” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

Date:

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर… विक्रमी कारभार

पुणे- काल महापालिकेच्या सभागृहात झालेल्या मुख्यसभेत ९५ प्रस्ताव फटाफट मंजूर झाल्यावर याकडे आता अनेकांनी वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे .या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर यांनीही ” झिरो पेंडेंसी ” च्या नावाखाली महापालिकेची सभा एक दिवसात संपवणे, किंवा घाईने एकाच सभेत ९५ विषय संपविणे हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले,’ यामुळे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांवर काही चर्चा होत नाही. अधिकाऱ्यांना हेच पाहिजे असते कारण प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये अनेक गोष्टी उघडकीस येतात, वेगवेगळ्या खात्यामध्ये झालेल्या चुका निदर्शनामध्ये येतात आणि जनरल बॉडी मध्ये अधिकाऱ्यांवर माननीय सभासदांचा वचक राहतो. २००२ पर्यंत महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ५ ते ६ होत होत्या आता मात्र एक-दोन सभेत सर्व विषय पत्रिका संपवली जाते. विषय पत्रिका संपवली जाणे हे चांगली प्रथा आहे पण त्याचबरोबर याही गोष्टीचा विचार पक्ष नेत्यांनी करायला हवा. सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या विषयावर महापालिका आयुक्त किंवा इतर वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत असतात आणि काही महत्त्वाचे निर्णय देखील होत असतात. त्यामुळे सर्व साधारण सभा महिन्यात किमान चार ते पाच दिवस चालली पाहिजे असे माझे मत आहे.
अर्थात कोणत्या विषयावर किती वेळ चर्चा करायची, कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे याबाबत पक्षनेते व माननीय महापौर यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा अर्धा तासापेक्षा जास्त असू नये असे नियम सांगतो पण सध्या तीन, साडेतीन तास पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर चर्चा होते हे योग्य नाही, त्यामुळे नियमित प्रश्नांवर चर्चा होत नाही आणि प्रशासनाला नेमके हेच हवे असते.

दरम्यान एक-दोन सभेत सर्व विषय पत्रिका संपवली , भानगड काय ? नवीन नगरसेवकांना विषय समजले काय ?असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा: PM मोदींचे आवाहन, भारतात मोठ्या तेलाच्या विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज

हैद्राबाद/बेंगळूरू -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, आजच्या...

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...