या संवर्धनासाठी होतो, तेव्हा सामान्यातील सामान्य कलाकारही आत्मविश्वासाने पाय रोवून उभा राहू शकतो.

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे नाट्यतीर्थ फाउंडेशनच्या कलाकारांनी सादर केलेले ‘रंगपूजा’ हे नाटक. रंगमंचावरचा तो प्रकाशझोत, कलाकारांच्या डोळ्यांतील ती चमक आणि संवादांतून ओसंडून वाहणारी ऊर्मी पाहून चंद्रकांतदादांसह उपस्थित रसिक भारावून गेले. नवोदित कलाकार असूनही त्यांनी सादर केलेल्या या प्रयोगाने व्यावसायिक नाटकांची तोड केली. ‘रंगपूजा’च्या या प्रयोगातूनच या संस्थेच्या भविष्यातील भव्यतेची आणि दर्जेदार कामाची चुणूक पाहायला मिळाली.

संस्थेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “कला आणि कलाकार यांना लोकाश्रयासह राजाश्रयाची देखील गरज असते. त्यामुळेच कोथरुड मधील हौशी आणि नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. यामुळे अनेक हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळाले. आता त्यांना नाटकाचे तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे; यासाठी नाट्यतीर्थ संस्थेचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ हे केवळ नाव नसून, ती प्रत्येक कलाकाराची कर्मभूमी ठरेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशनच्या रूपाने आता कोथरूडच्या मातीतील नव्या पिढीचे कलाकार केवळ नाटक शिकणार नाहीत, तर ते जगणार आहेत. आजच्या नाट्यप्रयोगाने खऱ्या अर्थाने कोथरूडच्या कलाविश्वात एका नव्या पर्वाचा ‘पडदा’ उघडला आहे.

चंद्रकांतदादांची अशीही शबाशकी!

‘रंगपूजा’चा काळजाला भिडणारा प्रयोग पाहून चंद्रकांतदादा केवळ भारावलेच नाहीत, तर एका लोकप्रतिनिधीच्या आत दडलेला हळवा रसिक जागा झाला. दादांनी आपल्या हातातील स्वतःचं मनगटी घड्याळ काढलं आणि ते दिग्दर्शक अथर्व भागवत याच्या हातावर बांधलं. ते केवळ घड्याळ नव्हतं, तर एका नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकाच्या कष्टांना दिलेली अनमोल पावती होती. दादांच्या या उत्स्फूर्त दातृत्वाने उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला.

४० जणांकडून ३५ गुंठ्याचा भूखंड बळकाविण्याचा प्रयत्न:बिल्डर लुंकड,ढाकलिया,बिडकर यांच्यासह ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

0

पुणे : वडगाव शेरी येथील ३५ गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंट गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढोकलियासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईटस, बिबवेवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया (Raj Dhaklia), रुपेश ढाकलिया (Rupesh Dhaklia), बिडकर, अमित लुंकड यांचा मॅनेजर तसेच अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये ७ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अमित लुंकड यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावाने कन्स्ट्रक्शनपचा व्यवसाय आहे. त्यांनी वडगाव शेरी सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांचे कडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा ही लुंकड यांनी खरेदी केली होती. २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडुन ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे व ३.५ गुंठे तेजस प्रविण दुगड यांच्या नावाने खरेदी खताने खरेदी केली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ वर त्यांचे नाव लागले आहे. तसेच जागा खरेदी करताना या जागेवर सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटला सात प्रॉपर्टी टॅक्स होते. ते सुद्धा दुगड यांच्या नावावर केलेले आहे. तसेच सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होत. ते फिर्यादी यांच्या नावावर करुन घेतले होते. या जागेवर बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडे एमओडीची एनओसी घेतली. फायरची प्रोव्हिजनल एनओसी घेतली. पुणे महानगरपोलिककडे जवळपास ५ कोटी रुपये चलन भरलेले आहे. गौण खनिजची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसे भरले. त्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लासिटंगची परवानगी घेतली आहे. जागेवर बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम चालु केलेले आहे. त्या ठिकाणी सध्या काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता दोन सुपरवायझर, दोन वॉचमन, सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती केलेली आहे.

७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांचा फोन आला. आपला सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळविले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर ३० ते ४० जण आठ दहा ट्रॅक्टर, दोन तीन डंपर, वॉटर टॅकर घेऊन आलेले असून त्यांनी साईटचे समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने आपल्या प्लॉटमध्ये घुसवली आहेत. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले. पोलीसही तेथे आले. तेव्हा तेथे अमित लुंकड याने बरोबरचे लोकांना फिर्यादीला मारण्याच्या धमक्या देऊन इथून तुम्ही निघुन जावा, हा आमचा प्लॉट आहे. त्यावेळी विमाननगरचे पोलीस निरीक्षक आले. त्यांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीमध्ये हत्यारे आहेत, असे म्हटले असता तो गाडीमध्ये बसुन पळून गेला. तसेच त्यांच्या बंदुके नावाच्या वॉचमनला मारहाण केल्यामुळे तो निघुन गेला होता. प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.

पूरमुक्त ‘शिवाजीनगर’साठी ३० कोटींचा निधी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुराचा धोका टाळण्यासाठी औंधमध्ये नाला, ओढ्यालगत सीमा भिंत

पुणे : पावसाळ्यात पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी औंध मधील कचरा, रॅम्प परिसरातील नाला आणि ओढ्यालगत सीमा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी दिली.

येत्या पावसाळ्यात पुणे शहर पूरमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पुण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी छत्रपती शिवाजीनगर मतदार संघासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून हे काम हाती घेतले आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या महत्त्वाच्या कामामुळे पावसाळ्यात होणारी पाण्याची समस्या, पूरस्थिती आणि यातून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. प्रशासनाच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा निर्धार आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी औंधमधील नाला आणि ओढा यांची पहाणी केली. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना ताई छाजेड, नगरसेविका भक्तीताई गायकवाड, मंडल अध्यक्ष आनंद छाजेड, लताताई धायगुडे, गणेश कलापुरे, अभिजीत गायकवाड, वसंता जुनवणे, चोंदे, सागर मदने, सागर परदेशी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये महिलेसोबत आढळलेला पोलिस हवालदार निलंबित

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत आढळल्याने एका पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.निलंबित करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे आहे. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध काळे पडळ पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाची फिर्याद दिली आहे.

कांबळे याच्या वर्तनामुळे शिस्तबद्ध पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध आणि संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस हवालदार हनुमंत कांबळे याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध लपवून ठेवले. पतीने पोलिस असल्याची आणि वर्दीचा धाक दाखवून वेळोवेळी शिवीगाळ केली, मारहाण केली. तसेच घरातून हाकलून देण्याबरोबरच घटस्फोट देण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी महिलेनेही फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

१५ जून २०२६ रोजी फिर्यादीने पती कांबळे याला रात्री फोन केला असता, त्याने कोम्बिंग ड्युटीवर असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील ‘सी डॉक’ या पबमध्ये त्या महिलेसोबत दारू पीत बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर, “मी पोलिस आहे, माझे काही होणार नाही, तू काही करू शकत नाहीस,” असे तो बोलला.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत पती आणि संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दिली.

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा आईवडिलांच्या कष्टातून प्रेरणा घेत परीक्षा दिलेल्या पैकी ८४ % विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.

पुणे- कचरावेचकांच्या मुलामुलींनी १० वी च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून सामाजिक पूर्वग्रह, आर्थिक अडचणी, अभ्यास करायला जागेची कमतरता आणि आसपासचे पोषक नसलेले वातावरण सारख्या आव्हानांना चपखल उत्तर दिले आहे.

परीक्षा दिलेल्या एकूण १९९ विद्यार्थ्यांपैकी १०९ मुलांनी आणि ९० मुलींनी यंदा १० वी ची परीक्षा दिली. यामध्ये शिक्षण अपूर्ण राहिलेल्या ११ जणांनी १७ नंबर फॉर्म भरून जिद्दीने बाह्य स्वरूपात परीक्षा दिली. त्याचबरोबर, ३ कचरावेचकांनी देखील यावर्षी आपले दहावी पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले. सकाळी घरोघरी कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या, कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या स्वच्छ च्या महिला कचरावेचकांनी देखील संस्थेच्या आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या मदतीने मुलांसोबत दहावी देऊन यश मिळवले.

कचरावेचकांच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेतर्फे कचरावेचकांच्या पाल्यांना या महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर आर्थिक सहाय्यासाठी शिष्यवृत्ती, योग्य मार्गदर्शनासाठी शिकवणी, अभ्यास करण्यासाठी व परीक्षेसाठी वह्या व स्टेशनरी सारखी मदत वर्षभरात करण्यात आली. त्याचबरोबर, आता थांबायचं नाय या चित्रपटाचा विशेष शो देखील कचरावेचक व त्यांच्या पाल्यांसाठी संघटनेने आयोजित केला होता. सफाई कामगारांनी दहावी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या या चित्रपटातून अनेकांनी प्रेरणा घेत यंदा दहावीची परीक्षा दिली.

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा या ओळी मुलामुलींनी आपल्या आईवडिलांप्रमाणेच प्रत्यक्षात आणल्या आहेत. शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने आपला पुढचा मार्ग स्वतः घडवण्याच्या प्रवासाची दमदार सुरुवात कचरावेचकांच्या पाल्यांनी या निकालातून केली आहे.

मुलांना शिक्षणात मदत करताना स्वतः १० वी पास केली; स्वच्छ च्या कचरावेचक महिलांची प्रेरणादायी कहाणी
सकाळी घरोघरी जाऊन कचरा घेतला, रात्री जागून अभ्यास केला, स्वच्छ च्या ३ कचरावेचक महिलांनी १० वी पास केली.

नाव: वर्षा ओव्हाळ
गुण: ४६%
मागच्या वर्षी मे महिन्यात संघटनेने आता थांबायचं नाय हा सफाई कामगारांनी सर्व अडचणींवर मात करत १० वी पास केल्याची कहाणी दाखवणाऱ्या चित्रपटाचा विशेष शो कचरावेचकांसाठी आयोजित केला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर वर्षा ओव्हाळांनी निश्चय केला कि यंदा दहावी द्यायची आणि पास व्हायचंच. आपल्या दोन मुलांची पूर्ण जबाबदारी घेणाऱ्या एकल माता असलेल्या वर्षा ताईंनी रात्रशाळेत जाऊन दहावीचा अभ्यास केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कागदपत्रांच्या अभावी परीक्षेस बसता येईल कि नाही अशी शंका असताना, वर्षा ताईंनी जिद्दीने अभ्यास केला आणि ४६% गुण मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.

नाव: ज्योती पंडित
गुण: ४१%
स्वच्छ संस्थेतील कचरावेचक ज्योती अशोक पंडीत SRPF भागातील गावठाण भागात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करतात. याआधी ज्योती पंडित यांचे ७ वी पर्यंतच शिक्षण झालेले होते. २७ वर्षापूर्वी कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. स्वतःच शिक्षण अर्धवट राहिले तरी, आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिकवून उच्च पदावर व प्रशासकीय सेवेत जावे पाठवायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ज्योतीताईंनी आपली मुलगी श्वेता हिचे भारतीय नौसेनेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. तसेच आपल्या दोन्ही मुलांना त्या पोलीस व आर्मी मध्ये भरती होण्यासाठी मदत करत आहेत.

ज्योती ताई सांगतात, “मुलगी श्वेताचे (भारतीय नौसेना दल ) स्वप्न पूर्ण झाले. माझ्या मुलीने माझ्यासाठी स्वप्न पाहिले कि, मी यावर्षी दहावीची परीक्षा द्यावी. आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याने सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म तिनेच भरला. मला आमच्या स्वच्छ संस्था आणि कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत मार्फत मासूम संस्थेच्या रात्रशाळेत प्रवेश मिळाला. यासाठी संघटनेतील अनेकांनी मला अडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केले. आम्हाला दाखवण्यात आलेली शिक्षणावरील फिल्म “आता थांबायचं नाही” हि माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.

सकाळी कचऱ्याचे काम आणि संध्याकाळी शाळा असे माझे नियोजन होते. यासाठी माझ्या दोघ मुलांची व पतीची पण तेवढीच साथ मिळाली, असे ज्योतीताईंनी सांगितले. रात्रशाळेतून येण्यापूर्वी घरातील सर्व गोष्टी त्या आवरून ठेवत असत जेणेकरून अभ्यासाला वेळ मिळेल. या सर्वांच्या सहकार्याने मी आज ४१% मिळवू शकले. पुढे मी पण प्रशासकीय सेवेत जाऊन काम करावे असे स्वप्न असेल. त्या साठी पुढे जिद्दीने शिकणार आहे. आणि सोबत काम पण चालू ठेवणार आहे, अशा भावना ज्योतीताईंनी व्यक्त केल्या.

कचरावेचक आई आणि मुलाची दहावीच्या परीक्षेत यशस्वी भरारी

आईचे नाव: अर्चना घोडके
गुण: ६०%
मुलाचे नाव: यश घोडके
गुण: ५४%

शिक्षणाची आवड आणि मनात जिद्द ठेवून या आई-मुलाच्या जोडीने एकत्र दहावीची तयारी केली आणि दोघेही उत्तीर्ण झाले.

पुण्यातील स्वच्छ संस्थेतील कचरावेचक अर्चना विकास घोडके या SRPF, वानवडी भागात दारोदारी कचरा संकलनाचे काम करतात. २५ वर्षापूर्वी अर्चना यांचे आधी ९ वी पर्यंत शिक्षण झाले होते .परंतु कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु यंदा स्वतःचा मुलगा यश विकास घोडके १० वी ची परीक्षा देणार होता. यशला दहावीच्या तयारीसाठी मदत करणाऱ्या अर्चना ताईंना स्वतःला शिक्षणाची गोडी नव्याने लागली आणि त्यांनी देखील १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा देण्याचे ठरवले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत व स्वच्छ संस्थेमधील सहकाऱ्यांनी शिक्षणासाठी प्रवृत्त केले असे अर्चना ताईंनी सांगितले. मासूम संस्थेच्या रात्र शाळेत प्रवेश घेवून ,सकाळी काम आणि रात्री अभ्यास करत अर्चना यांनी ६० % मिळवून यश संपादन केले आहे. आणि मुलगा यश याने ५४ % मिळवून स्वतःच्या नावाचा अर्थ प्रत्यक्षात उतरवला आहे.

मुलगा यश सांगतो कि ,मी स्वतः अभ्यास करायचो, तेव्हा आईला काही विषयांची अडचण आल्यास समजून सांगायचो आणि आम्ही दोघांनीही कुठला क्लास न लावता घरीच राहून अभ्यास केला. आई कामावरून आल्यावर संध्याकाळी रात्र शाळेत जायची तिथून आल्यावर जे शिकवले आहे ते मला सांगायची. यातून आमची अभ्यासाची गोडी वाढायची. कधी कधी मी झोपून जायचो पण आई अभ्यास करायची त्यामुळे कदाचित आईला माझ्यापेक्षा जास्त टक्के मिळाले असे यशने सांगितले.

कोणताही क्लास न लावता खुशी ने मिळवले ८९%

विद्यार्थ्याचे नाव : खुशी गणेश खुपटे
आईचे नाव: कावेरी खुपटे
गुण : 89%
Mobile: 8459695110
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

मी कोणताही क्लास लावला नाही कारण माझा स्वतःचा स्वतः अभ्यास करण्यावर ठाम विश्वास आहे. माझी आई मला शक्य त्या सर्वप्रकारे माझ्या अभ्यासात मदत करते. आईच्या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने मला आर्थिक मदत केलीच, पण त्याबरोबर अडचणींवर लक्ष केंद्रित न करता माझे मनोबल वाढावे यासाठी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.

मी इतरही सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते कि मोटिव्हेशन व्हिडीओ पाहून मिळत नाही, प्रेरणा आपल्या आत असते जिचा आपण फक्त शोध घ्यायचा असतो.

पाटील इस्टेट, शिवाजीनगर इथे राहणाऱ्या कावेरी खुपटे कागद,काच,पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत. एकल माता असलेल्या कावेरी आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी फिरून कचरा गोळा करण्याचे काम करून सांभाळतात

विद्यार्थ्याचे नाव : सार्थक मेश्राम चंदनशिवे
आईचे नाव: साधना मेश्राम चंदनशिवे
गुण : 86.60%
Mobile: 9881895802
वस्ती – दांडेकर पूल, सिंहगड रोड.

साधना मेश्राम चंदनशिवे या मागील २ वर्षांपासून स्वच्छ संस्थेच्या सभासद आहेत. त्यांचे पती रोजगार पद्धतीने कष्टाची कामे करतात. आपल्या आईवडिलांच्या कष्टांचे चीज करत सार्थकने १० वी मध्ये तो ८६.६०% मिळवले. साधना ताईंचे कुटुंब अगोदर बार्शी या गावी राहत होते आणि दुसऱ्यांच्या शेतात अल्प रोजगारावर मजुरी करत होते. पण भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी चांगले उत्पन्न मिळावे याचा विचार करून त्यांनी गाव सोडले आणि पुण्यामध्ये राहायला आले.

विद्यार्थ्याचे नाव : तनू भारत तरकसे
सभासद नाव : भारत मुकुंद तरकसे
गुण : ८१.८%
Mobile: 7030713870
वस्ती: निगडी ओटा स्कीम, निगडी

तनू अत्यंत हुशार आणि जिद्दी मुलगी आहे. लहानपणापासूनच तिला शिक्षणाची आवड आहे ती तिच्याबरोबर तिच्या लहान भावाचा देखील अभ्यास घेत असते. तिचे वडील भारत तरकसे हे गेल्या ८ वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेचे सभासद आहेत, ते पिंपरी चिंचवड भागात घंटा गाडीवर काम करतात.

वडिलांच्या कष्टाची मला जाणीव आहे आणि मी त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे, त्याकरिता मी खूप अभ्यास करीन आणि स्वप्न साकार करून दाखविन”, अशा भावना तनुने व्यक्त केल्या.

तनू चे वडील सांगतात, “संस्थेने केलेली मदत मौल्यवान आहे, वेळोवेळी केले गेलेले मार्गदर्शन, शैक्षणिक मदत यामुळे तनुच्या यशात खूप मोठा वाटा हा संस्थेचा आहे.”

विद्यार्थ्याचे नाव: सानिका उमेश अडसूळ
सभासद नाव: राणी उमेश अडसूळ
गुण: ७८%
Mobile: 7721809405
वस्ती :- गांधीनगर, पिंपरी

सानिका ने ८ वी पर्यंतचे शिक्षण पिंपरीतील इंटरनॅशन शाळेतून RTE मार्फत पूर्ण केले. परंतु आई ची परिस्थिती नसल्यामुळे तिला तिथून दाखला काढून प्रथमेश इंग्लिश स्कूल नेहरूनगर पिंपरी या ठिकाणी प्रवेश घेतला.

राणी उमेश अडसूळ या गेल्या १० वर्षापासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत.
राणी अडसूळ या एकल माता असून त्यांच्या पतीचे २०१६ साली निधन झाले. त्यानंतर मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी हार न मानता सानिका चे माध्यमिक पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले.सानिका ने अथक प्रयत्न करून १० वी ची परीक्षा दिली त्यात भरघोस यश देखील संपादन केले.

सानिका ११ वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असून ती मेडिकल मध्ये करिअर करायचे आहे असे तिचे स्वप्न आहे. सानिका ला संस्थेमार्फत शैक्षणिक मदत वारंवार करण्यात आली तसेच तिला अतिरिक्त क्लास करिता देखील संस्थेमार्फत मदत करण्यात आली.

विद्यार्थ्याचे नाव – दिव्या विकास शिरसाठ
सभासद नावं – विकास शिरसाठ
गुण – ७५%
मोबाईल नंबर – 9049804881
वस्ती – पाटील इस्टेट, शिवाजीनगर

दिव्याने दहावीच्या परीक्षेची तयारी अत्यंत मेहनतीने आणि सातत्याने केली. ती नियमितपणे घरी अभ्यास करत असे तसेच वर्गात जाऊन अभ्यासातील शंका शिक्षकांना विचारून त्यांचे मार्गदर्शन घेत असे. मोबाईलपासून दूर राहून तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. तिची आजी व वडील दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात.कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या मदतीने तिला दहावीचा क्लास लावण्यात आला, ज्याचा तिच्या अभ्यासाला मोठा फायदा झाला.

आजच्या विद्यार्थ्यांना ती एकच संदेश देते, “मोबाईलचा मर्यादित वापर करा, अभ्यासात सातत्य ठेवा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. मेहनत आणि चिकाटीमुळे यश निश्चित मिळते.”

खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात-टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

नसरापूर –

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (पुणे) येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) व सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दुचाकी क्रमांक एमएच १२ एफएच ४६९६ वरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर आले असता गॅस टँकर क्रमांक एपी ०३ टीई ५७५९ याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वाहने वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली होती.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

केळेवाडी येथील कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्यात डायलेसीस केंद्र व प्रसूतिगृह सुरू करण्याची नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : कोथरूडमधील केळेवाडी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिका संचालित कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्याची नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी पाहणी केली. यावेळी आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्या समवेत दवाखान्यातील विविध आरोग्य सुविधा, उपलब्ध सेवा तसेच आवश्यक विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गेल्या पाच वर्षांपासून प्रशासनाच्या काळात या दवाखान्यात डायलेसीस केंद्र तसेच गरोदर माता-भगिनींसाठी प्रसूतिगृह सुरू करण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत.
यासंदर्भात नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून दवाखान्यात तातडीने डायलेसीस केंद्र आणि प्रसूतिगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. परिसरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता या सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सध्या या दवाखान्यात सामान्य आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. विशेषतः ३० ते ६० वयोगटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि हिमोग्लोबिन तपासणी केली जाते. त्यामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, “प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डायलेसीस केंद्र आणि प्रसूतिगृह सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.”
डायलेसीस केंद्र सुरू झाल्यानंतर किडनीविकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून प्रसूतिगृह सुरू झाल्यास गरोदर माता-भगिनींना परिसरातच सुरक्षित व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
सदर पाहणीदरम्यान डॉ. सुनील आंधळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. आत्माराम काकडे, डॉ. सविता वावरे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

२००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र, पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात: हर्षवर्धन सपकाळ

डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित, डिलिमिटेशनंतरचा नकाशाही आत्ताच तयार.

मुंबई, दि. ८ मे २०२६..

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.