आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

Date:

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत

मातृगौरव न्यास, अखिल मंडई मंडळ, ज्ञानेश्वरी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा मातृगौरव सन्मान सोहळा संपन्न
पुणे : प्रत्येक माणूस हा आपल्या आईसाठी कायमच लहान मूल असतो. त्यामुळे आजचा सन्मान हा मातृत्वाचा सन्मान असून, ती एक प्रकारची पूजाच आहे. मातेला माया शिकवावी लागत नाही; ती उपजतच असते. आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. जगाच्या उत्पत्तीपासूनच मानवजात मातृपूजक आहे. कृतज्ञता दुर्मिळ होत चाललेल्या या काळात मातृगौरव पुरस्कारासारखे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे मत मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

मातृगौरव न्यास, अखिल मंडई मंडळ आणि ज्ञानेश्वरी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या मातृगौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, दत्ता सागरे उपस्थित होते.

कार्यक्रमात शुभांगी शेठ, मालती गिरे, शैलजा पेठकर, लीला रणधीर, जयश्री वडके, मालती दाते, शुभदा ठाकूर, मंदाकिनी वारे, संध्या झरकर, जयश्री टापरे,  उज्वला लवाटे, कीर्ती यार्दी आणि सुचेता देशपांडे या मातांचा सन्मान करण्यात आला. दत्तक मूल घेणारी माता आणि कॅन्सर सारख्या दूर्धर आजाराचा सामना करणाऱ्या मातेचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. 

पराग काळकर म्हणाले, मातृदिन आणि पितृदिन हे आजकाल फक्त मोबाईलच्या डीपीमध्ये दिसतात; प्रत्यक्ष वागण्यात मात्र त्यांचा अभाव जाणवतो. बाहेर जाऊन मुलांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली जातात, पण घरातील संस्कार मात्र वृद्धाश्रमात ठेवले जातात आणि विकतचे संस्कार घरी आणले जातात. फ्लॅट संस्कृती वाढत असताना लोकांची मने संकुचित होत चालली आहेत आणि जन्मदात्रीला घरात स्थान मिळेनासे झाले आहे. आपण कृतीतूनच जन्मदात्यांना विस्थापित करतो, हे आपली मुले पाहत असतात. मातृसत्ताक व्यवस्था आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे,असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद सराफ यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’ : हर्षवर्धन सपकाळ.

देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा...

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...